मराठी लेख

NMACC च्या माध्यमातून संपूर्ण विश्व बघणार आता भारताची संस्कृती – नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर

नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर
नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर

2023 मध्ये नीता अंबानी यांचे कल्चर क्लब चे स्वप्न पूर्ण, आता भारतातील कला क्षेत्रातील लोक दाखवू शकतात आपल्या जुन्या पारंपारिक कला.

NMACC- नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर हे देशाची आर्थिक राजधानी मुंबई येथे वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स मधील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये स्थापन करण्यात आले आहे. 30 मार्च रामनवमीच्या दिवशी अंबानी कुटुंबीयांनी NMACC च्या उद्घाटनासाठी पूजा आयोजित केली होती.

या पूजेमध्ये घरातील सर्व उपस्थित होते. 31 मार्च 2023 शुक्रवारी या सेंटरचे उद्घाटन करण्यात आले आहे. या उद्घाटनाचा भव्य दिव्य कार्यक्रम हा तीन दिवस चालू होता. या उद्घाटन सोहळ्यामध्ये अनेक दिग्गज मंडळी, कलाकार, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती आणि धर्मगुरू उपस्थित होते.

नीता मुकेश अंबानी कल्चर सेंटरमध्ये 4 मजल्याचा भव्य प्रदर्शन हॉल आहे. आणि तीन थिएटर आहेत. हे सर्व अत्याधुनिक पद्धती मध्ये तयार केलेले आहे.

नीता मुकेश अंबानी या एक बिजनेस वुमन, स्पोर्ट लीडर, रिलायन्स फाउंडेशन च्या चेअर पर्सन आहेत, तसेच लहान मुलांसाठी एक कमिटेड टीचर देखील आहेत.

Nita Mukesh Ambani Cultural Center
नीता मुकेश अंबानी कल्चर सेंटरचे मुंबईमध्ये उद्घाटन झाले

NMACC चे उद्दिष्ट | Objective of NMACC

नीता अंबानी यांना भारतीय कला क्षेत्रातील व्यक्तींसाठी एक प्लॅटफॉर्म तयार करायचे होते. असे प्लॅटफॉर्म जिथे भारतामधील जुन्या पारंपारिक कला लोकांपुढे मांडता येतील. यामध्ये शास्त्रीय संगीत, नृत्य, विणकाम, भारतीय साड्यांचे विणकाम, भारतातील मूर्तिकला, नाटक, चित्रकारी हे सर्व आणि अजूनही बरेच काही प्रकार यात समाविष्ट आहेत. 

नीता अंबानी यांच्या मते हे एक असे केंद्र बनवायचे आहे की तिथे कला, संस्कृती आणि ज्ञान या त्रिवेणीचा संगम एकाच ठिकाणी होईल. आपल्या भारतातील अभूतपूर्व परंपरेचा ठेवा जपण्यासाठी भारतातील या पारंपारिक कला संपूर्ण जगासमोर आणण्यासाठी नीता अंबानी यांनी हे सेंटर निर्माण केले आहे. भारतीय कलांचे जतन आणि त्यांचे संवर्धन करणे हे या सेंटरचे मुख्य उदिष्ट आहे.

तसेच जगभरातील लोकांना या सेंटरमध्ये आकर्षित करून भारतीय कलांचे जगभरातील लोकांपर्यंत महत्त्व पोहोचवण्यासाठी या सेंटरची निर्मिती करण्यात आली आहे.

NMACC हे नीता मुकेश अंबानी यांचे एक स्वप्न होते, जे नीता अंबानी आणि त्यांची मुलगी इशा यांनी सत्त्यात उतरवले आहे. नीता अंबानी यांना लहानपणापासूनच कलेची फार आवड होती. नीता अंबानी एक प्रशिक्षित क्लासिकल डान्सर आहेत. सहा वर्षाच्या असतानाच त्यांनी कल्चरल डान्स मध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. त्यांची ती आवड त्यांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनत गेला आणि त्यांना त्याबद्दल अधिक आवड निर्माण होत गेली.

त्यानंतर त्यांनी या कलेला प्रोत्साहन देणे आणि संरक्षित करण्यासाठी स्वतःला समर्पित केले, तसेच भारतातील कला आणि शिल्प पुनर्जीवीत करणे यासाठीही त्यांचे मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. 

NMACC मधील सुविधा | Facilities at NMACC

नीता मुकेश अंबानी कल्चर सेंटरमध्ये 3 हायटेक स्टुडिओ अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेले आहेत. द ग्रँड थिएटर, द स्टुडिओ थिएटर आणि द क्यूब हे सर्व खाजगी स्क्रीनिंग आणि उत्तेजक संभाषणांपासून ते बहुभाषिक प्रोग्रामिंग आणि आंतरराष्ट्रीय निर्मितीपर्यंत विविध प्रकारचे अनुभव सामावून घेण्यासाठी बांधले गेले. NMACC च्या आत तीन थिएटर आणि 16000 चौरस फूट प्रदर्शनाची जागा उपलब्ध आहे.

द ग्रँड थिएटर | The Grand Theatre

NitaMukesh Ambani Cultural Center-The Grand Theater
 द ग्रँड थिएटर-यात 2000 लोक बसू शकतात आणि 18 डायमंड बॉक्स आहेत. सहाय्यक ऐकण्याची साधने, इंटिग्रेटेड डॉल्बी ॲटमॉस सराउंड साउंड सिस्टम, प्रवेशयोग्य थिएटर.

