लाइफस्टाइलफॅशन

जाणून घ्या संबळपूरी साडीच्या इतिहासाबरोबरच साडीचे प्रकार आणि माहिती

Handwoven Sambalpuri Silk Saree from Odisha

संबळपूरी साडी ही एक परंपरीक भारतीय सिल्क साडी आहे. या प्रकारच्या साड्या भारतातील ओडिशा राज्यातील संबळपूर , बालंगीर, बारगढ, बौध आणि सोनेपूर या जिल्ह्यांमध्ये तयार केली जाते. या साड्या हाताने विनल्या जातात. या साडीला 2010 मध्ये भौगोलिक संकेत (GI) टॅग प्राप्त झाला आहे. संबळपूरच्या साड्या रंग आणि डिझाईन्स साठी ओळखल्या जातात. या ठिकाणी संबळपूरी साडीचा इतिहास, पूर्ण माहिती आणि ती प्रत्येक महिलेकडे का असावी या बाबत जाणून घेऊया. सर्व प्रकारच्या संबळपुरी साड्या ह्या “पाटा” म्हणून ओळखल्या जातात.

संबळपूरी साडीचे प्रकार
संबळपूरी साडीचे प्रकार

संबळपुरी साडीचा इतिहास | History of Sambalpuri Saree

भुलिया समुदायातील लोक या कलेत निपुण होते. असे मानले जाते की ही कला भुलिया समुदायासह पश्चिम ओडिशात गेली, जेव्हा 1192 मध्ये मुघलांनी चौहान साम्राज्याचा नाश केला. त्यानंतर या समुदायाने उत्तर भारत सोडले. या समाजाने त्यांच्या कलेची सुरुवात पश्चिम बंगाल इथे केली. पूर्वी या साड्या पारंपरिक नैसर्गिक रंगांमध्ये तयार केल्या जात असे त्यामध्ये लाल, काळा आणि पांढरा या रंगांचा समावेश होता जो भगवान कालिया ( जगन्नाथ ) यांचे स्वरूप दर्शवत होते. बदलत्या काळाप्रमाणे वेगवेगळ्या रांगांमध्ये देखील या साड्या तयार केल्या जाऊ लागल्या. सुरवातीला या साड्या इंदिरा गांधी यांनी वापरायला सुरुवात केली त्या नंतर या साड्यांना मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली.

Elegant Sambalpuri Saree with traditional motifs

संबळपूरी साडी विणण्याची पद्धत | Method of weaving

संबळपूर येथील भुलिया समुदाय “बंधा” नावाच्या टाय-डाय तंत्राचा वापर करून या साड्या बनवत होते. असे म्हणतात की बंधकला गुजरात आणि राजस्थानच्या बंधिनी तंत्रापासून प्रेरित आहे. या तंत्रामध्ये साडी विणण्यापूर्वी धागे बांधले जातात आणि त्यानंतर ते धागे रंगामध्ये बुडवले जातात. ज्या ठिकाणी धागे बांधलेले असतात त्या ठिकाणी रंग बसत नाही. त्यानंतर हे धागे हातमागावरती सेट केले जातात आणि सुंदर नक्षीकाम असलेली साडी तयार होते.

अशा पद्धतीने कठीण आणि रंगीबेरंगी डिझाइन तयार केले जातात. सुरुवातीला या साड्या स्थानिक महिला त्यांच्या सांस्कृतिक ओळखीचे प्रतीक म्हणून रोजच्या जीवनशैली मध्ये परिधान करत होत्या. परंतु कालांतराने या साड्यांना लोकप्रियता मिळाली आणि संबळपूरी साड्या हळू हळू जगप्रसिद्ध होऊ लागल्या.

संबळपूरी साडीचे प्रकार | Types Of Sambalpuri Saree

1. संबळपुरी इकत कॉटन साडी | Sambalpuri Ikat Cotton Saree

संबळपूरी कॉटन साडी ( Sambalpuri cotton saree ) इकत शुध्द कॉटन पासून बनवली जाते. या मध्ये साडी तयार करण्याआधी धागे टाय-डाय पद्धतीने रंगवले जातात. या कॉटन च्या धाग्यांना साध्या कॉटनच्या धाग्यांपेक्षा जरा जास्त चमक असते. साडीवरील संपूर्ण नक्षीकाम हे टाय-डाय  पद्धतीने हाताने तयार केले जाते. संबळपूर कॉटन साडीचा संपूर्ण पदर आणि साडी पारंपरिक पद्धतीने हाताने विणला जातो. या साड्या डबल कलर मध्ये देखील बनवल्या जाता. या मध्ये दोन्ही पद्धत म्हणजे टाय-डाय आणि हातमाग या दोन्ही पद्धतीचा वापर केला जातो.

या साड्या वजनाने अतिशय हलक्या असतात. आणि उन्हाळा, हिवाळा किंवा पावसाळा कुठल्याही सिझनमध्ये वापरण्यासाठी योग्य असतात. काही साड्यांची बॉर्डर हि प्लेन असते त्या बॉर्डर ला माठा बॉर्डर( sambalpuri matha border saree ) असे म्हणतात. या साडीची किंमत 2000 – 3500 पर्यंत असते.

2. संबळपुरी सिल्क साडी | Sambalpuri Silk Saree

संबळपूरी  इकत सिल्क साडी ही शुद्ध रेशम आणि कॉटन यांच्या मिश्रणातून बनवली जाते. या साडीची किंमत 9500 पासून पुढे आहे. हि साडी टाय-डाय पद्धतीने बनवली जाते. ही साडी अतिशय मऊ आणि नेसायला अगदी हलकी असते.

