मराठी उखाणे

Long ukhane or Mothe ukhane in marathi for female | मराठी मोठे उखाणे

long ukhane in marathi for female

मराठी उखाणे घेण्याची परंपरा महाराष्ट्रामध्ये फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. लग्न, बारसं, मकर संक्रांति, हळदीकुंकु, तसेच प्रत्येक सणामध्ये, शुभ समारंभामध्ये उखाणे घेतली जातात. त्यामध्ये छोटे उखाणे आणि मोठे उखाणे घेतली जातात. पण मोठे उखाणे घेणे फक्त आजीबाईंनाच शक्य असते. आत्ताच्या नवीन पिढीला मोठे उखाणे घ्यायला फारसे जमत नाही. म्हणूनच तर आम्ही आलोय तुमच्या मदतीला काही भन्नाट मोठे उखाणे घेऊन. चला तर मग बघूया तुमच्या आवडीचे मोठे उखाणे.

येत होते जात होते खिडकीवाटे पाहत होते | Yet hote jat hote khidkiwate pahat hote

येत होते जात होते,
खिडकीवाटे पाहत होते,
खिडकी लागली कानाला,
खिडकीला तीन तारा,
अडकीले घुंघर बारा,
पान खाते कराकरा,
घाम येतो दरदरा,
तिकडून आला व्यापारी,
व्यापारीनं दिली सुपारी,
सुपारी देते वाण्याला,
हंडा घेते पाण्याला,
पाणी आणते गंगेचे,
वाडा बांधते भिंगाचं,
वाड्यात वाडे सात वाडे,
एका वाड्यात पलंग,
पलंगावर गादी,
गादीवर उशी,
उशीवर होती कप-बशी,
कपबशी दिली पाहुण्याला,
त्यांनी पाहिलं समोरच्या भिंतीला,
भींतीवर होती घड्याळ,
घड्याळात वाजले एक,
… रावांचे नाव घेते,
… ची लेकं.


सासरचा गाव चांगला, गावामध्ये बंगला …

सासरचा गाव चांगला,
गावामध्ये बंगला
बंगल्याला खिडकी
खिडकीत द्रोण
द्रोणात तुप
तुपा सारखे रूप
रूपा सारखा जोडा
चंद्रभागेला पडला वेढा
चंद्रभागेची पाच नाव
नावेत बसावं
आणि
… रावांनी देहू, आळंदी, पंढरपूर, फिरवावं.


Cultural significance of Marathi wedding ukhane

Long ukhane in marathi for female marriage | लग्नासाठी मोठे उखाणे

आडगाव माझ सासर जयपुर माझ माहेर | Adgaon Maze Sasar Jaipur Maze Maher

आडगाव माझ सासर ,
जयपुर माझ माहेर ,

गावात घर, घरासमोर अंगण,
अंगणात मोठे प्रांगण,

प्रांगणात तुळशीचे वृंदावन,
वृंदावना समोर रांगोळी,

नाव घेते हळदीच्या वेळी,
नाव घ्या, नाव घ्या,
नावात काय असत,


नावात असत,
लहानांच मोठेपण,
मोठ्यांचा थोरपण,
थोरांचा मान,
तोच आमचा स्वाभिमान,
… रावांच नाव घेऊन ठेवते सर्वांचा मान.


marathi long ukhane

नाव घेते नाव, सासर हेच आता माझं गाव | Nav Ghete Nav, Sasar Hech Maze Gaon

नाव घेते नाव,
सासर हेच आता माझं गाव,

गावात बांधाला बंगला,
बंगल्याला लावला चुना,
चुण्यावर नेसली साडी,

साडीला लावला चाप,
… माझे बाप,

दारात होती जाई,
… माझी आई,

ताटात होता खाऊ,
…. माझा भाऊ,

कपाटात ठेवली चैन,
….माझी बहीण,

पाण्याला चालली गवळण,
… माझी मावळण,हातात होती अंगठी,
त्यावर चंद्राची खून,
… रावांचे नाव घेते,
…. रावांची सून.


