लाइफस्टाइलफॅशन

शक्तिशाली मराठा राणी अहिल्याबाई होळकरांची आवडती माहेश्वरी साडी

Maheshwari silk sarees in vibrant colors

माहेश्वरी साडी ही भारतीय सिल्क साड्यापैकी एक प्रचलित हॅन्डलूम साडी आहे. ह्या साड्या भारतामधील मध्यप्रदेश राज्यातील माहेश्वर या ठिकाणी पारंपारिक पद्धतीने हाताने विणल्या जातात. या साड्या तयार करण्यासाठी कॉटन आणि रेशम चा वापर केला जातो. भारतामधील शक्तिशाली मराठा राणी अहिल्याबाई होळकर (ahilyabai holkar) यांची ही अतिशय आवडती साडी होती. या अप्रतिम माहेश्वरी साडीला भारत सरकारचा GI टॅग प्राप्त झालेला आहे.

माहेश्वरी सिल्क साडीचा इतिहास | History of Maheshwari Silk Saree

मराठा राणी अहिल्याबाई यांनी हैद्राबादहून विणकर बोलावून माहेश्वरी साडीचे विणकाम सुरु केले. त्यांना या साड्या खूप आवडत होत्या. त्यांनी स्वतः साठी तसेच राजघराण्यातील इतरांसाठी हे कापड बनून घेण्यास सुरुवात केली. आणि तसेच येणाऱ्या पाहुण्यांना देखील भेटवस्तू म्हणून हे वस्त्र देत असे.

कालांतराने हि पारंपरिक साडी दुर्लक्षित होत चालली होती. आणि साडी उत्पादन बंद होण्याच्या मार्गावर होते. त्यामुळे अहिल्याबाई होळकर यांचे वंशज रिचर्ड होळकर आणि शालिनी होळकर यांनी रिवा सोसायटी ची स्थापना केली. रिवा सोसायटीचा उद्देश हि पारंपरिक हस्तकला टिकवून ठेवण्याचा होता.

Colorful and graceful navy blue Maheshwari saree collection

माहेश्वरी साडीचे प्रकार | Types of Maheshwari Sarees

माहेश्वरी साडीचे प्रकार हे तिच्या काठांवरील विणकामानुसार ठरते. इथे काही माहेश्वरी साडीचे बॉर्डर चे प्रकार आहेत.

  • माहेश्वरी बुगडी बॉर्डर
  • लहर बॉर्डर
  • जरी पत्ती बॉर्डर
  • चटाई बॉर्डर
  • रुई फूल बॉर्डर
  • बाजुबंद बॉर्डर
  • फूल बॉर्डर
  • व्ही बॉर्डर

Weaving method | विणण्याची पद्धत

  • माहेश्वरी साडी तयार करण्यासाठी सोन्याच्या किंवा चांदीच्या जरीचा वापर केला जातो. ही जरी रेशीमच्या धाग्यांमध्ये हातमागावरती विणली जाते, त्यामुळे साडीला अतिशय सुंदर स्वरूप प्राप्त होते.
  • साडी तयार करण्यासाठी लागणारी जरी ही सुरत वरून मागविली जाते आणि तामिळनाडू मधून कॉटन आणले जाते.
  • ही साडी तयार करण्यासाठी, साडी वरती आपल्याला जी डिझाईन तयार करायची आहे ती आधी कागदावरती रेखाटली जाते.
  • ही डिझाईन हातमागावरती साडीच्या खाली सेट केली जाते. हे नक्षीकाम बघूनच कारागिरांना साडीवरती विणकाम करण्यास सोपे जाते.
  • साडी तयार करण्याच्या आधी रेशीम, कॉटन आणि जरीचे धागे हातमागा वरती सेट केले जातात.
  • या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कारागीर विणकामाला सुरुवात करतात. आणि आपल्याला हवी तशी सुंदर साडी तयार होते.
  • साधी माहेश्वरी साडी 3 दिवसात तयार होते.
  • तसेच साडीवरती बुट्टी किंवा इतर नक्षीकाम असेल तर साडी तयार करण्यासाठी 8 दिवस लागतात.
  • टिशु ची साडी तयार करण्यासाठी 15 दिवस लागतात.
  • साडीवर जास्त नक्षीकाम आणि जरी वर्क असेल तर साडी तयार करण्यासाठी 20-25 दिवस लागतात.

