ऑर्गेन्झा सिल्क साडी (Organza silk saree) हे एक पारंपारिक भारतीय वस्त्र आहे. ही साडी वजनाने एकदम हलकी, निखळ आणि अगदी पारदर्शक असते. ऑर्गेन्झा हे पातळ, कुरकुरीत आणि कडक फॅब्रिक आहे जे रेशीम, पॉलिस्टर किंवा दोन्हीच्या मिश्रणापासून बनवले जाते.
ऑर्गेन्झा साड्या लग्नसमारंभ, पार्टी, उत्सव, धार्मिक कार्यक्रम अशा विविध महत्वाच्या ठिकाणी परिधान केल्या जातात. अप्रतिम हस्तकला, पारदर्शकता आणि चमक यामुळे ही साडी अतिशय लोकप्रिय आहे. आणि सध्या ती फारच ट्रेंड मध्ये आहे. चला तर मग या साडी बद्दल जाणून घेऊया काही महत्वाच्या गोष्टी.
ऑर्गेन्झा सिल्क साडी चा इतिहास | History of Organza Silk Saree
ऑर्गेन्झा साड्यांचा इतिहास भारतातील मुघल काळापासून सापडतो. असे मानले जाते की ऑर्गेन्झा फॅब्रिक प्रथम मुघलांनी भारतात आणले होते. आणि त्या काळामध्ये फक्त श्रीमंत व्यक्तींकडेच हे वस्त्र असायचे. उत्तम गुणवत्तेमुळे ऑर्गेन्झा फॅब्रिक श्रीमंतीसाठी ओळखले जात होते.
ऑर्गेन्झा फॅब्रिक पारंपारिकपणे रेशीम पासून बनवले जाते आणि या साड्या अर्धपारदर्शकता, चमक आणि नाजूक पोत या साठी प्रसिद्ध होत्या. या साडीवरती सहसा जरीचे काम, भरतकाम आणि मणी काम केले जाते.
भारतीय स्त्रिया कालांतराने विवाहसोहळा आणि धार्मिक उत्सव या सारख्या महत्त्वाच्या कार्यक्रमांसाठी ऑर्गेन्झा सिल्क साडी घालू लागल्या. त्यांच्या सौंदर्यामुळे या साड्या अत्यंत मौल्यवान ठरतात. या साड्या कौटुंबिक वारसा म्हणून देखील दिल्या जातात.
या साड्या आजही भारतातील आणि जगभरातील महिलांच्या आवडत्या आहेत. आधुनिक ऑर्गेन्झा साड्या पारंपारिक रेशीम आणि पॉलिस्टर किंवा नायलॉनच्या धाग्यांपासून बनवल्या जातात.
ऑर्गेन्झा सिल्क साडी ची वैशिष्ट्ये | Characteristics of organza silk saree
- ऑर्गेन्झा साडी पातळ, वजनाने खूपच हलकी आणि निखळ असते. त्यामुळे ही साडी अगदी पारदर्शक असते.
- ऑर्गेन्झा साड्या कडक असतात ज्यामुळे त्यांना परिधान आणि स्टाईल करणे सोपे होते. या गुणवत्तेमुळे साडी अधिक सुंदर दिसते.
- ऑर्गेन्झा साड्यांना एक सूक्ष्म चमक असते, ज्यामुळे त्यांना एक मोहक लुक मिळतो.
- या साड्यांवरती भरतकाम, जरी वर्क, सिक्विन, मणी किंवा लेस असे विविध नक्षीकाम केलेले असते.
- नाजूक रचना असूनही, ऑर्गेन्झा साड्या वापरण्यासाठी अगदी आरामदायक असतात. हलके फॅब्रिक असल्यामुळे उबदार हवामानासाठी उत्तम असतात.
