लाइफस्टाइलफॅशन

चंदेरी सिल्क साडी चे नवीन डिझाइन्स, प्रकार आणि महत्वपूर्ण माहिती

Pure chanderi silk saree
Pure chanderi silk saree

Chanderi Silk Saree ही हातमागर बनवलेले  भारतातील सर्वोत्कृष्ट साडी आहे. चंदेरी हे नाव या फॅब्रिकला मध्य प्रदेश राज्यामधील चंदेरी या गावाच्या नावावरून देण्यात आलेले आहे.  या साड्यांवरील नक्षीकाम हे निसर्ग प्रेरित असतात. चंदेरी साड्या त्यांच्या नाजूक पोत, चमक आणि अवघड विणकामासाठी प्रसिद्ध आहेत. चंदेरी फॅब्रिक हे अतिशय हलके असल्यामुळे ते उष्ण हवामानामध्ये देखील वापरता येऊ शकते.

best chanderi saree

शुद्ध चंदेरी सिल्कपासून बनवलेल्या साड्या त्यांच्या उत्कृष्ट चमक आणि भव्य सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहेत, तर चंदेरी कॉटन पासून बनवलेल्या साड्या वजनाने हलक्या, मऊ आणि उठवदार असल्यामुळे त्या लोकप्रिय आहेत. उत्कृष्ट चंदेरी कॉटन आणि रेशीम नेहमी पारंपारिक ताना आणि वेफ्ट्स वापरून हाताने तयार केले जातात, त्यानंतर सुंदर असे चंदेरी फॅब्रिक तयार होते.

भारतात तीन वेगवेगळ्या प्रकारच्या चंदेरी साडीचे उत्पादन केले जाते

1. चंदेरी सिल्क साडी | Chanderi Silk Saree

चंदेरी सिल्क साडी हा प्रमुख प्रकार आहे, जरीच्या बॉर्डरसह रेशीम एकत्र करून कारागीर पारंपारिक पद्धतीने हाताने विणकाम करून ही साडी तयार केली जाते.

chanderi silk saree

2. चंदेरी कॉटन साडी | Chanderi Cotton Saree

चंदेरी कॉटन साडी ही मध्य प्रदेशमधील चंदेरी शहरामध्ये कारागीर पारंपारिक पद्धतीने कॉटन आणि जरीचा वापर करून तयार करतात .

awesome chanderi cotton saree

3. चंदेरी कॉटन सिल्क साडी | Chanderi Cotton Silk saree

चंदेरी कॉटन सिल्क साडी चंदेरीतील कुशल कारागिर कॉटन आणि सिल्कच्या मिश्रण करून तयार करतात. ती तिच्या चमक आणि उच्च प्रत यामुळे प्रसिद्ध आहे.

unique chanderi cotton silk saree

चंदेरी सिल्क साडी चा इतिहास

  • पारंपारिक कथेनुसार भगवान श्रीकृष्णाचा चुलत भाऊ शिशुपाल याने या चंदेरी कापडाची सुरवात वैदिक कालखंडात केली होती.
  • मुघल काळामध्ये या कापडाची मोठ्या प्रमाणात प्रशंसा केली गेली. राजघराण्यांतील महिलांची विशेष पसंती या चंदेरी कापडाला होती.
  • 1350 मध्ये झाशीतील कोष्टी विणकर चंदेरी येथे स्थलांतरित होऊन तेथे स्थायिक झाले. तेथे त्यांनी विनकामाला सुरुवात केली.
  • 1890 च्या दरम्यान या फॅब्रिकच्या उत्क्रांतीला सुरुवात झाली. चंदेरी येथील कारागीरांनी हँडस्पन यार्नच्या ऐवजी गिरणी मध्ये तयार केलेले धागे वापरण्यास सुरुवात केली.
  • 1930 च्या दरम्यान कारागिरांनी कापसाच्या साड्यांमधील रॅपच्या जागी जपानी सिल्क वापरण्यास सुरुवात केली त्यामुळे चंदेरी सिल्क अस्तित्वात आले.
  • एक वेळ अशी होती की या मौल्यवान कापडाचा लोकांना विसर देखील पडला होता. परंतु काही नामांकित ब्रँड ने या फॅब्रिकवर अतिशय मेहनत करून वेगवेगळे डिझाईन तयार केले आणि या फॅब्रिक ला पुन्हा जीवनदान दिले.
चंदेरी सिल्क साडी
chanderi silk saree

चंदेरी सिल्क साडीची खास वैशिष्ट्ये

  • फक्त शुद्ध चांदी आणि सोन्याच्या धाग्यांनी केले जाणारे उत्कृष्ट आणि अवघड जरी काम हे चंदेरी साडीचे वैशिष्ट्य आहे. विशेषतः साडीच्या बॉर्डर वरती आणि पल्लू वरती जरी काम केले जाते.
  • या कापडाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे हे पारदर्शक फॅब्रिक आहे. जे अगदी हलके आहे. विणकामात सोन्या-चांदीच्या जरीमुळे चंदेरी साड्या भव्य आणि अत्याधुनिक दिसतात.
  • यामध्ये ताना फायबर उच्च दर्जाचा असतो, त्यामुळे त्या वरती केलेले जरी चे विणकाम अतिशय सुंदर तयार होते.  या साडी वरती फुले, पारंपरिक नाणी, मोर आणि भौमितिक रचना पारंपारिक चंदेरी पद्धतीने बनवले जातात.
  • चंदेरी साड्या बनवण्यासाठी सिल्क, कॉटन आणि कॉटन सिल्कसह अनेक साहित्य वापरले जातात. या साड्या वापरण्यासाठी अगदी हलक्या असल्यामुळे त्या भारतामधील उष्ण हवामानासाठी योग्य आहेत.
  • साडीच्या विणकामानुसार आपण ही साडी नियमित किंवा विशेष प्रसंगी घालू शकतो. कॉटन चंदेरी साड्या दैनंदिन किंवा व्यावसायिक वापरासाठी अतिशय उत्तम आहेत. पूजा, विवाहसोहळा आणिइतर महत्त्वाच्या समारंभांसाठी आणि उठवदार दिसण्यासाठी तुम्ही सिल्क किंवा कॉटन सिल्कने विणलेली साडीची निवड करू शकतात.
  • चंदेरी पट्टू साड्या सध्या बाजारात सर्वाधिक लोकप्रिय आणि सर्वाधिक मागणी असलेल्या साड्या आहेत. सोन्याच्या धाग्याने तयार केलेल्या आणि नाजूक विणलेल्या डिझाईन्स हे चंदेरी सिल्क फॅब्रिकचा रुबाब वाढवतो. या साड्या मध्य प्रदेशातील पारंपारिक कारागीर तसेच उच्च फॅशन डिझायनर्सनी बनवल्या आहेत.
  • बदलत्या काळात वस्त्र उद्योगातील वाढत्या क्रांतीमुळे यापासून वेगवेगळे प्रोडक्ट्स देखील तयार केले जाऊ लागले. त्यामध्ये टॉप, ड्रेस, दुपट्टा, इंडो वेस्टर्न, शर्ट, कुर्ती इत्यादी.. तसेच घरातील सुशोभीकरणासाठी देखील या फॅब्रिकचा वापर केला जाऊ लागला उदाहरणार्थ- पडदे, उशी कव्हर..
red chanderi silk saree
Red Chanderi Silk Saree

शुद्ध चंदेरी साडी कशी ओळखायची?

खालील सूचना तुम्हाला अस्सल चंदेरी साडी ओळखण्यात मदत करतील:

  • साडीची सत्यता पडताळणारा हातमागाचा शिक्का किंवा हातमाग टॅग सर्व अस्सल चंदेरी साड्यांवर असतो. शिवाय, GI (जिओग्राफिक इंडिकेशन) टॅग बघा, ज्यामध्ये साडी कुठे तयार केली जाते याची संपूर्ण माहिती दिलेली असते.
  • शुद्ध चंदेरी साड्यांमध्ये पारंपारिक पेस्ले, फुलांचा आणि मोरांचे विणकाम असते आणि हे नक्षीकाम हाताने विणले जाते.
  • हातमागवरती विणलेल्या चंदेरी साडीचा पृष्ठभाग एकसारखा नसतो. चंदेरी वेफ्ट धागा हा कॉटन आहे, जो सामान्यत: इतर कोणत्याही कापडामध्ये वापरला जात नाही, तर ताना धागा हा डिगम्ड मलबेरी रेशीम आहे.
  • या साड्यांवरती बुट्टी आणि विविध नक्षीकाम हे हाताने बनवले जातात. सोने, तांबे आणि चांदीच्या जरी मध्ये हे नक्षीकाम तयार केले जाते.
pure chanderi saree
Pure Chanderi Saree

चंदेरी सिल्क साडीची काळजी कशी घ्यायची?

  • या साड्यांवरील जरी वर्क मुळे शक्यतो यांना ड्रायक्लिनच करावे. हे फॅब्रिक शक्यतो सावलीमध्येच सुकवावे अगदी सूर्यप्रकाशामध्ये ठेवू नये. 
  • या साड्यांना हलकी इस्त्री करावी.
  • या साड्यांवरती डायरेक्टर परफ्युम किंवा डीओड्रंट चा वापर टाळावा, त्याचा परिणाम जरीच्या शाईन वर होऊ शकतो.
  • अधून मधून या साड्यांची घडी बदलावी.
black chanderi silk saree
ब्लॅक चंदेरी सिल्क साडी

चंदेरी सिल्क साडीची किंमत किती असते?

अस्सल चंदेरी रेशमी साडीची किंमत रेशमाची गुणवत्ता, नक्षीकाम आणि ब्रँड किंवा विणकराची मेहनत यासारख्या अनेक घटकांवर अवलंबून बदलू शकते. साधारणपणे, अस्सल चंदेरी रेशमी साडीची किंमत भारतात Rs.6000 पासून ते 1 लाख रुपयांपर्यंत असू शकते.

जरी बॉर्डर असलेली चंदेरी सिल्क साडी

जरी बॉर्डर ही साडीमध्ये सोन्याचे किंवा चांदीचे धातूचे धागे वापरून तयार केलेले विणकाम असते. यामुळे साडीची सुदंरता वाढते, लग्न आणि सण यांसारख्या महत्त्वाच्या प्रसंगी या साडीला अतिशय मागणी असते.

आपण चंदेरी रेशीम धुवू शकतो का? | Can we wash Chanderi silk?

चंदेरी सिल्क साडीवरती सोन्याच्या आणि चांदीच्या जरीच्या धाग्यांनी विणकाम केलेले असते. जर ही साडी घरी धुतली तर साडीची जरी खराब होऊ शकते आणि साडीची चमक देखील कमी होऊ शकते. त्यामुळे शक्यतो चंदेरी सिल्क साडीला ड्रायक्लीनच करावे.

हे सुद्धा वाचा :-

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

फॅशनलाइफस्टाइल

Yoga Clothes Information : महिलांना वर्क आऊट साठी योग्य कपडे का महत्त्वाचे आहेत? जाणून घ्या पूर्ण माहिती

जिम मध्ये जाणे, योगाभ्यास करणे, धावणे किंवा उच्च स्थरावरील जिम ट्रेनिंग मध्ये...

garba dress
फॅशनलाइफस्टाइल

नवरात्रीचा पोशाख : ९ रंगाचे महत्व

नवरात्री, भारतातील सर्वात आनंदी सणांपैकी एक आहे. वाईटावर चांगल्याच्या विजयाचा उत्सव आहे...

silk Fabric
लाइफस्टाइलफॅशन

सिल्क ( रेशीम )आणि सिल्क साड्यांबद्दल माहिती

आपण सर्व भारतीय महिला विशेष प्रसंगी सिल्कच्या साड्या परिधान करतो, परंतु या...

pure handmade kashmiri silk saree
लाइफस्टाइलफॅशन

काश्मिरी सिल्क साडी

काश्मिरी सिल्क साडी त्यांच्या सुंदर आणि आलिशान रेशीमच्या गुणवत्तेसाठी खास ओळखल्या जातात....