लाइफस्टाइलफॅशन

सिल्क ( रेशीम )आणि सिल्क साड्यांबद्दल माहिती

silk Fabric

आपण सर्व भारतीय महिला विशेष प्रसंगी सिल्कच्या साड्या परिधान करतो, परंतु या सिल्कच्या साड्या तयार करण्यासाठी वापरण्यात आलेले सिल्क कसे तयार केले जाते आणि त्याचा प्राचीन इतिहास काय आहे हे आपल्याला माहित असणे गरजेचे आहे.

सिल्क साडी साठी लागणाऱ्या रेशीम ची थोडीशी माहिती घेऊया | History of Silk Saree

रेशीम एक नैसर्गिक फायबर आहे. सुरुवातीच्या काळामध्ये रेशीम चीनमधून आयात केले जायचे, रेशीम चा इतिहास 27 व्या शतकातील चीनमध्ये सापडतो, जेव्हा फक्त चीनी लोक रेशीम वापरत असत. तांग राजवंशाच्या काळात, लोकांनी परिधान केलेल्या रेशमाचा रंग त्यांचा सामाजिक दर्जाचा वर्ग दर्शवत होता. चिनी लोक या रेशमी कापडाचा उपयोग कपडे, लेखन आणि इतर कारणांसाठी करत होते. नंतर कालांतराने भारतामध्येही रेशीमचे उत्पादन होऊ लागले. रेशीम चे उत्पादन एका अळीपासून होते (Silkworm). सध्या चीन, भारत, स्पेन, इटली, फ्रान्स या देशांमध्ये रेशीमचे उत्पादन घेतले जाते. रेशीमउत्पादनात भारताचा जगामध्ये दुसरा नंबर आहे. भारतात ९७% रेशीम उत्पादन होते.

पारंपारिक रेशीमचे प्रकार | Reshim che paramparik prakar | Traditional Silk Type

  • मलबरी रेशम | Mulberry silk ( शहतूत रेशम | shahtoot silk )
  • तसर रेशम | Tussar silk | Tasar silk
  • ओक रेशम | Oak silk
  • एरी रेशम| Eri silk
  • मुगा रेशम | Muga silk

आपल्याला कुठल्या प्रकारचा रेशीम हवा आहे हे कोकून च्या आहाराच्या सवयींवरून ठरवला जातो. रेशीम तंतू खूप मजबूत असतात. नैसर्गिक प्रथिने फायबर संवेदनशील त्वचा असलेल्यांना त्रास देत नाही. फक्त भारतामध्येच या पाचही प्रकारच्या सिल्कचे उत्पादन घेतले जाते.

रेशीम साड्या तयार करण्यासाठी जरीचा वापर वारंवार केला जातो. पूर्वी रेशीम साडी फक्त प्रतिष्ठित किंवा श्रीमंत घरातील बायकांकडे असायची, मात्र बदलत्या काळानुसार आणि परिस्थितीनुसार आता भारतातील प्रत्येक महिलेकडे एक तरी रेशीम साडी असतेच आणि आता भारतातच नाही तर विदेशातील स्त्रियांना देखील तिच्या दिमाखदार रूपाने रेशीमसाडीची भुरळ घातली आहे.

अस्सल सिल्क साडी कशी ओळखायची | Assal silk saree kashi olkhaychi | How to Identify Pure silk saree ?

  • सर्वात आधी सिल्क साडी वरती हॉलमार्क (hallmark) आहे की नाही ते चेक करणे. अस्सल सिल्क साड्यांचे उत्पादन करणाऱ्या विक्रेत्यांनाच सरकारने हॉलमार्कचे अधिकार दिले आहेत. 
  • कापडाला हात लावून चेक करणे, कापड अगदीच माऊ लागले तर समजायचे ते अस्सल रेशीम आहे.
  • सिल्क चा कपडा चुरगळल्यानंतर त्याचा आवाज येतो. 
  • अस्सल सिल्क हे उबदार असते. 
  • अस्सल सिल्क साडी चे काठ खडबडीत असतात. 
  • या साड्यांचे टेक्चर समान नसते.
  • अस्सल सिल्क हे फ्लेक्झिबल असते तो कपडा एखाद्या अंगठी मधून बाहेर काढला तर संपूर्ण साडी ही जशीच्या तशी अगदी अलगद अंगठीमधून बाहेर निघते.
  • खऱ्या सिल्क साडी ला एक वेगळीच शाईन असते आणि ती बघताक्षणी नजरेत बसते ती ओळखता आली पाहिजे.
  • अस्सल सिल्क साडी ही महाग असते त्यामुळे नक्कीच आपण किंमतीवरूनही साडीचे निरीक्षण करू शकतो, जर साडीची किंमत कमी असेलच तर ओळखून घ्यावे कि ती साडी अस्सल रेशमा पासून बनलेली नाही.
  • सिल्क साडी विकत घेतांनी शक्यतो पारंपरिक आणि अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदी करावी, त्यामुळे आपली फसवणूक होणार नाही.

सिल्क साड्यांची काळजी कशी घ्यायची | Silk saree Chi kalji Kashi ghyavi | How to care for silk sarees. 

  • या साड्या नेहमी मलमल च्या मऊ कपड्यामध्ये ठेवाव्यात.
  • रेशीम साड्यांवरती डायरेक्ट परफ्यूमचा वापर करायचा नाही. 
  • रेशीम साड्या नेहमी ड्रायक्लीन कराव्यात, त्यामुळे त्यांची चमक वर्षानुवर्षी टिकून राहते.
  • रेशीम साड्या नेहमी ड्रायक्लीन कराव्यात, त्यामुळे त्यांची चमक वर्षानुवर्षी टिकून राहते.
  • या साड्या शक्यतो डायरेक्ट सूर्यप्रकाशामध्ये ठेवायच्या नाही.

सिल्क साड्या महाग का असतात ? | Why are silk sarees so costly?

रेशीम धागा तयार होण्यासाठी खूप मेहनत लागते, त्याचबरोबर साडी साठी लागणारी जरी देखील खूप महाग असते, त्यामुळे या साड्या खूप महाग असतात. तसेच या रेशीम साड्यांवरती हाताने विणकाम केले जाते आणि या विणकामासाठी बरीच मेहनत लागते म्हणून या साड्यांची किंमत जास्त असते.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

फॅशनलाइफस्टाइल

Yoga Clothes Information : महिलांना वर्क आऊट साठी योग्य कपडे का महत्त्वाचे आहेत? जाणून घ्या पूर्ण माहिती

जिम मध्ये जाणे, योगाभ्यास करणे, धावणे किंवा उच्च स्थरावरील जिम ट्रेनिंग मध्ये...

garba dress
फॅशनलाइफस्टाइल

नवरात्रीचा पोशाख : ९ रंगाचे महत्व

नवरात्री, भारतातील सर्वात आनंदी सणांपैकी एक आहे. वाईटावर चांगल्याच्या विजयाचा उत्सव आहे...

pure handmade kashmiri silk saree
लाइफस्टाइलफॅशन

काश्मिरी सिल्क साडी

काश्मिरी सिल्क साडी त्यांच्या सुंदर आणि आलिशान रेशीमच्या गुणवत्तेसाठी खास ओळखल्या जातात....

wedding outfit ideas for womens
फॅशनलाइफस्टाइल

लग्नामध्ये कुठला पोशाख घालावा याचा विचार करताय का? इथे आहेत महिलांसाठी काही भन्नाट कल्पना

लग्नामध्ये कुठला पोशाख घालावा? हा प्रश्न तर सर्वांनाच पडलेला असतो. आपल्या भारतीय...