- उभा होतो घरात, तेव्हड्यात …. आपटून पडली जोरात.
- आमची …. जेवण करते इतकी दमानं, जशी गोठ्यातली म्हैस रवंथ करते आरामानं.
- घरात पडली भांडी, बाहेर पडले बादलीभर धुणं, आमची …. सकाळपासून बघत बसली मोबाईल अन म्हणती काम काही उरकानं.
- घरात सासू, दारात मेहुणा, अंगणात बसला सासरा,… आता धरून बसतो घरातला एक कोपरा.
- मी म्हणालो अगं येकतेस का, आणि जेव्हा आमची …. व्हस्कन अली अंगावर तर घाबरून म्हणालो जरा अराम करतेस का.
- पैठणीवर होते सुंदर मोर, आणि आमच्या …. चे केस किती काळे भोर.
- सुट्टीच्या दिवशी म्हटलं बायको सोबत जरा आनंद साजरा करू, आणि मग काय …. ला म्हटलं चाल दोघं मिळून घरातलं काम करू.
- ओल्या फरशीवर पाय पडला तर …. बघते डोळे वटारून, मग काय परत पुसून घेतो फारशी बायकोला घाबरून.
- घरात होतं दूध, दुधावर होती साय, आमची …. म्हणजे अगदी गरीब गाय.
- घरात होतं दूध, दुधावर होती मऊ – मऊ साय, आमची …. म्हणजे गोठ्यातली मारकी गाय.
- दूध आणले चहा केला, चहा काही आवडेना, हजार वेळेस सांगितले पण …. ला चहा काही जमेना.
- लाल – लाल दोरा त्याला सोनेरी गोंडा, सासऱ्यांनी बांधला माझ्या गळ्यात … नावाचा धोंडा.
Leave a comment