ऑर्गेन्झा सिल्क साडी चे प्रकार | Types of organza silk saree
ऑर्गेन्झा साड्या विविध प्रकारामध्ये उपलब्ध आहेत. ऑर्गेन्झा साडीचे काही खालील लोकप्रिय प्रकार येथे आहेत
- प्लेन ऑर्गेन्झा साडी – या साड्या शुद्ध ऑर्गेन्झा सिल्क फॅब्रिक पासून बनवल्या जातात. या साडीवरती कुठल्याही प्रकारचे नक्षीकाम नसते. तरीही साडी अतिशय सुंदर आणि मोहक दिसते.
- एम्ब्रॉयडरी ऑर्गेन्झा साडी – या साड्यांवर धाग्यांचे विणकाम, मणी किंवा स्टोन्स वापरून साडी वरती विणकाम केले जाते. हे विणकाम विविध डिझाईन्स मध्ये तयार केले जाते. यामध्ये बहुतेकदा फुले पक्षी आणि विविध आकृत्यांचा देखील समावेश असतो.
- प्रिंटेड ऑर्गेन्झा साडी – ब्लॉक प्रिंटिंग, स्क्रीन प्रिंटिंग किंवा डिजिटल प्रिंटिंग यांसारख्या तंत्रांचा वापर करून या साड्या तयार केल्या जातात. या साड्यांवरील सर्व डिझाइन्स प्रिंट केलेल्या असतात.
- जरी वर्क ऑर्गेन्झा साडी – या प्रकारच्या साडीवरती जरी वर्क केले जाते, सोन्याच्या किंवा चांदीच्या जरीच्या धाग्यांनी या साड्यांवरती विणकाम केले जाते. या मध्ये विविध नक्षीकामामध्ये जरी काम केलेले असते.
- हाफ – हाफ ऑर्गेन्झा साडी – या साड्या दोन वेगवेगळ्या प्रकारच्या फॅब्रिकपासून तयार केल्या जातात. यामध्ये ऑर्गेन्झा आणि सिल्क धागे एकत्र करून साडी तयार केली जाते. त्यामुळे या साड्यांना मोहक लुक प्राप्त होतो.
- मिरर वर्क ऑर्गेन्झा साडी – या प्रकारच्या सीडीवरती छोट्या-छोट्या आरश्याच्या तुकड्यानी नक्षीकाम तयार केले जाते. हे आरशाचे तुकडे ऑर्गेन्झा फॅब्रिकवर शिवले जातात. त्यामुळे साडीला चमकदार लुक येतो.
- ओम्ब्रे ऑर्गेन्झा साडी – या मध्ये साडी एका रंगातून दुस-या रंगात हळूहळू फिकट होत जाते, ज्यामुळे एक आश्चर्यकारक कलर इफेक्ट तयार होतो.
ऑर्गेन्झा सिल्क साडी विणण्याची पद्धत | Organza silk saree Weaving Method
- ऑर्गेन्झा साड्या पारंपारिक विणकाम पद्धतीचा वापर करून बनविल्या जातात. या पद्धतीमध्ये मेकॅनिकल लूम वापरले जाते जे कापडावर डिझाइन आणि पॅटर्न तयार करतात.
- विणकामाची सुरुवात सूत तयार करण्यापासून होते. ऑर्गेन्झा साडी साठी वापरण्यात येणारे धागे हे सहसा रेशीम, कापूस किंवा कृत्रिम असतात. त्यानंतर हे धागे रंगवले जातात.
- हे तयार केलेले धागे लूम वरती सेट केले जातात.
- साडीवरती तयार करायचे नक्षीकाम आधी कार्ड वरती पंच केले जाते आणि हे कार्ड लूम वरती सेट केले जातात. पंच केलेले कार्ड लूमच्या हालचालीवर नियंत्रण ठेवतात, ज्यामुळे डिझाईन्स फॅब्रिकमध्ये विणल्या जातात. आणि साडीवरती सुंदर डिझाइन तयार केली जाते.
- विणकाम पूर्ण झाल्यावर, फॅब्रिक लूममधून कापले जाते. साडीमध्ये काही त्रुटि असेल तर साडी धुतली जाते. नंतर सुकवली जाते आणि इस्त्री केली जाते जेणेकरून साडी मऊ होते.
