लाइफस्टाइलफॅशन

लेहेंगा चोली – प्रकार, कलर, डिझाइन, फोटो आणि संपूर्ण माहिती

multicolor lehenga
मल्टी कलर लेहेंगा

लेहेंगा चोली, प्रत्येक नववधुच्या आवडीचा पोशाख ठरतो आहे. त्याचे कारण ही तसेच आहे, लेहेंगा चोलीची सुंदरतेमुळे नववधुचे सौंदर्य द्विगुणित होते. त्यामुळे नववधुसाठी लेहेंगा चोलीचे प्रकार, सुंदर फोटो, डिझाइन आणि पूर्ण माहिती असणे गरजेचे आहे.

भारत हा देश विविध रंगांनी आणि संस्कृतीने सजलेला देश आहे. या संस्कृतीमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रांतांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पोशाख देखील बघायला भेटतात. यातीलच एक म्हणजे लेहेंगा चोली. हा एक भारतीय पारंपरिक पेहराव आहे. आणि हा पेहराव परंपरेबरोबरच आधुनिकतेची देखील जोड देतो. परंपरागत चालत आलेला लेहेंगा चोली या पोशाखाने सध्याच्या मॉडर्न युगामध्ये देखील स्वतःचे अस्तित्व अगदी दिमाखदार पद्धतीने टिकवून ठेवले आहे.

म्हणूनच तर भारताबरोबरच भारताबाहेर देखील कुठलाही विवाह सोहळा आणि कार्यक्रम हा लेहेंगा चोली शिवाय अपूर्णच आहे. भारतामध्ये लग्न समारंभासाठी नववधू तिची पहिली पसंती लेहेंगा चोलीलाच देते. आपण या ठिकाणी लेहेंगा चोली चे काही सुंदर प्रकार बघणार आहोत जे तुम्हाला तुमच्या महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये अगदी सुंदर लुक देतील.

अनुक्रमणिका

लेहेंगा चोली खरेदीपूर्वी जाणून घ्या लेहेंग्यामधील फेमस प्रकार

1. घेरदार लेहेंगा चोली | Circular Lehenga Choli

Circular Lehenga हा पूर्ण फ्लोर टच आणि घेरदार लेहेंगा असतो. हा लेहेंग्याचा प्रकार नववधूसाठी सर्वात पारंपारिक आणि क्लासिक आहे. या प्रकारामध्ये कमरेभोवती भरपूर मोठ्या प्रमाणात प्लीट्स म्हणजेच चुन्या तयार केल्या जातात त्यामुळे लेहेंगा घेरदार दिसतो. या लेहेंग्यावरती जरीचे वर्क किंवा मणी वर्क असेल तर अतिशय सुंदर आणि आकर्षक दिसतो. तसेच या सर्क्युलर घेरदार लेहेंग्यावरती डिझाईनर सुंदर वर्क केलेला दुपट्टा आणि सुंदर डिझाईन केलेली चोली म्हणजेच ब्लाऊज तुमच्या सौंदर्यामध्ये परंपरेबरोबरच आधुनिकतेची देखील भर घालेल. रॉयल लुकसाठी कुंदनचा किंवा सोन्याचा नेकलेस तुमच्या लेहेंग्यावरती निवडू शकता.

Circular Lehenga Choli
घेरदार लेहेंगा चोली

2. पॅनेल केलेला लेहेंगा चोली | Paneled Lehenga Choli

पॅनेल केलेला हा एक पारंपरिक पद्धतीचा लेहेंगा आहे. या प्रकारामध्ये वेगवेगळ्या रंगांमध्ये फॅब्रिकच्या उभ्या पट्ट्या एकमेकांना जोडल्या जातात, त्यामुळे लेहेंग्याचा एक मोठा घेर तयार होतो. सुंदर ब्लाउज सह वर्क केलेला दुपट्टा ह्या लेहेंग्यावरती अतिशय सुंदर दिसतो. या लेहंग्यामध्ये आपल्याला वेगवेगळे सुंदर कलर देखील बघायला भेटतात. जर तुम्हाला डार्क कलर आवडत असेल तर यामधील डार्क कलर देखील खूप सुंदर दिसतात. तसेच लेहेंग्यामधील पेस्टल कलर देखील अतिशय सुंदर दिसतात.

Paneled Lehenga Choli
पॅनेल केलेला लेहेंगा चोली

3. A- लाईन लेहेंगा चोली | A-line Lehenga Choli

A- लाईन लेहेंगा त्याच्या आकारावरून हे नाव देण्यात आले आहे. हा लेहेंगा इंग्रजी अक्षर कॅपिटल A सारखा याचा आकार दिसतो म्हणून याला A- लाईन लेहेंगा असे म्हणतात. हा लेहेंगा कमरे भोवती घट्ट असतो याला कुठल्याही प्रकारच्या चुन्या नसतात. आणि खालच्या बाजूला हा घेरदार असतो त्यामुळे या लेहेंग्याचा आकार A सारखा दिसतो.

A-line Lehenga Choli
A- लाईन लेहेंगा चोली

4. मरमेड स्टाईल किंवा फिश कट लेहेंगा चोली | Mermaid Cut | fish cut / tail | trumpet Lehenga Choli

हा एक नवीन आधुनिक पद्धतीच्या लेहेंग्याचा प्रकार आहे. या प्रकारामध्ये कमरेपासून गुडघ्यापर्यंत लेहेंग्याचा घेर हा पायाभोवती घट्ट असतो आणि गुडघ्यापासून खाली लेहेंग्याचा घेर पसरलेला असतो. हे दिसायला अगदी माशासारखे दिसते म्हणून याला मरमेड स्टाईल किंवा फिश कट लेहेंगा असे म्हणतात.

Mermaid Cut  | fish cut / tail | trumpet Lehenga Choli
मरमेड स्टाईल किंवा फिश कट लेहेंगा चोली

5. स्ट्रेट कट लेहेंगा चोली | Straight Cut Lehenga Choli

हा लेहेंग्याचा प्रकार त्याच्या नावाप्रमाणे अगदी आपल्या शरीराच्या समान सरळ खालपर्यंत असतो. यामध्ये कुठल्याही प्रकारच्या प्लीट्स किंवा चुन्या नसतात. कमरेपासून ते पायापर्यंत अगदी सरळ हा लेहेंगा असतो. या लेहेंग्याला कुठल्याही प्रकारचा घेर नसतो. हा लेहेंगा जरी अगदी सरळ असला तरी या वरती डिझाईन केलेले सुंदर ब्लाउज आणि दुपट्टा परिधान केल्यास याची सुंदरता अधिकच वाढते.

Straight Cut Lehenga Choli
स्ट्रेट कट लेहेंगा चोली

6. शरारा लेहेंगा चोली | Sharara Lehenga Choli

शरारा लेहेंगा हा एक पारंपारिक पोशाख आहे. यामध्ये सैल, घेरदार पॅन्ट असते. हा लेहंगा पॅन्ट सारखा दोन भाग असलेला घेरदार स्कर्ट असतो. या पॅन्ट वरती नक्षीकाम, विणकाम, मनी वर्क आणि मोतीवर्क केलेले असतात ज्यामुळे हा स्कर्ट अतिशय सुंदर दिसतो. या लेहेंग्यावरती ब्लाउज ऐवजी वरती शॉर्ट कुर्ता ज्याला आपण अंगरखा देखील म्हणतो हा वापरला जातो आणि एक सुंदर दुपट्टा यावरती घेतला जातो ज्यामुळे या शरारा लेहेंग्यावरील सौंदर्य अतिशय खुलून येते.

Sharara Lehenga Choli
शरारा लेहेंगा चोली

7. लेयर्ड लेहेंगा चोली | Ruffle or Layered Lehenga Choli

लेयर्ड लेहेंगा हा पारंपरिक लेहेंग्यापासून किंवा घागरा चोली पासून प्रेरित असलेला आधुनिक पद्धतीमध्ये तयार केलेला लेहेंगा आहे. हा लेहेंगा परंपरेबरोबरच आधुनिकतेची जोड असलेला लेहेंगा आहे. पारंपरिक लेहेंग्यावरती फॅब्रिकचा एकच थर असतो. परंतु लेयर्ड लेहेंगा त्याच्या नावाप्रमाणेच या लेहिंग्यावरती कापडाच्या अनेक लेअर्स असतात. या अनेक लेअर्समुळे लेहेंग्याला व्हॉल्यूम मिळतो. त्यामुळे हा लेहेंगा विशेष कार्यक्रमांसाठी आकर्षक दिसतो.

