मराठी उखाणे

Funny Ukhane in Marathi for Male | पुरुषांसाठी आणि नवरदेवासाठी कॉमेडी मराठी उखाणे

Funny Ukhane in Marathi for Male
Funny Ukhane in Marathi for Male

हे मजेदार Comedy आणि Funny उखाणे कोणत्याही प्रकारच्या समारंभामध्ये बायकोसाठी, मित्रांसाठी आणि मैत्रिणींसाठी पुरुष घेऊ शकतात. पुरुषांना नक्कीच मजा येईल. उखाणे घेणे पुरुष मंडळीसाठी सोपे नाही पण त्यांचे काम सोपे करण्यासाठी आम्ही काही मजेदार फनी आणि कॉमेडी उखाणे तयार केले आहे. हे उखाणे पुरुषांची मदत नक्की करतील.

Romantic Funny Ukhane in Marathi for Groom

  • गळ्यात घातली चैन, डोक्याला लावला टीका, …  ला कुणीतरी सांगा,
    घर नई बघत, दार नई बघत, कुठ बी घेते मुका.
  • उखाण्यांची मैफिल आलीया रंगात, आणि ३६ नखरे माझ्या बायकोच्या अंगात.
  • पंढरीच्या वारीला वारकरी निघाले सोळा, आणि माझ्या बायकोने दाखवला पिक्चर आंधळा मारतो डोळा.
  • एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात, आणि … बरोबर लग्न करून पडलं म्हशीचं लोढनं गळ्यात.
  • आल्या आल्या सासूबाई, पाया पडतो वाकून, … चे नाव घेतो एक क्वार्टर टाकून.
  • चहा गरम राहावा म्हणून कपावर ठेवली बशी, आणि मंडळी माझ्या बायकोला दिसते बारीक बारीक दाढी मिशी.
  • महादेवाच्या भजनात वाजवावी टाळी, …  च नाव घ्यायची माझ्यावर आली पाळी.
  • आज झालं आमचं लग्न, लग्नात आला होता बँड वाला, ….  चे नाव घेतो, झुकेगा नई साला.
  • लग्नाच्या चार दिवस …. एवढी लाजली, एवढी लाजली, आणि एवढ्या दहा-बारा वर्षात केव्हडी माजली.
  • रात्रीची थंडी वाजते म्हणून मला गोधडी घेऊन झोपुशी वाटतंय, आणि सकाळी उठल्यानंतर मला आमदार झाल्या सारख वाटतंय.
  • केळीचे पान टर टर फटतं, … चे नाव घ्यायला लय भारी वाटतं

Chavat Ukhane in Marathi for Male Friends

  • वादळ आलं, पाऊस आला, नंतर आला पूर, … लई वळवळ करू नको नाहीतर काढील कानाखाली धूर. 
  • बाजारातून आणली सुपारी चिकणी, आणि माझी वहिनी आहे दिसायला हेकनी.
  • सोन्याची खुटी तिला मोत्याचं  दावं, मी संडासला गेलो हे … ला कसं ठावं.
  • दिवाळीत पणती हलती डुलती आणि …. झोपेतच रांगती.
  • तारुण्यात आल्यावरती पोरी दिसतात फार सुंदर, आणि जपावं लागतं पोरींना, कारण की टपून असतात तुमच्या सारखे छछूंदर.
  • धोंड्याच्या महिन्यात सासूने मला वाढली होती पुरी, आणि खायच्या आधीच मला म्हणत्यात जावईबापू आता जावा की घरी.
  • सगळ्या गावात माझ्या … वानी हुशार नाही कोणी, आणि तुम्हाला काय सांगू लई चाबरी आहे ती सोनी.
  • रोज सकाळी संडासला जातो …. गायछाप खाऊन, आणि रात्र त्याची जात नाही दोन पेग दारू पीऊन.
  • महादेवाच्या पिंडीवर निवद ठेवला गोड, आणि …  ला डोळा मारायची लई घाण खोड.
  • मिशी आहे मर्दाची शान आणि गल्ली गल्लीत आहे आपली जान.
  • दीदी तेरा देवर दिवाना म्हणून म्हणून त्या काळतोंडीने माझ्यामागे फिरू फिरू चप्पल घासली, आणि ती काल जेव्हा हसली, तर तिच्या दातावरती किलोभर मळी दिसली.

