पटोला सिल्क साड्या (Patola Saree) ह्या भारतामधील गुजरात राज्यातील पाटण या शहरामध्ये तयार केल्या जातात. पटोला रेशीम साडी ही एक प्रकारची पारंपारिक हातमागावरती विणलेली भारतीय रेशीम साडी आहे. या साडीला “पाटण पटोला” साडी असेही म्हणतात. पटोला हे अनेकवचनी नाव आहे. या साडीचे एकवचनी नाव पटोलू हे आहे.
पटोला साड्या डबल इकत तंत्राचा वापर करून तयार केल्या जातात. पटोला साडीवरील विणकाम आणि रंगसंगतीमुळे साड्या विशेष आकर्षक दिसतात आणि म्हणूनच या साड्या अतिशय जगप्रसिद्ध बनल्या आहेत. आणि प्रत्येक लग्न-सोहळा, पूजा-विधि, पारंपारिक कार्यक्रमांसारख्या विशेष प्रसंगी परिधान केल्या जातात.
पटोला सिल्क साडी चा इतिहास | History of Patola Silk Saree
- पाटण पटोला साडीच्या विनकामाच्या या कला 850 वर्षांहून अधिक जुन्या आहेत. पटोला साडी चे विणकरांचे वंशज हे महाराष्ट्रीयन होते. महाराष्ट्रातील जालन्यामधील साळवी समाजाचे विणकर हे पटोला विणण्यात कुशल होते. या साळवी समाजाच्या विणकारांनी आपल्या विणकाम उद्योगासाठी 12 व्या शतकामध्ये गुजरात राज्यामध्ये स्थलांतर केले.
- गुजरात मधील सोळंकी (चौलूक्य) राजपुत हे पाटण, संपूर्ण गुजरात, दक्षिण राजस्थान, मालवा या भागांवर राज्य करत होते. सोळंकी यांचे संरक्षण मिळवण्याच्या हेतूने साळवी विनकर गुजरातमध्ये त्यांच्या आश्रयाला गेले. सोळंकी साम्राज्याचा राजा कुमारपाल रोज पूजेसाठी नवीन वस्त्र परिधान करत असे. त्याने 700 पेक्षा जास्त विणकर महाराष्ट्रातून गुजरातला बोलावले. त्यानंतर सोळंकी साम्राज्याच्या ऱ्हासानंतर साळवींनी गुजरातमध्ये आपला व्यापार समृद्ध केला.
- काही इतिहासकारांच्या मते पटोला साडी वरील नक्षीकाम हे अजिंठा लेण्यांवर देखील बघायला भेटतात, जी पटोला साडीच्या टाय-डाय तंत्रासारखी दिसते.
- या साडीचा उल्लेख पौराणिक कथा रामायण आणि नरसिंह पुराण मध्ये देखील बघायला भेटतो. राजा जनक यांनी मुलगी सीता हिला पटोला साडी भेट म्हणून दिली होती. तसेच नरसिंह पुराण या धार्मिक ग्रंथात देखील या पटोला साडीचा उल्लेख आला आहे.
- गुजरात मध्ये आता फक्त तीनच परिवार पाटण पटोला साड्या विणतात.
पटोला साडी बद्दल महत्त्वाच्या गोष्टी | Important Things About Patola Saree
- पडी पटोले भात, फाटे पण फिटे नाही – गुजरात मधील या म्हणीनुसार पटोला साडी फाटते, पण तिचा रंग आणि डिझाइन हजारो वर्षे टिकते.
- पटोला साड्या शुद्ध रेशमापासून तयार केल्या जातात, या साड्या त्यांच्या चमकदार आणि मुलायम पोतसाठी ओळखल्या जातात. पटोला साड्या तयार करण्यासाठी उच्च दर्जाच्या रेशमाचा वापर केला जातो.
- पटोला डिझाईन्समध्ये बहुधा फुले, प्राणी, पक्षी आणि भौमितिक आकार यासारखे नक्षीकाम असतात.
- पारंपारिक पटोला साडीच्या डिझाईन्समध्ये अनेकदा डायमंड, चौकोनी आणि गोलाकार नक्षीकाम तयार केलेले असतात.
- जुन्या पारंपारिक साड्या फक्त कल्पनाशक्तीवर तयार केल्या जात असे.
