काश्मिरी सिल्क साडी त्यांच्या सुंदर आणि आलिशान रेशीमच्या गुणवत्तेसाठी खास ओळखल्या जातात. काश्मिरी साड्या हातमागावरती तयार केल्या जातात. या सिल्क साड्यांवरील डिझाईन्स पारंपरिक पद्धतीने तयार केल्या जातात. या पारंपरिक काश्मिरी सिल्क साड्या पुरातन काळापासूनच भारताच्या कापडउद्योगातील महत्वाचा भाग आहे. म्हणून तर ही अप्रतिम साडी भारतातील सर्वात सुंदर सिल्क साड्यांपैकी एक आहे.
काश्मिरी सिल्क साडी चा इतिहास
१५ व्या शतकात कश्मीर मध्ये रेशीम विणकामाचे पुरावे सापडतात. सर्वप्रथम चीनी लोकांनी या भागामध्ये रेशीम आणले. काश्मीर मध्ये हळू हळू रेशीम विणकामाची स्थानिक लोकांना कला अवगत होऊ लागली. त्यामुळे पूर्वीपासूनच काश्मीर मध्ये रेशीम विणकामाची परंपरा आहे. त्यानंतर मुघल काळामध्ये रेशीम विणकामाची ही कला विकसित होऊ लागली.
मुघलांना या हातमाग कला फार प्रिय होत्या. अकबर आणि शहाजहान या मुघल सम्राटांनी काश्मिरी विणकरांना संरक्षण दिले आणि उत्तम रेशीम कापडांच्या निर्मितीस प्रोत्साहन देखील दिले. मुघल काळामध्येच ब्रोकेड म्हणजेच सोन्याचे आणि चांदीचे धागे वापरून विणकाम केले जाऊ लागले आणि तसेच कापडावरील भरतकाम देखील विकसित झाले. यामुळे काश्मिरी साडीच्या विणकामाच्या तंत्रामध्ये सुधारणा होऊ लागली.
कालांतराने काश्मिरी विणकरांनी पर्शियन आकृतिबंध आणि डिझाइन्स देखील या साडीमध्ये विणण्यास सुरुवात केली. त्यामुळे या साड्यांच्या सुंदरतेत अधिकच भर पडली. परंतु इंग्रजांच्या काळामध्ये औद्योगिकीकरण आणि मशीनमध्ये तयार होणाऱ्या कापडामुळे या पारंपरिक हस्तकलेच्या उत्पादनावरती मोठ्या प्रमाणात प्रभाव झाला आणि हळू हळू काश्मिरी साडी विणकामात घट होऊ लागले.
परंतु स्थानिक काही राजकीय आणि श्रीमंत संरक्षकांनी ही कला टिकवली आणि साड्यांचे उत्पादन सुरूच ठेवले. कालांतराने साडीनिर्मतीमध्ये सुधारणा आणि योग्य साधनांमुळे मोठ्या प्रमाणात उत्पादन देखील होऊ लागले. म्हणूनच जागतिक बाजापेठेमध्ये काश्मिरी सिल्क साड्यांनी त्यांची स्वतःची एक ओळख बनविली आहे आणि जगभरामध्ये प्रसिद्धी देखील मिळवली आहे.
काश्मिरी सिल्क साडी चे प्रकार
- शुद्ध काश्मीर सिल्क साडी – या साड्या पूर्णपणे अस्सल रेशीम पासून तयार केल्या जातात. या रेशीम साड्या त्यांच्या मऊपणासाठी आणि सुंदर नैसर्गिक चमक साठी प्रसिद्ध आहे.
- कानी सिल्क | कानी पश्मीना साडी – कानी रेशीम साड्यांवरती टेपेस्ट्री-शैलीतील विणकाम तंत्राचा वापर केला जातो. या साड्यांवती हातमागाच्या साहाय्याने गुळगुळीत व्हिज्युअल कॉन्ट्रास्ट तयार केले जाते.
- जमावर सिल्क साडी – या साडी च्या विणकामात सोन्याच्या किंवा चांदीच्या जरीचा वापर केला जातो. जामवार साड्या अतिशय आलिशान असतात आणि बऱ्याचदा लग्नामध्ये आणि विशेष कार्यक्रमात परिधान केल्या जातात.
- काश्मिरी वर्क | आरी वर्क सिल्क साडी – कापडावरती सुईच्या मदतीने हाताने सुंदर आणि अतिशय बारकाईने विणकाम केले जाते. सहसा या विणकामामध्ये फुले आणि पेस्ली या डिझाइन्स चा समावेश असतो.
- काश्मिरी क्रेप साडी – काश्मिरी क्रेप साडी या प्रकारामध्ये रेशीम, लोकर आणि सिंथेटिक फायबर या पासून हलक्या कुरकुरीत स्वरूपात कापड तयार केले जाते. त्यावरती काश्मीरी वर्क किंवा डिझाइन्स तयार केल्या जातात.
- सोझनी वर्क काश्मिरी साडी – सोझनी वर्क काश्मिरी साडी , या प्रकारामध्ये रेशीम धागे बारीक सुई ने फॅब्रिकवरती अगदी नाजूक आणि सुरेख विणकाम केले जाते.