3. संबळपूरी बोमकई साडी | Sambalpuri Bomkai Pata Saree

संबळपूरी बोमकई साडीची किंमत 10000 पासून पुढे आहे. या साड्या बोमकई या ठिकाणी बनवलय जातात म्हणून त्यांना बोमकई साडी म्हणतात. हि साडी रेशम आणि कॉटनच्या मिश्रणातून बनवली जाते.

4. पसापल्ली इकत पाटा साडी | Pasapalli Ikat Pata Saree

पसापल्ली साडी हि भारघर इथे तयार केली जाते. या साडीची किंमत 12000 पासून पुढे आहे. सिल्क, कॉटन, तसर आणि सोनेरी धाग्यांमध्ये या साड्या तयार केल्या जातात. काही पसपल्ली साडीचे पदर सोनेरी धाग्यांपासून बनवले जातात.

5. पारंपारिक बिचित्रोपुरी किंवा बंधकला साडी | Traditional Bichitropuri or Bandhkala Saree

पारंपारिक बिचित्रोपुरी साडीची किंमत 14000 पासून पुढे आहे. या साडीला बंधकला साडी असेही म्हणतात. ही साडी डबल इकत पद्धतीने तयार केली जाते.

6. संबळपुरी बारपाली साडी | Sambalpuri Barpali saree

बारपाली साडी ही संबलपुरी साडीचा एक प्रकार आहे, या साडीला बारपाली हे नाव ओडिशाच्या बारगढ जिल्ह्यातील बारपाली या शहराच्या नावावर देण्यात आले आहे. बारपाली हे संबळपुरी साड्यांच्या उत्पादनाचे प्रमुख केंद्र म्हणून ओळखले जाते. या साड्यांवरील डिझाइन बंध इकत तंत्राद्वारे तयार केली जाते.

7. संबळपुरी बाप्ता साडी | Sambalpuri Bapta saree

संबळपुरी साड्यांमध्ये, “बाप्ता” हे एक प्रकारचे सीडीवरील विणकाम तंत्र आहे. बाप्ता ही एक प्रकारची संबळपूर साडीवरील बॉर्डरचा प्रकार आहे. बाप्ता बॉर्डर असलेल्या संबळपूर सद्य अतिशय सुंदर आणि मनमोहक असतात.

संबळपूरी साडीचे लोकप्रिय नक्षीकाम

  • संबळपुरी साड्या उच्च दर्जाचे रेशीम आणि सूत वापरून बनविल्या जातात.
  • या साड्यांमध्ये वापरलेले नक्षीकाम (designs) हे पौराणिक कथा, आदिवासी कला आणि निसर्गापासून प्रेरित आहेत. 
  • या नक्षीकामामध्ये “शंख”,  “चक्र” (चाक) आणि  “फुल” यांचा समावेश आहे.  
Handwoven Sambalpuri Silk Saree from Odisha

संबळपुरी साडी ऑनलाइन | Sambalpuri Saree Online

  • संबळपुरी साड्या विविध सरकारी उदयोजक, हातमाग स्टोअर्स आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून देखील खरेदी केल्या जाऊ शकतात. 
  • साडी अस्सल आहे याची खात्री करणे आवश्यक आहे. 
  • साडी पारंपारिक टाय-डाय तंत्राचा वापर करून तयार केलेली आहे कि नाही याची खात्री तुम्ही करू शकता.
  • संबळपुरी साड्या आपण ऑनलाइन देखील खरेदी करू शकतो. त्यामध्ये  Amazon, Flipkart आणि Craftsvilla यांचा समावेश आहे.

विणकरांना आधार | Support to Weavers

संबळपुरी साडी खरेदी केल्याने हातमाग उद्योगाला आणि विणकरांना आधार मिळतो जे शतकानुशतके या कलेचे जतन करत आहेत, शिवाय तुमच्या फॅशन लिस्ट मध्ये एक आकर्षक पारंपरिक साडी जोडली जाईल. वेगवान फॅशन उद्योगाच्या वाढीच्या प्रकाशात नैतिक आणि पर्यावरणीय पद्धतींना आपला पाठिंबा दर्शवण्यासाठी हातमागाची साडी खरेदी करणे हा एक उत्कृष्ट पर्याय आहे.

हे सुद्धा वाचा

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

फॅशनलाइफस्टाइल

Yoga Clothes Information : महिलांना वर्क आऊट साठी योग्य कपडे का महत्त्वाचे आहेत? जाणून घ्या पूर्ण माहिती

जिम मध्ये जाणे, योगाभ्यास करणे, धावणे किंवा उच्च स्थरावरील जिम ट्रेनिंग मध्ये...

garba dress
फॅशनलाइफस्टाइल

नवरात्रीचा पोशाख : ९ रंगाचे महत्व

नवरात्री, भारतातील सर्वात आनंदी सणांपैकी एक आहे. वाईटावर चांगल्याच्या विजयाचा उत्सव आहे...

silk Fabric
लाइफस्टाइलफॅशन

सिल्क ( रेशीम )आणि सिल्क साड्यांबद्दल माहिती

आपण सर्व भारतीय महिला विशेष प्रसंगी सिल्कच्या साड्या परिधान करतो, परंतु या...

pure handmade kashmiri silk saree
लाइफस्टाइलफॅशन

काश्मिरी सिल्क साडी

काश्मिरी सिल्क साडी त्यांच्या सुंदर आणि आलिशान रेशीमच्या गुणवत्तेसाठी खास ओळखल्या जातात....