लाइफस्टाइलफॅशन

कोटा सिल्क साडी | Kota Doria Silk Saree | कोटा डोरिया

kota doria saree : famous handloom sarees in india

Kota silk saree या रेशीम साडीची निर्मिती राजस्थानमध्ये कोटा या शहरात होते. या साड्यांना “कोटा डोरिया” (kota doria) किंवा “कोटा मसुरिया” (kota masuria) असे देखील म्हणतात. या साड्या “खट विणकाम” नावाच्या विशेष विणकाम पद्धतीचा वापर करून बनवल्या जातात. 2005 मध्ये या साड्यांना भारत सरकारचा GI tag (Geographical indication) प्राप्त झालेला आहे.

Pure handloom Yellow Kota Silk Saree

कोटा साडीचा इतिहास | History of Kota silk Saree | kota saree origin

कोटा डोरिया सिल्क साडीचा इतिहास हा 17 व्या शतकापासून सापडतो. 17 व्या शतकामध्ये राव किशोर सिंग (Rao Kishor Singh) हे म्हैसूर येथे गेले होते. तेथील राजाने त्यांना भेट म्हणून म्हैसूर येथील काही विणकर (weaver) दिले. हे विणकर साडी विणकाम करण्यात अतिशय हुशार होते.

राव किशोर सिंग यांनी हे विणकर कोटा येथे आणले आणि त्यांना या ठिकाणी राहण्यासाठी जागा दिली. तिथून पुढे या साडीच्या प्रवासाला सुरुवात झाली. हे कारागीर म्हैसूर येथून आल्यामुळे या साड्यांना “मसुरिया” देखील म्हणतात. सुरुवातीला साडीवरती तयार केलेली बुट्टी लहान आणि नियमित होते परंतु आता मोठ्या आकाराच्या डिझाइन फॅशन आणि आवडीनुसार बनविल्या जातात.

Pure Kota Silk Designer sky blue Women Saree

कोटा डोरिया साडीचे प्रकार | Types of Kota Doria Saree

  1. साधी कोटा साडी | Plain Kota Sarees – ही साडी संपूर्ण प्लेन असते. यावरती कुठल्याही प्रकारची डिझाइन किंवा प्रिंट नसते. अगदी साधी साडी पण दिसायला अतिशय सुंदर असते.
  2. कोटा रेशीम साडी | Kota Silk Sarees – कोटा रेशीम साडी तिच्या उत्कृष्ट फॅब्रिकसाठी ओळखली जाते. ही साडी चमकदार आणि अतिशय आरामदायक असते.
  3. कोटा जरी साडी | Kota Jari Sarees – ही साडी तयार करण्यासाठी विणकामामध्ये जरीचा वापर केला जातो. जरीमुळे साडीला विशिष्ट चमक आणि सुंदरता प्राप्त होते. ज्यामुळे ही साडी विशेष प्रसंगी उत्कृष्ट ठरते.
  4. कोटा डोरिया कॉटन साडी | Kota Doria Cotton Sarees – कॉटन कोटा डोरिया साड्या या शुद्ध कापसापासून बनवल्या जातात. या साड्या परिधान करण्यासाठी अगदी आरामदायक आणि वजनाने खूप हलक्या असतात.
  5. प्रिंटेड कोटा डोरिया साडी | Printed Kota Sarees – पारंपरिक कोटा साडीवरती नक्षीकाम प्रिंट केले जाते. ही आधुनिक प्रकाराची साड देखील अतिशय लोकप्रिय आहे.
  6. तसर कोटा साडी | Kota Tussar Sarees – ही साडी तयार करण्यासाठी तसर सिल्क चा वापर केला जातो. या साड्या त्यांच्या नैसर्गिक रंगासाठी ओळखल्या जातात.
  7. एम्ब्रॉयडरी कोटा साडी | Embroidered Kota Sarees – या प्रकारामध्ये पारंपरिक कोटा साडीवरती हाताने भरतकाम केले जाते. ज्यामुळे साडीची सुंदरता अधिक वाढते.

प्युअर कोटा साडी कशी ओळखायची? | How to identify a pure kota saree?

येथे काही पर्याय आहेत ज्याचा वापर करून आपण प्युअर कोटा सिल्क साडी कशी ओळखायची हे जाणून घेऊ शकतात. 

  • चेकर्ड पॅटर्न तपासा – प्युअर कोटा सिल्क साड्या त्यांच्या विशिष्ट चेकर्ड (Checkered) किंवा चौकोनी पॅटर्नसाठी ओळखल्या जातात. जे रेशीम आणि सुती धागे एकत्र विणून बनवले जातात.
  • हाताने विणलेल्या कोटा साडीचे चेकर्ड लहान आणि आकाराने एकसमान असतात. 
  • हाताने विणल्यामुळे शुद्ध सिल्क कोटा साड्यांचा पृष्ठभाग थोडा खडबडीत असतो.
  • प्युअर कोटा सिल्क साडीचा विणकामाचा जर एखादा धागा ओढला तर धागा सहसा ओढला जात नाही आणि जर ओढलाच तर त्या ठिकाणी साडी फाटली जाते. तसेच पावरलूम वरती तयार केलेल्या साडीचा धागा सहज निघून येतो.
  • प्युअर कोटा साडी मध्ये सिल्क धाग्यावरती जरीची कोटिंग केली जाते.
  • प्युअर साडी वजनाने खूप हलकी असते आणि मशीन मेड साडी ही वजनाने जड असते.
  • गव्हर्मेंट ने कोटा डोरिया साडीचा ट्रेडमार्क दिलेला आहे तो चेक करावा. हा लोगो साडी वरती विणलेला असतो. आणि हा लोगो फक्त प्युअर हातमागावरती तयार केलेल्या साडी वरतीच असतो.
  • साडीची किंमत जर 3000 रुपयांच्या आत असेल तर साडी नक्कीच चेक करून घ्यावी. नाहीतर कदाचित आपली फसवणूक होऊ शकते. 
Pure kota saree : Yello Handblock hadloom Pure Kota Doria Saree