- या साडीचे वजन कमीत कमी 500 ते 600 ग्रॅम इतके असू शकते. या साड्या तयार करण्यासाठी कॉटन, सिल्क, सोन्याची आणि चांदीची जरी वापरली जाते. पटोला कापडाची किंमत 2000 रुपये / मिटर इतकी आहे.
- लॅक्मे फॅशन वीकमध्ये पटोला साड्या रॅम्पवर होत्या.
- या साड्या तयार करण्यासाठी प्रचंड कौशल्य आणि अचूकता आवश्यक असते.
- वनस्पती, खनिजे आणि कीटकांसह विविध स्त्रोतांपासून बनवलेल्या नैसर्गिक रंगांचा वापर या साड्या तयार करण्यासाठी केला जातो.
- या साड्या भौगोलिक स्थानदर्शक (GI) प्रमाणित आहे. या साड्यांमध्ये 8 ते 10 डिजाइन्स अव्हेलेबल असतात.
- एका पटोला साडीची वयोमर्यादा 300 वर्षे इतकी असू शकते.
- पाटणमधील अनेक विणकर आणि कारागीर पारंपारिक तंत्रे टिकवून, शाश्वत पद्धतींचा वापर करून आणि आधुनिक अभिरुची आणि प्राधान्यांशी जुळवून घेऊन पटोला साड्यांना पुनरुज्जीवित आणि प्रोत्साहन देण्यासाठी काम करत आहेत.
पटोला साडीचे प्रकार | Types of Patola Sarees
1. राजकोट पटोला
राजकोट पटोला ही सिंगल इकत विणकाम पद्धतीने तयार केली जाते ज्या उभ्या कलर केलेल्या असतात. या साड्या पारंपारिक आहेत आणि सर्वसामान्य ग्राहकाला परवडणाऱ्या आहेत.
2. पाटण पटोला
पाटण पटोला ही दुहेरी इकत विणकाम पद्धत आहे. ज्या आडव्या कलर केलेल्या असतात. ही मॅट सिल्क साडी आहे. प्युअर साडीला शेवटी ब्लाउज नसते, ही साडी दोन्ही बाजूला सारखीच दिसते.
पटोला साडी विणण्याची पद्धत | Patola Saree Weaving Method
- पटोला साडी दुहेरी-इकत तंत्राचा वापर करून हाताने विणल्या जातात, साडी तयार करण्यासाठी प्रथम सूत बांधण्यासाठी आणि रंगविण्यासाठी चिन्हांकित केले जाते.
- त्यानंतर प्रत्येक धागा पाण्यात बुडवला जातो आणि दाब देऊन घट्ट बांधला जातो.
- नियोजित डिझाईन्सनुसार प्रक्रियेदरम्यान प्रत्येक साडीवर 4 – 5 वेळा सूत आणि डाईंगचे विभाजन केले जाते.
- प्रत्येक तानाचा धागा मास्किंग करून वारंवार बांधला जातो आणि रंगवला जातो आणि साडीच्या पॅटर्नमध्ये वेगळे केले जातात.
- तानाचे धागे रंगवल्यावर सोडल्यानंतर धागे मोकळे होऊन पसरतात.
- नमुन्यानुसार एकच रंगाचे ताना यार्नची मांडणी केली जाते, एकेरी रंगाचे धागे एका बाजूने मांडलेले असल्याने कारागिरांना पॅटर्नचे विणकाम कसे करायचे ते लक्षात येते. त्यामुळे त्याला विणकाम करण्यास सोपे जाते.
- पटोला साडीच्या विणकामासाठी वापरल्या जाणार्या लूम्स कलते ( तिरके ) असतात. संपूर्ण सेट- अप करण्यासाठी आणि विणकाम करताना एका पेक्षा जास्त व्यक्तींची मदत लागते. विणलेल्या डिझाइनची अचूकता निश्चित करण्यासाठी गणितीय अचूकता वापरली जाते.
- साडीच्या किचकट विणकाम पद्धतीमुळे ही साडी पूर्ण होण्यासाठी सुमारे 6 महिने ते 3 वर्षे लागू शकतात. तसेच साडी वरील विणकामाचे प्रमाण किती आहे यावर देखील साडी तयार होण्याचा कालावधी ठरतो.
