मराठी बायकांना पैठणी साडी आणि त्या साडीवरती सुंदर असे डिझाइन ब्लाउज याचे एक वेगळेच आकर्षण असते. जेव्हा पैठणी साड्यांसाठी ब्लाउज डिझाइन ( Paithani Saree Blouse Design ) करण्याचा विचार येतो तेव्हा साडीची सुंदरता आणि तिच्यावरती केलेले नक्षीकाम या सर्व गोष्टींचा विचार करूनच पैठणी साडीवरचे ब्लाउज डिझाइन करावे. या ठिकाणी आपण पैठणी साडीवरती कशा पद्धतीचे ब्लाउज डिझाइन करता येईल ते जाणून घेऊया.
1. नॉट्स ब्लाउज नेक डिझाइन | Knots Blouse Neck Design
आपल्याला हव्या त्या डिझाईन मध्ये सुंदर खोल गळा तयार करून त्या गळ्याला दोन्ही बाजूने लेस किंवा नाडी लावून त्या नाडीची गाठ सुंदर डिझाईन मध्ये बसवली जाते. त्यामुळे पाठीमागच्या बाजूने ब्लाऊजला अतिशय सुंदर स्वरूप प्राप्त होते.
2. स्टोन वर्क ब्लाऊज नेक डिझाईन | Stone Work Blouse Neck Design
पैठणी साडी म्हंटली कि त्यावरती मोर हा आलाच, त्यामुळे आपण ब्लाउजच्या गळ्याभोती आणि बाहीला मोराचे डिझाइन करू शकता, त्यामुळे ब्लाउज अधिक आकर्षक दिसेल. जर तुमचा ब्लाउज साधा असेल आणि तुम्हाला तो अधिक सुंदर बनवायचा असेल. तर तुम्ही स्टोनवर्क किंवा मोती वर्कचा आधार घेऊ शकता. स्टोन वर्कमुळे ब्लाऊजच्या गळा सुंदर दिसतो. यामध्ये मोर, पाने, फुले तसेच विविध पक्षांची डिझाईन देखील ब्लाऊजच्या गळ्याभोवती तयार करून भेटतात.
3. चौकोनी गळा | Square Back Neck
स्क्वेअर नेक गळा म्हणजेच चौकोनी गळा यामध्ये गळ्याचा आकार हा चौकोनी असतो. आपल्याला पाहिजे तशी डिझाईन तयार करून आणि त्यामध्ये ब्लाऊज ची सुंदरता वाढवण्यासाठी आपण विविध लटकन किंवा स्टोन वर्क यांचा देखील वापर करून स्क्वेअर गळ्याची सुंदरता वाढवू शकतो.
4. की- होल ब्लाउज डिझाइन | Key Hole Blouse Design
या प्रकारामध्ये ब्लाऊजच्या पाठीमागच्या बाजूला अतिशय सुंदर पद्धतीने एक होल तयार केले जाते. गोल किंवा अंडाकृती तसेच आपल्या आवडीनुसार डिझाईन बदलू शकते. हे ब्लाउज परिधान केल्यानंतर अतिशय सुंदर आणि फॅन्सी दिसते.
5. बोट नेक डिझाइन | Boat Neck Design
यामध्ये ब्लाऊजच्या पाठीमागच्या बाजूने बोटच्या आकाराचा गळा तयार केला जातो. हा गळा जास्त खोल नसतो पण दिसायला अतिशय मनमोहक आणि सुंदर दिसतो. सिम्पल लूक साठी हा बोट नेक गळा एक उत्तम पर्याय आहे.
6. हाय नेक ब्लाऊज डिझाईन | High Neck Blouse Design
यामध्ये ब्लाउजचा गळा हा उंच असतो किंवा त्याला कॉलर असते. ब्लाउजला कॉलर असल्यामुळे अतिशय सुंदर हा ब्लाउज दिसतो आणि एखाद्या ऑफिशियल किंवा प्रोफेशनल फंक्शन साठी या पद्धतीचा ब्लाऊज परिधान करणे प्रोफेशन बरोबर तुमचा ग्लॅमरस लुक देखील टिकवून ठेवतो.
7. साधा गोल गळा | Simpal Back Neck Blouse
ही ब्लाउजची नेक डिझाईन अतिशय साधी परंतु तितकीच सुंदरही दिसते. यामध्ये ब्लाऊजचा गळा हा सिम्पल गोलाकार असतो. तुम्हाला जर ब्लाऊजच्या गळ्याला अती डिझाईन नको असेल तर हा एक साधा गळा असेल असलेला ब्लाऊज उत्तम असतो. आणि जितक्या साध्या पद्धतीने आपण हे ब्लाउज तयार करतो ते तेवढेच सुंदरही दिसते.
