लाइफस्टाइलफॅशन

ओडिसा मधील सांस्कृतिक वारसा – बोमकाई सिल्क साडी | Bomkai silk saree

handloom bomkai silk saree

बोमकाई सिल्क साडी ही भारतामधील ओडिसा राज्यामध्ये  हातमागावरती अस्सल रेशिम पासुन तयर होनारी अतिशय सुंदर साडी अहे. उत्कृष्ट पारंपारिक विणकाम पद्धतीने तयार केलेल्या डिझाईन्स, सुंदर आणि मनमोहक रंग, साडीचे हलके आणि मऊ सुत या सर्वांच्या मिश्रणाने बोमकाई सिल्क साडी ही अतिशय उच्च दर्जाची भारतातील उत्कृष्ट सिल्क साड्यांपैकी एक साडी बनते.

बोमकाई सिल्क साडीला सोनपुरी साडी असे देखील म्हणतात. या सुंदर बोमकाई सिल्क साडीला 2009 मध्ये भारत सरकारचा GI (भौगोलिक संकेत) टॅग प्राप्त झालेला आहे. चला तर मग आपण या सुंदर भारतीय सिल्क साडी बद्दल सविस्तर माहिती या ठिकाणी जाणून घेऊया. 

बोमकाई सिल्क साडी चा इतिहास | History of Bomkai Silk Saree

बोमकाई सिल्क साड्या ज्यांना “बोमकाई” किंवा “बोमकी” असे देखील म्हणतात. ओडिसा राज्यातील गंजम जिल्ह्यामधील बोमकाई या गावामध्ये या रेशीम साड्या तयार केल्या जातात. म्हणूनच या साडीला बोमकाई असे म्हणतात. 

बोमकाई सिल्क साडीचा इतिहास ओडीसा राज्यामध्ये 8 व्या शतकामध्ये सापडतो. सुरुवातीच्या काळामध्ये या साडीचे विणकाम सुती धाग्यांमध्ये करत होते. स्थानिक लोक त्यांच्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये हे तयार केलेले वस्त्र परिधान करत होते. इतिहासानुसार, बोमकाई साडीच्या विकासात भांज या राजघराण्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

कालांतराने या साड्यांमध्ये रेशीम धाग्यांचा वापर होऊ लागला आणि अतिशय सुंदर आणि मनमोहक साडी तयार केली जाऊ लागली. ओडिसा मधील हातमाग विकास महामंडळाने या बोमकाई साडी विणकारांना विणकामासाठी प्रोत्साहन दिले, त्यामुळे 20 व्या शतकामध्ये या साड्यांची लोकप्रियता अधिकच वाढू लागली. 

या साडीच्या सुंदरतेमुळे बोमकाई सिल्क साडी ही भारतातच नव्हे तर जगभरात देखील अतिशय लोकप्रिय झालेली आहे. या साड्यांना जगभरात प्रसिद्धी मिळूनही कारागीर आजही या साड्या हातमागावरती पारंपारिक पद्धतीने स्वतः तयार करतात.

