लाइफस्टाइलफॅशन

गडवाल सिल्क साडीची संपूर्ण माहिती

gadwal silk saree
gadwal silk saree

गडवाल सिल्क साडी, ही भारतातील तेलंगणा राज्यातील जोगुलांबा गडवाल जिल्ह्यात असलेल्या गडवाल या ठिकाणी पारंपारिकपणे बनवल्या जातात. तसेच महबूबनगर जिल्यातील पोरवाल आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये या साड्यांचे विणकाम केले जाते. गडवाल हे शहर हैदराबादपासून २०० किलोमीटर असलेल्या कृष्णा नदीच्या जवळ वसलेले आहे. 1999 मध्ये या साडीला भौगोलिक स्थानदर्शक म्हणून मान्यता प्राप्त झालेली आहे. तिरुपतीच्या भगवान व्यंकटेश्वराच्या ब्रह्मोत्सवाची सुरुवात देवाच्या मूर्तीला या गडवाल सिल्क साडीने सजवूनच केली जाते.

गडवाल सिल्क साडीचा इतिहास | History of Gadwal Silk Sarees

गडवाल साडीचा इतिहास 200 वर्षांपूर्वीचा आहे. गडवाल हे शहर एका छोट्या राज्याची राजधानी होती. स्थानिक भाषेत “समस्थानम” असे म्हणतात. त्या काळातील राणी ‘आधी लक्ष्मी देवम्मा’ यांनी विविध भागातून आलेल्या विणकरांच्या कलेला प्रोत्साहन दिले आणि त्यांची हस्तकला वाढवली.  सुरवातीच्या काळामध्ये गढवाल साडीला  ‘मठियामपेटा’ म्हणत. कालांतराने या साडीला गडवाल नावाने मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली.

1946 मध्ये दिवंगत रतन बाबू राव यांनी गडवाल हँडलूम सेंटरची स्थापना केली. या सेंटर मध्ये गडवाल साडीबद्दल संपूर्ण माहिती आपल्याला प्राप्त होते.

गडवाल साडीचे प्रकार | Types of Gadwal Sarees

गडवाल साडी, पारंपरिकपणे कुट्टू बॉर्डर आणि जरी वर्क या दोन प्रकारे तयार केली जाते. परंतु गडवाल साडीचे त्यांच्या विणकामाच्या पद्धतीनुसार वेगवेगळे प्रकार ठरतात. ते पुढील प्रमाणे आहेत. 

1. कुट्टू बॉर्डर गडवाल साडी – या प्रकारामध्ये गडवाल साडीला पारंपरिकपद्धतीने विणलेली कॉटन बॉर्डर असते. या कॉटन बॉर्डर साडीलाच कुट्टू बॉर्डर गडवाल  साडी असे म्हणतात. 

2. प्युअर सिल्क गडवाल साडी – या साड्या पूर्णपणे सिल्कपासून तयार केल्या जातात. उत्कृष्ट फॅब्रिक, चमक सुंदर डिझाइन आणि जरी वर्क यामुळे या साड्या अतिशय सुंदर दिसतात.

3. गडवाल पट्टू साडी –  “पट्टू” या शब्दाला दक्षिण भारतात रेशीम असे म्हणतात.  गडवाल पट्टू साडी उत्कृष्ट विणकाम आणि जारि वर्कसाठी साठी खास लोकप्रिय आहेत. 

4. गडवाल जामदानी साडी – या प्रकारामध्ये गडवाल साडीवरील विणकाम हे जामदानी विणकाम तंत्राने केले जाते. यामध्ये जामदानी पद्धतीने साडीवरती अतिशय कठीण डिझाइन भौमितिक आकार, पक्षी,  फुले यांचे विणकाम केले जाते. 

5. सिल्क कॉटन ( सिको ) गडवाल साडी – या साडी विणकामामध्ये शुद्ध रेशीम आणि उच्च दर्जाचे कॉटन वापरले जाते. या दोन्हींच्या मिश्रणाने अतिशय सुंदर आणि आरामदायी गडवाल साडी तयार होते. 

6. टेंपल बॉर्डर गडवाल साडी – भारतातील मंदिरावरील अतिशय सुंदर कलाकृती या साड्यांवरती मनमोहक पद्धतीने विणली जाते. या मंदिरावरील डिझाइन्स साडीच्या काठावरती विणली जाते म्हणून या साडीला टेंम्पल बॉर्डर साडी असे म्हणतात. 

7. कलमकारी गडवाल साडी – कलमकारी ही एक पारंपारिक कला आहे ज्यामध्ये फॅब्रिकवर हाताने पेंटिंग किंवा ब्लॉक प्रिंटिंग केली जाते.म्हणून या साडीला कलमकारी गडवाल साडी असे म्हणतात. 

