मराठी उखाणे

बायको आणि नवऱ्याचे कॉमेडी उखाणे

comedy ukhane for wedding
  1. उभा होतो घरात, तेव्हड्यात …. आपटून पडली जोरात. 
  2. आमची …. जेवण करते इतकी दमानं, जशी गोठ्यातली म्हैस रवंथ करते आरामानं. 
  3. पलंगावर होती गादी त्यावर ठेवल्या उषा, …. च्या करवल्या म्हणजे म्हशीचं जश्या.
  4. घरात पडली भांडी, बाहेर पडले बादलीभर धुणं, आमची …. सकाळपासून बघत बसली मोबाईल अन म्हणती काम काही उरकानं. 
  5. घरात सासू, दारात मेहुणा, अंगणात बसला सासरा,… आता धरून बसतो घरातला एक कोपरा. 
  6. मी म्हणालो अगं येकतेस का, आणि जेव्हा आमची …. व्हस्कन अली अंगावर तर घाबरून म्हणालो जरा अराम करतेस का.  
  7. पैठणीवर होते सुंदर मोर, आणि आमच्या …. चे केस किती काळे भोर. 
  8. सुट्टीच्या दिवशी म्हटलं बायको सोबत जरा आनंद साजरा करू, आणि मग काय …. ला म्हटलं चाल दोघं मिळून घरातलं काम करू.
  9. ओल्या फरशीवर पाय पडला तर …. बघते डोळे वटारून, मग काय परत पुसून घेतो फारशी बायकोला घाबरून.  
  10. घरात होतं दूध, दुधावर होती साय, आमची …. म्हणजे अगदी गरीब गाय. 
  11. घरात होतं दूध, दुधावर होती मऊ – मऊ साय, आमची …. म्हणजे गोठ्यातली मारकी गाय. 
  12. दूध आणले चहा केला, चहा काही आवडेना, हजार वेळेस सांगितले पण …. ला चहा काही जमेना.
  13. लाल – लाल दोरा त्याला सोनेरी गोंडा, सासऱ्यांनी बांधला माझ्या गळ्यात … नावाचा धोंडा. 

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

romantic ukhane
मराठी उखाणे

रोमँटिक मराठी उखाणे | Romantic ukhane in marathi

स्त्री आणि पुरुषांसाठी रोमँटिक मराठी उखाणे जे तुम्ही कुठल्याही लग्नामध्ये किंवा कार्यक्रमामध्ये...

शेतकरी उखाणे
मराठी उखाणे

शेतकरी नवरदेवासाठी कॉमेडी उखाणे | comedy ukhane for farmers

शेतकऱ्यांसाठी लग्नातील फनी उखाणे शेतकरी महिलांसाठी सुंदर उखाणे हे देखील वाचा –