Funny आणि Comedy मराठी उखाणे तुम्ही कोणत्याही समारंभामध्ये किंवा समारंभाविना नवऱ्यासाठी, मित्रासाठी आणि मैत्रिणींसाठी पण घेऊ शकतात. हे अतिशय मजेदार मराठी उखाणे तुमची उखाणे घेण्याची मजा वाढवतील.
New Funny Ukhane in Marathi for Female
- चांदीच्या ताटात खव्याचा पेढा, आमचे हे म्हणजे ज्ञानेश्वरांचा रेडा.
- एक होती चिऊ, एक होता काऊ, … रावांचे नाव घेते, डोकं नका खाऊ.
- सोन्याचा रांजण, चांदीचं झाकण … रावांच्या बहिणी माझ्या चपलाला राखण.
- वाकडी तिकडी बाभुळ उगवली टेकावर, … रावांचं नाव घेते … बाईच्या नाकावर.
- बांदा बांदानी जाताना बाई मी भूईमूग उपटलं, आणि लाडाने हे आले अंगावर मी झुरळावानी झटकलं.
- घालत होते वेणी-फणी समोर होता आईना, … रावांनी मारली मिठी पण मी मिठीत माईना.
- आला आला रुखवत त्यात होत मंदिर, … च्या साडीत घुसला उंदीर.
- सात समुद्रा पलीकडे रंगतो आता राधा कृष्णाचा खेळ, …. रावांचे नाव घेते आता झाली संध्याकाळची वेळ.
- प्रीती झिंटाच्या गालावर पडतात छान छान खळ्या, आमच्या यांचे दात म्हणजे लाकडाच्या फळ्या.
- देवळीत देवळी, देवळीत होती पिवशी, … रावांचे नाव घेते गटारी अमावस्येच्या दिवशी.
- वरून गोरे, आतून काळे, माझे मिस्टर दिसतात भोळे, पण अंगात लई चाळे.
- हंड्यावर हंडे सात हांडे, …. आहेत हेमबाडतोंडे.
- पुणे ते मुंबई वेचत गेले खडे, आमचे … राव पोंग्यासाठी रडे.
- चिरेबंदी वाडा, वाड्यासमोर अंगण, अंगणात होती तुळस, आणि आमचे … राव करतात मूर्खपणाचा कळस.
- कांदयात कांदा कुजका कांदा, आमच्या यांना बोचक्यात बांधा.
- कोकणात गेली रेल्वे बोगद्यात बसले हादरे, … राव एक नंबरचे घाबरे.
Best Comedy Ukhane in Marathi For Husband
- चांदीच्या ताटात फणसाचे गरे, …. राव दिसतात बरे, पण मला पिक्चर ला नेतील तेव्हाच खरे.
- कालच मी माझ्या माहेरून आणले होते केवढे मोठे काजू, …. रावांनी मला न विचारताच खाल्ले, मग त्यांच्या थोबाडीत द्यायला मी कशाला लाजू.
- हिमालयाच्या प्रदेशात हिऱ्या मोत्याच्या खाणी, आमचे … राव दिसतात मारक्या बैला वाणी.
- गळ्यात घातली माळ, कपाळावरती लावला बुक्का, …. घर नाही बघत, दार नाही बघत कुठेबी घेती मुका.
- आत घर, मद घर, मद घरात होता टेबल, टेबलावर होती बशी, बशीत बटाट्याची फोड, …. रावांचं बोलणं लय गोड, पण डोळ वटारायची खोड.
- घरात नाही खायला, खिशात नाही दमडा आणि मला नवरा भेटला एक नंबरचा शेंबडा.
- कासाराचं घर, सासू म्हणते चुडा भर, नणंद म्हणते थोडा भर, …. राव म्हणतात काय भरायच्या ते भर पण ऐश कर.
- आला आला रुखवत त्यात होती कप आणि बशी, … रावांचे उंदरावानी मिशी.