Ruffle or Layered Lehenga Choli
लेयर्ड लेहेंगा चोली

8. जॅकेट लेहेंगा | Lehenga Choli With Jacket

जॅकेट लेहेंगा हा एक फॅन्सी लेहेंगा आहे. आधुनिक पद्धतीच्या जॅकेट किंवा केपसह पारंपारिक लेहेंग्याचे मिश्रण या पोशाखाला आधुनिक ट्विस्ट देते. पारंपारिक ब्लाउजऐवजी या लेहेंग्यावरती जॅकेट किंवा केप वापरले जाते. आपल्या आवडीनुसार हे जॅकेट छोटे किंवा मोठे म्हणजेच फ्लोर टच देखील असू शकते. आणि या लेहेंग्यावरती जॅकेट असल्यामुळे याच्या वरती शक्यतो दुपट्टा परिधन केला जात नाही. लेहेंग्याची सुंदरता वाढवण्यासाठी लेहेंग्यावरती आणि जॅकेट वरती विविध प्रकारचे नक्षीकाम, विणकाम केले जाते त्यामुळे या लेहेंग्याची सुंदरता अधिकच वाढते.

Lehenga Choli With Jacket
जॅकेट लेहेंगा

9. अम्ब्रेला लेहेंगा | Umbrella lehenga

अम्ब्रेला लेहेंगा याचा आकार छत्री सारखा दिसतो, हा लेहेंगा कमरेजवळ फिट असतो आणि हळूहळू खाली हा घेरदार बनत जातो म्हणून याला अम्ब्रेला लेहेंगा असे म्हणतात. हा पारंपारिक लेहेंगा आहे. लेहेंग्यावरती योग्य दागिने आणि दुपट्टा घेतल्यास यातील सौंदर्य अतिशय सुंदर आणि मोहक दिसते.

Umbrella lehenga
अम्ब्रेला लेहेंगा

10. अनारकली लेहेंगा | Anarkali Lehenga

अनारकली लेहेंगा हा पारंपारिक ड्रेस अनारकली आणि लेहेंगा चोली या दोन्हींच्या मिश्रणातून तयार झालेला मॉडर्न अनारकली लेहेंगा आहे. अनारकली आणि लेहेंगा चोली हे दोन्हीही अतिशय लोकप्रिय भारतीय पारंपरिक पोशाख आहेत. यातील वरचा भाग हा ब्लाउज ऐवजी अनारकली ड्रेस सारखा तयार केला जातो आणि खालचा स्कर्ट हा पारंपरिक लेहेंगा असतो. या ड्रेस वरती विविध प्रकारचे नक्षीकाम, विणकाम तयार करून याची सुंदरता अधिक वाढवली जाते आणि यावरती आवडीनुसार दुपट्टा ही घेतला जातो.

Anarkali Lehenga
अनारकली लेहेंगा

11. हाफ साडी लेहेंगा | Half Saree Lehenga

हाफ साडी लेहेंगा हा एक पारंपारिक भारतीय पेहराव आहे, ज्याला दक्षिण भारतात लंगा वोनी असे ही म्हणतात, ही लेहेंग्याची स्टाईल साडी सारखी परिधान केली जाते म्हणून याला हाफ साडी लेहेंगा असे म्हणतात. खालच्या बाजूला पारंपरिक घेरदार लेहेंगा असतो, त्यावरती सुंदर डिझाईन केलेले ब्लाऊज आणि दुपट्टा जो साडीच्या पद्धतीने ओढला जातो, म्हणजेच कमरेला खोचून शरीराभोवती गुंडाळून खांद्यावरती घेतला जातो. जो अगदी साडी परिधान केल्यासारखा दिसतो. भारताच्या दक्षिणेकडील आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू आणि कर्नाटक या भागांमध्ये ही लेहेंगा स्टाईल बघायला भेटते.

