लाइफस्टाइलफॅशन

म्हैसूर सिल्क साडी | कर्नाटक सिल्क इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन लिमिटेड (KSIC)

mysour silk saree
yellow green pure mysour silk saree

म्हैसूर सिल्क साडी (Mysore Silk Saree) चे उत्पादन कर्नाटक राज्यामधील म्हैसूर या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात घेतले जाते. म्हैसूर हे शहर म्हैसूर सिल्क साठी प्रसिद्ध आहे. कर्नाटक सिल्क इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन लिमिटेड (KSIC) म्हैसूर सिल्कचे उत्पादन करते. देशातील तुती रेशीम उत्पादनापैकी 45% तुती रेशीम उत्पादन हे कर्नाटक राज्यामध्ये घेतले जाते.

KSIC हे म्हैसूर सिल्क ब्रँड चे मालक आहे. कर्नाटक मधील रेशीम उत्पादन हे KSIC च्याअंतर्गत पेटंट नोंदणी कृत उत्पादन आहे.

म्हैसूर सिल्क साडी चा इतिहास | History of Mysore Silk Sarees

टिपू सुलतानाच्या कारकिर्दीमध्ये रेशीम उद्योगाच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. टिपू सुलतानने 1780 ते 1790 इसवी पर्यंत म्हैसूर राज्यावर राज्य केले. नंतर जेव्हा जागतिक अर्थव्यवस्था कोलमडली तेव्हा आयातित रेशीम आणि रेयॉनशी स्पर्धा करणे भाग पडले. 20 व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये रेशिम उत्पादनाचे पुनरुज्जीवन झाले आणि म्हैसूर राज्य भारतातील मल्टीव्होल्टाइन रेशीम उत्पादक बनले.

कर्नाटक सिल्क इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन लिमिटेड (KSIC) म्हैसूर रेशीम चे उत्पादन करते. म्हैसूरचा राजा श्री नलवाडी कृष्णराजा वोडेयार यांनी 1912 मध्ये या सिल्क उत्पादन कारखान्याची स्थापना केली.

प्रथम राजघराण्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांच्या सशस्त्र दलांना सजावटीचे वस्त्र प्रदान करण्यासाठी रेशमी कापडांची निर्मिती आणि पुरवठा या कारखान्याद्वारे करण्यात येत असे. त्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर म्हैसूर राज्य रेशीम विभाग सरकारने रेशीम विणकाम कारखाना ताब्यात घेतला.

हा कारखाना KSIC या कर्नाटक सरकारी उपक्रमाला 1980 मध्ये देण्यात आला होता. आज या कारखान्यांमध्ये सिल्क साड्या, शर्ट, कुर्ते, रेशमी धोती आणि नेकटाई इत्यादींचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जात आहे. म्हैसूर सिल्कला भौगोलिक स्थानदर्शक (GI) म्हणून देखील ओळख मिळाली आहे. 

 म्हैसूर सिल्क साडी
हातमागावरती विणलेली अस्सल म्हैसूर सिल्क साडी

म्हैसूर सिल्क साडीचे प्रकार | Types of Mysore Silk Saree

  • प्युअर म्हैसूर रेशीम साडी | Pure Mysore Silk Saree
  • प्युअर म्हैसूर जरी रेशीम साडी | Pure Zari Mysore Silk Sarees
  • म्हैसूर जॉर्जेट साडी | Mysore Georgette Sarees
  • म्हैसूर शिफॉन साडी | Mysore Chiffon Sarees
  • सेमी म्हैसूर रेशीम साडी | Semi Mysore Silk Saree
  • म्हैसूर क्रेप साडी | Mysore Crepe Silk Saree

म्हैसूर सिल्क बद्दल महत्त्वाची माहिती | Important Information about Mysore silk

कर्नाटकातील रामनगर जिल्हा, जो रेशीम कोकूनसाठी आशियातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. कर्नाटक मधील विविध भागातील शेतकरी दररोज येथे रेशीम कोकून विकतात. दररोज, सरकारी बोली प्रक्रियेचा एक भाग म्हणून म्हैसूर रेशमाची माहिती असलेल्या KSIC अधिकार्‍यांकडून या मार्केटमध्ये रेशम कोकून मॅन्युअली निवडले जातात आणि टी. नरसीपुरा येथील कच्च्या रेशीम उत्पादन कारखान्यात पाठवले जातात.

