आधुनिक आणि पारंपारिक विवाहमध्ये नवरीसाठी नवीन उखाणे संग्रह खास घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी. लग्नाबरोबरच इतर शुभ कार्यामध्ये सुद्धा हे उखाणे तुमाला नक्कीच मदत करतील. आजच्या मॉडर्न पिढीला लागतात नवीन उखाणे हे लक्षात घेऊनच विवाह आणि नववधू संबधी नवीन आणि जुन्या चालीरीतीचा विचार करून हा उखाणा संग्रह तयार केला आहे.
द्वारकेमध्ये कृष्ण, अयोध्येमध्ये राम,
द्वारकेमध्ये कृष्ण, अयोध्येमध्ये राम,
… रावांच्या चरणीच माझे चारधाम.
चांगला नवरा मिळावा
म्हणून नवस केला देवाला,
… रावांचा कान पिळण्यासाठी
बोलवा माझ्या भावाला.
Marathi Bridal Ukhane
शिवशंभूंचा पराक्रम बघून
देवांनाही वाटला असेल हेवा,
… रावांसोबत सुरू करते
सुखी संसार नवा.
आधी होते मिस,
आता झाले मिसेस,
…. रावांचं नाव घेते
तुमच्यासाठी विशेष.
इंद्रधनुष्य दिसतो जेव्हा
पावसात असते ऊन,
… रावांचं नाव घेते,
… घराण्याची सून.
घातले मंगळसूत्र,
लावले कुंकू आणि नेसली मी साडी,
सर्व लोक बोलतात,
शोभून दिसते
… रावांची आणि माझी जोडी.
ऑटोमॅटिक गाडीला नसतात गिअर,
नवरा आहे माझा इंजिनियर,
कितीही हट्ट केले तरी
त्यांना येत नाही माझी कीव,
….. सारखं सांगत असतात,
अगं संपल्या आहेत माझ्या लिव्ह.
मंदिराच्या गाभाऱ्यात विठ्ठलाची मूर्ती,
…. रावांची सगळीकडे कीर्ती.
लग्नामध्ये रुखवतात
मांडली जरीची साडी,
… रावांचे नाव घेते
मांडवाच्या दारी.
Ukhane on love marriage | लव्ह मॅरेज वरती उखाणे
लग्नासाठी आली आजी,
आजीने आणली गावावरून भाजी,
… आणि माझ्या लव्हमॅरेजमुळे सगळ्यांचीच होती नाराजी,
पण मीया बीवी राजी,
तो क्या करेगा काझी.
कॉलेज करता-करता झाली मैत्री,
कॉलेज करता-करता झाली मैत्री,
मैत्री करता-करता झालं प्रेम,
मैत्री करता-करता झालं प्रेम,
प्रेम करता-करता झालं आज लग्न,
प्रेम करता-करता झालं आज लग्न,
… रावांचं नाव घेते होऊन मी त्यांच्यात मग्न.
खरा तर उखाणा असतो दोन ओळींचा फक्त
आता संधी साधून आली तर होईल मन व्यक्त
इंजीनियरिंग करता करता आमची मैत्री जमली घट्ट
आणि
मग काय इंजिनिअरिंग संपल्यानंतर प्रेमात पडलो चक्क
घरच्यांचा होकार मिळवण्यासाठी घेतले खूप कष्ट
अशी आहे माझी आणि … रावांची गोष्ट.
लव्ह मॅरेज करायचं होतं मला सासू-सासर्यांची
आणि
आई-वडिलांची संमती मिळवून
पण दिली [वधूचे नाव] तर नेली असती पळुन.
लग्नामध्ये वधुसाठी सहज आठवणारे सुंदर आणि सोपे उखाणे
संसार आहे दोघांचा,
तो दोघांनीही सावरायचा,
जर मी पसारा केला तर,
…रावांनी तो आवरायचा.
ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी,
तुकारामांची गाथा,
… रावांचे नाव घेते,
तुमच्या चरणी ठेवून माथा.
दारी होती तुळस,
तिला घातले पाणी,
आधी होते आई-बाबांची तान्ही,
आता झाले … रावांची राणी.