Half Saree Lehenga
हाफ साडी लेहेंगा

12. क्रॉप टॉप लेहेंगा | Crop Top Lehenga

क्रॉप टॉप लेहेंगा हा पारंपारिक भारतीय पोशाख लेहेंगा चोली चे आधुनिक आणि स्टायलिश मिश्रण आहे, ज्यामध्ये लेहेंग्यावरती क्रॉप केलेला स्टायलिश टॉप परिधान केला जातो. ज्यामुळे सांस्कृतिक पेहेरावाबरोबरच ग्लॅमरस लुक देखील मिळतो. क्रॉप टॉप लेहेंगा हा फॅशन-फॉरवर्ड महिलांसाठी एक उत्तम पर्याय बनला आहे.

Crop Top Lehenga
क्रॉप टॉप लेहेंगा

13. इंडो-वेस्टर्न लेहेंगा | Indo Western Lehenga

इंडो-वेस्टर्न लेहेंगा हा भारतीय आणि पाश्चात्य देशातील मिश्रण आहे, लेटेस्ट फॅन्सी टॉप सह पारंपारिक भारतीय लेहेंगा या दोन्हींचे कॉम्बिनेशन आहे. सांस्कृतिक वारसा टिकवून त्यात आधुनिकतेची जोड देऊन हा अतिशय सुंदर इंडो वेस्टर्न लेहेंगा तयार होतो. त्यामुळेच त्याला अतिशय प्रसिद्धी देखील मिळालेली आहे.
यामध्ये लेहेंगा हा पारंपारिक लेहेंग्यासारखा नसून त्याला आधुनिकतेची जोड देऊन तयार केला जातो. तसेच ब्लाउज ऐवजी मॉडर्न पद्धतीचे टॉप किंवा क्रॉप टॉप, ऑफ-शोल्डर ब्लाउज, टी-शर्ट वापरले जातात, ज्यामध्ये त्यांची नेक लाईन आणि स्लीव्हज हे वेस्टर्न स्टाईल मध्ये तयार केलेले असतात. या वेस्टर्न स्टाईल मुळेच ड्रेसला ट्रेंडिंग ट्विस्ट देखील मिळतो.

Indo Western Lehenga
इंडो-वेस्टर्न लेहेंगा

14. शॉर्ट लेहेंगा | Short or Cropped Lehenga Skirt

भारतीय पारंपारिक लेहेंग्याचा क्रॉप केलेला लेहेंगा स्कर्ट हा एक आधुनिक प्रकार आहे, यामध्ये लेहेंग्याची लांबी ही गुडघ्याच्या वरती एवढी शॉर्ट असू शकते किंवा घोट्यापर्यंत देखील असू शकते. यामध्ये आपल्याला अनेक फॅन्सी लेहेंगा स्टाईल भेटतात. ब्लाउज ऐवजी या लेहंग्यावरती क्रॉप टॉप किंवा टी-शर्ट वापरले जातात. आधुनिक ट्रेंड सोबत पारंपारिक भारतीय पोशाखाचे हे मिश्रण अतिशय सुंदर आहे.

Short or Cropped Lehenga Skirt
शॉर्ट लेहेंगा

15. राजस्थानी लेहेंगा | Rajasthani Lehenga

राजस्थानी लेहेंगा, हा राजस्थान मधील पारंपरिक राजपूती पोशाख आहे. याला राजस्थानी घागरा चोली असे देखील म्हणतात. लेहेंगा हा पायापर्यंत लांब असतो आणि अतिशय घेरदार असतो त्यामध्ये अनेक प्लीट्स तयार केलेल्या असतात. या लेहेंग्यावरती राजस्थानी भरतकाम, विणकाम आणि मिरर वर्क देखील केलेले असते, तसेच गोटा पट्टी, जरदोजी, बांधणी, लहरीसारखे नक्षीकाम हे देखील या लेहेंग्यावरती केलेली असते त्यामुळे याची सुंदरता अधिकच वाढते.

Rajasthani Lehenga
राजस्थानी लेहेंगा

16. ट्रेल लेहेंगा | Trail lehenga

ट्रेल लेहेंगा ज्याला ट्रेल कट लेहेंगा असे देखील म्हणतात. हा भारतीय लेहेंग्याचाच आधुनिक प्रकार आहे. यामध्ये लेहेंगा हा घेरदार असून लेहेंग्याचा पुढील भाग हा पारंपरिक लेहेंगाप्रमाणेच असतो परंतु मागचा भाग हा अतिशय लांब असतो. ज्यामुळे जेव्हा हा लेहेंगा परिधान केल्यानंतर चालल्यावरती पाठीमागे हा ट्रेल पसरला जातो आणि त्याचे हे स्वरूप अतिशय सुंदर दिसते. हा मागच्या बाजूचा ट्रेल लेहेंग्याला ग्लॅमरचा स्पर्श देते.