या कारखान्यामध्ये कोकून उकळवून त्याचे रेशीम धागे काढले जातात आणि एका थ्रेड रोलमध्ये गुंडाळले जातात. त्यानंतर तयार केलेले हे सिल्क म्हैसूरमधील विणकाम उद्योगांना पोहोचविण्यात येते. त्यानंतर या रेशमा पासून विविध प्रकारचे सिल्कचे प्रॉडक्ट तयार केले जातात.

साडीवरील विणकाम | Weaving on sarees

handmade mysour silk saree

म्हैसूर सिल्क साड्या हातमागावरती विणल्या जातात. विणकामामध्ये रेशमाबरोबर सोने आणि चांदीच्या जरीचा वापर केला जातो.

साडीवरील उत्कृष्ट विणकाम या साडीचा विशेष आकर्षणाचा भाग ठरतो. तसेच या साड्यांमध्ये जरी चे विणकाम आकर्षक दिसण्यासाठी योग्य कलरची निवड केली जाते. जरी आणि कलर यांच्या योग्य रंगसंगतीमुळे विणलेली सिल्क साडी ही अतिशय सुंदर तयार होते.

हातमागावर तयार केल्यामुळे आणि प्युअर सिल्क आणि सोन्या-चांदीच्या जरीच्या वापरामुळे या साड्या महाग असतात. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकाला  साडी खरेदी करणे शक्य होत नाही. या साड्यांच्या वाढत्या मागणीमुळे बाजारामध्ये कमी किंमतीत सेमी म्हैसूर सिल्क साड्या देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत.

त्यामुळे KSIC ने साड्यांवर अस्सल सिल्क साडीचा लोगो प्रिंट केलेला आहे. ज्यामुळे सामान्य ग्राहकांची प्युअर सिल्क साडी खरेदी करण्यासाठी फसवणूक होणार नाही.

pure mysour silk saree
green pure mysour silk saree

प्युअर म्हैसूर सिल्क साडी कशी ओळखायची | How to identify a pure Mysore silk saree

  • या साडीवरती थोडेसे पाणी टाका. जर साडीने पाणी शोषले नाही तर ती प्युअर सिल्क साडी आहे असे समजावे. आणि जर साडीने पाणी शोषले तर ती प्युअर सिल्क साडी नाही असे समजावे. 
  • अस्सल रेशीम साडी तपासण्यासाठी आपण “बर्निंग टेस्ट” करू शकतो. शुद्ध रेशमी साड्यांची ताना आणि वेफ्ट दोन्ही प्युअर रेशमाच्या धाग्यांपासून तयार केलेले असतात. त्यामुळे या साडीचे थोडेसे धागे जाळून बघावे आणि त्याचा वास जळालेल्या केसांसारखा आला तर समजावे ती प्युअर सिल्क साडी आहे.
  • या साड्यांवरील हॉलमार्क चेक करावा. शुद्ध रेशीम हॉलमार्क हे फक्त अस्सल रेशीम साड्या उत्पादन करणाऱ्या विक्रेत्यांकडेच उपलब्ध असतात.
pure mysour silk saree
yellow and red pure mysour silk saree

