मराठी उखाणे

रोमँटिक मराठी उखाणे | Romantic ukhane in marathi

romantic ukhane

स्त्री आणि पुरुषांसाठी रोमँटिक मराठी उखाणे जे तुम्ही कुठल्याही लग्नामध्ये किंवा कार्यक्रमामध्ये अगदी आरामात घेऊ शकता.

रोमँटिक मराठी उखाणे पुरुषांसाठी | Romantic Marathi Ukhane for Male

  1. बघितले जेव्हा … ला काळीज झाले स्थिर, आता जन्मभर सोडणार नाही साथ, राहील तिच्यासाठी नेहमीच खंबीर.   
  2. जाईच्या वेणीला चांदीची तार, माझी…  म्हणजे लाखात सुंदर नार. 
  3. हत्तीच्या अंबारीला मखमली झूल, माझी ….  इतकी नाजूक जसे गुलाबाचे फुल. 
  4. संसार रुपी सागरात पती – पत्नीची नौका, ….  चे नाव घेतो सर्वजण ऐका.
  5.  उभा होतो मळ्यात, नजर गेली खळ्यात, नवरत्नांचा हार …  च्या गळ्यात.
  6. नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री  ….  आज पासून माझी गृहमंत्री.
  7.  नभांगनी दिसे शरदाचे चांदणे, ….  चे रूप आहे अत्यंत देखणे. 
  8.  गंगेची वाळू चाळणीने चाळू, चल चल  ….  आपण सारीपाठ खेळू. 
  9.  लाखात दिसते देखणी, चेहरा सुद्धा हसरा, ….  च्या रूपा पुढे अप्सरेचा काय तोरा. 
  10.  आंबे वनात कोकिळा गाते गोड, …  आहे माझ्या तळहाताचा फोड.
  11.  सप्तपदी केली, मंगल वाद्य वाजली,….  आज पासून माझ्या जीवनात आली.
  12. मोगरा, जाई – जुई दारातच फुलली ,…. च्या जोडीने संसार वेल बहरली. 
  13. माप लवंडले, तांदूळ झाले साक्षी, …  च्या रूपानं  घरी अली लक्ष्मी.
  14.  सरला अंतरपाट, माळ पडली गळ्यात, ….  अलगद आली सासरच्या गोताळ्यात. 
  15.  विठ्ठलाने राखला सावता माळ्याचा मळा, मनी मंगळसूत्र बांधले मी ….  च्या गळा.
  16.  हिरवा चुडा, मंगळसूत्र गळ्यात, नेसली हिरवा शालू, ….  उभी  आहे मैत्रिणींच्या मेळाव्यात कसा मी तिच्याशी बोलू.
  17.  भरल्या पंगतीत उदबत्तीचा वास, ….  ला देतो जिलेबीचा घास.
  18.  चाकणच्या किल्ल्यावर ठेवल्या होत्या फौजा, …  च्या जीवावर …  मारतो मौजा.
  19. वाटल्या डाळीचे केले पिठले, त्यात खोबरे घातले किसून, …  गेली तेव्हा मीच खाल्ले चाटून पुसून.
  20.  कोवळी काकडी करकर वाजते , काळी चंद्रकला पैठणीमध्ये  …. शोभून दिसते. 
  21.  कपाटाच्या खणात ठेवला पैका, … चे  नाव घेतो सर्वजण ऐका.
  22.  आंबे वनात पिकाला अंबा, माझी … जशी स्वर्गाची रंभा.
  23.  श्रावण महिन्यात प्रत्येक वारी सण, ….  ला सुखात ठेवीन असा माझा पण.
  24.  पाण्याच्या हंड्यावर रुप्याचे  झाकण, … च्या हातात हिऱ्याचे कंकण.
  25.  वर मथळा, खाली बातमी वर्तमानपत्राची रीती, ….  चे नाव घेतो, अशीच वाढो आमची प्रीती.
  26.  काव्यासाठी प्रतिभा, देवासाठी भक्ती, मलाही मिळाली …. सारखी मदनाची रती.
  27.  सोन्यात सोने बावन कशी, माझी … दुसरी मस्तानीच जशी.
  28.  पुनवेच्या चंद्राच्या शोभल्या 16 कला, ….  ने माझ्या आवडीची नेसली चंद्रकला.
  29.  राधिकेला कृष्ण म्हणे हास राधे हास, मी …. ला भरवतो लाडवाचा घास.
  30.  श्रावण महिन्यात दिसते इंद्रधनुची रंगत न्यारी, …. साठी केली लग्नाची तयारी.
  31.  मुखी असावे प्रेम, मनामध्ये दया, ….  सोबत जडली माझी माया.
  32.  वाटीत वाटी सोन्याची,….  माझी प्रीतीची.
  33. कश्मीरच्या नंदन वनात फुलतो नशीगंध, ….  सोबत जीवनात मला आहे आनंद.
  34.  भरली फुलांनी निशिगंधाची पाती, … चे नाव घेतो लग्नाच्या राती.

रोमँटिक मराठी उखाणे महिलांसाठी | Romantic Marathi Ukhane for Female

  1. काय जादू केली जिंकलं मला एक क्षणात, प्रथमदर्शनीच भरले …  माझ्या मनात.
  2.  नवग्रह मंडळात शनीचा आहे वर्चस्व, ….  आहे माझे सर्वस्व.
  3. लग्नाची झाली सुरुवात सगळीकडे चालू आहे गडबड, आणि …. समोर येताच काळीज करताय धडधड. 
  4. आंबा गोड, ऊस गोड, त्याहीपेक्षा अमृत गोड, …. चे नाव आहे अमृता पेक्षाही गोड.  
  5. आधी होती लेक,मग झाली सून, नवीन नातं जडलं, …. चे  संसारात सोन्याचं पाऊल पडलं.
  6.  गळ्यात माळ पडली, बांधले मंगळसूत्र, …. आणि माझा संसार होऊ दे पवित्र.
  7.  फुलांत फुल मदनबाण, … माझा जीव की प्राण.
  8. हत्तीला बघण्यासाठी सगळे झाले गोळा, आणि …. ने मला हळूच मारला डोळा.

हे सुद्धा वाचा :-

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *