लग्नामध्ये कुठला पोशाख घालावा? हा प्रश्न तर सर्वांनाच पडलेला असतो. आपल्या भारतीय संस्कृती मध्ये लग्न समारंभाला फार महत्व आहे. लग्नातील विविध कार्यक्रम असो किंवा कार्यक्रमातील महत्वाचे धार्मिक विधी अगदी आनंदाने आणि मोठ्या उत्सवात हे सर्व सोहळे पार पाडले जातात. आणि या सर्व सोहळ्यमध्ये विविध प्रकारचे ड्रेस तसेच प्रत्येक कार्यक्रमाची सुंदरता वाढविण्यासाठी ठराविक त्या प्रकारचा ड्रेस कोड देखील असतो. आपली पहिली छाप ही सर्वात महत्वाची असते. त्यामुळे भारतीय वेडिंग ड्रेस कसा स्टाईल करावा हे सर्वात महत्वाचे आहे.
म्हणून या सर्व गोष्टींना साजेसे आणि योग्य पोशाख निवडणे गरजेचे आहे. कुठला पेहराव करावा आणि कशा पद्धतीने केल्यास अतिशय सुंदर आणि मोहक लुक दिसेल ? त्यामुळेच आम्ही आलो आहोत तुमच्या मदतीला. या ठिकाणी आपण बघणार आहोत विवाह सोहळ्यामध्ये कुठला पोशाख निवडावा आणि त्याचबरोबर सौंदर्य खुलविण्याचे काही महत्वाच्या टिप्स.
तुम्ही लग्नाच्या कुठल्या कार्यक्रमासाठी जात आहात त्यावरून तुमचे ड्रेस निवडा. ज्या प्रसंगासाठी तुम्ही जात आहात त्याला साजेसा पोशाख असणे आवश्यक आहे त्याबद्दल आपण जाणून घेऊया.
मेहंदीच्या कार्यक्रमासाठी कुठला पोशाख योग्य राहील ?
मेहंदीच्या कर्यक्रमासाठी नेहमी वजनाने हलके आणि आरामदायक कपडे निवडा. ज्यामुळे मेहंदी हातावरती लावल्यानंतर तुमची हाल होणार नाही. सर्वात महत्वाचे म्हणचे जो कुठलाही ड्रेस तुम्ही निवडाल त्याची बाही ही कमी असावी ज्यामुळे मेहंदी आपल्याला हवी त्या प्रमाणात काढता येते. या कार्यक्रमासाठी शक्यतो मेहंदीच्या रंगाच्या शेड प्रमाणेच ड्रेसचा रंग निवडावा.
मेहंदीच्या या फंक्शन मध्ये तुम्ही पारंपरिक लुक सोबत इंडोवेस्टर्न आऊटफिट, डिझायनर गाउन देखील वापरू शकता, त्यामुळे तुमचा लुक सुंदर आणि युनिक दिसेल. आणि जर तुम्हाला संपूर्णच पारंपरिक इंडियन लुक हवा असेल तर लेहंगा चोली, सलवार कमीज, साडी हे अतिशय योग्य ठरेल.
संगीत कर्यक्रम / कॉकटेल पार्टी यासाठी कसा पोशाख निवडावा ?
संगीत, हा कर्यक्रम शक्यतो संध्याकाळच्या वेळी असतो, त्यामुळे या कार्यक्रमामध्ये रंगीबेरंगी, हेवी वर्क असलेले, सुंदर सर्वत्र भरलेल्या डिझाइन्स आणि विविध अलंकारांनी सजवलेला पोशाख शक्यतो निवडा. ज्यामुळे रात्रीच्या वेळी तुमचा ड्रेस आणि त्याचबरोबर तुमचे सुंदर आणि मोहक लुक खुलून दिसेल. या ठिकाणी तुम्ही लेहंगा चोली, अनारकली, चुडीदार, पटियाला, शरारा, गरारा या पोषाखांची निवड करू शकता.
हळदीच्या कार्यक्रमासाठी कोणता आणि कसा पोशाख योग्य राहील ?