8. हेवी पल्लूसह सिम्पल साडी – काही गडवाल साड्या अतिशय प्लेन विणल्या जातात. कुठल्याही प्रकारची बुट्टी किंवा डिझाइन साडीवर नसते.  परंतु साडीचा पल्लू हा संपूर्ण विणकामाने भरलेला असतो आणि दिसायला ही साडी अतिशय सुंदर दिसते.

गडवाल सिल्क साडीचे वैशिष्ट्ये | Features of Gadwal Silk Saree

  • गडवाल साडी हि प्रामुख्याने शुद्ध रेशीम पासून बनवल्या जातात त्यामुळे त्यांना एक सुंदर चमक असते.
  • गडवाल साड्यांचे एक वेगळे वैशिष्ट्य म्हणजे “कुट्टू बॉर्डर ” किंवा कॉटन बॉर्डर. ही बॉर्डर पारंपारिकपणे परस्परविरोधी रंग आणि अति बारकाईने हाताने केलेले विणकाम या साठी खास ओळखली जाते.
  • गडवाल सिल्क साडी तयार करण्यासाठी शुद्ध सोन्याच्या किंवा चांदीच्या जरीच्या धाग्यांचा वापर केला जातो.
  • गडवाल साडी ही इंटरलॉकिंग तंत्राचा वापर करून तयार केली जाते. ज्यामध्ये साडीचा संपूर्ण भाग वेगळा विणला जातो आणि पल्लू आणि बॉर्डर वेगळी विणली जाते. रेशीम पल्लू कॉटन च्या फॅब्रिकला नाजूकपणे झिगझॅग पॅटर्नचा वापर करून जोडला जातो.
  • साडीचे शरीर पिट लूमवर सुती धाग्यांनी विणले जाते.
  •  गडवाल साडी रेशिम आणि जरीचा वापर करून तयार केली जाते तरीही या साड्या वजनाने हलक्या आणि परिधान करण्यास अतिशय आरामदायक असतात.
  • गडवाल साड्या विविध रंग, डिझाईन्स आणि पॅटर्नमध्ये तयार केल्या जातात.
  • गडवाल साड्या विविध पारंपरिक डिझाइन्स मध्ये तयार केल्या जातात. ज्यामध्ये निसर्ग, पौराणिक कथा, प्राणी, पक्षी इत्यादींचा समावेश आहे.
  • साडीचा मुख्य भाग कॉटन , सिल्क कॉटन किंवा रेशीमने बनलेला असतो, परंतु बॉर्डर आणि पल्लू 100% रेशीम मधेच तयार केलेले असतात.
  • रेशीम गडवाल साड्या इतक्या हलक्या असतात कि त्यांची मॅचबॉक्सच्या आकाराएव्हडी घडी होऊ शकते.

गडवाल सिल्क साडीची काळजी कशी घ्यावी | How to Care for Gadwal Silk Saree

  • गडवाल साडी रेशिम आणि जरीपासून बनवली जाते त्यामुळे या साडीला नेहमी ड्राय क्लीन चा करावे.
  • साडी नेहमी कपड्याच्या पिशवीत किंवा धूळ आणि आद्रता लागणार नाही अशा ठिकाणी ठेवा.
  • साडीवर डायरेक्ट परफ्यूम चा वापर टाळावा कारण त्यामध्ये केमिकल चा वापर असू शकतो ज्यामुळे साडी खराब होऊ शकते.
  • रेशीमला बुरशी लागू शकते, त्यामुळे या साडीला शक्यतो ओलावा लागणार नाही याची काळजी घ्या.
  • गडवाल साडीला इस्त्री करताना दोन सुती कापडांच्या मध्ये ठेऊन साडीला इस्त्री करा.
  • अधून मधून साडीची घडी बदला, त्यामुळे साडीतील जरीची झीज होणार नाही.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

silk Fabric
लाइफस्टाइलफॅशन

सिल्क ( रेशीम )आणि सिल्क साड्यांबद्दल माहिती

आपण सर्व भारतीय महिला विशेष प्रसंगी सिल्कच्या साड्या परिधान करतो, परंतु या...

pure handmade kashmiri silk saree
लाइफस्टाइलफॅशन

काश्मिरी सिल्क साडी

काश्मिरी सिल्क साडी त्यांच्या सुंदर आणि आलिशान रेशीमच्या गुणवत्तेसाठी खास ओळखल्या जातात....

wedding outfit ideas for womens
फॅशनलाइफस्टाइल

लग्नामध्ये कुठला पोशाख घालावा याचा विचार करताय का? इथे आहेत महिलांसाठी काही भन्नाट कल्पना

लग्नामध्ये कुठला पोशाख घालावा? हा प्रश्न तर सर्वांनाच पडलेला असतो. आपल्या भारतीय...

konrad silk saree
लाइफस्टाइलफॅशन

दक्षिण भारतातील टेम्पल साडी – कोनराड सिल्क साडी | Konrad Silk Saree

कोनराड सिल्क साडी, ही साडी भारतातील सर्वात सुंदर साड्यांपैकी एक साडी आहे....