मराठी उखाणे

महिलांना गौराई साठी सुंदर मराठी उखाणे

gauri ganpati ukhane
  • गौराई पुढे लावली समईची जोडी, … च्या नावाची मला आहे गोडी.
  • गौरीपुढे वाजते सनई, … चे नाव घ्यायला मला वाटते नवलाई
  • गौरीपुढे केशर – अत्तराचे सडे, .. चे नाव घ्यायला मी नेहमीच पुढे.
  • गौरी पुढे ठेवल्या फुलांच्या राशी, .. चे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी.
  • गौवरीच्या डोलाऱ्याला सोन्याचा कळस,… नाव घ्यायला मला नाही आळस.
  • गौवरीच्या पुढे मांडले फराळाचे ताट,… राव बघतात माझी वाट.

गणपतीमध्ये महिलांना घेण्यासाठी उखाणे

  • टिळकांच्या प्रेरणेने सुरु झाले सार्वजनिक गणपती,… चे नाव घेते, करूया गणेशाची आरती.
  • गणेशाकरिता करते दुर्वांचे आसन,… रावांचे नाव घेते, गणपती बाप्पा राहो सदा प्रसन्न.
  • गणेश चतुर्थीला गणपती बाप्पाला वाहतात तुळस,.. रावांचे नाव घेते माल कामाचा नाही आळस.
  • गणपतीला वाहतात शमीचे पान… रावांचे नाव घेते येवो सर्वाना विवेकाचे भान.
  • गणेशाची पूजा करावी ठेऊन मनोभाव,.. चे नाव घेते, वाढो सर्वांच्यात प्रेमभाव.
  • गजाननाच्या मखराला फुलांचे तोरण,… चे नाव घेते, आणि गणेशाला विनंती करते होवो दुष्ट प्रवृत्तीचे हरण.
  • गणराया करतो संकटाचे निवारण,.. चे नाव घेते, केले नैवेद्याला मोदकाचे सारण.

हे सुद्धा वाचा :-

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

डोहाळे जेवणासाठी मराठी उखाणे
मराठी उखाणे

डोहाळे जेवणासाठी मराठी उखाणे

भारतीय परंपरेत डोहाळे जेवणाला फार महत्व आहे, त्याच सोबत अनेक वेगवेगळे कार्यक्रम...

Funny Ukhane in Marathi for Male
मराठी उखाणे

Funny Ukhane in Marathi for Males | पुरुषांसाठी आणि नवरदेवासाठी कॉमेडी मराठी उखाणे

हे मजेदार Comedy आणि Funny उखाणे कोणत्याही प्रकारच्या समारंभामध्ये बायकोसाठी, मित्रांसाठी आणि...

romantic ukhane
मराठी उखाणे

रोमँटिक मराठी उखाणे | Romantic ukhane in marathi

स्त्री आणि पुरुषांसाठी रोमँटिक मराठी उखाणे जे तुम्ही कुठल्याही लग्नामध्ये किंवा कार्यक्रमामध्ये...