कोनराड सिल्क साडी, ही साडी भारतातील सर्वात सुंदर साड्यांपैकी एक साडी आहे. या साडीचा उगम दक्षिण भारतातील तामिळनाडूतील कांचीपुरम येथील आर्णी इथे झाला आहे. ही पारंपरिक साडी अस्सल रेशीम पासून हातमागावरती विणली जाते. या साडीला सांस्कृतिक महत्व देखील आहे. या साड्यांचे विणकाम मुळात मंदिरातील देवतांसाठी केले जात असे.
कोनराड साडीला दक्षिण भारतामध्ये “टेम्पल साडी” किंवा “मुभगम साडी” या नावाने देखील ओळखले जाते. आपण या ठिकाणी कोनराड साडीबद्दल तपशिलासह संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
कोनराड सिल्क साडीचा इतिहास | History of Konrad Silk Saree
असे म्हणतात १९ व्य शतकामध्ये आर्णी हे कोनराड साडी विणकामाचे प्राथमिक केंद्र होते. त्यानंतर या साडीचे विणकाम आजूबाजूच्या भागांमध्ये देखील केले जाऊ लागले. तामिळनाडूमध्ये शतकानुशतके या साडीचे विणकाम पारंपरिक पद्धतीने चालू आहे. असे म्हणतात १९ व्य शतकामध्ये आर्णी हे कोनराड साडी विणकामाचे प्राथमिक केंद्र होते.
विजयनगर साम्राज्याच्या काळात आणि कालांतराने कांचीपुरम भागातील मराठा शासकांच्या आश्रयाने कोनराड साडीला प्रसिद्धी प्राप्त झाली. सुरवातीच्या काळामध्ये या साड्या राजघराण्यातील प्रतिष्टित लोक सण उत्सवा दरम्यान परिधान करत. त्यानंतर या साडीचे विणकाम आजूबाजूच्या भागांमध्ये देखील केले जाऊ लागले. प्रत्येक भागामध्ये साडी विणकामाच्या पद्धतीमध्ये व डिझाइन मध्ये थोडा वेगळेपण असतो.
कोनराड सिल्क साडीचे प्रकार | Types of Konrad Silk Sarees
- आर्णी सिल्क साडी | Arni Silk Saree – आर्नी सिल्क साड्या कांचीपुरम साड्यांच्या तुलनेत थोड्या वेगळ्या आहेत. या साडीचा पोत आणि पॅटर्न वेगळा आहे. आर्नी हे गाव तामिळनाडूच्या कमंडला नदीच्या काठावरती वसलेले आहे. या साडीवरती कोरवाई विणकाम पद्धतीचा वापर करून विणकाम केले जाते त्यामुळे या साडीला कोरवाई वर्क साडी देखील म्हणतात. आर्णी या ठिकाणचे हातमाग वस्त्र मऊपणा आणि टिकाऊपणासाठी अतिशय प्रसिद्ध आहेत.
- रासीपुरम सिल्क साडी | RasiPuram Silk Saree – रासीपुरम सिल्क साड्या ही एक अतिशय प्रसिद्ध कोनराड साडी आहे जिचा उगम तामिळनाडूतील रसीपुरम गावामध्ये झाला आहे. कोनराड साडीचा हा अतिशय सुंदर प्रकार आहे. रासीपुरम साडी ही सालेम सिल्क या नावाने देखील ओळखली जाते. या साडीमध्ये पल्लू आणि काठांवरती जरीचे काम कमी केलेले असते. म्हणून रसीपुरम कोनराड साड्या इतर कोनराड साड्यांपेक्षा वजनाने अतिशय हलक्या आणि परिधान करण्यास अतिशय सोप्या असतात.
- तंजावर सिल्क साडी | Thanjavur Silk Saree – तंजावर सिल्क साड्यांमध्ये संपूर्ण साडीवरती सोन्याच्या जरीचे विणकाम केलेले असते. ही साडी तयार करण्यासाठी शुद्ध जरीचा वापर केला जातो. या साडीला एकाच बाजूने बॉर्डर असते. सोन्याच्या जरीच्या वापरामुळे या साड्या खूप महाग असतात.
- अरक्कू कोनराड साडी | Arakku Konrad Saree – लाख रंगाची बॉर्डर असलेल्या पारंपरिक कोनराड साडीला अरक्कू साडी असे म्हणतात.
- कोनराड शिफॉन साडी | Konrad Chiffon Saree – ही साडी शिफॉन आणि सिल्क यांच्या मिश्रणातून तयार झालेली आधुनिक साडी आहे. या साडीवरती अतिशय सुंदर जरदोसी भरतकाम केलेले आहे. रेशीम आणि शिफॉन च्या एकत्रीकरणातून तयार झालेली शिफॉन कोनराड साडी एक उत्तम साडी आहे.
- कोनराड आर्ट सिल्क साडी | Konrad Art Silk Saree – प्युअर कोनराड सिल्क साडी ही महाग असते. प्युअर कोनराड सिल्क साडीच्या तुलनेत कोनराड आर्ट सिल्क साडी ही अतिशय कमी किंमतीमध्ये उपलब्ध होते आणि दिसायलाही तितकीच सुंदर आणि ग्लॅमरस असते.
कोनराड सिल्क साडीचे वैशिष्ट्ये | Features of Konrad Silk Saree
- या साडीचे विशेष आकर्षणचा भाग असतो तो या साडीची बॉर्डर, ही बॉर्डर १० – १४ सेंटिमीटर इतकी असते.
- पारंपारिक पद्धतीने हातमागावरती तयार केलेल्या कोनराड साडीच्या मुख्य भागामध्ये चेक्स किंवा पट्टेदार नक्षीकाम केलेले असते. स्थानीकी भाषेत त्याला “कंपी” किंवा “पेटू” (पट्टे) असे देखील म्हणतात.
- या साड्या सोन्याच्या किंवा चांदीच्या धाग्यांमध्ये देखील विणल्या जातात.
- कोनराड साडीवरती नैसर्गिक आकृत्या, पाने, फुले, प्राणी, पक्षी, पोपट, दुहेरी डोके असलेले गरुड आणि भौमितिक नमुने यांचे सुंदर विणकाम केलेले असते.
विणकामाची पध्दत | Method of weaving
- कोनराड सिल्क साडी तयार करण्यासाठी उच्च दर्जाचे तुतीचे रेशीम वापरले जाते.
- हे रेशीम धागे वेगवेगळ्या रांगांमध्ये रंगवले जातात. हे रंग नैसर्गिक पद्धतीने तयार केले जातात यामध्ये कुठल्याही केमिकल रंगाचा वापर केला जात नाही. पारंपरिक रंग हे वनस्पती आणि खनिजांपासून तयार केले जातात.
- हे रेशीम धागे हातमागावरती सेट केले जातात. कोनराड साड्या पारंपारिकपणे पिट लूम किंवा फ्रेम लूमवर विणल्या जातात.
- सर्वात आधी ज्या प्रकारचे नक्षीकाम साडीवरती तयार करायचे आहे ते आधी ग्राफ पेपर वरती तयार केले जाते. ज्यामुळे कारागीर अचूक पद्धतीने धाग्यांचे विणकाम करू शकतो. या विणकामामध्ये कुशलता अतिशय महत्वाची असते.
- यामध्ये इंटरलॉकिंग वेफ्ट तंत्र वापरले जाते. पिल्लू आणि काठांवरती विशेष जरीच्या धाग्यांमध्ये विणकाम केले जाते.
- विणकाम पूर्ण झाल्यानंतर साडी लूमवरून काळजीपूर्वक कापली जाते. आणि साडीवरील अतिरिक्त धागे कापले जातात.
- साडीवरील डाग काढण्यासाठी साडी धुतली जाते आणि मऊपणा येण्यासाठी साडीला इस्त्री केली जाते.
कोनराड साड्या कुठे तयार केल्या जातात | Where are Konrad sarees made?
तामिळनाडूमधील आर्नी, कांचीपुरम, रासिपुरम, कुंभकोणम, मद्रास, तंजावर, सेलम, थिरुभुवनम याठिकाणी पारंपरिक पद्धतीने कोनराड साडी हाताने विणली जाते. असे म्हणतात की पूर्वी आर्नी हे गाव कोनराड साडी निर्मितीचे केंद्रबिंदू होते. परंतु कालांतराने आजूबाजूच्या भागांमध्ये साडीचे विणकाम सुरु झाले.
त्यामुळे सध्या तंजावर आणि कुंभकोणम या ठिकाणी कोनराड साडीचे सर्वात मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. कुंभकोणम येथे विविध प्रकारच्या बॉर्डर्स मध्ये या साडीचे विणकाम केले जाते. तसेच तामिळनाडूतील इतर ठिकाणी मुब्बगम प्रकारच्या साडीचे उत्पादन घेतले जाते.
कोनराड सिल्क साडीची किंमत | Konrad Silk Saree Price
कोनराड सिल्क साड्या या अस्सल रेशीम आणि जरी पासून बनवल्या जातात त्यामुळे या साड्यांची किंमत देखील थोडी जास्त असते. कोनराड साडीची किंमत 7000 रुपयांपासून सुरू होते आणि 50000 किंवा त्याहिपेक्षा अधिक असू शकते.
साडीवरील विणकाम, वापरलेल्या सोन्याच्या किंवा चांदीच्या जरीच्या धाग्यांमुळे साडीची किंमत कमी किंवा जास्त होऊ शकते.
हे सुद्धा वाचा ;-
Leave a comment