Trail lehenga
ट्रेल लेहेंगा

फॅब्रिकनुसार लेहेंग्याचे प्रकार आणि त्यावरील वर्क

1. मेटॅलिक लेहेंगा | Metallic Lehengas

मेटॅलिक लेहेंगा सध्याच्या काळामधील अतिशय ट्रेंडिंग लेहेंगा आहे. त्याच्या ग्लॅमरस लुक मुळे हा लेहेंगा अतिशय लोकप्रिय आहे. लेहेंग्याला मेटॅलिक लुक देण्यासाठी फॅब्रिकमध्ये धातूच्या धाग्यांचे विणकाम केले जाते. तसेच काही फॅब्रिकमध्ये मेटॅलिक लूक तयार करण्यासाठी मेटॅलिक फॉइल प्रिंटिंग केली जाते किंवा एम्ब्रॉयडरी देखील केली जाते. मेटॅलिक लेहेंग्यामध्ये गोल्डन, सिल्व्हर, कॉपर, ब्रॉन्झ, रोझ गोल्ड हे कलर्स मोठ्या प्रमाणात वापरले जातात. यावरती मणी वर्क, स्टोन वर्क, एम्ब्रॉयडरी इत्यादींनी लेहेंगा सजवला जातो. मेटॅलिक लेहेंगा हा पारंपारिक आणि आधुनिक अशा विविध डिझाइनमध्ये देखील उपलब्ध आहेत.

Metallic Lehengas
मेटॅलिक लेहेंगा

2. बनारसी लेहेंगा | Banarasi Lehenga

बनारसी लेहेंगा हा आलिशान बनारसी रेशीमपासून बनवले जातात, हा लेहेंगा चमक आणि मऊपणासाठी अतिशय प्रसिद्ध आहे. या लेहेंग्यांमध्ये अस्सल रेशीमचा वापर करून पारंपरिक बनारसी साडीवर जे विणकाम केले जाते तसेच विणकाम या लेहंग्यावर देखील केले जाते. या मध्ये फुलांची रचना, पेस्ले, पक्षी, प्राणी आणि मोर आणि हत्ती या पारंपरिक नक्षीकामाचा समावेश आहे. 

Banarasi Lehenga
बनारसी लेहेंगा

3. ऑर्गेन्झा लेहेंगा | Organza Lehenga

ऑर्गेन्झा लेहेंगा दिसायला अतिशय सुंदर आणि  वजनाने खूप हलके असतात. हलकी चमक, कुरकुरीत पोत, निखळ आणि अर्धपारदर्शक कापडामुळे हा लेहेंगा लोकप्रिय आहे. ऑर्गेन्झा लेहेंगा पारंपारिक तसेच आधुनिक अशा विविध डिझाईन्समध्ये उपलब्ध आहेत. क्रॉप टॉप, ऑफ-शोल्डर ब्लाउज किंवा लांब स्लीव्हज सारखे ब्लाउज या लेहेंग्याचे सौंदर्य खुलवतात. 

Organza Lehenga
ऑर्गेन्झा लेहेंगा

4. बांधणी लेहेंगा | Bandhani Lehenga

बांधणी लेहेंगा हा गुजरात आणि राजस्थान सारख्या प्रदेशात खूप लोकप्रिय आहे. बांधणी ही एक पारंपारिक कला आहे. बांधणी लेहेंगा हा टाय-डाय तंत्राचा वापर करून बनवला जातो. रेशीम धागे आधी घट्ट बांधून रंगवले जातात मग कापडाचे विणकाम केले जाते. लेहंग्याची सुंदरता वाढवण्यासाठी त्यावर सिक्विन, मणी, भरतकाम किंवा मिरर वर्क देखील केले जाते. हॅल्टर नेक, बॅकलेस ब्लाउज किंवा ऑफ-शोल्डर ब्लाउज यावरती अतिशय सुंदर दिसतात.

