लाइफस्टाइलफॅशन

बालुचारी सिल्क साडी आणि स्वर्णाचारी साडी : प्रकार, इतिहास, वैशिष्ट्ये

green baluchari saree
Baluchari Silk Saree

बालुचारी सिल्क साडी, ही पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील छोटेसे गाव बलुचर या ठिकाणी तयार केली जाते. या गावाच्या नावावरूनच या साडीला बालुचारी साडी असे नाव देण्यात आलेले आहे. या साडीचे विणकाम बलुचर सह त्याच्या आसपासच्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात केले जाते. 2011 मध्ये बालुचारी साडीला GI टॅग (भौगोलिक स्थानदर्शक) प्राप्त झालेले आहे. बालुचारी साड्या पश्चिम बंगालचा पारंपारिक आणि सांस्कृतिक खजिना मानल्या जातात.

बालुचारी साडीचे प्रकार | Types of Baluchari

या साड्यांच्या विणकाम पद्धतीमध्ये फारसा फरक नाही. परंतु या साड्यांचे प्रकार हे विणकामात वापरल्या जाणाऱ्या रेशमाच्या धाग्यांच्या आधारावरती बालुचारी साडीचे प्रकार ठरतात. बालुचारी साडीचे तीन प्रकार आहेत.

1. बालुचारी रेशीम साडी | Baluchari Silk Saree

सर्वात सध्या बालुचारी साडी मध्ये संपूर्ण डिझाइन विणण्यासाठी एकाच रंगात रेशीम धागे असतात. ही फक्त शुद्ध रेशमापासूनच बनवली जाते. साडी तयार करण्यासाठी कुठलाही जरीचा वापर केला जात नाही.

2. बालुचारी मीनाकारी साडी | Baluchari Meenakari Saree

या साडीवरील सर्व डिझाईन्स, नक्षीकाम हे रेशमाच्या धाग्यांनीच तयार केलेले असतात. या बालुचारींमध्ये आकर्षक मीनाकारी काम करण्यासाठी दोन किंवा अधिक रंगांचे धागे असतात जे डिझाइन आणखी उठावदार बनवतात.

3. स्वर्णाचारी साडी | swarnachari saree

स्वर्णाचारी साडी, ही साडी तयार करण्यासाठी सोन्याच्या जरीचा किंवा चांदीच्या जरीचा वापर केला जातो. म्हणून या साडीला सुवर्णचरी साडी असे म्हणतात. या साडी वरती सुंदर पद्धतीची मीनाकरी केलेली असते.

बालुचारी सिल्क साडी
Baluchari Silk Saree

बालुचारी सिल्क साडीचा इतिहास | History of Baluchari saree

  • बालुचारी साड्यांचा इतिहास हा  200 वर्षांहून अधिक आहे, बंगालचा नवाब मुर्शिदकुली खान ज्यांनी 1717 ते 1727 या काळात राज्य केले, यांनी 18 व्या शतकामध्ये ही कला ढाका येथून मुर्शिदाबाद येथे आणली. 
  • बंगालची तत्कालीन राजधानी मुर्शिदाबाद हे त्यांचे मुख्य केंद्र बनले होते. मुर्शिदाबादमधील भागीरथी नदीच्या काठावरती असलेल्या बालुचर नावाच्या एका छोट्याशा गावामध्ये या साड्यांच्या विणकामाला सुरुवात झाली. 
  • बालुचारी हे नाव “बाळू” म्हणजेच मराठीमध्ये वाळू आणि “चार” याला नदीकिनार म्हणतात यावरून बालुचारी हे नाव देण्यात आले. 
  • सुरुवातीला या साड्या फक्त श्रीमंत व्यक्तींकडेच असायच्या आणि विशेष प्रसंगी किंवा सण समारंभांना परिधान केल्या जात असे. त्यानंतर कालांतराने या साड्या बंगालच्या सांस्कृतिक पोशाखाचा एक अविभाज्य भाग बनल्या आणि अतिशय लोकप्रिय झाल्या. 
  • परंतु 19 व्या शतकाच्या उत्तरार्धात नवाबी दरबारांच्या ऱ्हासानंतर, इंग्रजांच्या काळामध्ये यंत्राद्वारे कापड बनवण्यास सुरुवात होऊ लागली, आणि बदलत्या फॅशन ट्रेंडसारख्या विविध कारणांमुळे पारंपारिक बालुचारी साडी विणकाम अतिशय कमी होऊ लागले.
  • 20 व्या शतकात, बालुचारी साडी विणकामाला पुनरुज्जीवित करण्याचे प्रयत्न सुरू होऊ लागले. पश्चिम बंगाल सरकार आणि इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज (INTACH) यासारख्या संस्थांनी विणकरांना पाठिंबा आणि प्रोत्साहन दिले. विणकारांना या पारंपारिक कलेचे जतन आणि संवर्धन करण्यात मदत केली.
  • जॅकवर्ड विणकामाचे तंत्र विकसित केले गेले. साडी विणण्याची प्रक्रिया सुलभ झाली आणि साडी विणण्यासाठी लागणारा वेळही कमी लागू लागला. 

बालुचारी सिल्क साडीची वैशिष्ट्ये | Features of Baluchari Saree

  • बालुचारी साडीचा पदर त्याच्या उत्कृष्ट विणकामासाठी प्रसिद्ध आहे, ज्यामध्ये पौराणिक दृश्यांचे विणकाम असते.
  • या साडी वरती पौराणिक कथा, महाकाव्य रामायण, महाभारतातील दृश्यांचे विणकाम अतिशय सुंदर पद्धतीने केले जातात. 
  • महाकाव्यातील लढायांच्या दृश्यांपासून ते शाही  दरबारातील दृश्य, प्रत्येक कारागिराचे कौशल्य दर्शविते.
  • साडी तयार करण्यासाठी अस्सल रेशमाचा वापर केला जातो.
  • ही साडी हात मार्गावरती तयार केली जाते. 
  • साडीचे विणकाम पूर्ण होण्यासाठी 7 ते 8 दिवस लागतात, तसेच साडी वरती जर अधिक विणकाम असेल तर विणकाम पूर्ण होण्यासाठी त्यापेक्षाही अधिक दिवस लागू शकतात. 
  • साडीच्या काठांवरती शकुंतला आणि हरिण यांचे विणकाम अतिशय सुंदर पद्धतीने केले जाते.
  • या साडी वरती निसर्ग प्रेरित विणकाम देखील केले जाते. पक्षी आणि प्राण्यांचे दृश्य काहीवेळा साडीवरील वनस्पती किंवा प्राण्यांमध्ये लपलेल्या आढळतात.
  • या साडीवरील ब्लाउज हा रनिंग कलर मध्ये येत असतो, म्हणजे साडीच्या कलर मध्येच येतो.
  • ब्रिटिशांच्या काळा मधील देखील  दृश्य या साडी वरती  तयार केलेली  दिसतात, एक पुरुष धूम्रपान करताना आणि हातामध्ये पंखा असलेली एक महिला. 
  • महाकाव्यातील लढायांच्या दृश्यांपासून ते शाही  दरबारातील दृश्य, प्रत्येक कारागिराचे कौशल्य दर्शविते.

बालुचारी सिल्क साडी विणकामाची पद्धत | Method of Saree Weaving

  • सर्वप्रथम एका ग्राफ पेपर वरती आपल्याला हवी असलेली डिझाईन तयार करून घेतली जाते.
  • त्यानंतर पंचिंग कार्ड वरती हे डिझाईन पंच केले जातात.
  • हे पंच केलेले डिझाईन एकमेकांमध्ये क्रमाने शिवून मशीन वरती सेट केले जातात. 
  • रेशीम धागे हे देखील मशीन वरती सेट केले जातात आणि विणकाम प्रक्रियेला सुरुवात केली जाते. 

बालुचारी सिल्क साडी कशी ओळखावी? How to identify Baluchari saree?

  • प्युअर बालुचारी सिल्क साड्या या अस्सल रेशीम पासून बनवल्या जातात. 
  • या साड्यांचे विशेष म्हणजे यांचा पदर हा लांब असतो. 
  • या साडवांवरती आयताकृती विणकाम केलेले असते आणि त्यामध्ये पौराणिक कथांचे विणकाम अतिशय सुंदर पद्धतीने केलेले असते.
  • प्युअर बालुचारी साडी ही दोन्हीही बाजूने, म्हणजेच उलट आणि सुलट बाजूने अगदी एकसारखीच दिसते. 

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

silk Fabric
लाइफस्टाइलफॅशन

सिल्क ( रेशीम )आणि सिल्क साड्यांबद्दल माहिती

आपण सर्व भारतीय महिला विशेष प्रसंगी सिल्कच्या साड्या परिधान करतो, परंतु या...

pure handmade kashmiri silk saree
लाइफस्टाइलफॅशन

काश्मिरी सिल्क साडी

काश्मिरी सिल्क साडी त्यांच्या सुंदर आणि आलिशान रेशीमच्या गुणवत्तेसाठी खास ओळखल्या जातात....

wedding outfit ideas for womens
फॅशनलाइफस्टाइल

लग्नामध्ये कुठला पोशाख घालावा याचा विचार करताय का? इथे आहेत महिलांसाठी काही भन्नाट कल्पना

लग्नामध्ये कुठला पोशाख घालावा? हा प्रश्न तर सर्वांनाच पडलेला असतो. आपल्या भारतीय...

konrad silk saree
लाइफस्टाइलफॅशन

दक्षिण भारतातील टेम्पल साडी – कोनराड सिल्क साडी | Konrad Silk Saree

कोनराड सिल्क साडी, ही साडी भारतातील सर्वात सुंदर साड्यांपैकी एक साडी आहे....