- गुलाबाचे फुल हळू हळू उमललं, आणि … रावांना काल डुकराने चिखलात ढकललं.
- स्वयंपाक झाला, कपडे झाले, भांडी ही झाली घासून, …. राव आले नाही अजून पडले की काय दारू ढोसून.
- होळीला करतात छान छान पुरणाची पोळी, ….. स्वतःला समजू नकोस फार भोळी.
Romantic Funny Ukhane For Female Friends in Marathi
- पुणे ते मुंबई लावला लसुन, … गेली रुसून, तर तिला आणली गाढवावर बसून.
- काळी घोंगडी पट्ट्या पट्ट्याची, आणि … माझी एका रट्ट्याची.
- आत घरात मद घर, मद घरात ठेवली परात, लय वाढावा बोलू नका, नाहीतर गावातून काढेल तुमची वरात.
- आला आला रुखवत त्यावर ठेवली फणी, माझ्यासारखी देखणी इथं आहे का कुणी.
- विटावर विटा 100 विटा, … रावांचे नाव घेते सगळ्यांनी फुटा.
- गणपतीच्या मंदिरात करत होते आरती, ते गेले वरती आणि मी राहिले खालती.
- पहाटेच्या वेळेस कोंबडा कुकतं, आणि … ला पाहून गल्लीतलं कुत्र भुकतं.
- आला आला रुखवत रुखवतात होता पेढा, मी दिसते म्हैस तर … पालखीचा रेडा.
- वाकडी तिकडी बाभूळ तिला हिरवा हिरवा पाला, …. चे नाव घेतो झुकेगा नई साला.
- अलबल्यात गलबला गलबल्यात टरफले आणि माझ्या सगळ्यात आले, … नावाचे निळू फुले.
- कात नाही, चुना नाही, पान कसं रंगलं… रावांनी पिक्चर दाखवला तुमचं आमचं जमलं.
- आला आला रुखवत त्यात होता भवरा, सगळ्यात भारी माझाच नवरा.
- उन्हाळ्यात ठेवले मी वाळत कुरडया आणि पापड, आणि माझ्याच पदरात पडलं असलं हे माकड.
ननंद भाऊजई वर कॉमेडी उखाणे | Nanand Bhaujai Warti Comedy Ukhane in Marathi
- हंड्यावर हंडे सात हांडे, त्यावर ठेवली परात, ननंद बाई जास्त नका बोलू गुपचूप जा घरात.
- व्हाट्सअप चा डीपी झाला बाई जुना, आमच्या नणंद बाईला लागतो नुसताच तंबाखू आणि चुना.
- गच्चीवर गच्ची सिमेंटची गच्ची, माझी ननंद निघाली खूप मोठी लुच्ची.
- आकाशात उडतो पक्षांचा थवा, ननंद बाईंना आमच्या अमिताभ बच्चन सारखा नवरा हवा.
- आमच्या यांनी बाजारातून आणले खायला बोरं, माझ्या ननंदबाईला डझनभर पोरं.
- रंगात रंग लाल रंग, नणंदबाई असतात नेहमीच व्हाट्सअप मध्ये दंग.
- आला आला रुखवत, रुखवतात होती भेंडी, आमची नणंद बाई भलतीच चोंबडी मेंढी.
- पैठणी साडी नेसून आले मी जोमात, नणंदबाई मला बघून तुम्ही जाल कोमात.
- शेजारची बाई करत होती चुगली तर मी म्हणलं खरं हाय, ऐकलं का नणंदबाई हे माझ्या नवऱ्याचं घर हाय.
- आली तेव्हा मी तुझ्यासाठी आणली होती पैठणी, म्हणत होती गावभर माझी नणंद आहे लई हौशी, आणि आत्ता चक्क मला म्हणते माझ्या घरातून निघ म्हशी.
हे सुद्धा वाचा :-
Leave a comment