- टिल्ला वर्क काश्मिरी साडी – टिल्ला भरतकाम प्रकारामध्ये फॅब्रिकवरती सोन्याच्या किंवा चांदीच्या धाग्यांनी अगदी नाजूक पद्धतीने भरतकाम केले जाते किंवा हे धागे साडीमध्ये विणले जातात.
काश्मिरी सिल्क साडी चे वैशिष्ट्ये
- काश्मिरी फॅब्रिक हे उच्च गुणवत्तेसाठी,नैसर्गिक चमक,मऊ सूतासाठी खास ओळखल्या जातात.
- या साड्यांवरती हाताने सुंदर भरतकाम केले जाते ज्यामुळे साडीची सुंदरता अधिकच वाढते.
- निसर्गापासून प्रेरित पाने, वेली, पक्षी या सारख्या डिझाइन्स तयार केल्या जातात.
- तसेच पारंपरिक काश्मिरी डिझाइन्स, पेस्ले, सांस्कृतिक वारसा यांचा देखील समावेश आहे.
- साडी तयार करण्यासाठी ब्रोकेड आणि अरी यासारख्या तंत्राचा वापर केला जातो.
- काश्मिरी साडीवर भौमितिक रचना जसे झेंडूच्या माळा, चमेली, चिनारची पाने, बर्फाचे तुकडे आणि स्नोफ्लेक्स यांच्यासारखे देखावे देखील सुंदर पद्धतीने तयार केले जातात.
- पोपट, बदके, किंगफिशर व स्थलांतर करणारे पक्षी असे जिवंत देखावे देखील तयार केले जातात.
अस्सल काश्मिरी सिल्क साडी कशी ओळखावी
- काश्मिरी सिल्क साडी अगदी मऊ असते फॅब्रिक ला हात लावताच रेशीम चा उच्च दर्जा ललक्षात येतो.
- या साड्या दिसायला आलिशान असतात आणि त्यांना नैसर्गिक चमक असते.
- अस्सल काश्मिरी साड्या वजनाने अतिशय हलक्या असतात त्यामुळे त्या परिधान करण्यास अतिशय आरामदायक असतात.
- काश्मिरी सिल्क साड्या हाताने विणलेल्या असतात त्यामुळे अगदी थोडयाफार प्रमाणामध्ये विणकामात अनियमितता असू शकते.
- या साड्यांवरती काश्मिरी विणकाम म्हणजेच स्थानिक गोष्टींचे विणकाम असते, उदा. नैसर्गिक विणकाम पाने, फुले.
- अस्सल साडीला शुद्धतेचे एक चिन्ह प्राप्त असते ते हातमाग चिन्हे चेक करा.
- या साड्यांना सिल्क मार्क ऑर्गनायझेशन ऑफ इंडियाचे प्रमाणपत्र आहे. त्यामुळे साडी अस्सल रेशीम पासून बनवलेली आहे की नाही हे तपासण्यासाठी सिल्क मार्क तपासा.
- या साड्या हाताने तयार केल्या जातात त्यामुळे या प्रक्रियेला फार मेहनत आणि वेळ लागतो. म्हणून या साड्या महाग असतात. जर तुम्हाला कमी किमतीत अस्सल साडी काश्मिरी सिल्क साडी भेटत असेल तर आधी साडीच्या शुद्धतेची नक्की खात्री करून घ्या.
- शक्यतो तुमची फसवणूक होणार नाही यासाठी अस्सल काश्मिरी साडीसाठी ओळखल्या जाणाऱ्या दुकानांमध्येच साडी खरेदी करा.
काश्मिरी सिल्क साडीची काळजी कशी घ्यावी
- काश्मिरी सिल्क साड्यांची योग्य प्रकारे काळजी घेतल्यास या साड्या खूप काळ टिकतात.
- या साडीवरती रेशीम आणि जरीने विणकाम केलेले असते आणि रेशीम देखील अतिशय नाजूक असते स्ट्रॉंग डिटर्जंट्समुळे हे रेशीम आणि वर्क खराब होऊ शकते. त्यामुळे काश्मिरी सिल्क साडी ला नेहमी ड्राय क्लीनच करावे.
- या साडीला घरी धुणे टाळा कारण रेशीमचा रंग जाऊ शकतो आणि त्याची चमक देखील कमी होते.
- या साडीला सूर्यकिरणांपासून दूर कोरड्या जागी व्यवस्थित ठेवा कारण सूर्यप्रकाशामुळे साडीचा रंग फिकट होऊ शकतो.
- या साड्या शक्यतो मलमल च्या कपड्यामध्ये गुंडाळून ठेवा म्हणजे साडीला डाग आणि ओलावा लागणार नाही.
- असून मधून साडीला मोकळ्या हवेत ठेवा ज्यामुळे साडीचा वास येणार नाही.
- साडी नेहमी स्वच्छ हातांनीच हाताळावी जेणेकरून साडीला कुठलाही खराब डाग लागणार नाही.
- डायरेक्ट परफ्यूम चा वापर टाळा कारण त्यातील रसायनांमुळे फॅब्रिक खराब होईल.
हे देखील वाचा –
Leave a comment