थंडगार जुस पिऊन
झाली मला सर्दी,
… रावांचे नाव घेते
सोडा आता गर्दी.
केळीच्या पानावर
काढीत होते शून्य,
… रावांचे नाव घेते
हेच माझं पुण्य.
सुहासिनींच्या शृंगारामध्ये
असतात शृंगार सोळा,
… रावांचे नाव ऐकण्यासाठी
सर्व झाले गोळा.
जाई जुईच्या झाडाखाली
हरणी घेते विसावा,
… रावांसारखे पती
जन्मोजन्मी असावा.
पाच पानं तोडले
तीन पानं आथरले,
… राव लग्नासाठी
हेलिकॉप्टरने उतरले.
काचेच्या ग्लासात
गुलाबी सरबत,
… गेले फॉरेनला
म्हणून मला नाही करमत.
द्राक्षाच्या वेली खाली
हरणी घेते विसावा,
… रावांचे नाव घेते
आशीर्वाद असावा.
तांब्याची घागर
अमृताने भरावी,
… रावांची सेवा
जन्मभर करावी.
आत्मरुपी करंडा
देहरुपी झाकण,
…. रावांना
ईश्वराचे राखण.
नवरीसाठी गृहप्रवेशावेळी चे उखाणे
सासरची मंडळी
खूप आहेत हौशी,
… रावांचे नाव घेते
गृहप्रवेशाच्या दिवशी.
खूप पहिले तीर्थक्षेत्र
पवित्र वाटते काशी,
… रावांचे नाव घेते
गृहप्रवेशाच्या दिवशी.
सोन्याची सुई
पितांबराच्या घोळात,
… रावांचे नाव घेते
सुहासिनींच्या मेळ्यात.
राम बसले राज्यावर
सीता बसली अंकावर,
… रावांचे
तेज माझ्या कुंकावार.
सासुबाई आहेत जणू
माझी दुसरी माऊली,
… रावांचे नाव घेते
मी बनवून राहील आयुष्यभर त्यांची सावली.
लाईट गेल्यावर
घरात लावतात मेणबत्ती,
… रावांचे नाव घेते
मी त्यांची सौभाग्यवती.
लिंबाला लागल्या लिंबोळ्या,
आंब्याला लागल्या कैऱ्या,
… रावांच्या संसारामध्ये
करीन देहाच्या पायऱ्या.
वसंत ऋतु सुरु झाला कि
लागते उन्हाळ्याची चाहूल,
… रावांच्या जीवनात टाकते
मी आज पहिले पाऊल.
पहाटे पहाटे झाडावर
कोकिळा गाते स्वरात,
… रावांचे नाव घेते
येऊ द्या मला घरात.
सत्यनारायन पूजेवेळी नवरीसाठी सुंदर उखाणे
सोन्याच मंगळसूत्र
माझ्या गळ्यात,
… रावांचे नाव घेते
सुहासिनींच्या मेळ्यात.
तिरंगा झेंड्याला
अशोक चक्राची खूण,
… रावांच नाव घेते
… रावांची सून.
राजहंस पाखरू
चरत होत वनात,
…. रावांच स्वरूप
चिंतलं होतं मी मनात.
ताटामध्ये आहे
थंडगार टरबुजाची फोड,
… रावांच नाव आहे
साखरे इतकं गोड.
गोल गोल चंद्राची सावली
पाण्यात झळकते,
… रावांचे नाव
माझ्या कुंकवामध्ये चमकते.
सुफ भरून सोनं,
गळा भरून लेणं,
… रावांच्या जीवावर
मला नाही ऊनं.
डब्यात डब्बा,
डब्यात होता केक,
… राव आहे
लाखात एक.
वाटीत वाटी,
वाटीमध्ये जीरा,
… राव माझ्या
हृदयातला हिरा.
लग्न झाले आता जोडीने
कुलदेवतेचे दर्शन येऊ करून,
… रावांचे नाव घेते
आशीर्वाद द्या आता मनभरून.
हे सुद्धा वाचा :-
Leave a comment