हळदी, लग्नाच्या एक दिवस अगोदर असणारा हा सोहळा. अतिशय सुंदर, मजेदार आणि आनंददायी असा हा कार्यक्रम. या सोहळ्यासाठी नेहमी पिवळ्या रंगामध्ये तुमचा पोशाख निवडा. वधू आणि वर या दोघांचा ड्रेस तर असतोच पिवळ्या रंगामध्ये, परंतु आपण देखील पिवळ्या रंगात ड्रेसची निवड करावी.
कारण की या सोहळ्यामध्ये सर्व एकमेकांना हळद लावतात आणि हे डाग आपल्या ड्रेसला देखील लागू शकता. तसेच छोटी बाही असलेले कपडे वापरावे. यामध्ये परंपरिक लुक हवा असेल तर साडी, सलवार कमीज, लेहंगा चोली, चुडीदार या पारंपरिक पोशाखची निवड करू शकता. आणि जरा वेस्टर्न लुक हवा असेल तर फॅन्सी रेडी टू वेअर साडी अव्हेलेबल असतात यासोबत आपण फॅन्सी लुक कॅरी करू शकतो.
लग्नाच्या मुख्य विधीमध्ये कुठला पोशाख घालावा ?
मुख्य लग्नाच्या सोहळ्यासाठी मात्र तुम्ही पारंपरिक पोशाख परिधान करण्याला प्राधान्य दया. यामध्ये महाराष्ट्रीयन नऊवारी साडी, भारतीय पारंपरिक साडी किंवा लेहंगा चोली, त्याचबरोबर लॉन्ग गाऊन देखील तुम्ही निवडू शकता. यामध्ये देखील सुंदर डिझाइन्स आणि कलर याची योग्य निवड असणे महत्वाचे आहे. तसेच त्याला शोभेल असे दागिने देखील निवडावे. जर तुम्ही साडी परिधान करणार असाल तर साडीवरती सुंदर डिझाइनर ब्लाउज निवडावे आणि त्याचबरोबर साडीची ड्रेपिंग योग्य असणे गरजेचे आहे. साडीवरती पारंपरिक किंवा मॉडर्न ट्विस्ट देखील सुंदर दिसेल.
रिसेप्शन साठी कुठला पोशाख निवडावा ?
लग्न समारंभ आटोपल्यानंतर असतो तो रिसेप्शन सोहळा. संगीत सोहळ्यातील पोशाखामध्ये आणि रिसेप्शन मधील पोषाखामध्ये तासा काही फारसा फरक नाही. या ठिकाणी आपण सुंदर आणि चमकदार कपड्यांना प्राधान्य द्यावे, ज्यामुळे रात्रीच्या वेळी तुमचा पोशाख उठून दिसेल. या मध्ये तुम्ही सुंदर इव्हिनिंग गाउन किंवा स्टाईलिश इंडो-वेस्टर्न आउटफिट निवडू शकता.
तुमच्या रंगला शोभेल असे कलर कसे निवडाल ?
कुठल्याही कार्यक्रमामध्ये जेव्हा आपण पोशाख परिधान करतो तेव्हा त्याचा रंग आपल्या त्वचेच्या टोनला पूरक असला पाहिजे नाहीतर तुमचा संपूर्ण लुक बिघडेल. भारतीय विवाह सोहळ्यांमध्ये उठवदार रंगांना फार प्राधान्य दिले जाते. त्यामुळे तुम्हाला जो रंग आवडेल तो निवडा मात्र तुमच्या त्वचेच्या टोनला मिळता जुळता असावा.
या सोहळ्यांमध्ये सहसा पांढऱ्या आणि काळ्या रंगाचे कपडे टाळावे. तुमची त्वचा गोरी किंवा फिकट असेल तर ब्लश पिंक, मिंट ग्रीन, पावडर ब्लू यासारखे सॉफ्ट पेस्टल रंगाचा वापर तुमची सुंदरता अधिक वाढवेल. ज्यांचा रंग माध्यम किंवा थोडा सावळा आहे त्यांनी हलका पिवळा, फेंट ऑरेंज किंवा डीप ग्रीन यासारखे रंग निवडावे. गडद त्वचा टोन असेल तर पन्ना हिरवा, नीलम निळा आणि डार्क बरगंडी यासारख्या रंगांची निवड करावी.
हे सुद्धा वाचा ;
Leave a comment