Design | डिझाईन

  • माहेश्वर हे शहर नर्मदा नदीच्या काठावरती असल्यामुळे या साडीवरती नर्मदा लहर चे विणकाम केलेले दिसून येते.
  • तसेच या साडीच्या काठावरती तेथील किल्ल्यावरील भौमितिक नक्षीकाम आणि चटई बॉर्डर देखील तयार केली जाते.
  • साडीच्या डिझाईनवर अवलंबून काठ रुंद किंवा अरुंद असतात.
  • महेश्वरी साड्यांवरती शक्यतो कॉन्ट्रास्ट ब्लाउज असतात, ज्यामुळे साडीतील लुक सुंदर दिसतो.
Heritage Maheshwari sarees with unique motifs in black color

अस्सल माहेश्वरी साडी कशी ओळखायची? | How to Identify pure Maheshwari saree?

  • माहेश्वरी साड्या कॉटन, रेशीम आणि जरीचा वापर करून तयार केल्या जातात त्यामुळे या साड्या अतिशय मऊ असतात आणि वजनाला हलक्या असतात.
  • हातमागावरील साडी मागच्या आणि पुढच्या बाजूने सारखीच दिसते, त्यामुळे अस्सल माहेश्वरी साडी लगेच ओळखू येते.
  • मशीन वरती तयार केलेली साडीचे मागच्या बाजूचे धागे दिसतात हातमागावरील माहेश्वरी साडीचे धागे दिसत नाहीत.
  • हातमागावर तयार केलेल्या साडी वरती धाग्यांच्या विणकामातील छोट्या छोट्या गाठी दिसतात आणि काही ठिकाणी थोडेफार असमान विणकाम असते.
  • या साड्यांना भारत सरकारकडून शुद्धतेचे हॉलमार्क प्राप्त झालेले आहे, त्यामुळे साडी खरेदी करताना आपण हे हॉलमार्क चेक करून घ्यावे.

Price | किंमत

  • या साड्या तयार करण्यासाठी भरपूर मेहनत आणि वेळ लागतो म्हणून या साड्या महाग असतात.
  • साध्या कॉटन माहेश्वरी साडीची किंमत हि 1500 पासून सुरु होते.
  • साडीवर बुट्टी असेल तर त्या साडीची किंमत 3600 पासून सुरु होते.
  • जरीच्या साडीची किंमत हि साडीवरील नक्षीकामानुसार कमी किंवा जास्त होऊ शकते. सोन्याच्या जरीपासून तयार केलेल्या साडीची किंमत 60000 पर्यंत असू शकते. 
Traditional handwoven Maheshwari sarees in royal blue color

How to wash | कसे धुवावे

  • नॉर्मल कॉटन माहेश्वरी साडी हाताने धुतली जाऊ शकते.
  • परंतु, जरी किंवा सिल्कची माहेश्वरी साडी हि शक्यतो ड्राय क्लिनिंगच (Dry Clean) करावी. 
  • जरीची साडी घरी धुतल्यास साडीवरील जर खराब होऊ शकते.

maheshwari sarees for wedding | लग्नासाठी माहेश्वरी साड्या

माहेश्वरी साड्या त्यांच्या उत्कृष्ट विणकामासाठी, सुंदर डिझाईन आणि मऊ फॅब्रिक साठी ओळखल्या जातात. तसेच या साडीवरील जरीच्या विणकामामुळे ही साडी अतिशय सुंदर आणि रिच लुक देते, ज्यामुळे या साड्या लग्नामध्ये नवरीसाठी उत्तम असतात.

Other Product | इतर उत्पादन

माहेश्वरी कापडा पासून साडी, नऊवारी, ड्रेस मटेरियल, ओढणी, स्टोल आणि आसन देखील बनवले जातात.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

silk Fabric
लाइफस्टाइलफॅशन

सिल्क ( रेशीम )आणि सिल्क साड्यांबद्दल माहिती

आपण सर्व भारतीय महिला विशेष प्रसंगी सिल्कच्या साड्या परिधान करतो, परंतु या...

pure handmade kashmiri silk saree
लाइफस्टाइलफॅशन

काश्मिरी सिल्क साडी

काश्मिरी सिल्क साडी त्यांच्या सुंदर आणि आलिशान रेशीमच्या गुणवत्तेसाठी खास ओळखल्या जातात....

wedding outfit ideas for womens
फॅशनलाइफस्टाइल

लग्नामध्ये कुठला पोशाख घालावा याचा विचार करताय का? इथे आहेत महिलांसाठी काही भन्नाट कल्पना

लग्नामध्ये कुठला पोशाख घालावा? हा प्रश्न तर सर्वांनाच पडलेला असतो. आपल्या भारतीय...

konrad silk saree
लाइफस्टाइलफॅशन

दक्षिण भारतातील टेम्पल साडी – कोनराड सिल्क साडी | Konrad Silk Saree

कोनराड सिल्क साडी, ही साडी भारतातील सर्वात सुंदर साड्यांपैकी एक साडी आहे....