साडी विणण्याची पद्धत | Saree Weaving Method

कोटा साड्या पारंपारिक पद्धतीने रेशीम आणि सुती धाग्यांमध्ये लहान चौकोनी (चेकर्ड) आकाराच्या डिझाईन मध्ये विणल्या जातात. ज्याला स्थानिक भाषेत “खट” (khats) किंवा “खत”असे म्हणतात. जे

हे साड्यांवरील खट राजस्थानमधील कोटा येथील कैथूनमध्ये आणि त्याच्या आजूबाजूच्या काही गावांमध्ये आजही पिट लूमवर पारंपरिक पद्धतीने हाताने विणले जाते. कोटा साड्या अतिशय नाजूक पद्धतीने विणलेल्या असतात आणि वजनाने या साड्या खूपच हलक्या असतात.

या साड्या बनवण्यासाठी कमीत कमी 15 दिवस किंवा त्यापेक्षाही अधिक दिवस लागतात. 

कोटा साड्या बनवण्यासाठी 60% कॉटन आणि 40% रेशीम वापरले जाते. आणि यामध्ये जरी थ्रेडचा वापर केला जातो.

या साड्या तयार करण्याआधी रेशीम रंगवले जाते आणि त्यानंतर हे रेशीम लूमवरती सेट केल्यानंतर साड्यांवरती डिझाईन तयार केली जाते.

साडीवरती डिझाईन तयार करण्याआधी कागदावरती आपल्याला हवी असलेली डिझाईन तयार केली जाते. आणि मग तो डिझाईन केलेला कागद लूमवरती सेट केला जातो. ज्यामुळे विणकरांना साडी वरील नक्षीकाम विणण्यास सोपे होते.

कोटा सिल्क साडीबद्दल महत्वाच्या टिप्स | Important Tips about Kota Silk Saree

  • कोटा साडी अगदी मऊ असते. ही साडी दिवसभर जरी परिधान केली तरी आपल्याला तिचा काही त्रास होत नाही. जसे टोचणे, गरम होणे किंवा जड होणे, साडी सावरण्याचा कंटाळा येने.
  • या अस्सल कोटा साडीची लांबी 6.20 मीटर असते आणि ज्यात साधा ब्लाउज असतो.
  • जर तुम्ही या साडीमध्ये दिलेल्या कापडापासून ब्लाउज तयार करणार असाल, तर हे कापड पारदर्शक आल्यामुळे या ब्लाउज ला अस्तर लावणे आवश्यक आहे.
  • कोटा साडी पारदर्शक आल्यामुळे साडीवरती मॅचिंग पेटिकोट परिधान करणे आवश्यक आहे.

कोटा डोरिया साडी कशी धुवावी | How to Wash Kota Saree

  • कोटा साडी स्वच्छ करण्यासाठी सौम्य लिक्विड डिटर्जंट वापरावा आणि अगदी हलक्या हाताने साडी स्वच्छ करावी. साडी स्वच्छ करण्यासाठी थंड पाणी वापरावे.
  • साडीची चमक जास्त काळ टिकून राहण्यासाठी शक्यतो ड्रायक्लीन करणे हा उत्तम पर्याय आहे.

कोटा साडीची किंमत | Kota Saree Price

कोटा डोरिया साड्यांची किंमत 3००० पासुन ते काही लाखापर्यंत असतात. ग्राहकांच्या डिझाइन च्या मागणीनुसार साडीची किंमत कमी-जास्त होते.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

silk Fabric
लाइफस्टाइलफॅशन

सिल्क ( रेशीम )आणि सिल्क साड्यांबद्दल माहिती

आपण सर्व भारतीय महिला विशेष प्रसंगी सिल्कच्या साड्या परिधान करतो, परंतु या...

pure handmade kashmiri silk saree
लाइफस्टाइलफॅशन

काश्मिरी सिल्क साडी

काश्मिरी सिल्क साडी त्यांच्या सुंदर आणि आलिशान रेशीमच्या गुणवत्तेसाठी खास ओळखल्या जातात....

wedding outfit ideas for womens
फॅशनलाइफस्टाइल

लग्नामध्ये कुठला पोशाख घालावा याचा विचार करताय का? इथे आहेत महिलांसाठी काही भन्नाट कल्पना

लग्नामध्ये कुठला पोशाख घालावा? हा प्रश्न तर सर्वांनाच पडलेला असतो. आपल्या भारतीय...

konrad silk saree
लाइफस्टाइलफॅशन

दक्षिण भारतातील टेम्पल साडी – कोनराड सिल्क साडी | Konrad Silk Saree

कोनराड सिल्क साडी, ही साडी भारतातील सर्वात सुंदर साड्यांपैकी एक साडी आहे....