8. बो- बॅक डिझाइन | Bow-back Design
बो- बॅक डिझाइन म्हणजे ब्लाऊजच्या पाठीमागे एक गाठ असलेली डिझाईन. ही एक पारंपरिक पद्धत आहे. जुन्या काळामध्ये बायकांच्या ब्लाऊजच्या पाठीमागच्या बाजूने किंवा ब्लाऊजच्या पुढच्या बाजूने एक गाठ असायची. परंतु बदलत्या काळानुसार आणि फॅशनच्या ट्रेंडमध्ये वेगवेगळ्या युनिक पद्धतीने ही डिझाईन आता अतिशय लोकप्रिय झालेली आहे.
9. बॅकलेस ब्लाउज डिझाइन | Backless Blouse Design
तुम्हाला पारंपारिक पेहरावामध्ये जर बोल्ड लुक पाहिजे असेल तर हा बॅक लेस ब्लाऊज उत्तम राहील. पारंपारिक साडी आणि तिला चालू ट्रेंड ची जोड देण्यासाठी बॅकलेस ब्लाऊज उत्तम आहे. तसेच यामध्ये अनेक वेगवेगळ्या डिझाइन्स देखील तयार करून भेटतात.
तसेच बाजारामध्ये अनेक तयार पैठणी साडी ब्लाउज डिजाइन कॅटलॉग देखील आहेत ते सुद्धा आपण ब्लाउज ची सुंदरता वाढविण्यासाठी वापरू शकतो.
पैठणी साडीवरील ब्लाउज साठी बाही डिझाइन | Paithani Sleeves Design
पैठणी साडीच्या ब्लॉऊसच्या बाह्यांमध्ये वेगवेगळ्या डिझाईन असतात. आणि साडीला शोभेल अशी योग्य बाही डिझाईन करून तुम्ही तुमच्या पैठणी साडीतील सौंदर्य वाढवू शकतात.
- मोर डिझाइन स्लीव्हज | Peacock Design Sleeves – मोर डिझाईन स्लीव्हज प्रकारामध्ये तुम्ही तुमच्या ब्लाऊज च्या बाही वरती मोराचे डिझाईन लावू शकतात. तुम्ही साडी च्या काठांवरील मोर किंवा बाजारामध्ये रेडिमेड स्टोन वर्क किंवा मोती वर्क असलेले मोर देखील ब्लाऊज ला लावू शकतात. त्यामुळे तुमच्या लुक मध्ये आधुनिकतेबरोबरच पारंपरिकतेची देखील भर पडेल.
- पफ स्लीव्हज | Puff Sleeves – पफ स्लीव्हज ज्याला बलून स्लीव्हज असेही म्हटले जाते. पफ स्लीव्हज स्टाईल फार जुन्या काळापासून चालत आलेली आहे आणि अजूनही ती ट्रेंड मध्ये आहे. पफ स्लीव्हज तुमच्या सुंदरतेला पारंपारिक लुक देतात आणि या स्लीव्हज दिसायला देखील खूप सुंदर दिसतात.
- एम्ब्रोईडरी स्लीव्हज | Embroidered Sleeves – यामध्ये आपल्याला हवी तशी एम्ब्रॉयडरी बाहीवर तयार करून भेटते. ही एम्ब्रॉयडरी वेगवेळ्या रंगीत धाग्यांनी तयार केली जाते. तुमचा ब्लाऊज दिसायला कितीही साधा असला तरी एम्ब्रॉयडरी मुळे तुमच्या ब्लाऊज ची सुंदरता अधिकच खुलते.
- थ्री फोर्थ स्लीव्हज | Three fourths Sleeves – थ्री-फोर्थ स्लीव्हज, ज्याला ब्रेसलेट स्लीव्हज असेही म्हणतात, थ्री-फोर्थ स्लीव्हज आपल्याला स्टायलिश आणि आधुनिक लुक देतात. आणि या प्रकारच्या स्लीव्हज रिसेप्शन साठी उत्तम पर्याय असतात.
- एलबो लेन्थ स्लीव्हज | Elbow Length Sleeves – हा एक उत्तम पर्याय आहे तुमची साडीतील सुंदरता वाढवण्यासाठी.
- स्लीव्हजलेस | Sleeveless – तुमच्या परंपरीक साडीतील लुक बरोबरच हे स्लीव्हलेस ब्लाउज तुम्हाला अत्याधुनिकतेची देखील जोड देतात.
हे सुद्धा वाचा :-
Leave a comment