- स्वप्नात पाहिलेले घर आज सत्यात आले,…. समवेत सौख्याचे क्षण लाभले.
- पानात वेलची, ताटात तूप, … राव आहेत माझे भाग्यवंत रूप.
- चंद्र-सूर्याच्या साक्षीने घेतो ….चे नाव, आयुष्यभर साथ देईन हाच आहे ठराव.
- सोन्याच्या ताटात दिला नैवेद्य खास,… माझे, सुखी जीवनाचा प्रकाश.
- गणपती बाप्पा झाले घरात विराजमान, …. राव माझे आनंदाचा दागिना महान.
- सोन्याच्या ताटात वाढला गोड गोड शिरा, …. रावांमुळे वाढला माझा तोरा.
- चंदनाचा सुवास, मोगऱ्याचा गंध, … रावांसोबत आता घेईन संसाराचा आनंद.
- स्वप्नात पाहिलेले घर आज सत्यात आले, … रावांसोबत सौख्याचे क्षण लाभले.
- साखर टाकली चहात, झाला गोड गुळगुळीत, … ला पाहून माझं मनच झालं डळमळीत.
- दुपारी वाढते ऊन, रात्री सुटतो वारा गार, … राव दिसतात अगदी सुपर स्टार.
- गावभर फिरतात सायकल वर, हातात नेहमी मोबाईल, … सोबत माझं जगणं, जणू राईड ऑन रोयल इनफिल्ड स्टाईल.
- चहा पिताना साखर जरा जास्तच पडली, … ला पाहून माझी धडधड जरा जास्तच वाढली.
- पोहे खाताना बटर टाकलं जास्त, … राव माझे दिसतात अगदीच क्युट आणि मस्त.
- दुधात साखर टाकून केली लस्सी भारी, … रावांची भलतीच खुश दिसते स्वारी.
- भाजीवाल्या काकूंनी केली घासाघीस भारी, … राव माझे बाजारात झाले फेमस, म्हणूनच लोक म्हणतात, “हेच का तुमचे कारभारी ?”
- पावसाळ्यात खायची गरम गरम भजी,… रावांनी आणली भाजी अगदी ताजी ताजी.
- महादेवाच्या पिंडीवर संत्र्याची फोड, … रावांचे बोलणे त्याहून गोड.
- सोन्यात सोने बावन कशी … माझी दुसरी मस्तानीच जशी.
- पुनवेच्या चंद्राच्या शोभल्या सोळा कला … ने माझ्या आवडीची नेसली पैठणी चंद्रकला.
- मळ्यामधे आहे माझ्या सोनचाफा, माझी …. जणू आहे हळदीचा गाभा.
- राधिकेला कृष्ण म्हणे हास राधे हास, मी देतो …ला लाडवाचा घास.
- श्रावण महिन्यात दिसते इंद्रधनुची रंगत न्यारी, …. साठी केली लग्नाची तयारी.
- मुखी असावे प्रेम मनामध्ये दया, …. सोबत जडली माझी माया.
- वाटीत वाटी सोन्याची, …. माझ्या प्रीतीची.
- कश्मीरच्या नंदनवनात फुलतो निशिगंध, …. सोबत जीवनात मला आहे आनंद.
- नवग्रह मंडळात क्षणीच आहे वर्चस्व, … आहे माझे सर्वस्व.
- आई-बाबा सासू-सासरे मीलाप झाला दोन कुटुंबांचा, …. आणि आज पासून भार घेतला संसाराचा.
- आई-बाबांच्या शिरावर सेवेचं तोरण बांधील, …. बरोबर सुखाने मी संसार करीन.
- खडीसाखरेचा खडा खावा तेवढा गोड, … च्या रूपात नाही कुठेच खोड.
- कळी हसेल, फुल उमलेल, माहेरून येईल सुगंध,…. च्या सोबतीत गवसेल जीवनाचा आनंद.
- निसर्गाला नाही आदी नाही अंत, … आहे माझी मनपसंत.
- चौकोनी आरशाला वाटोळी फ्रेम, … आहे माझे खरे प्रेम.
- चंद्र आहे चांदण्याच्या संगती, … आहे माझे जीवन साथी.
- ताऱ्यांचं लुकलुकुन चंद्राला आवडलं, … ला जीवनसाथी म्हणून निवडलं.
- हिऱ्याचा कंठा, मोत्याचा घाट,… च्या हौशीसाठी केला सगळा थाट.
- गुलाबाचे फुल गणपतीला वाहिले, …. रावांसाठी … गाव पाहिले.
- गंगेची वाळू चाळणीने चाळू, चल चल …. आपण सारी पाठ खेळू.
- नभंगणी दिसे शरदाचे चांदणे,… चे रूप आहे अत्यंत देखणे.
- सर्व ऋतूंमध्ये ऋतू आहे वसंत, … केली मी पत्नी म्हणून पसंत.
- इंद्राची इंद्राणी, दुष्यंत ची शकुंतला, …. नाव ठेवले माझ्या प्रिय पत्नीला.
- लाखात दिसते देखनी चेहरा सदा हसरा, … च्या रूपा पुढे अप्सरेचा काय तोरा.
- आंबे वनात कोकिळा जाते गोड, …. आहे माझ्या तळ हाताचा फोड.
- आधी झालं सूनमुख, मग निघाली वरात … ला घेऊन आलो सासरच्या मंदिरात.
- जोडीने नमस्कार करतो वाकून, … चे नाव घेतो सर्वांचा मान राखून.
- हत्तीच्या अंबारीला मखमली झूल माझी … इतकी नाजूक जशी गुलाबाचे फुल
Leave a comment