सरकारी योजना

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना संपूर्ण माहिती

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना ही महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली एक महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेचा उद्देश ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना वीजेवरील अवलंबन कमी करून, स्वच्छ व अक्षय ऊर्जा स्रोताद्वारे सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे. सध्याच्या वाढत्या विजेच्या समस्यांवरती सरकारने अतिशय उत्तम उपाय योजना केलेली आहे. तसेच शेतकऱ्याला विजेअभावी होणारे पीकनुकसान टाळण्यासाठी “मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना” ही शेतकऱ्याला एक वरदानच ठरते आहे.

योजनेचे मुख्य वैशिष्ट्ये-

1. सौर कृषी पंपांचे मोफत/सब्सिडीवर वितरण

  • 3 HP आणि 5 HP क्षमतेचे सोलर पंप.
  • 95% पर्यंत अनुदान.

2. 24 तास सिंचनाची सुविधा

  • सौरऊर्जेवर चालणारे असल्याने विजेवर अवलंबन नाही.
  • दिवसाही सिंचन शक्य.

3. पर्यावरणपूरक व खर्च वाचवणारी प्रणाली

  • विजेचे बील नाही, जनरेटर लागत नाही.
  • दीर्घकाळ टिकणारा पर्याय.

योजनेची पात्रता-

  • अर्जदार हा शेतकरी असावा.
  • त्याच्या नावावर जमिनीचा सातबारा असावा.
  • त्याच्या शेतात वीज कनेक्शन उपलब्ध नसावे किंवा अस्थिर असावे.
  • शेतजमीन ही सिंचन योग्य असावी.

आवश्यक कागदपत्रे-

  • आधार कार्ड
  • 7/12 उतारा
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • जातीचा दाखला (जर लागला तर)
  • बँक पासबुक

योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया-

  1. https://www.mahadiscom.in/solar/index.html या अधिकृत वेबसाइटवर जा.
  2. ऑनलाइन फॉर्म भरा.
  3. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  4. अर्जाची स्थिती वेळोवेळी तपासा.
  5. अर्ज मंजूर झाल्यानंतर सोलर पंपची बसवणी केली जाते.

योजनेचे फायदे-

  • दिवसा शेतीपंप चालवण्यासाठी वीज उपलब्ध होते, ज्यामुळे शतकऱ्याचा रात्रीच्या वेळी पाणीभरण्याचा त्रास वाचतो.
  • कुठल्याही प्रकारचे वीजबिल भरावे लागत नाही, ज्यामुळे शेतकऱ्याचा शेतीचा खर्च देखील कमी होतो.
  • डिझेल पंपाच्या तुलनेत शून्य खर्च.
  • सिंचनात सातत्य आणि नियमितता, योग्य वेळेत पिकाला पाणीपुरवठा होतो.
  • वेळेत पिकाला पाणी भेटल्यामुळे उत्पादनात उत्तम वाढ देखील होते.
  • ही योजना पर्यावरण पूरक असल्यामुळे पर्यावरणाचे कुठल्याही प्रकारचे नुकसान होत नाही.

योजनेच्या अटी-

  • यापूर्वी शासनाच्या कुठल्याही कृषिपंप योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
  • अतिदुर्गम भागातील शेतकर्यां अधिक प्राधान्य.
  • शेतकरीकडे जलस्रोत असलेली जमीन असणे आवश्यक.
  • महावितरणकडे पैसे भरून देखील प्रलंबित असलेले शेतकरी.
  • ५ एकर पर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यास ३ hp, सौर कृषिपंप, व ५ एकर पेक्षा जास्त शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यास ५ hp व ७.५ hp सौर कृषिपंप देय असेल.
  • पारंपरिक पद्धतीने कुठल्याही कृषिपंप करीता विद्यत जोडणी न झालेले शेतकरी.
  • धडक सिंचन योजने अंतर्गत लाभ घेतलेले शेतकरी.

हे सुद्धा वाचा-

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

प्रधानमंत्री पीक विमा योजना
सरकारी योजना

प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY) संपूर्ण माहिती – 2025 | pradhan mantri pik vima yojana | Fasal Bima Yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY) ही भारत सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली एक...

Sukanya Samriddhi Yojana
सरकारी योजना

सुकन्या समृद्धी योजना ( SSY योजना )– मुलींच्या भविष्याची सुरक्षित शिदोरी

भारत सरकारकडून सुरू करण्यात आलेली सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana) ही...

Ladki bahin yojana band honar ka
सरकारी योजना

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: “लाडकी बहीण योजना बंद होऊ शकते का?”

महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत....