मराठी उखाणे

डोहाळे जेवणासाठी मराठी उखाणे

डोहाळे जेवणासाठी मराठी उखाणे

भारतीय परंपरेत डोहाळे जेवणाला फार महत्व आहे, त्याच सोबत अनेक वेगवेगळे कार्यक्रम देखील घेतले जातात. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे डोहाळे जेवणासाठी काही गमतीदार मराठी उखाणे ज्याने तुमच्या सोहळ्याची रंगात अधिकच वाढेल.

डोहाळे जेवणासाठी सोपे आणि मजेशीर उखाणे

  • सासुबाई आहेत प्रेमळ, वन्सबाई आहेत हौशी, …. रावांचे नाव घेते डोहाळ जेवणाच्या दिवशी.
  • मावळला सूर्य, उगवला शशी, …. रावांचे नाव घेते डोहाळ जेवणाच्या दिवशी.
  • चांदीच्या वाटीत रुपये ठेवले साठ, …रावांचे नाव घेते केला डोहाळे जेवणाचा थाट.
  • दशरथ राजा ने केला होता पुत्रासाठी नवस, … रावचे नाव घेते आज आहे डोहाळे जेवणाचा दिवस.
  • आई – बाबा, सासू – सासरे, नणंद – दीर सर्वजण करत आहे इतकं कौतुक, आनंद वाटतो हे सर्व पाहून, … रावांच्या सहवासात हळूहळू लागते आहे नाजूक पावलांची चाहूल.

सातव्या महिन्यातील ओटी भरण्यासाठी मराठी उखाणे

  • पैठणीच्या साडीला जर तारी काठ, …. रावांचे नाव घेते बघून डोहाळे जेवणाचा थाट.
  • शृंगार केला सारा, छान सुंदर नटली, … रावांनी आणलेली भरजरी पैठणी आज डोहाळे जेवणाच्या दिवशी घातली.
  • हिरवी साडी, हिरव्या बांगड्या, गजरा लावला केसभर … राव डोहाळे जेवणाची तयारी आहे अतिशय सुंदर.
  • आकाशात उगवणाऱ्या चंद्राला म्हणतात शशी, …. रावांचे नाव घेते डोहाळे जेवणाच्या दिवशी.
  • गुलाबी रंग, निळा रंग, कुठलाही रंग असू दे, परंतु देवा माझ्या बाळाचे आयुष्य उदंड असूदे.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

gauri ganpati ukhane
मराठी उखाणे

महिलांना गौराई साठी सुंदर मराठी उखाणे

गणपतीमध्ये महिलांना घेण्यासाठी उखाणे हे सुद्धा वाचा :-

Funny Ukhane in Marathi for Male
मराठी उखाणे

Funny Ukhane in Marathi for Males | पुरुषांसाठी आणि नवरदेवासाठी कॉमेडी मराठी उखाणे

हे मजेदार Comedy आणि Funny उखाणे कोणत्याही प्रकारच्या समारंभामध्ये बायकोसाठी, मित्रांसाठी आणि...

romantic ukhane
मराठी उखाणे

रोमँटिक मराठी उखाणे | Romantic ukhane in marathi

स्त्री आणि पुरुषांसाठी रोमँटिक मराठी उखाणे जे तुम्ही कुठल्याही लग्नामध्ये किंवा कार्यक्रमामध्ये...