- किरणांच्या ओंजळीत पृथ्वी देते स्वतःचे अर्ध्य, …. चे नाव घेते हाच आहे खरा होळीचा अर्थ.
- होळी सणात वाईट प्रवृत्तीची करावी होळी, …. चे नाव घेऊन सर्वांच्या सुखासाठी पसरते झोळी.
- होळी सणाने परिसर होतो स्वच्छ सर्व, … चे नाव घेते मला ना होवो कशाचाही गर्व.
- पुरणपोळ्यांचा नैवेद्य दाखवितात होळी सणा, … च्या संसारी आनंदी नाही उणा.
- वर्षातली साऱ्या सणांची होते होळीने सांगता, …. चे नाव घेण्यासाठी उभी … ची कांता.
- भारतीयांमध्ये महत्त्व भारी सणाला, … चे नाव घेते उणे न पडो कुणाला.
- भारतीयांच्या प्रत्येक सणामध्ये आहे एक कथा, … च्या संसारात मला नाही व्यथा.
- भारतीय परंपरेल सणांची आहे सुंदर जोड, …. च्या सहवासाने संसार झाला गोड.
- रंगपंचमीच्या सणाला नवरंगानी येते रंगात,… रावांची सदा लाभो मला सांगत.
- रंगपंचमीच्या सणी आकाशात उधळती रंग, …. च्या संसारात मी सदैव दंग.
- होळीपासून रंगपंचमी पर्यंत उधळण होते रंगांची मला सदैव साथ लाभो … रावांच्या प्रेमाची.
- भारतीय सणांनी मानवाची सांगड घातली पर्यावरणाशी, … चे नाव घेऊन मागणे मागते कुणीही न राहो उपाशी.
- भारतीय संस्कृतीत प्राधान्य आहे रंगाला, दृष्ट न लागो … व माझ्या संसाराला.
- दारी लावले केळीचे खांब वर बांधले तोरण,…. चे नाव घेते आज आहे रंगपंचमीचा सण.
- भारतीय सणांनी मानवा मानवांत वाढतो स्नेहभाव, …. चे नाव घेते न राहू कोणताही दुजा भाव.
- होळी झाल्यावर लागते उन्हाळ्याची चाहूल,…..रावांच्या प्रेमात मी गेले न्हाऊन.
- होळी सणाला करतात होलिकाचे दहन, … रावांच्या सोबत संसारात करिन सर्व सहन.
- रंगपंचमीला उधळतात सर्व रंग ,… राव करत नाही कधीही माझी अपेक्षा भंग.
Leave a comment