Bandhani Lehenga
बांधणी लेहेंगा

5. चिकनकारी लेहेंगा | Chikankari Lehenga

चिकनकारी लेहेंगा हा पारंपारिक भरतकाम तंत्राचा वापरकरून तयार केला जातो. याची निर्मिती लखनौ इथे मोठ्या प्रमाणात केली जाते. लेहेंग्यावरती हाताने नाजूक भरतकाम केले जाते. ज्यामध्ये फुलांचे विणकाम, पेस्ले, वेली आणि इतर पारंपारिक भारतीय डिझाईन्स असतात. भरतकामाच्या व्यतिरिक्त, लेहेंग्याची सुंदरता वाढवण्यासाठी आणि कपड्यात चमक आणण्यासाठी सिक्विन्स, मणी, मोती किंवा मिरर वर्क यासारखे अधिक वर्क देखील केले जाते.

Chikankari Lehenga
चिकनकारी लेहेंगा

6. जॉर्जेट लेहेंगा | Georgette Lehenga

जॉर्जेट लेहेंगा मऊ आणि फ्लोय ड्रेपसाठी प्रसिद्ध आहे. जॉर्जेट हे एक टिकाऊ फॅब्रिक आहे. या कापडावरती सुरकुत्या पडत नाही ज्यामुळे हे लेहेंगे दिवसभर घालण्यासाठी योग्य असतात. जॉर्जेट लेहेंग्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी भरतकाम, सिक्विन, मणी, स्टोन आणि लेस यासारखे विविध घटक त्यावरती लावले जातात. पारंपारिक डिझाईन्समध्ये भारतीय कला संस्कृतीने प्रेरित भरतकाम असू शकतात, तर आधुनिक डिझाईन्समध्ये भौमितिक, फ्लोरल प्रिंट्स चा समावेश असतो.

Georgette Lehenga
जॉर्जेट लेहेंगा

7. मिरर वर्क लेहेंगा | Mirror Work Lehenga

मिरर वर्क लेहेंगा, याला शिशा वर्क लेहेंगा असे देखील म्हणतात, मिरर वर्क हे कापडावरील डिझाइन ची पारंपरिक पद्धत आहे. यामध्ये आरश्याचे लहान तुकडे  कापडावरती लावले जातात आणि त्याचे सुंदर नक्षीकाम तयार केले जाते. हे आरश्याचे तुकडे शिलाई ने कापडावरती अगदी पक्के केलेले असतात. 

Mirror Work Lehenga
मिरर वर्क लेहेंगा

8. कॉटन लेहेंगा चोली | Cotton Lehenga Choli

कॉटन लेहेंगा हा शुद्ध कॉटन फॅब्रिक पासून बनवला जातो. कॉटन फॅब्रिक अगदी हलके, हवेशीर आणि आरामदायक असतात. कॉटन लेहेंगा विविध प्रकारच्या डिझाईन्समध्ये येतात, ज्यामध्ये साधे आणि अधोरेखित नक्षीकाम देखील असते.

Cotton Lehenga Choli
कॉटन लेहेंगा चोली

हे देखील वाचा –

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

फॅशनलाइफस्टाइल

Yoga Clothes Information : महिलांना वर्क आऊट साठी योग्य कपडे का महत्त्वाचे आहेत? जाणून घ्या पूर्ण माहिती

जिम मध्ये जाणे, योगाभ्यास करणे, धावणे किंवा उच्च स्थरावरील जिम ट्रेनिंग मध्ये...

garba dress
फॅशनलाइफस्टाइल

नवरात्रीचा पोशाख : ९ रंगाचे महत्व

नवरात्री, भारतातील सर्वात आनंदी सणांपैकी एक आहे. वाईटावर चांगल्याच्या विजयाचा उत्सव आहे...

silk Fabric
लाइफस्टाइलफॅशन

सिल्क ( रेशीम )आणि सिल्क साड्यांबद्दल माहिती

आपण सर्व भारतीय महिला विशेष प्रसंगी सिल्कच्या साड्या परिधान करतो, परंतु या...

pure handmade kashmiri silk saree
लाइफस्टाइलफॅशन

काश्मिरी सिल्क साडी

काश्मिरी सिल्क साडी त्यांच्या सुंदर आणि आलिशान रेशीमच्या गुणवत्तेसाठी खास ओळखल्या जातात....