शुद्ध ऑर्गेन्झा साडी कशी ओळखायची | How to Identify pure Organza silk saree
- सिंथेटिक ऑर्गेन्झा पेक्षा ऑर्गेन्झा सिल्कमध्ये कुरकुरीत आणि कडक पोत असतो. हे किंचित खडबडीत असते आणि जेव्हा ते हलते तेव्हा एक खडबडीत आवाज येतो.
- या साडीच्या विणकाम पद्धतीमुळे ही साडी चमकदार आणि पारदर्शक तयार होते. साडीची पारदर्शकता चेक करण्यासाठी तुम्ही साडीला प्रकाशा च्या दिशेने धरुन चेक करू शकता.
- हातमागावरील ऑर्गेन्झा सिल्क साड्यांच्या विणकामात बर्याचदा लहान अनियमितता असतात, जसे की स्लब किंवा नॉट्स, हे फक्त हातमागावरती बनवलेल्या साड्यांवरती असतात.
- तुमच्याकडे फॅब्रिकचा छोटा तुकडा असेल तर तुम्ही बर्न टेस्ट करू शकता. अस्सल रेशीम हळूहळू जळते आणि जळलेल्या केसांसारखा वास येतो, तर सिंथेटिक कापड वितळतात आणि जळणाऱ्या प्लास्टिकसारखा वास येतो.
- प्युअर सिल्क मार्क तपासा, साडीला लेबल असल्यास, “100% शुद्ध सिल्क” किंवा “ऑर्गेन्झा सिल्क” असे शब्द शोधा.
ऑर्गेन्झा साडी ची किंमत | Organza saree price
ऑर्गेन्झा साडीची किंमत अनेक घटकांवर अवलंबून असते, वापरलेल्या रेशमाची गुणवत्ता, विणकाम किंवा भरतकाम या सर्व गोष्टींवर अवलंबून असते
ऑर्गेन्झा साडीची किंमत 3000 रुपयांपासून 1 लाख रुपयांपर्यंत असू शकते. सिम्पल ऑर्गेन्झा साडी ची किंमत सुमारे रु. 3000 – 5000. तसेच, जरी किंवा धाग्याचे काम असलेली नक्षीदार ऑर्गेन्झा साडीची किंमत रु. 50,000 इतकी असू शकते किंवा त्याहूनही अधिक असू शकते, तसेच या साड्यांची किंमत कारागिरी आणि डिझाइनवर देखील अवलंबून असते.
ऑर्गेन्झा सिल्क साडीवरील दागिने | Jewelry on Organza silk saree
- मोत्याचे दागिने : मोत्याचे दागिने एक उत्कृष्ट निवड आहे जे कोणत्याही पोषाखाची सुंदरता वाढवते. एक साधा मोत्यांचा हार किंवा स्टड कानातले ऑर्गेन्झा सिल्क साडीवरतीअतिशय शोभून दिसतात.
- सोन्याचे दागिने : सोन्याचे दागिने हा एक छान पर्याय आहे जो ऑर्गेन्झा सिल्कसह विविध प्रकारच्या साड्यांवर देखील वापरले जाऊ शकतात. पेंडेंट असलेली सोन्याची साखळी उत्तम अत्याधुनिक लुक देते.
- कुंदन ज्वेलरी : कुंदन ज्वेलरी हे लग्न आणि रिसेप्शन साठी योग्य आहे. कुंदनचा हार, कानातले, अंगठ्या सिल्कच्या साडीला ग्लॅमरचा स्पर्श देतात.
ऑर्गेन्झा सिल्क साडी मधील कलर | Color in orange silk saree
- पेस्टल रंग : बेबी पिंक, मिंट ग्रीन, ब्लू आणि लॅव्हेंडरसारख्या पेस्टल शेड्स ऑर्गेन्झा साड्यांमधील सुंदर कलर आहेत. हे रंग एक हलके लुक देतात जे दिवसाच्या कार्यक्रमांसाठी उत्तम असतात.
