मराठी उखाणे

उत्तम मराठी उखाणे

  1. स्वप्नात पाहिलेले घर आज सत्यात आले,…. समवेत सौख्याचे क्षण लाभले.
  2. पानात वेलची, ताटात तूप, … राव आहेत माझे भाग्यवंत रूप.
  3. चंद्र-सूर्याच्या साक्षीने घेतो ….चे नाव, आयुष्यभर साथ देईन हाच आहे ठराव.
  4. सोन्याच्या ताटात दिला नैवेद्य खास,… माझे, सुखी जीवनाचा प्रकाश.
  5. गणपती बाप्पा झाले घरात विराजमान, …. राव माझे आनंदाचा दागिना महान.
  6. सोन्याच्या ताटात वाढला गोड गोड शिरा, …. रावांमुळे वाढला माझा तोरा.
  7. चंदनाचा सुवास, मोगऱ्याचा गंध, … रावांसोबत आता घेईन संसाराचा आनंद.
  8. स्वप्नात पाहिलेले घर आज सत्यात आले, … रावांसोबत सौख्याचे क्षण लाभले.
  9. साखर टाकली चहात, झाला गोड गुळगुळीत, … ला पाहून माझं मनच झालं डळमळीत.
  10. दुपारी वाढते ऊन, रात्री सुटतो वारा गार, … राव दिसतात अगदी सुपर स्टार.
  11. गावभर फिरतात सायकल वर, हातात नेहमी मोबाईल, … सोबत माझं जगणं, जणू राईड ऑन रोयल इनफिल्ड स्टाईल.
  12. चहा पिताना साखर जरा जास्तच पडली, … ला पाहून माझी धडधड जरा जास्तच वाढली.
  13. पोहे खाताना बटर टाकलं जास्त, … राव माझे दिसतात अगदीच क्युट आणि मस्त.
  14. दुधात साखर टाकून केली लस्सी भारी, … रावांची भलतीच खुश दिसते स्वारी.
  15. भाजीवाल्या काकूंनी केली घासाघीस भारी, … राव माझे बाजारात झाले फेमस, म्हणूनच लोक म्हणतात, “हेच का तुमचे कारभारी ?”
  16. पावसाळ्यात खायची गरम गरम भजी,… रावांनी आणली भाजी अगदी ताजी ताजी.
  17. महादेवाच्या पिंडीवर संत्र्याची फोड, … रावांचे बोलणे त्याहून गोड.
  18. सोन्यात सोने बावन कशी … माझी दुसरी मस्तानीच जशी.
  19. पुनवेच्या चंद्राच्या शोभल्या सोळा कला … ने माझ्या आवडीची नेसली पैठणी चंद्रकला.
  20. मळ्यामधे आहे माझ्या सोनचाफा, माझी …. जणू आहे हळदीचा गाभा.
  21. राधिकेला कृष्ण म्हणे हास राधे हास, मी देतो …ला लाडवाचा घास.
  22. श्रावण महिन्यात दिसते इंद्रधनुची रंगत न्यारी, …. साठी केली लग्नाची तयारी.
  23. मुखी असावे प्रेम मनामध्ये दया, …. सोबत जडली माझी माया.
  24. वाटीत वाटी सोन्याची, …. माझ्या प्रीतीची.
  25. कश्मीरच्या नंदनवनात फुलतो निशिगंध, …. सोबत जीवनात मला आहे आनंद.
  26. नवग्रह मंडळात क्षणीच आहे वर्चस्व, … आहे माझे सर्वस्व.
  27. आई-बाबा सासू-सासरे मीलाप झाला दोन कुटुंबांचा, …. आणि आज पासून भार घेतला संसाराचा.
  28. आई-बाबांच्या शिरावर सेवेचं तोरण बांधील, …. बरोबर सुखाने मी संसार करीन.
  29. खडीसाखरेचा खडा खावा तेवढा गोड, … च्या रूपात नाही कुठेच खोड.
  30. कळी हसेल, फुल उमलेल, माहेरून येईल सुगंध,…. च्या सोबतीत गवसेल जीवनाचा आनंद.
  31. निसर्गाला नाही आदी नाही अंत, … आहे माझी मनपसंत.
  32. चौकोनी आरशाला वाटोळी फ्रेम, … आहे माझे खरे प्रेम.
  33. चंद्र आहे चांदण्याच्या संगती, … आहे माझे जीवन साथी.
  34. ताऱ्यांचं लुकलुकुन चंद्राला आवडलं, … ला जीवनसाथी म्हणून निवडलं.
  35. हिऱ्याचा कंठा, मोत्याचा घाट,… च्या हौशीसाठी केला सगळा थाट.
  36. गुलाबाचे फुल गणपतीला वाहिले, …. रावांसाठी … गाव पाहिले.
  37. गंगेची वाळू चाळणीने चाळू, चल चल …. आपण सारी पाठ खेळू.
  38. नभंगणी दिसे शरदाचे चांदणे,… चे रूप आहे अत्यंत देखणे.
  39. सर्व ऋतूंमध्ये ऋतू आहे वसंत, … केली मी पत्नी म्हणून पसंत.
  40. इंद्राची इंद्राणी, दुष्यंत ची शकुंतला, …. नाव ठेवले माझ्या प्रिय पत्नीला.
  41. लाखात दिसते देखनी चेहरा सदा हसरा, … च्या रूपा पुढे अप्सरेचा काय तोरा.
  42. आंबे वनात कोकिळा जाते गोड, …. आहे माझ्या तळ हाताचा फोड.
  43. आधी झालं सूनमुख, मग निघाली वरात … ला घेऊन आलो सासरच्या मंदिरात.
  44. जोडीने नमस्कार करतो वाकून, … चे नाव घेतो सर्वांचा मान राखून.
  45. हत्तीच्या अंबारीला मखमली झूल माझी … इतकी नाजूक जशी गुलाबाचे फुल

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

romantic ukhane
मराठी उखाणे

रोमँटिक मराठी उखाणे | Romantic ukhane in marathi

स्त्री आणि पुरुषांसाठी रोमँटिक मराठी उखाणे जे तुम्ही कुठल्याही लग्नामध्ये किंवा कार्यक्रमामध्ये...

शेतकरी उखाणे
मराठी उखाणे

शेतकरी नवरदेवासाठी कॉमेडी उखाणे | comedy ukhane for farmers

शेतकऱ्यांसाठी लग्नातील फनी उखाणे शेतकरी महिलांसाठी सुंदर उखाणे हे देखील वाचा –