कणकण कुदळी, मन-मन माती | kan kan kudali, man man mati

कणकण कुदळी, मन-मन माती, 
पोचारल्या भीती, चेतरले काम,
सासूबाईच्या पोटी जन्मले राम,
राम गेले हटा,
हटावून आणल्या करडी,
त्याच्या घेतल्या आरडी,
उरल्या सुरल्या शिक्यावर ठेवल्या,
शिक तुटलं, भांडं फुटलं,
वगळ गेला परस दारी,
परसदार म्हणतं नाव घे पोरी,
नाव काय फुकटचं,
नाव हळदी कुंकवाचं,
हळदी कुंकवाने भरले ताट,
…राव बसले जेवायला
तर समया लावते तीनशे साठ.


Long Ukhane for wedding | लग्नामध्ये नवरीसाठी मोठे उखाणे

आग्रह केला तुम्ही म्हणून घेते खास नाव,
सासू आहे माझी दुसरी माऊली,
वाटते मला सुखाची सावली,
सासर्‍यांचा आहे खूपच रुबाब,
देत नाही त्यांना कोणी उलटा जवाब,
जे असतात नेहमी हसरे,
… राव माझे सासरे,
येऊ देत नाही माझ्या डोळ्यात आसु,
….. माझी सासु,
मैत्रिणीसारखी आहे माझी ननंद,
नाव त्यांचे घेताना होतो मला खूप आनंद,
बहिणीसारखी आहे माझी जाऊ,
… ताई आपण दोघी खूप सुखाने राहू,
मागणं मागते पाहून श्रीकृष्णाची मूर्ती,
वाढत राहो माझ्या सासरची सुख-समृद्धी आणि कीर्ती,
.. रावांचा आणि माझा लाखात एक जोडा, 
.. रावांचा आणि माझा लाखात एक जोडा,
आता तरी तुम्ही आमची वाट सोडा.


मकर संक्रांती चे हळदीकुंकूवाचे लांबलचक मोठे उखाणे | Long ukhane on makar Sankranti’s haldi kunku

उखाणा १

आली आली मकर संक्रांत, संक्रांतीच हळदीकुंकू | Ali Ali Makar Sankranti

आली आली मकर संक्रांत,
संक्रांतीच हळदीकुंकू,
सुहासिनी येता घरा,
साडी मी कोणती नेसु,
जॉर्जेट नको, प्रिंटेड नको,
साडी हवी जरतारी,
ज्यात मी शोभून दिसेन
कुलवंत स्त्री खरी,
म्हटलं जिजामाता नेसावी,
पण वय दिसेल का जास्त?
कलमकारी साडी माझ्यावर
शोभून दिसते मस्त,

खणाच्या साडीचा आता
trendच नवा आला,
बांधणीची साडी नेसून
तर जमाना झाला,
मग वाटलं पदरावर
मोर हवा नाचरा,
बनारसी नेसावी तर
जपून जरा वावरा,
कांजीवरम साडीचे
बुट्टे दिसतात उठून,
गडवाल सिल्कच्या काठापदरावर
मन पडलंय अडकून,

काय बाई कळेना
साडी कोणती नेसावी,
हळदीकुंकवाची वेळ आली
घाई आता करावी,
मग म्हटलं जरा
— रावांनाच विचाराव,
त्यांचं काय मत पडत
जाणून तरी घ्यावं,
म्हटलं जरा ऐकलं का
सांगा मी साडी कोणती नेसू,
माझ्या चेहऱ्यावरचे प्रश्नचिन्ह पाहून
यांना आले हसु,

मग आले जवळ
बोलले हळूच प्रेमाने,
ऐक माझे उत्तर
सांगतो मी अभिमानाने,
कोणतीही साडी नेस
तु सुंदरच दिसतेस,
साडी तुझी नव्हे तर
साडीची शोभा तू वाढवतेस.


