cotton sarees या कॉटनच्या फॅब्रिक पासून बनवलेल्या साड्या आहेत. कॉटनच्या फॅब्रिक पासून विविध प्रकारचे कपडे बनवले जातात. त्यामध्ये साडी, कुर्ती, शर्ट या सर्वांचा समावेश आहे. कॉटन फॅब्रिक पासून बनवलेले सर्व कपडे अगदी आरामदायी, मऊ आणि वापरण्यासाठी एकदम हलके असतात. अतिशय गरम वातावरणामध्ये हे कॉटनचे कपडे उत्तम पर्याय असतो.
भारतामधील बऱ्याचशा महिला कॉटन साडीला किंवा कॉटन पासून बनवलेल्या कपड्यांना विशेष प्राधान्य देतात. कॉटन हे नैसर्गिक फायबर असल्यामुळे त्यापासून बनवलेले कपडे हे उबदार आणि उष्णकटिबंधीय हवामानात वापरले जाते.
या कॉटन पासून बनवलेल्या साड्या आपण विविध कार्यक्रमांमध्ये किंवा ऑफिस साठी देखील परिधान करू शकतो.
कॉटन साड्या कशा बनवल्या जातात? | How are Cotton Sarees Made?
कॉटन साडी ही कापूस या नैसर्गिक फॅब्रिक पासून तयार केली जाते. या कापसाचे रूपांतर प्रथम बारीक धाग्यामध्ये केले जाते. हे धागे त्यानंतर रीळ मध्ये गुंडाळे जातात. हे रीळ मशीनला लावले जाते आणि त्यापासून आपल्याला कॉटनची साडी तयार होऊन भेटते.
कॉटन साडी चे प्रकार | Types of Cotton Sarees
- माहेश्वरी कॉटन साडी
- जामदानी कॉटन साडी
- चंदेरी कॉटन साडी
- कोटा डोरिया कॉटन साडी
- संबळपुरी कॉटन साडी
- हॅण्डलूम कॉटन साडी
- खादी कॉटन साडी
- साऊथ इंडियन कॉटन साडी
कॉटनची साडी घरी कशी धुवावी ? | How to Wash Cotton Saree at Home?
- या कॉटनच्या साड्या आपण हाताने घरच्या घरी स्वच्छ धुवू शकतो.
- अगदी हलक्या हाताने या साडीला धुवावे त्यामुळे साडीच्या फॅब्रिकवर जास्त परिणाम होत नाही .
- साडीचा कलर जाऊ नये म्हणून आपण या साड्या मिठाच्या पाण्यामध्ये जरा वेळ भिजवत ठेवून मग त्यांना स्वच्छ करावे.
- त्यानंतर स्वच्छ पाण्यामध्ये धुवून साडी सावलीमध्ये सुकवायला ठेवावी ज्यामुळे साडीचा कलर जाणार नाही.
- कॉटन साड्यांना शक्यतो इस्त्री चा वापर करावा.
कॉटन साडी जास्त कडक असेल तर काय करावे ? | What to do if the Cotton Saree is too Stiff?
- काही कॉटनच्या साड्या खूप कडक असतात. ज्यामुळे त्या व्यवस्थित नेसता येत नाही.
- कॉटनच्या साडीमध्ये जास्त कडकपणा असेल तर साडी मऊ होण्यासाठी अर्धा कप डिस्टिल्ड व्हाईट व्हिनेगर थंड पाण्याच्या बादलीत घाला आणि त्यात साडी 30 मिनिटे भिजवा.
- त्यानंतर साध्या पाण्यामध्ये साडीला स्वच्छ धुऊन घ्यावी आणि सावलीमध्ये सुकवायची.
- साडी सुकवल्यानंतर साडीला इस्त्री करायची. यामुळे साडीचा कडकपणा निघून जातो आणि कॉटनची साडी अगदी मऊ होते.
कॉटन साडी लुक | Cotton Saree Look.
- शक्यतो साध्या कॉटन साड्यांवरती अति जास्त दागिने चांगले दिसत नाही, यासाठी आपण हातामध्ये बांगडी, गळ्यामध्ये छानसा सिम्पल हार आणि कानामध्ये नॉर्मल साईज मध्ये कानातले वापरू शकतो.
- कॉटन साडी वरती ऑक्सिडाइज्ड सिल्व्हर ज्वेलरी किंवा मिनिमलिस्ट ज्वेलरी हा एक उत्तम पर्याय आहे.
- जर आगदीच हलका लुक हवा असेल तर एखादे सिंगल ब्रेसलेट किंवा घड्याळ निवडू शकता.
- त्याचबरोबर तुम्हाला अवडत असेल तर छोटीशी टिकली लाऊ शकता.
- जर तुमची साडी साधी असेल, तर त्यावरती तुम्ही हेवी दागिने निवडू शकता.
- अशा छोट्या छोट्या टिप्स वापरून तुम्ही तुमची सुंदरता वाढवू शकतात.
मुलाखतीसाठी किंवा ऑफिससाठी कॉटन साडी | Cotton Saree for Interview or Office.
- तुम्हाला जर कॉन्फिडन्ट दिसायचं असेल आणि समोरच्या व्यक्तीवर तुमचा पॉसिटीव्ह प्रभाव पडायचा असेल तर नक्कीच कॉटन साडी ची निवड करू शकता.
- ऑफिस साठी किंवा मुलाखतीसाठी नाजूक फुलांचे नक्षीकाम असलेली किंवा छोटे चेकस असलेली साडी निवाडा, जास्त नक्षीकाम असलेली साडी टाळा.
- व्यावसायिक ठिकाणी फॅन्सी साडी वापरणे टाळा.
- एक साधा ब्लाउज निवडा आणि मध्यम उंचीच्या सँडल किंवा शूज निवडा.
- आपली केशरचना व्यवस्थित आणि व्यावसायिक ठेवा. एक साधा बन किंवा पोनीटेल उत्तम पर्याय आहे.
- साडीला इस्त्री केलेली असावी, साडीवर सुरकुत्या नसाव्या.
- या सर्व बाबींच योग्य वापर केल्यस नक्किच तुम्ही तुमची सकारात्मक छाप इतरांवर टाकू शकता.
कॉटन साड्या का सर्वोत्तम आहेत? | Why cotton sarees are the best?
कॉटनची अगदी कितीही साधी साडी असली पण जर तिला व्यवस्थित रित्या स्टाईल केले तर अतिशय स्टाईलिश लुक ही साडी देते. महागड्या साड्यांच्या तुलनेत कॉटनच्या साड्या नेसण्यास सोप्या आणि अधिक आरामदायक असतात.
कॉटन साडी मधील उत्कृष्ट आणि फेमस कलर | Excellent and famous color in cotton saree
पांढरा
काळा
लाल
निळा
पिवळा
हिरवा
गुलाबी
जांभळा
लाईट कॉटन
केसरी
कापसाचे (कॉटन) चे शास्त्रीय नाव काय आहे? | What is the scientific name of cotton?
कापसाचे शास्त्रीय नाव गॉसिपियम हर्बेसियम (Gossypium herbaceum ) हे आहे.
हे सुद्धा वाचा :-
Leave a comment