स्त्रियांनी जर एखाद्या लग्न समारंभामध्ये पैठणी नेसली असेल आणि त्यांना उखाणे घेण्याचा आग्रह झाला तर आम्ही त्यांच्यासाठी घेऊन आलो आहेत पैठणीचे उखाणे यातील तुमच्या आवडीचे उखाणे लक्षात नक्की ठेवा.
ओल्या चिंब केसांना
टॉवेल घ्या पुसायला
— चे नाव घेते
पैठणी घ्या नेसायला—
पैठणीवर शोभून दिसतेय
कोल्हापूर साजाचं डोरलं
— चे नाव
माझ्या हृदयावर कोरल
पैठणीच्या साडीवर
पाच जोडी मोरांची
— चे नाव घेतेय
मी सून थोरांची —
पैठणी परिधान करताच
मी दिसतेय जशी लावण्यावती
— हे माझे पती
मी त्यांची सौभाग्यवती…
Paithani Quotes in Marathi
भरजरी पैठणी वर
शोभून दिसते या मोराची जोडी
— च्या मुळे आयुष्याला आली
साखरेची गोडी —
पैठणी खेळाचा
दाही दिशा झाला गजर
— चे नाव घ्यायला
मी नेहमीच असते हजर —
हिरव्यागार पैठणीवर
लाल लाल रंगाचं खण
— नी आणि मी साजरा केला
दीपावलीचा सण —
पैठणची पैठणी,
कोल्हापूरची कोल्हापुरी
— चे नाव घेता
धडधड होते उरी .
भारतीय परंपरेला
पैठणीची आहे सुंदर जोड,
— च्या सहवासाने
संसार झाला गोड.
जरतारी पैठणीवर
शोभे कोल्हापुरी साज
— च नाव घेऊन
गृह प्रवेश करते आज
लाल साडीची लाली
गालावर चढली
— नाव घेऊन
मी पैठणी नेसली
सत्यनारायणाच्या पुजेला
बसले बाई नटून
— रावांचे नाव घेते
पैठणी नेसुन
पाऊस आला पडून गेला,
चिखल झाला दाटणीचा,
…. राव म्हणाले
अगं पदर आवर पैठणीचा.
पैठणीचा पदर रेशमी गोंड्याचा आणि मोरांचा,
…… रावांचे नाव घेऊन आशीर्वाद घेते थोरांचा
घातले मंगळसूत्र,
लावले कुंकू आणि
नेसली पैठणी साडी,
लोक म्हणतात शोभून दिसते,
माझी नि — रावांची जोडी.
पैठणीच्या साडीवरती
शोभून दिसतो मोर,
… राव आहेत
माझ्या हृदयाचे चोर.
लाल लाल पैठणीवरती
शोभतो हिरवा खन,
…. रावांनी
हळूच चोरले माझे मन.
श्रावणामध्ये पडतात
सुंदर श्रावण सर,
… रावांनी आणली पैठणी
तिच्यावरती सुंदर नाचणारे मोर.
पैठणी घातल्यावर दिसते
मराठमोळी नारी,
…रावांपेक्षा
आज मीच दिसतेय भारी.
पैठणी खेळाचा
दाही दिशा झाला आहे गजर,
… चे नाव घ्यायला
मी नेहमीच असते हजर.
पैठणी साडी वरती
शोभून दिसतात सोन्याचे दागिने,
… राव आहेत फार मिश्किल
असे बरे नव्हे वागणे.
पेशवाई पैठणी आहे
मऊ – मऊ आणि छान,
… रावांची मी आहे
फार मोठी फॅन.
पैठणीवर असतात
सगळीकडे मोर,
… रावांचे आणि माझे
भाग्य किती थोर.
पैठणी साडीवर असतात
प्राणी आणि पक्षी,
…रावांचे नाव घेते
चंद्र – सूर्य साक्षी.
ब्रोकेड पैठणीवर असते
सोन्याची आणि चांदीची जरी,
…रावांचा आणि माझा जोड
आहे सगळ्यात भारी.
सुंदर हरीण झाडाखाली
बसलेली असते पैठणी साडीवर,
मन हरवले माझे
… रावांच्या दाढीवर.
हिरवा चुडा आणि
कपाळावर सुंदर चंद्रकोर,
…. रावांनि आणली पैठणी
त्यावर आहे मस्त नाचरा मोर.
नऊवारी साडीवरती उखाणे | Nauvari Saree Vrun Ghenya Sathi traditional ukhane in marathi for female
स्त्रियांनी जर एखाद्या लग्न समारंभामध्ये नऊवारी साडी परिधान केली असेल आणि त्यांना उखाणे घेणायचा प्रसंग आला तर खालील उखाणे आम्ही घेऊन आलो आहे खास तुमच्यासाठी!
सुहासिनीला शोभून दिसते
नऊवारी आणि डोरलं
… रावांच नाव मी
माझा हृदयामध्ये कोरलं…
नऊवारीवर शोभुन दिसते
मोराची जोडी
… रावांमुळे आली
माझा आयुष्याला गोडी…
सुखात आणि दुःखात नेहेमी
… रावांना साथ देते
त्याच्यासाठी एखादा शर्ट घेताना
मलाही ४ साड्या घेते…
साडीत साडी नऊवारी साडी
… राव म्हणतात तुझ्यासाठी
बांधीन सातमजली माडी…
नऊवारी वरती शोभतो
नथ आणि गजरा
… रावांसारखे मिळाले पती
त्या देवाला माझा
मानाचा मुजरा…
Quotes on Nauvari in Marathi
नऊवारी साडी आहे
महाराष्ट्राची शान
… राव आहे माझे
जीव की प्राण…
नऊवारीवर लावली
टिकली चंद्रकोर
… रावांसारखे मिळाले पती
नशीब माझे थोर…
नऊवारी साडीवर
शोभुन दिसते ठुशी
… रावांचे नाव घेते
हळदीकुंकवाच्या दिवशी…
सत्यनारायणाच्या पुजेला
बसले बाई नटून
— रावांचे नाव घेते
नऊवारी नेसुन…
नऊवारी घातल्यावर
दिसते मराठमोळी नार,
आणि चक्क … रावांनी कमेंट केली
सुंदर दिसतेस फार.
सण आहे मराठी माणसाचा
म्हणून घालून आले
मराठी पद्धतीने सुंदर नऊवारी साडी,
आणि सर्व म्हणाले
… रावांची आणि माझी शोभून दिसतेय जोडी.
नऊवारी साडीवरती घातले
जोडवे आणि मंगळसूत्र,
आणि लग्नानंतर
…रावांच्या हाती आहे
जीवनाचे सूत्र.
परंपरा म्हंटलं तर महाराष्ट्रात येते
पहिली नऊवारी साडी,
… रावांची आणि माझी
शोभून दिसतेय जोडी.
नऊवारी साडीच्या पदरावरती
आहे नाचरा मोर,
… रावांशी लग्न झाले
माझे भाग्य किती थोर
साडी घातली नऊवारी
पदर होता छान,
… रावांच्या संसारात
विसरून गेले देह भान.
नऊवारी चा पदर
हवेत होता उडत,
… रावांचा स्वभाव आहे
अगदी बेधडक.
नऊवारी साडी वरती
माळली शेवंतीची वेणी,
… रावांचा स्वभाव
फारच आहे फनी.
हे सुद्धा वाचा :-
Leave a comment