Funny Ukhane in Marathi for Wife

  • कपाळी लावला टिळा, गळ्यात घातल्या माळा, आणि येता- जाता …. नुसती मलाच मारती डोळा.
  • महादेवाच्या पिंडीला नागाने घातला वेढा ….. चा आणि माझा मांजर आणि उंदिरचा जोडा.
  • चांदीची सायकल तिला सोन्याच्या तारा, आणि जेव्हा बघावं तेव्हा … च्या तोंडावर वाजलेले असतात बारा.
  • आंबा गोड, ऊस गोड, अमृतही गोड, …. चे नाव त्याच्यापेक्षा ही गोड.
  • ज्वारीच्या कडेला पेरली होती जवस, आणि मीच नवरा मिळावा म्हणून …. नी केला होता नवस.
  • रव्याचा लाडू बुक्कीने फोडू, चल ग …. जोडीने उपवास सोडू.
  • पोळ्याला बैलाच्या शिंगाला बांधतात गोंडा ….  एक लाख कधी देणार माझा हुंडा
  • सासू बसली अइस पईस आणि माझी … म्हणजे जशी गवळ्याची म्हैस.
  • ठरलं लग्न आणि बांधला बस्ता, आणि माझी … म्हणजे काळ्या डांबराचा रास्ता.
  • खुर्चीत खुर्ची प्लास्टिकची खुर्ची …. आमची लवंगी मिरची.
  • रस्त्यात आला म्हशींचा घोळका, त्यात आमच्या …. ला ओळखा.
  • कायबी करून पाण्यात होत शेवाळ, … बरोबर लग्न करून माझं निघालं दिवाळ
  • श्रावणाच्या महिन्यात पावसाची आली सर, … ची आई गेली वर आणि तिथून म्हणती जावईबापू माझ्या लेकीबरोबर नीट संसार कर.

आधी केली बार्शी,
पैठण केलं गेल्यावर्षी,
पैठणात पाहिली नाथ महाराजांची कावड,
मग लागली पंढरीची आवड,
पंढरीत पाहिला विठ्ठल रखुमाईचा जोडा,
मग पहिला पालखीचा वेढा,
पालखीच्या वेढ्यात असतो ज्ञानोबारायांचा घोडा,
ज्ञानोबारायांच्या घोड्याला घुंगराची हलकी,
मग पहिली मुक्ताबाईची पालखी,
मुक्ताबाईच्या पालखीला मोत्याचा तुरा,
मग पहिला गोपाळपुरा,
गोपाळपूरला पहिला जनाबाईचा खेळ,
मग झाली आळंदीला जायची वेळ,
आळंदीचा सोहळा गार,
देव आले आरपार,
साधुसंतांची केली सेवा,
मग गेलो महादेवा,
महादेवाला वाहिला बळी,
मग आली जगन्नाथ ला जायची पाळी,
जगन्नाथ मध्ये घेतली माळ,
मग झाली घरी जायची वेळ,
घरी न्यायला घेतली भेळ,
भेळी मध्ये होता लसूण,
आमची ….  गेली रुसून
तर आणली गाढवावर बसून.

Comedy Ukhane in Marathi for Male

  • तुमची मामी मला पप्पी देत नाही म्हणून कधी कधी बसतो मी रुसून, अगं नाकातला शेंबूड घे बरं आधी पुसून
  • लग्न जमल्यापासून रात्रीचा लागत नाही डोळा, … चे नाव ऐकण्यासाठी कावळ्यासारखे झाले सगळे गोळा.

हे देखील वाचा –

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

शेतकरी उखाणे
मराठी उखाणे

शेतकरी नवरदेवासाठी कॉमेडी उखाणे | comedy ukhane for farmers

शेतकऱ्यांसाठी लग्नातील फनी उखाणे शेतकरी महिलांसाठी सुंदर उखाणे हे देखील वाचा –

नवरदेवासाठी उखाणे
मराठी उखाणे

नवरदेवासाठी उखाणे सोपे, छोटे आणि सुंदर

भारतातील लग्न समारंभामध्ये उखाणे घेण्याचा फार आनंदी सोहळा असतो. या सोहळ्यांमध्ये खास...

Funny Ukhane in Marathi for Female
मराठी उखाणे

Best Comedy And Funny Ukhane in Marathi for Female | Comedy Ukhane Marathi

Funny आणि Comedy मराठी उखाणे तुम्ही कोणत्याही समारंभामध्ये किंवा समारंभाविना नवऱ्यासाठी, मित्रासाठी...

Marathi Ukhane
मराठी उखाणे

नवरीसाठी मस्त आणि सहज लक्षात राहणारे मजेदार नवीन मराठी उखाणे | Marathi Ukhane For Bride

आधुनिक आणि पारंपारिक विवाहमध्ये नवरीसाठी नवीन उखाणे संग्रह खास घेऊन आलो आहोत...