About Us

गुरुदेव डी ब्लॉग वेबसाइट बद्दल माहिती

गुरुदेव डी हि एक मराठी ब्लॉग वेबसाइट आहे, यामध्ये वेगवेगळ्या विषयांवरती माहिती दिली जाते. विशेषतः भारतामधील हात मागा वरती तयार केलेल्या साडी बद्दल आणि त्या संबंधित इतर उत्पादने याबद्दल संपूर्ण माहिती दिली जाते. देशभरातील प्राचीन परंपरागत हातमाग विणकाम बद्दल येथे आम्ही माहिती देण्याचा प्रयत्न करतो.

यामध्ये भारतीय सिल्क साडीबद्दल माहिती दिली गेली आहे. तसेच मनोरंजन, फॅशन याबद्दल देखील माहिती दिली आहे. हि सर्व माहिती मिळवण्यासाठी कठीण परिश्रम आणि रिसर्च करून आम्ही ही सर्व माहिती मिळवतो आणि तुमच्यापर्यंत पोहोचवतो.

भारत देशामध्ये वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या प्रकारच्या अतिशय सुंदर साड्या हातमागंवरती बनविल्या जातात. परंतु मार्केटिंग ची पूर्णपणे माहिती नसल्यामुळे आणि अपुऱ्या सुविधा या कारणांमुळे आपली ही प्राचीन कला बऱ्याच लोकांना माहित देखील नाहीये. त्यामुळे आम्ही ह्या वेबसाईटमध्ये भारतातील या सर्व साड्यांबद्दल शक्य होईल तितकी योग्य माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. आणि आपली भारतीय कला जागतिक पातळीवर मांडण्याचा प्रयत्न करत आहोत.

त्याचबरोबर फॅशन रिलेटेड माहिती तंत्रज्ञान शिक्षण आणि इतरही महत्त्वपूर्ण बाबींबद्दल माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न करू 

गुरुदेव डी टीम चा परिचय, कारण प्रत्येक लेखामागे लेख लिहिणाऱ्याची मेहनत महत्वाची असते.

राधिका कदम

राधिका कदम एक हाऊस वाईफ असुन महाराष्ट्रामधील नाशिक जिल्यामध्ये राहते. तसेच शिक्षण Bsc (Chemistry) मध्ये पदवी घेतलेली आहे. राधिका चा गुरुदेव डी ब्लॉग मध्ये लिखाणाचा महत्वाचा वाटा आहे.

का ब्लॉगर झाले?

या वेबसाईटची सुरुवात करण्यामागे असा उद्देश आहे की आपल्याकडे ज्या पारंपारिक आणि अतिशय सुंदर हात मागावरती साड्या बनवल्या जातात त्याबद्दल सर्वांना मुळापासून त्याची माहिती मिळावी म्हणून याची सुरुवात केली गेली आहे. आपण जे पारंपारिक वस्त्र परिधान करतो त्याचा इतिहास देखील आपल्याला आणि आपल्या मुलांना माहीत असणे आवश्यक आहे असे मला वाटते.

माझा देखील साडी विक्रीचा व्यवसाय आहे. आणि या पारंपारिक साड्या विकतांनी मला हे लक्षात आले की ज्या वस्त्राला आपल्या प्रत्येक धार्मिक कार्यक्रमांमध्ये फार महत्त्व आहे त्या वस्त्राबद्दल कोणालाच पुरेशी अशी माहिती नाहीये. 

ते कुठे तयार होते ? 

कुठल्या पद्धतीने बनवले जाते ? 

त्यामागे किती मेहनत आहे ? 

किती लोकांची मेहनत आहे ? 

आणि का ते वस्त्र इतके मौल्यवान आहे ? 

ही सर्व माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश मनामध्ये ठेवून आणि आपली पिढी जात कला लोप पावत चालली आहे तिला पुनर्जीवन देण्यासाठी या ब्लॉगची सुरुवात केलेली आहे.

मला असे वाटते की आमच्या या छोट्याशा प्रयत्नामुळे आपली ही पारंपरिक कला सर्वांपर्यंत हळूहळू पोहोचेन आणि आपली हस्तकला वर्षानुवर्षे जपली जाईल आणि येणार्‍या पिढीला आपल्या परंपरेबद्दल संपूर्ण माहिती कळेल. 

आम्हाला आशा आहे की आम्ही पुरवलेली ही माहिती ही नक्कीच तुमच्या प्रश्नांचे समाधानकारक उत्तर देऊ शकेल. जर आपल्याला ही माहिती आवडली असेल तर आमचे इतर ब्लॉग नक्कीच वाचा, तुम्हाला नक्कीच महत्त्वपूर्ण माहिती मिळेल याची आम्हाला पूर्णपणे खात्री आहे. आणि आम्ही दिलेल्या माहितीबद्दल तुम्हाला काय वाटते. आम्हाला तुमचे मत नक्की कळवा.