कोरियल साडी ही एक पारंपारिक भारतीय सिल्क साडी आहे. “कोरियल” हे नाव बंगाली भाषेमध्ये “कोरा” म्हणजे साधा, या शब्दावरूनच या साडीला कोरियल हे नाव देण्यात आलेले आहे. कोरा म्हणजे साधा, शुभ्र किंवा पांढरा, ज्याच्यावर कुठलाही डाग नाही असा. या साड्या पारंपारिक पद्धतीने हात मागावर विणल्या जातात तसेच त्यांच्या चमक, नाजूक पोत, सुरेल नक्षीकाम आणि टिकाऊपणासाठी ओळखल्या जातात. कोरियल साड्या प्युअर सिल्क पासून तयार केल्या जातात. पारंपारिक पद्धतीने सिल्क न रंगवता ही साडी तयार केली जाते.
कोरीयल सिल्क साडी चे दोन प्रकार आहेत | Korial Banarasi Silk Saree che prakar | types of korial silk saree
- गरड-कोरियल साडी | Bengali garad korial saree
- कोरियल बनारसी साडी | Korial banarasi saree
पारंपारिक गरड कोरियल सिल्क साडी | Traditional garad-korial silk saree
गरद सिल्क साड्या पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात तयार केल्या जातात. या साड्या प्युअर सिल्क पासून तयार केल्या जातात त्यामुळे त्यांचा पोत टिशू पेपर सारखा असतो. या साड्या वजनाने खूप हलक्या आणि नेण्यासाठी अतिशय सोप्या असतात. पारंपारिक गरद साडी मध्ये साडीचा कलर पांढरा असतो, बॉर्डर आणि पल्लू लाल कलर मध्ये असतात.
कोरियल बनारसी सिल्क साडी | Korial Banarasi silk Saree
कोरियल बनारसी साडी ही बनारसी ब्रोकेड तंत्राने सोन्याच्या आणि चांदीच्या जरीमध्ये विणली जाते. या साडीच्या नावामध्ये जरी बनारस हे नाव असले, तरी ही साडी अजूनही पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये तयार केली जाते. बनारसी साडी सारखेच कोरियल बनारसी साडी वरती देखील संपूर्ण जरी काम केलेले असते.
दुर्गा पूजेत कोरीयल साडी | korial saree in durga puja
कोरियल साडीचा पांढरा रंग त्यांच्या शुद्धतेचे प्रतिनिधित्व करतो, ज्यामुळे या साड्या पूजा, शुभ प्रसंगी किंवा धार्मिक समारंभामध्ये मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात. दुर्गा पूजेदरम्यान बंगाली स्त्रिया या साड्यांना फार महत्त्व देतात आणि पूजेमध्ये परिधान करतात. असे म्हणायला हरकत नाही की बंगाल मधील प्रत्येक दुर्गा पुजा या साडीशिवाय अपूर्णच आहे.
हळदी समारंभासाठी बंगाली साडी | Bengali Saree for Haldi Ceremony
आज काल बऱ्यचश्या नवर्या त्यांच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी बंगाली साडीची निवड करतात. आणि त्यावर शोभिवंत असे दागिने घातल्यानंतर नवरीचे लूक हे खूप सुंदर दिसते. हळदीसाठी योग्य पर्याय म्हणून बंगाली साडीची निवड ही अतिशय उत्तम राहील.
बंगाली वेडिंग साडी स्टाइल | Bengali Korial Banarasi Bridal Wedding Saree Style
भारतामध्ये लग्न सोहळ्याला एक अनन्य साधारण महत्त्व आहे. आणि या लग्न सोहळ्यामध्ये प्रत्येक नवरी (Bridal) ही पारंपारिक पद्धतीने सजली जाते. त्यामुळे ही पारंपरिक बंगाली साडी घातल्यानंतर नवरीचे सौंदर्य हे अतिशय सुंदर दिसते.
बंगाली सिम्पल साडी लुक | Bengali Simple Saree Look
अतिशय साध्या पद्धतीने देखील आपण बंगाली साडी परिधान करून कार्यक्रमांमध्ये उठून दिसू शकतो. त्यावरती साडीला शोभेल असे दागिने आणि हेअर स्टाईल करून आपला लूक आपण उठावदार बनवू शकतो.
बंगाली पारंपरिक साडी लुक | Bengali Traditional Red Border Saree Look
बंगाली साडी आपण पारंपरिक पद्धतीने देखील परिधान करू शकतो. आणि साडी वरती दागिने आणि कपाळा वरती मोठी टिकली. अशा पद्धतीने देखील अतिशय सुंदर लुक करू शकतो. अगदी साध्या आणि पारंपारिक पद्धतीने देखील आपण आपला पेहराव हायलाईट करू शकतो.
लग्नाच्या पार्टीसाठी बंगाली साडी लुक | Bengali Saree Look For Wedding Party
लग्नाच्या पार्टीसाठी देखील तुम्ही सुंदर बंगाली साडीचा पेहराव करू शकता. यासाठी ब्राईट कलर कॉम्बिनेशन असलेली साडी निवडावी. आणि साडीला मॅचिंग किंवा गोल्डन कलर ची ज्वेलरी निवडावी. सोबतच एखादा बटवा किंवा पर्स घ्यावी. तसेच संपूर्ण केस बांधलेली छान हेअर स्टाईल करावी. ज्याने तुमचा लूक अतिशय छान आणि पारंपारिक दिसेल.
पिवळी साडी बंगाली लुक | Yellow Saree Bengali Look
पिवळ्या रंगाच्या साडीला आपल्या धर्मात, सांस्कृतिक कार्यक्रमांत फार महत्त्व आहे. पिवळी बंगाली साडींमध्ये अनेक प्रकारची डिजाईन्स आपल्याला बघायला भेटतील. हळदी किंवा लग्न समारंभामध्ये या साडीला फार महत्त्व असते. त्यामुळे पिवळा कलर महिलांसाठी एक उत्कृष्ट निवड आहे.
Leave a comment