नीता अंबानी भारतीय अब्जाधीश मुकेश अंबानी यांच्या पत्नी आणि रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा, त्यांच्या फॅशनमधील उत्कृष्ट निवड आणि त्यांच्या महागड्या साड्यांच्या संग्रहासाठी ओळखल्या जातात. नीता अंबानी अनेकदा विविध इव्हेंट्स आणि फंक्शन्समध्ये डिझायनर साड्या परिधान करताना दिसतात. नीता अंबानी यांचे साडीचे कलेक्शन नेहमीच चर्चेत असते.
नीता यांच्या साडीच्या संग्रहाविषयीची विशिष्ट माहिती सार्वजनिकरित्या उपलब्ध नसली तरी, हे सर्वांनाच माहित आहे की नीता अंबानी यांनी प्रसिद्ध भारतीय डिझायनर्स जसे की सब्यसाची मुखर्जी, मनीष मल्होत्रा आणि अबू जानी, संदीप खोसला यांच्या साड्या परिधान केल्या आहेत. या डिझायनर साड्या त्यांच्या उत्कृष्ट भरतकाम, आलिशान फॅब्रिक्स आणि अनोख्या डिझाईन्ससाठी ओळखल्या जातात, ज्यामुळे त्या महाग असतात.
35 महीला कारागिरांनी काम केलेली नीता अंबानी यांची सर्वात महाग साडी

नीता अंबानी यांच्याकडे जगातील सर्वात महागडी साडी आहे. 35 महीला कारागिरांनी या साडीवरती हाताने विनकाम केलेले आहे. या साडीवरती सोन्याच्या तारेचे विणकाम केलेले आहे. आणि तसेच महागडे माणिक, पन्ना, पुखराज, मोती या महागड्या रत्नांनी या साडीला सजवले गेले आहे. या साडीची किंमत तब्बल 40 लाख रुपये एवढी आहे. या साडीची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंद करण्यात आलेली आहे.
या साडीचा विशेष आकर्षणाचा भाग होता तो या साडीवरील ब्लाऊज. या साडी वरती जे ब्लाऊज होते त्याच्या पाठीमागच्या भागावर भगवान श्रीकृष्णाचे नक्षीकाम तयार केलेले होते. या साडीला विवाह पट्टू साडी असे म्हणतात. ही भारतातील चेन्नई मधील एक प्रसिद्ध साडीचा प्रकार आहे. चेन्नई सिल्कचे संचालक शिवलिंगम यांच्या मार्गदर्शनाने ही साडी तयार करण्यात आली होती.
एक्ट्रेसच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमामधील चिकनकारी वर्क साडी
बॉलीवूडमधील फेमस एक्ट्रेस सोनम कपूर हिच्या पोस्ट वेडिंग फंक्शन मध्ये नीता अंबानी यांनी फॅशन डिजाइनर अबू जानी-संदीप खोसला यांनी डिझाईन केलेली चिकनकारी वर्क साडी परिधान केली होती. या साडी मधील त्यांचा लुक अतिशय सुंदर दिसत होता.

मुलाच्या लग्नामधील म्युझिकल पार्टीतील डिझायनर साडी

नीता यांनी मुलगा आकाश आणि श्लोका यांच्या लग्नामधील म्युझिकल पार्टीमध्ये एक अतिशय सुंदर डिझायनर साडी परिधान केली होती. ही साडी फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जी यांनी डिझाईन केलेली होती. या साडीचा रंग गुलाबी आणि दोन शेडमध्ये होता. या साडी वरती गोल्डन एम्ब्रोईडरी केलेली होती आणि बॉर्डर वरती हेवी गोटा वर्क केलेला होता.
NMACC इव्हेंट मधील सब्यसाची गोल्ड सिक्विन साडी

नीता यांनी NMACC च्या ग्रँड थिएटरच्या कार्यक्रमामध्ये गोल्डन टोनच्या सिक्वीन्सने सुशोभित केलेली सब्यसाची टुल्ले साडी आणि हाताने विनकाम केलेला सोन्याच्या बुटी वर्कमध्ये काळा ब्लाउज परिधान केलेला होता.
राधिका मर्चंटच्या अरंगेत्रम कार्यक्रमातील साडी

राधिका मर्चंटचे अरंगेत्रम या कार्यक्रमामध्ये नेता अंबानी यांनी ऑरेंज कलरची सुंदर रेशमी पैठणी परिधान केलेली होती. अरंगेत्रम म्हणजे क्लासिकल डान्सर कोर्स पूर्ण झाल्यानंतर स्टेज वर पहिल्यांदाच परफॉर्म करतो त्या कार्यक्रमाला अरंगेत्रम म्हणतात.
NMACC च्या ओपनिंग कार्यक्रमामधील बनारसी साडी
मुंबईमध्ये सुरू केलेल्या NMACC च्या ओपनिंग कार्यक्रमाच्या वेळी नीता यांनी ब्लू कलरची सुंदर अशी हँडमेड बनारसी सिल्क साडी परिधान केली होती. त्यामधील त्यांचा लुक अतिशय सुंदर दिसत होता.

नीता अंबानी यांनी नेसलेली गोल्डन कांजीवरम साडी
नीता अंबानी यांनी 31 ऑक्टोबर रोजी मुंबईतील जिओ वर्ल्ड प्लाझाच्या उद्घाटनाच्या वेळी पारंपारिक कांजीवरम साडी नेसल्या होत्या. सोनेरी साडी घातलेल्या नीता अंबानीचा एक नवीन फोटो शेअर करण्यात आला होता, या साडीमध्ये त्या अतिशय सुदंर दिसत होत्या.

सिल्वर कलर ची सुंदर हॅन्डमेड कांजीवरम साडी
1 ते 3 मार्च 2024 ला अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाह पूर्व सोहळ्यामध्ये नीता अंबानी यांनी डिझाईनर मनीष मल्होत्रा यांच्या द्वारे डिझाईन केलेली सिल्वर कलर ची सुंदर हॅन्डमेड कांजीवरम साडी परिधान केलेली होती.

नीता अंबानी यांच्या साडीवरील १०२ प्रकारच्या कांचीपुरम डिझाइन्स साडी
६ मार्च रोजी जामनगर (गुजरात) येथे अनंत आणि राधिका यांच्या विवाहापूर्वीच्या सोहळ्याचा भाग म्हणून रिलायन्सच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी डिनरचे आयोजन केले होते. या कार्यक्रमामध्ये अंबानी परिवारातील सर्व सदस्य हजार होते. विशेष आकर्षण होते ते नीता अंबानी यांनी परिधान केलेली रेड कलर मधील कांजीवरम साडी. हि कांजीवरम साडी कारागिरांनी हाताने विणलेली होती आणि या साडीवरती १०२ प्रकारच्या कांचीपुरम साडीवरील डिझाइन्स तयार केलेल्या होत्या.

हे सुद्धा वाचा :-
Leave a comment