उखाणा २

आमंत्रण आले हळदीकुंकूच, निमित्त मकर संक्रांतीच | Aamantran Aale haldi kunkwache, nimitt Makar Sankranti Che

आमंत्रण आले हळदीकुंकूच
निमित्त मकर संक्रांतीच
बाकी तयारी नंतर करू
आधी पहाव साडीच,
कपाट उघडताच दिसली
पैठणी सुंदर गुलाबी
म्हटलं माझ्या हळदीकुंकवाला काय नेसाव
हीच साडी ठेवावी,
बाजूलाच होती लिनन निळी
पण परवाच तर नेसली होती
भाचीच्या बर्थडे वेळी,

खाली दिसले चमचमते
जरदोसी साडीचे खडे
ही साडी नेसून मागच्याच महिन्यात तर गेलो होतो
यांच्या मावशीकडे,
मऊ मऊ सुत लागल हाताला
साडी होती चिकनकारी
पण दोन महिन्यापूर्वीच तर नेसली होती
जाताना मी माहेरी,
इरकलीचे दिसले गोंडे
म्हटलं प्रश्न सुटला
पण सहा महिन्यापूर्वी तर नेसली होती
जेव्हा भेटले होते आत्याला,

खादी साडी नेसावी तर
हळदी कुंकवाला साधी वाटेल
ज्युटच्या साडीला आधी
कडक इस्त्री लागेल,
ब्रोकेड साडी नेसली
तर मीच उठून दिसेल
नक्की हळदीकुंकू कोणाकडे आहे
सगळ्यांनाच प्रश्न पडेल,
काय बाई करावे
साडीच नाही माझ्याकडे
हळदी कुंकवाची वेळ झाली
तरी सुटले नाही कोडे,

मग केली तक्रार
— रावांकडे
अहो मला साडीच नाही
नवी आणूया का गडे?
मग मात्र स्वारींनी
कपाळावर मारला हात
साड्यांनी भरलेलं कपाट पाहून
झाले एकदम अवाक,

जवळ मला घेऊन
बोलले अगदी प्रेमाने
इतकी सुंदर आहेस तू
फरक तो काय पडतो साडीने?
कोणतीही साडी नेस
तुला अप्रतिमच दिसेल
आणि हळदी कुंकवाला गेल्यावर तुला
दुसरीचीच साडी आवडेल.


Funny Long Ukhane in Marathi

उखाणा १

अंतरवाळी पंतरवाळी,
पंतरवळीवर वाढला भात,
भातावर टाकलं तूप,
तूपा सारख माझा गोरं गोरं रूप,
रूपासारखा बांधला मोठा वाडा,
वाड्यात आणला घोडा,
घोड्याने खाल्ली सुपारी,
आणि
…. चा बाप म्हणजे
देवळाबाहेरचा भिकारी

हे सुद्धा वाचा :-

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

शेतकरी उखाणे
मराठी उखाणे

शेतकरी नवरदेवासाठी कॉमेडी उखाणे | comedy ukhane for farmers

शेतकऱ्यांसाठी लग्नातील फनी उखाणे शेतकरी महिलांसाठी सुंदर उखाणे हे देखील वाचा –

नवरदेवासाठी उखाणे
मराठी उखाणे

नवरदेवासाठी उखाणे सोपे, छोटे आणि सुंदर

भारतातील लग्न समारंभामध्ये उखाणे घेण्याचा फार आनंदी सोहळा असतो. या सोहळ्यांमध्ये खास...

Funny Ukhane in Marathi for Male
मराठी उखाणे

Funny Ukhane in Marathi for Male | पुरुषांसाठी आणि नवरदेवासाठी कॉमेडी मराठी उखाणे

हे मजेदार Comedy आणि Funny उखाणे कोणत्याही प्रकारच्या समारंभामध्ये बायकोसाठी, मित्रांसाठी आणि...

Funny Ukhane in Marathi for Female
मराठी उखाणे

Best Comedy And Funny Ukhane in Marathi for Female | Comedy Ukhane Marathi

Funny आणि Comedy मराठी उखाणे तुम्ही कोणत्याही समारंभामध्ये किंवा समारंभाविना नवऱ्यासाठी, मित्रासाठी...