लाइफस्टाइलफॅशन

बांधणी साडीचे 10 प्रकार, डिझाइन्स व संपूर्ण माहिती | Bandhani Sarees

bandhani saree
bandhani saree

बांधणी साडी, या साडीला बंधेज साडी असेही म्हणतात, बांधणी हा संस्कृत शब्द “बांध” यापासून तयार झालेला आहे, त्याचा अर्थ बांधणे असा होतो. या साड्या टाय-डाय तंत्राचा वापर करून तयार केल्या जातात. गुजरात आणि राजस्थान या राज्यांमध्ये या बांधणी साड्या अतिशय लोकप्रिय आहेत. बांधणी साडी तयार करण्याची वेगवेगळ्या भागातील वेगवेगळी पद्धत आहे. प्रत्येक प्रदेशाचे स्वतःचे विशिष्ट तंत्र आणि शैली आहे.

बांधणी साडीचा इतिहास | History of Bandhani Sarees

  • बांधणी साडीचा इतिहास फार जुना आहे. यांचा उगम गुजरात आणि राजस्थान या प्रदेशांमध्ये होतो.
  • असे म्हणतात की रेशीम मार्गाने प्रवास करणाऱ्या पर्शियन व्यापाऱ्यांनी टाय-डाय हे तंत्र भारतात आणले. त्यानंतर 6 व्या शतकात गुजरातमधील अजरखपूर या शहरामध्ये बांधणी पद्धतीने फॅब्रिक तयार करण्यास सुरुवात झाली.
  • गुजरात मधील खत्री समाजाने हे तंत्र वापरण्यास सुरुवात केली. खत्री समाज बांधणी कलेमध्ये अतिशय कुशल झाले. त्यांच्या उत्कृष्ट कारागिरीमुळे 7 व्या शतकामध्ये बांधणी ही कला गुजरात मध्ये अतिशय लोकप्रिय झाली.
  • मुघल काळामध्ये देखील या कलेला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळाले. गुजरात आणि राजस्थान या दोन्ही भागांमध्ये प्रादेशिक विविधता असल्यामुळे बांधणी डिझाइन्समध्ये देखील आपल्याला फरक जाणवतो.
  • कच्छ आणि गुजरातमधील भागात कठीण डिझाइन्स व सुंदर मोहक रांगांमध्ये बनविल्या जातात. तसेच राजस्थानमध्ये या डिझाइन्स कापडावर मोठ्या आकारामध्ये तयार केल्या जातात.
  • गुजरातमधील जामनगर, भुज आणि मांडवी हे प्रदेश बांधणी साड्यांसाठी विशेष प्रसिद्ध आहेत. बांधणी हे वस्त्र पुरुष आणि महिला दोघेही परिधान करू शकतात.

rai bandhej saree
rai bandhej saree

बांधणी साडीचे प्रकार | Types of Bandhani Sarees

1. गज्जी सिल्क बांधणी साडी | Gajji Silk Bandhani Saree

गज्जी सिल्क फॅब्रिक हे उत्तम दर्जाचे हाताने विणकाम केलेले कापड असते. हे कापड रेशीम धागे आणि सुती धाग्यांपासून तयार केले जाते. वजनाला अतिशय हलके आणि अगदी मऊ टेक्चर असणारे हे फॅब्रिक असते. यावरती बांधणी तंत्राने डिझाईन तयार करून सुंदर पद्धतीची साडी तयार केली जाते. दिसायला देखील ही साडी अतिशय सुंदर दिसते.

2. लेहरिया साडी | Leheriya Sarees

‘लेहेरिया’ या शब्दाचा अर्थ ‘लहर’ असा होतो. यामध्ये  पारंपारिक बांधणी तंत्राने कापडावरती लहरींचे डिझाईन तयार केले जातात. या तयार केलेल्या लहरींमुळे साडी सुंदर दिसते. लेहेरिया साडीच्या मुख्य डिझाईन मध्ये कॉर्नर पासून लाईन्स असतात. काही साड्यांमध्ये रुंद किंवा अरुंद लहरींचे पट्टे असू शकतात, तसेच जरी वर्क किंवा मिरर वर्क देखील तयार केलेले असते.

3. घरचोला साडी | Gharchola Saree

घरचोला साडी ही एक बांधणी साडी आहे. “घरचोळा” या शब्दाचा अर्थ “घर” म्हणजे घर आणि “चोला” म्हणजे पोशाख असा होतो. या प्रकारामध्ये चौकटी आणि डायमंडच्या आकारामध्ये साडीवरती डिझाइन्स असतात. जरीच्या वर्कने या साडीवरती सुंदर डिझाइन्स तयार केले जातात. ज्यामुळे साडीची भव्यता वाढते. घरचोला साडी गुजरात आणि राजस्थान मधील लग्नसमारंभाचा एक अविभाज्य भाग आहे.

4. राय बंधेज साडी | Rai Bandhej Saree

राय बांधेज साड्या शिफॉन, जॉर्जेट किंवा सिल्क या सारख्या वजनाने हलक्या असणाऱ्या कापडांपासून बनवल्या जातात. टाय-डाय प्रक्रियेसाठी हे फॅब्रिक उत्तम असते. साडीवरील डिझाईन्समध्ये ठिपके, पट्टे, चौरस आणि फुलांच्या नक्षीकामाचा समावेश असतो. जयपूर, जोधपूर, बारमेर, सीकर, बिकानेर या शहरांमध्ये या साड्यांचे उत्पादन घेतले जाते.

5. अजरक बांधणी साडी | Ajrak Bandhani Saree

अजरक छपाई आणि बांधणीच्या टाय-डाय या दोन्ही पारंपरिक तंत्राचा वापर करून या साड्या तयार केल्या जातात. प्रथम अजरक छपाई पद्धतीने ब्लॉक प्रिंट केले जाते. त्यानंतर बांधणीचे डिझाइन तयार करण्यासाठी फॅब्रिक घट्ट बांधून रंगवले जाते. अजरक बांधणी साडीमध्ये अजरक ब्लॉक प्रिंट्स आणि बांधणी टाय-डाय पद्धतीमुळे अतिशय सुंदर साडीचा पॅटर्न तयार होतो. या सद्य तयार करण्यासाठी कॉटन किंवा रेशीम सारख्या हलक्या फॅब्रिकचा वापर केला जातो. अजरक साड्या त्यांच्या मातीच्या ( मातट ) रंगासाठी होळखल्या जातात. डीप इंडिगो, मॅडर रेड आणि मस्टर्ड येलो हे यातील प्रसिद्ध रंग आहेत.

6. बंधेज बनारसी साडी | Bandhej Banarasi Saree

बांधणी साडी ( बंधेज ) आणि बनारसी साड्या या दोन्हीही पारंपरिक भारतीय साड्या आहेत. दोन्ही पारंपरिक साड्या एकत्र करून ही बंधेज बनारसी साडी तयार करण्यात आलेली आहे. बंधेज साड्या त्यांच्या टाय-डाय तंत्रासाठी तर वाराणसी मधील बनारसी साड्या ब्रोकेड वर्कसाठी प्रसिद्ध आहेत. साडीवर बांधणी डिझाइन बरोबर काठावरती आणि पदरावरती बनारसी ब्रोकेड विणकाम केले जाते. अलिकडच्या वर्षांत, डिझाइनच्या नवीन संकल्पनेतून ही सुंदर साडी तयार करण्यात अली आहे.

7. शिकारी बांधणी साडी | Shikari Bandhani Saree

शिकारी बांधणी साड्यांना हे नाव त्यांच्यावरील नक्षीकामावरून देण्यात आले आहे. या साडीवर प्राणी, शिकारी, झाडांच्या फांदया यांचे सुंदर विणकाम केलेले असते. हे सर्व डिझाइन्स पारंपरिक पद्धतीने तयार केले जाते.

8. चंद्रखानी बांधणी साडी | Chandrakhani Bandhani Saree

चंद्रखानी बांधणी साडी हि बांधणी साडीचा एक प्रकर आहे. यामध्ये साडीवरती चंद्राच्या आकाराचे, चंद्रकोर यासारखे डिझाइन्स टाय- डाय पद्धतीने तयार केले जातात. या साड्यांमध्ये हिरवा, निळा, पिवळा हे रंग जास्त प्रचलित आहे.

9. पनेतर बांधणी साडी | Panetar Bandhani Saree

“पनेतर” हा एक गुजराती शब्द आहे. “पाने” म्हणजेच कापूस आणि “टार” म्हणजे विणणे आहे. पनेतर साडी शुद्ध पांढऱ्या सूती कापडापासून पारंपारि पद्धतीने बनविली जाते. पांढऱ्या साडीवरती लाल किंवा मरून रंगामध्ये फुले, ठिपके आणि चौरस या डिझाइन्स तयार केल्या जातात. तसेच या साड्यांवरती जरीचे विणकाम देखील केले जाते.

10. बांधणी क्रेप साडी | Bandhani Crepe Saree

बांधणी क्रेप साडी ही दोन वेगळे प्रकार एकत्र करून तयार केली जाते. क्रेप हे अगदी हलके फॅब्रिक असते आणि हे त्याच्या अनोख्या टेक्सचरसाठी ओळखले जाते. या कापडावरती बांधणी साडीच्या टाय-डाय तंत्राचा वापर करून डिझाइन तयार केली जाते. यातुन तयार होणारी साडी अतिशय सुंदर दिसते.

Panetar Bandhani Saree
Panetar Bandhani Saree

साडी तयार करण्याची पद्धत | How to make a saree

  • बांधणी पद्धतीमध्ये आपल्याला ज्या प्रकारची फॅब्रिकवरती डिझाईन हवी असते त्या डिझाईन मध्ये कापडाला घट्ट धागे बांधले जातात. 
  • हा बांधलेला कपडा रंगांमध्ये बुडवला जातो. 
  • बांधलेल्या धाग्यामुळे त्या जागेवरती रंग बसत नाही. 
  • नंतर कापड सुकल्यानंतर हे धागे सोडले जातात आणि सुंदर डिझाईन तयार होते. 

बांधणी मधील डिझाइन्स आणि रंग | Designs and colors

  • बांधणीच्या डिझाईन्स मध्ये आपल्याला चौरस, ठिपके, लाटा असे विविध प्रकार बघायला भेटतात. 
  • या साडीच्या डिझाईनच्या आकार आणि घनता मध्ये फरक असू शकतो.
  • बांधणी प्रक्रियेमध्ये वापरले जाणारे रंग हे उठवदार असतात ज्यामध्ये लाल, हिरवा, निळा, पिवळा, गुलाबी अशा रंगांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. 

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

फॅशनलाइफस्टाइल

Yoga Clothes Information : महिलांना वर्क आऊट साठी योग्य कपडे का महत्त्वाचे आहेत? जाणून घ्या पूर्ण माहिती

जिम मध्ये जाणे, योगाभ्यास करणे, धावणे किंवा उच्च स्थरावरील जिम ट्रेनिंग मध्ये...

garba dress
फॅशनलाइफस्टाइल

नवरात्रीचा पोशाख : ९ रंगाचे महत्व

नवरात्री, भारतातील सर्वात आनंदी सणांपैकी एक आहे. वाईटावर चांगल्याच्या विजयाचा उत्सव आहे...

silk Fabric
लाइफस्टाइलफॅशन

सिल्क ( रेशीम )आणि सिल्क साड्यांबद्दल माहिती

आपण सर्व भारतीय महिला विशेष प्रसंगी सिल्कच्या साड्या परिधान करतो, परंतु या...

pure handmade kashmiri silk saree
लाइफस्टाइलफॅशन

काश्मिरी सिल्क साडी

काश्मिरी सिल्क साडी त्यांच्या सुंदर आणि आलिशान रेशीमच्या गुणवत्तेसाठी खास ओळखल्या जातात....