बोमकाई सिल्क साडी चे प्रकार | Types of Bomkai Silk Sarees

  1. पासपल्ली बोमकाई साडी | Paspalli Bomkai Saree – पासपल्ली या प्रकारामध्ये साडी आणि पदरावरती चौकोनी आकारामध्ये सुंदर डिझाइन्स तयार केलेल्या असतात. या साडीवरील विणकाम पद्धती ही महाभारतातील बुद्धिबळ या खेळापासून प्रेरित आहे. यामध्ये चेकरबोर्ड पॅटर्न सारखे डिझाइन्स असतात आणि पासे असतात म्हणून या साडीला पासपल्ली असे म्हणतात. 
  2. बिचित्रपुरी बोमकाई साडी | Bichitrapuri Bomkai Saree बिचित्रपुरी बोमकाई साडीमध्ये रेशीम धाग्यांचा वापर करून कारागिर पारंपरिक पद्धतीने हाताने विणकाम करतात. या साडीवरील नक्षीकाम हे निसर्गप्रेरित आहेत, ज्यामध्ये पक्षी, झाडे आणि फुले यांचा समावेश आहे.  
  3. सोनपुरी बोमकाई साडी | Sonpuri Bomkai Saree सोनपुरी सिल्क साडी ही ओडिसा राज्यातील सोनपूर प्रदेशात तयार केली जाते. या साड्या उत्कृष्ट सिल्क आणि डिझाइन्स साठी खास ओळखल्या जातात. विशेषत: मोर, हत्ती आणि पारंपारिक ओडिया डिझाईन्स चे अतिशय कौशल्याने विणकाम केले जाते. 
  4. सुवर्णपट्टा बोमकाई साडी | Suvarnapatta Bomkai Saree सुवर्णपट्टा बोमकाई साडी मध्ये साडीच्या फॅब्रिक मध्ये सोनेरी धागे किंवा जरी ही धाग्यांबरोबर विणली जाते त्यामुळे साडी अतिशय सुंदर दिसते. 
  5. बाप्ता किंवा कॉटन बोमकाई साडी | Bapta Bomkai Cotton Saree – कापूस आणि रेशीम धाग्यांचे एकत्र विणकाम करून बाप्ता बोमकाई साडी तयार केली जाते. या साडीची सुंदरता वाढविण्यासाठी सोन्याच्या धाग्यांचा देखील वापर केला जातो. बाप्ता साडीवरती तयार केलेल्या डिझाइन्स मुळात प्रसिद्ध संबळपुरी साडीपासून प्रेरित आहेत. 
  6. खंडुआ बोमकाई साडी | Khandua Bomkai Saree –  खंडुआ बोमकाई साडीला मनियाबंदी किंवा कटकी असे देखील म्हणतात. ओडिसातील नुआपटना या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने ही साडी तयार केली जाते. ही साडी दुहेरी इकत तंत्राने विणली जाते त्यामुळे साडी दोन्ही बाजूंनी एकसारखीच दिसते. 
  7. गोपालपूर टसर सिल्क साडी | Gopalpur Tussar Silk Saree – गोपालपूर टसर सिल्क साडी हि ओडिसामधील गोपालपूर भागामध्ये तयार केल्या जातात. या प्रकारच्या साडीमध्ये टसर सिल्कचा वापर बेस मटेरियल म्हणून केला जातो.

बोमकाई साडीचे वैशिष्ट्ये | Characteristics of Bomkai sarees

  • अस्सल बोमकाई सिल्क साडी ही नैसर्गिक रंगापासून तयार केली जाते.
  • ही साडी अस्सल रेशीम कॉटन किंवा रेशीम आणि कॉटन या दोन्हींच्या  मिश्रणातून देखील तयार केली जाते.
  • या साड्यांवरती पौराणिक आकृतीबंध जसे राधा – कृष्ण, श्री गणेश तसेच माता दुर्गा यांचे चित्र देखील विणले जाते.
  • नैसर्गिक आकृतीबंध देखील या साड्यांवरती तयार केले जाते जसे की कमळ, गुलाब, चमेली, झाडे इत्यादी…
  • तसेच या साडी वरती भौमितिक नमुने देखील सुंदर पद्धतीने विणले जातात. 
  • निसर्गापासून प्रेरित देखावे देखील या साडीवरती विणले जातात.
  • मंदिर, कासव या प्रकारचे सुंदर नमुने देखील बघायला भेटतात.

बोमकाई साडीचे धार्मिक महत्व | Religious Significance of Bomkai Saree

  • पूर्वी ओडिसामधील राजा परबा यांच्या काळामध्ये स्त्रीत्वाचा उत्सव ३ दिवस साजरा केला जात असे आणि या वेळी भाऊ बहिणीला बोमकाई साडी भेट म्हणून देत असे.
  • ओडिसामध्ये लग्नसमारंभात मामाकडून नववधूंना बोमकाई साडी दिली जाते.
  • ओडीसाराज्यामध्ये धार्मिक कार्यक्रमांमध्ये देवीला लाल आणि काळ्या साड्या अर्पण केल्या जातात.
  • ओडिसामध्ये कथ्थक नृत्य कलाकार कला सादर करतेवेळी ही सुंदर साडी परिधान करतात.
  • राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू , अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांसारख्या प्रतिष्ठित महिलांनी देखील ही बोमकाई साडी परिधान केलेली आहे.
  • अभिनेत्री ऐश्वर्या रॉय बच्चन हिने तिच्या लग्नसमारंभामध्ये बोमकाई साडी नेसली होती.
  • तसेच बोमकाई साडी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक महोत्सवांमध्ये सादर केली गेली आहे.