- पटोला साडीच्या फॅब्रिकमध्ये दोन्ही बाजूंनी एकसारखेच नक्षीकाम असते. आणि ते पूर्णपणे भूमितीच्या निर्मितीवर आधारित आहे.
- एका दिवसात फक्त 4 ते 6 इंच फॅब्रिक विणले जाते आणि कारागीर अचूक विणकाम सुनिश्चित करण्यासाठी यार्नच्या जुळणीची तपासणी करतात.
पाटण पटोला साडीची किंमत | Patan Patola Saree Price
- सिंगल इकत पाटण पटोला साडीची किंमत 12 हजार पासून सुरू होते.
- प्युअर पटोला साड्या तयार करण्यासाठी लागणारी मेहनत, विणकाम पद्धत, त्यावरील डिझाईन आणि लागणारा वेळ यामुळे या साड्या अतिशय महाग असतात.
- सावधगिरीने विणलेल्या भौगोलिक रचनांमुळे प्युअर पटोला सिल्क साडीची किमान किंमत सुमारे 1.5 लाखांपासून ते 2 लाखांपर्यंत असू शकते.
- साडीवरील विणकाम यावरती देखील साडीची किंमत ठरते. तसेच साडी मधील विणकामामध्ये वापरलेल्या सोन्याच्या आणि चांदीच्या जरीवर देखील या साडीची किंमत ठरवली जाते.
प्युअर पाटण पटोला साडी कशी ओळखायची | How to Identify a Pure Patan Patola Saree
- प्युअर पटोला साडी इतकी मऊ असते की ती अंगठी मधून सहज बाहेर निघते.
- अस्सल पटोला साडी दोन्ही बाजूने एकसारखीच दिसते.
- प्युअर पटोला साडी वजनाला अतिशय हलकी असते.
पटोला सिल्क साडी वरती दागिने | Jewellery on Patola saree
- सोन्याचे दागिने – पटोला साडी वरती सोन्याचे नेकलेस किंवा हार, झुमके आणि बांगड्या असलेला सेट निवडू शकता. जे तुमचे सौंदर्य वाढवेल.
- चांदीचे दागिने – चांदीचे दागिने साडीच्या कलरमध्ये एक सुंदर कॉन्ट्रास्ट लुक देतात.
- कुंदन ज्वेलरी – उत्कृष्ट डिझाईन्स आणि स्टोन्स असलेले कुंदनचे दागिने पाटण पटोला साडीला ग्लॅमरस लुक देतात. कुंदनचा हार आणि कानातले निवडा ज्यात तुमच्या साडीच्या रंगांशी जुळणारे स्टोन्स असतील.
- पोल्की ज्वेलरी – पोल्की दागिने तुम्हाला शाही लुक देतात. पोल्की नेकलेस किंवा कानातले पाटण पटोला साडीची सुंदरता वाढवतात.
- टेम्पल ज्वेलरी – या दागिन्यांवरती भारतातील मंदिरांमधील डिझाइन्स असतात. पाटण पटोला साडीच्या उत्कृष्ट डिझाईनवर हे दागिने अतिशय सुंदर दिसतात.
- मीनाकरी दागिने – मीनाकरी दागिन्यांवरती रंगीबेरंगी इनॅमल वर्क असते, साडीच्या कलर शी जुळणारे मीनाकरी कानातले किंवा बांगड्या निवडा.
- मोत्याचे दागिने – मोत्याचे दागिने परंपरेबरोबर आधुनिकतेची देखील जोड देतात, त्यामुळे या साड्यांवरती मोत्याचे दागिने उत्कृष्ट निवड ठरेल.
पटोला साड्या इतक्या महाग का असतात?
पटोला साड्यांच्या विणकामासाठी 6 महिने ते 3 वर्षे इतका कालावधी लागतो. तसेच या साड्यांवरील विणकाम हे अत्यंत किचकट आहे, त्यामुळे या साड्या अतिशय महाग असतात.
इकत आणि पटोला यात काय फरक आहे?
इकत साडीमध्ये फॅब्रिक डिझाइन आणि विणकाम दुहेरी इकत साडीसारखे स्पष्ट दिसत नाही. पटोला साड्यांमध्ये फॅब्रिक डिझाइन आणि इतर विणकाम स्पष्टपणे दिसते.
हे सुद्धा वाचा :-
Leave a comment