स्टुडिओ थिएटर | Studio Theatre

studio theater in Nita Mukesh Ambani Cultural Center
स्टुडिओ थिएटरमध्ये 250 आसन क्षमता आहे आणि त्यात लवचिक स्टेज, एक एकीकृत डॉल्बी ॲटमॉस सराउंड साउंड सिस्टम, LEDs द्वारे समर्थित थिएटरल लाइटिंग आणि सहाय्यक ऐकण्याची उपकरणे आहेत.

आर्ट हाऊस | Art House

Art House in Nita Mukesh Ambani Cultural Center
कोकिला धीरूभाई अंबानी यांनी “संगम” या 4 मजली आर्ट हाऊसचे उद्घाटन केले, ज्यामध्ये 5 भारतीय आणि 5 परदेशी कलाकारांच्या 50 कलाकृती आणि प्रतिष्ठापनांचा समावेश आहे. भारतातील वैविध्यपूर्ण संस्कृती आणि परंपरा दर्शविणारे अनोखे प्रदर्शन.

द क्यूब | The Cube

The cube Hall in Nita Mukesh Ambani Cultural Center
नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमधील द क्यूब अत्याधुनिक सुविधांनी तयार केलेले आहे. 125 आसन क्षमता डायनामिक्स थिएटर. स्टेज आणि आसन, 5G कनेक्टिव्हिटी.

धीरूभाई अंबानी स्क्वेअर | Dhirubhai Ambani Square

Dhirubhai Ambani Squre-Nita Mukesh Ambani Cultural Center
नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमधील भव्य धीरूभाई अंबानी स्क्वेअर

कार्यक्रमासाठी उपस्थित भारतीय व जगभरातील पाहुणे | the guest

नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमात देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध व्यक्तींचा समावेश होता. त्यामध्ये सलमान खान, सोनम कपूर, अनुपम खेर, जावेद अख्तर, शबाना आझमी, सुनील शेट्टी, शाहिद कपूर, विद्या बालन, सुपरस्टार रजनीकांत, आमिर खान, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, प्रियांका चोप्रा, वरुण धवन, भारत्नरत सचिन तेंडुलकर, सानिया मिर्झा, राजू हिरानी, तुषार कपूर, दिया मिर्झा, श्रद्धा कपूर आणि श्रेया घोषाल यांसारख्या दिग्गज बॉलीवूड सेलिब्रिटींनी देखील हजेरी लावली.

हॉलीवुड सुपरस्टार टॉम हॉलंड (Spider-Man), गिगी हदीद आणि एम्मा चेंबरलेन यांसारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या मॉडेल्सही उपस्थित होत्या. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि स्मृती इराणी हे राजकारणी देखील सहभागी झाले होते. सद्गुरु जग्गी वासुदेव, स्वामी नारायण आदेशाचे राधानाथ स्वामी, रमेश भाई ओझा आणि स्वामी गौर गोपाल दास यांसारखे आध्यात्मिक अधिकारी देखील कार्यक्रमाला उपस्थित होते.

देशातील प्रत्येकाला निमंत्रण देण्यात आले होते. येथे भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची झलक पाहण्यासाठी दर्शक nmacc.com किंवा BookMyShow वर तिकीट आरक्षित करू शकतात. खास वैशिष्ट्य म्हणजे नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये मुले, विद्यार्थी, ज्येष्ठ आणि दिव्यांगांसाठी प्रवेश विनामूल्य आहे.

” नीता अंबानी यांनी NMACC संदर्भात सांगितले, ज्याचे वर्णन त्यांनी “भारतीय कलांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी आमची वचनबद्धता” असे केले. मला आशा आहे की आमच्या जागृत प्रतिभेची जोपासना केली जाईल आणि भारत आणि जगभरातील लोकांना प्रेरणा मिळेल.”

नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचा पत्ता | Address of Nita Mukesh Ambani Cultural Centre

Jio World Centre, G Block, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai, Maharashtra 400098

हे सुद्धा वाचा :-

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Traditional Sankranti Haldi Kunku Ceremony with Turmeric and Vermilion
मराठी लेख

हळदी कुंकू चे महत्व आणि हा समारंभ का साजरा केला जातो? | Importance of Haldi Kunku and why we celebrate it

आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हळदी कुंकू (Haldi Kunku) साजरे करण्याला अनन्य साधारण महत्त्व...

People celebrating Makar Sankranti in traditional Marathi attire.
मराठी लेख

मकर संक्रांत म्हणजे काय? ती का साजरी केली जाते? | Why celebrate makar sankranti?

मकर संक्रांत (makar sankranti) हा प्रेम संवर्धनाचा सण. नवीन वर्षाच्या जानेवारी महिन्यात...

paithani manufacturer
मराठी लेख

पैठणी साडी कशी तयार केली जाते हे माहित नसेल तर हे नक्की वाचा!

paithani saree कुशल कारागीर हाताने विणतात (weaving) त्यामुळे ती प्रसिद्द आहे, हे...

फॅशन डिझायनर | Top 10 fashion designers in India
मराठी लेख

भारतातील टॉप 10 फॅशन डिझायनर | Top 10 fashion designers in india

भारतामधील काही टॉप फॅशन डिझायनर्स बद्दल आपण या ठिकाणी माहिती जाणून घेऊया....