उखाण्यांची मैफिल आलीया रंगात, आणि 36 नखरे माझ्या बायकोच्या अंगात.
लग्नाच्या चार दिवस .... एवढी लाजली, एवढी लाजली, आणि एवढ्या दहा-बारा वर्षात केव्हडी माजली.
आज झालं आमचं लग्न, लग्नात आला होता बँड वाला, .... चे नाव घेतो, झुकेगा नई साला.
मिशी आहे मर्दाची शान आणि गल्ली गल्लीत आहे आपली जान.
बाजारातून आणली सुपारी चिकणी, आणि माझी वहिनी आहे दिसायला हेकनी.
रस्त्यात आला म्हशींचा घोळका, त्यात आमच्या .... ला ओळखा.
वादळ आलं, पाऊस आला, नंतर आला पूर, ... लई वळवळ करू नको नाहीतर काढील कानाखाली धूर.
लग्न जमल्यापासून रात्रीचा लागत नाही डोळा, … चे नाव ऐकण्यासाठी कावळ्यासारखे झाले सगळे गोळा.
आल्या आल्या सासूबाई, पाया पडतो वाकून, ... चे नाव घेतो एक क्वार्टर टाकून.
खुर्चीत खुर्ची प्लास्टिकची खुर्ची .... आमची लवंगी मिरची.
ठरलं लग्न आणि बांधला बस्ता, आणि माझी ... म्हणजे काळ्या डांबराचा रास्ता.
रव्याचा लाडू बुक्कीने फोडू, चल ग .... जोडीने उपवास सोडू.