नवरात्री, भारतातील सर्वात आनंदी सणांपैकी एक आहे. वाईटावर चांगल्याच्या विजयाचा उत्सव आहे आणि तो मनोभावे भक्ती, नृत्य आणि प्रार्थनेने नऊ दिवस साजरा करतात. या नवरात्री दरम्यान अनेक परंपरांपैकी, रंगीबेरंगी आणि सुंदर डिझाइन केलेले पोशाख परिधान करणे, विशेषत: महिलांसाठी अतिशय शुभ मानले जाते. लेहेंगा चोली ज्याला घागरा चोली असे देखील म्हणतात. हा पारंपारिक भारतीय पोशाख नवरात्रीच्या काळात सर्वात लोकप्रिय पर्याय आहे. परंतु नवरात्रीला हा लेहेंगा चोली का परिधान करतात आणि त्याचे महत्त्व काय आहे हे आज आपण जाणून घेऊया.
नवरात्रीला लेहेंगा चोली का परिधान करतात?
नवरात्रीच्या काळात लेहेंगा चोली ही केवळ फॅशन नसून त्याचे एक खोल सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व देखील आहे. भारतीय महिला सणाच्या वेळी हा पोशाख घालण्यास विशेष प्राधान्य का देतात याची काही महत्वाची कारणे देखील आहेत ते आपण बघूया.
नवरात्रीमध्ये परिधान करण्याच्या पोशाखाला काय म्हणतात?
भारतातील महिला नवरात्रीमध्ये जो पोशाख परिधान करतात त्या पोशाखाला “घागरा चोली” असे म्हणतात. घागरा म्हणजे लांब स्कर्ट आणि चोली म्हणजे ब्लाउज. यावरती सुंदर लांब ओढणी परिधान केली जाते. यावरती सुंदर भरतकाम केलेले असते. हा पोशाख गरबा आणि दांडिया खेळण्यासाठी पारंपरिक पोशाख आहे.
1. भारतीय परंपरेचे प्रतीक
नवरात्री हा देवी दुर्गा आणि तिच्या नऊ अवतारांचा आनंदाचा उत्सव आहे, देवीची प्रत्येक शक्ती, संरक्षण आणि वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे. लेहेंगा चोलीसारखे पारंपारिक कपडे घालणे हा प्राचीन रीतिरिवाजांशी जोडण्याचा, आपली भारतीय संस्कृती जपण्याचा आणि देवीला वंदन करण्याचा एक मार्ग आहे.
2. नारीशक्तीचे प्रतिनिधित्व
लेहंगा चोली चे सुंदर आणि उठावदार रंग स्त्रीत्व आणि तिची शक्ती दर्शवते, अगदी नवरात्रीच्या वेळी पूजल्या जाणाऱ्या देवीप्रमाणे. महिलांना या सणासाठी सुंदर वेषभूषा करणे त्यांच्या आंतरिक शक्तीची जाणीव करून देते. हा देवीचा उस्तव आणि नृत्य साजरे करताना महिलांचा आत्मविश्वास आणि आंतरिक शक्ती प्रबळ होते. स्कर्टचा गोलाकार प्रवाह देखील जीवनाच्या अंतहीन चक्राचे प्रतिनिधित्व करणारा, पूर्णता आणि संपूर्णतेचे प्रतीक म्हणून पाहिले जाते.
3. कला आणि कारागिरीचे प्रदर्शन
नवरात्रीच्या निमित्ताने भारतीय कलाकुसर देखील नवीन पिढीला समजते व जगासमोर मांडता येते. लेहेंगा चोली वरती बऱ्याचदा आरशाचे काम, भरतकाम, सिक्विन आणि मणी वर्क यांनी सुशोभित केलेली असते, हे सर्व काम स्थानिक कारागीर हाताने तयार करतात.
3. नवरात्रीच्या रंगांचे महत्व
नवरात्रीच्या नऊ दिवसांपैकी प्रत्येक दिवस एका विशिष्ट रंगाशी निगडित असतो, जो देवीच्या विविध पैलूंचे प्रतिनिधित्व करतो. नवरात्रीच्या रंगांचे महत्व आपण जाणून घेऊया.
1- सफेद रंग – सफेद रंग हा शुद्धतेचे प्रतीक म्हणून ओळखला जातो.
2- निळा – निळा हा रंग शांततेसाठी ओळखला जातो.
3- पिवळा – पिवळा रंग आनंदाचे प्रतीक म्हणून ओळखला जातो.
4- हिरवा – हिरवा रंग हा भरभराटीचे प्रतीक मानले जाते.
5- राखाडी – राखाडी हा रंग संतुलित विचारांचे प्रतीक मानले जाते.
6- लाल – लाल रंग शक्तीचे प्रतीक आहे.
7- केशरी – केशरी रंग उत्साह दर्शवते.
8- गुलाबी – गुलाबी रंग प्रेम आणि करुणा दर्शवतो.
9- जांभळा – जांभळा रंग अध्यात्म आणि भक्ती दर्शवतो.
नवरात्रीमध्ये गरबा आणि दांडिया का खेळाला जातो?
गरबा आणि दांडिया रास हे नवरात्रीमध्ये सादर करणारे नृत्यप्रकार एक पवित्र कला आहे. ही कला केवळ मनोरंजनाचा भाग नसून त्यामागे धार्मिक महत्व देखील आहे. गरबा जीवनाच्या चक्राचे प्रतिनिधित्व करतो ज्यामध्ये नृत्य करणारा एका मातीच्या दिव्याभोवती गोलाकार फिरतो. देवीच्या ऊर्जेचे प्रतिनिधित्व करतात. दांडिया हा काठीने खेळाला जातो. ज्याप्रमाणे देवी आणि राक्षस यांच्यामध्ये युद्ध झाले त्याचे रूप दर्शवते.
गरबा आणि दांडियाच्या रात्री महिला कोणत्या प्रकारचे कपडे घालू शकतात?
गरबा हा पारंपरिक नृत्य प्रकार आहे, गुजरात राज्यामध्ये या नृत्यप्रकाराचा उगम झालेले आहे. गुजरातमध्ये धार्मिक कार्यक्रमांमध्ये हा नृत्य प्रकार साजरा केला जातो. गरबा हा हाताने खेळला जातो. तसेच दांडिया हा टिपऱ्यांनी (दांडिया स्टिक्स) खेळाला जातो. नवरात्रीतील दांडिया आणि गरबा खेळण्यासाठी मुलींसाठी टॉप 6 कपड्यांचे प्रकार आहेत. जे तुम्ही नौरात्रीमध्ये प्रत्येक दिवशी परिधान करू शकता.
1) लेहेंगा चोली
2) धोती पँट
3) साडी
4) लेहंगा पद्धतीची साडी
5) कुडता पायजमा
6) इंडो वेस्टर्न फ्यूजन
नवरात्रीमध्ये लेहेंगा सोडून दुसरा कुठला पोशाख घालू शकतो?
धोती पँट, सुंदर डिझायनर गुजराती साडी स्टाइल करू शकता. किंवा तुमच्या पसंतीनुसार फ्यूजन इंडो वेस्टर्न वेअर घालू शकता. काहीजण आधुनिक पण सांस्कृतिक शैलीसाठी अनारकली सूट किंवा स्कर्टसह कुर्ती देखील निवडतात.
Leave a comment