- ठळक रंग : लाल, रॉयल ब्ल्यू, पन्ना हिरवा आणि गडद जांभळा यासारखे ठळक रंग संध्याकाळच्या कार्यक्रमांसाठी उत्तम पर्याय आहेत.
- जरी चे कलर : सोने, चांदी आणि कांस्य यांसारख्या जरीकाम ऑर्गेन्झा साडीला रीच लुक देतात. हे रंग लग्न आणि रिसेप्शन यांसारख्या संध्याकाळच्या कार्यक्रमांसाठी योग्य असतात.
- पांढरी ऑर्गेन्झा साडी : पांढऱ्या ऑर्गेन्झा साडीमध्ये फ्रेश आणि बोल्ड लुक मिळतो.
- काळी ऑर्गेन्झा साडी : काळी ऑर्गेन्झा साडी अत्याधुनिक आणि मोहक लुक देते.
- पिवळी ऑर्गेन्झा साडी : पिवळा हा एक सकारात्मक आणि आनंदी रंग आहे जो विवाहसोहळा, धार्मिक समारंभ आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांसारख्या ठिकाणी बरयाचदा वापरला जातो. पिवळ्या साड्या शुभ मानल्या जातात आणि नववधू (bride) लग्ना समारंभात परिधान करतात.
ॲमेझॉन वर ऑर्गेन्झा साडी | Organza saree on amazon
Amazon हा एक लोकप्रिय ऑनलाइन मार्केटप्लेस आहे जे ऑर्गेन्झा साड्यांसह विविध प्रकारच्या इतर प्रॉडक्ट साठी ओळखले जाते. खरेदी करण्याआधी, विक्रेत्याचे रिटर्न पॉलिसी आणि शिपिंग माहिती तपासुन घ्यावी. जेणेकरून तुम्हाला उत्तम प्रॉडक्ट भेटेल.
लग्नासाठी ऑर्गेन्झा साडी | Organza saree for wedding
- विवाहसोहळ्यासाठी ऑर्गेन्झा साडी हा एक छान पर्याय आहे. लग्नासाठी ऑर्गेन्झा साडी निवडताना रंग आणि साडीवरील डिझाइन अशा अनेक गोष्टींचा विचार केला पाहिजे.
- लग्नाच्या साड्या लाल, मरून, गुलाबी आणि सोनेरी यासारख्या पारंपारिक रंगांमध्ये असतात. त्यामुळे तुम्हाला जो रंग आवडेल आणि सूट होईल असा रंग निवड.
- एम्ब्रॉयडरी, सिक्विन किंवा स्टोन वर्क यासारख्या वर्क असलेल्या ऑर्गेन्झा साड्या तुमच्या लग्नाच्या लुकमध्ये ग्लॅमर वाढवेल.
- तुमचा वेडिंग लुक पूर्ण करण्यासाठी स्टेटमेंट ज्वेलरी, क्लच आणि उंच सॅंडल यासारख्या योग्य ॲक्सेसरीज निवडा.
ऑर्गेन्झा कुठे बनवला जातो? | Where Is Organza Made?
बहुतेक रेशीम कपड्यांप्रमाणे, रेशीम ऑर्गेन्झा फॅब्रिकची उत्पत्ती चीनमध्ये झाली, जिथे प्रथम रेशीम लागवड केली गेली.
चीन आजही ऑर्गन्झाचा सर्वात मोठा उत्पादक आणि निर्यातदार आहे. भारत देखील ऑर्गन्झा चा एक मोठा निर्यातदार आहे, जिथे बंगळुरू प्रदेशात ऑर्गेन्झा तयार केला जातो. फ्रान्स आणि इटली अतिशय उच्च दर्जाचे ऑर्गेन्झा तयार करतात.
हे सुद्धा वाचा :-
Leave a comment