म्हैसूर  सिल्क साड्यांची काळजी कशी घ्यायची | How to care for Mysore silk sarees

  • सिल्कच्या साड्या लोकर, कागद प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये ठेवू नका. प्लॅस्टिक कव्हर्स असल्यामुळे पिशवीच्या आत ओलावा तयार होतो. ज्यामुळे सिल्क साडीची रेशीम आणि जरी खराब होते. त्यामुळे या साड्या नेहमी स्वच्छ, मऊ कापडामध्ये गुंडाळून ठेवा.
  • या साड्यांना हलक्या हाताने पाण्यात स्वच्छ करू शकतो. शक्य असल्यास या साड्यांना नेहमी ड्रायक्लीनच करावे. 
  • वर्षातून किमान दोनदा या साड्यांना जरावेळ सूर्य प्रकाशामध्ये ठेवावे. त्यामुळे या साड्यांमधील आद्रता निघून जाईल.
  • या साड्यांवरती डायरेक्ट परफ्युम किंवा डिओड्रंटचा वापर करू नका.

प्युअर म्हैसूर सिल्क साडीची किंमत | Pure Mysore Silk Saree Price

  • प्युअर सिल्क साडीची किंमत साडीवर केलेल्या सोन्याच्या आणि चांदीच्या जरीच्या विनकामावरती अवलंबून असते.
  • प्लेन म्हैसूर सिल्क साडीची किंमत ही कमीत कमी 4000 रु. पासून सुरू होते. 6.3 मीटर (ब्लाउज पीससह) त्यानंतर साडीवरील जसजसे विणकाम वाढते तस तसे साडी ची किंमत देखील वाढत जाते.
  • फॅब्रिकच्या गुणवत्तेवर देखील या साड्यांची किंमत ठरवली जाते. तसेच आपण कुठल्या विक्रेत्याकडे साडी खरेदी करत आहोत त्यावर देखील साडीची किंमत ठरवली जाते.
  • ज्या विक्रेत्याला सिल्क साडीचा हॉलमार्क प्राप्त आहे अशाच विक्रेत्याकडे आपण मैसूर सिल्क साडी खरेदी करावी ज्यामुळे आपली फसवणूक होणार नाही.

म्हैसूर सिल्क साडी धुता येते का? | Can Mysore silk sarees be washed?

म्हैसूर सिल्क साड्या सौम्य शांपूच्या पाण्यामध्ये धुवाव्या. अगदी हलक्या हाताने साडी पाण्यामध्ये हळूहळू स्वच्छ करावी. ज्यामुळे साडीच्या जरीवरती आणि विणकामावरती काही परिणाम होणार नाही.

आपण म्हैसूर सिल्क साडी इस्त्री करू शकतो का? | Can we iron mysore silk saree?

म्हैसूर सिल्क साडीला इस्त्री करताना इस्त्री चे तापमान हे कमी किंवा मध्यम ठेवावे. दोन कॉटनच्या कपड्यांमध्ये ही साडी ठेवून मग तिला इस्त्री करावी.

हे सुद्धा वाचा :-

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

silk Fabric
लाइफस्टाइलफॅशन

सिल्क ( रेशीम )आणि सिल्क साड्यांबद्दल माहिती

आपण सर्व भारतीय महिला विशेष प्रसंगी सिल्कच्या साड्या परिधान करतो, परंतु या...

pure handmade kashmiri silk saree
लाइफस्टाइलफॅशन

काश्मिरी सिल्क साडी

काश्मिरी सिल्क साडी त्यांच्या सुंदर आणि आलिशान रेशीमच्या गुणवत्तेसाठी खास ओळखल्या जातात....

wedding outfit ideas for womens
फॅशनलाइफस्टाइल

लग्नामध्ये कुठला पोशाख घालावा याचा विचार करताय का? इथे आहेत महिलांसाठी काही भन्नाट कल्पना

लग्नामध्ये कुठला पोशाख घालावा? हा प्रश्न तर सर्वांनाच पडलेला असतो. आपल्या भारतीय...

konrad silk saree
लाइफस्टाइलफॅशन

दक्षिण भारतातील टेम्पल साडी – कोनराड सिल्क साडी | Konrad Silk Saree

कोनराड सिल्क साडी, ही साडी भारतातील सर्वात सुंदर साड्यांपैकी एक साडी आहे....