बोमकाई साडी विणकामाची पद्धत | Method of weaving Bomkai Saree

  • बोमकाई सिल्क साडी ही कॉटन आणि रेशीम या दोन्ही प्रकारांमध्ये तयार केली जाते.
  • ही पारंपारिक सिल्क साडी कारागीर पिट लूम वरती हाताने तयार करतात.
  • साडी तयार करण्यासाठी वेफ्ट तसेच इकत या तंत्राचा वापर केला जातो.
  • ठोस बॉर्डरचा सुंदर इफेक्ट मिळविण्यासाठी 3 शटल तंत्राचा वापर केला जातो.
  • तसेच या साड्यांवरती सुंदर असे भरतकाम देखील केले जाते.

बोमकाई सिल्क साडीची काळजी कशी घ्यावी | How to Care Bomkai Silk Saree

  • बोमकाई साडी अस्सल रेशीम पासून बनवलेली असते त्यामुळे ही साडी हे नेहमी ड्रायक्लीनच करावी.
  • साडी नेहमी कोरड्या जागी ठेवावी.
  • बोमकाई साडी सूर्यप्रकाशापासून नेहमी दूर ठेवावे.

बोमकाई साडी कशी धुवावी | How to Wash Bomkai Saree

  • जर तुम्ही तुमची बोमकाई साडी घरी स्वच्छ करणार असाल तर आधी मिठाच्या पाण्यात जरावेळ ठेवा, पण जास्तवेळ नाही.
  • साडी स्वच्छ करण्यासाठी डिटर्जंट चा वापर टाळावा.
  • साडी घरी धुण्यासाठी चांगल्या दर्जाचे आणि सौम्य डिटर्जेंट वापरा.
  • डाग काढण्यासाठी ब्लीच किंवा कठोर डाग रिमूव्हर्स वापरू नका त्यामुळे साडीचा रंग खराब होऊ शकतो.
  • पेट्रोल आणि टॅल्कम पावडरचा वापर साडीवरील डाग काढण्यासाठी केला जाऊ शकतो, परंतु बोमकाई सारख्या हातमागावरती तयार केलेल्या साड्यांसाठी ड्राय क्लीनिंग हा एक सर्वोत्तम पर्याय आहे.

हे देखील वाचा :-

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

silk Fabric
लाइफस्टाइलफॅशन

सिल्क ( रेशीम )आणि सिल्क साड्यांबद्दल माहिती

आपण सर्व भारतीय महिला विशेष प्रसंगी सिल्कच्या साड्या परिधान करतो, परंतु या...

pure handmade kashmiri silk saree
लाइफस्टाइलफॅशन

काश्मिरी सिल्क साडी

काश्मिरी सिल्क साडी त्यांच्या सुंदर आणि आलिशान रेशीमच्या गुणवत्तेसाठी खास ओळखल्या जातात....

wedding outfit ideas for womens
फॅशनलाइफस्टाइल

लग्नामध्ये कुठला पोशाख घालावा याचा विचार करताय का? इथे आहेत महिलांसाठी काही भन्नाट कल्पना

लग्नामध्ये कुठला पोशाख घालावा? हा प्रश्न तर सर्वांनाच पडलेला असतो. आपल्या भारतीय...

konrad silk saree
लाइफस्टाइलफॅशन

दक्षिण भारतातील टेम्पल साडी – कोनराड सिल्क साडी | Konrad Silk Saree

कोनराड सिल्क साडी, ही साडी भारतातील सर्वात सुंदर साड्यांपैकी एक साडी आहे....