2023 मध्ये नीता अंबानी यांचे कल्चर क्लब चे स्वप्न पूर्ण, आता भारतातील कला क्षेत्रातील लोक दाखवू शकतात आपल्या जुन्या पारंपारिक कला.
NMACC- नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर हे देशाची आर्थिक राजधानी मुंबई येथे वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स मधील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये स्थापन करण्यात आले आहे. 30 मार्च रामनवमीच्या दिवशी अंबानी कुटुंबीयांनी NMACC च्या उद्घाटनासाठी पूजा आयोजित केली होती.
या पूजेमध्ये घरातील सर्व उपस्थित होते. 31 मार्च 2023 शुक्रवारी या सेंटरचे उद्घाटन करण्यात आले आहे. या उद्घाटनाचा भव्य दिव्य कार्यक्रम हा तीन दिवस चालू होता. या उद्घाटन सोहळ्यामध्ये अनेक दिग्गज मंडळी, कलाकार, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती आणि धर्मगुरू उपस्थित होते.
नीता मुकेश अंबानी कल्चर सेंटरमध्ये 4 मजल्याचा भव्य प्रदर्शन हॉल आहे. आणि तीन थिएटर आहेत. हे सर्व अत्याधुनिक पद्धती मध्ये तयार केलेले आहे.
नीता मुकेश अंबानी या एक बिजनेस वुमन, स्पोर्ट लीडर, रिलायन्स फाउंडेशन च्या चेअर पर्सन आहेत, तसेच लहान मुलांसाठी एक कमिटेड टीचर देखील आहेत.
NMACC चे उद्दिष्ट | Objective of NMACC
नीता अंबानी यांना भारतीय कला क्षेत्रातील व्यक्तींसाठी एक प्लॅटफॉर्म तयार करायचे होते. असे प्लॅटफॉर्म जिथे भारतामधील जुन्या पारंपारिक कला लोकांपुढे मांडता येतील. यामध्ये शास्त्रीय संगीत, नृत्य, विणकाम, भारतीय साड्यांचे विणकाम, भारतातील मूर्तिकला, नाटक, चित्रकारी हे सर्व आणि अजूनही बरेच काही प्रकार यात समाविष्ट आहेत.
नीता अंबानी यांच्या मते हे एक असे केंद्र बनवायचे आहे की तिथे कला, संस्कृती आणि ज्ञान या त्रिवेणीचा संगम एकाच ठिकाणी होईल. आपल्या भारतातील अभूतपूर्व परंपरेचा ठेवा जपण्यासाठी भारतातील या पारंपारिक कला संपूर्ण जगासमोर आणण्यासाठी नीता अंबानी यांनी हे सेंटर निर्माण केले आहे. भारतीय कलांचे जतन आणि त्यांचे संवर्धन करणे हे या सेंटरचे मुख्य उदिष्ट आहे.
तसेच जगभरातील लोकांना या सेंटरमध्ये आकर्षित करून भारतीय कलांचे जगभरातील लोकांपर्यंत महत्त्व पोहोचवण्यासाठी या सेंटरची निर्मिती करण्यात आली आहे.
NMACC हे नीता मुकेश अंबानी यांचे एक स्वप्न होते, जे नीता अंबानी आणि त्यांची मुलगी इशा यांनी सत्त्यात उतरवले आहे. नीता अंबानी यांना लहानपणापासूनच कलेची फार आवड होती. नीता अंबानी एक प्रशिक्षित क्लासिकल डान्सर आहेत. सहा वर्षाच्या असतानाच त्यांनी कल्चरल डान्स मध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. त्यांची ती आवड त्यांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनत गेला आणि त्यांना त्याबद्दल अधिक आवड निर्माण होत गेली.
त्यानंतर त्यांनी या कलेला प्रोत्साहन देणे आणि संरक्षित करण्यासाठी स्वतःला समर्पित केले, तसेच भारतातील कला आणि शिल्प पुनर्जीवीत करणे यासाठीही त्यांचे मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत.
NMACC मधील सुविधा | Facilities at NMACC
नीता मुकेश अंबानी कल्चर सेंटरमध्ये 3 हायटेक स्टुडिओ अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेले आहेत. द ग्रँड थिएटर, द स्टुडिओ थिएटर आणि द क्यूब हे सर्व खाजगी स्क्रीनिंग आणि उत्तेजक संभाषणांपासून ते बहुभाषिक प्रोग्रामिंग आणि आंतरराष्ट्रीय निर्मितीपर्यंत विविध प्रकारचे अनुभव सामावून घेण्यासाठी बांधले गेले. NMACC च्या आत तीन थिएटर आणि 16000 चौरस फूट प्रदर्शनाची जागा उपलब्ध आहे.
द ग्रँड थिएटर | The Grand Theatre
स्टुडिओ थिएटर | Studio Theatre
आर्ट हाऊस | Art House
द क्यूब | The Cube
धीरूभाई अंबानी स्क्वेअर | Dhirubhai Ambani Square
कार्यक्रमासाठी उपस्थित भारतीय व जगभरातील पाहुणे | the guest
नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमात देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध व्यक्तींचा समावेश होता. त्यामध्ये सलमान खान, सोनम कपूर, अनुपम खेर, जावेद अख्तर, शबाना आझमी, सुनील शेट्टी, शाहिद कपूर, विद्या बालन, सुपरस्टार रजनीकांत, आमिर खान, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, प्रियांका चोप्रा, वरुण धवन, भारत्नरत सचिन तेंडुलकर, सानिया मिर्झा, राजू हिरानी, तुषार कपूर, दिया मिर्झा, श्रद्धा कपूर आणि श्रेया घोषाल यांसारख्या दिग्गज बॉलीवूड सेलिब्रिटींनी देखील हजेरी लावली.
हॉलीवुड सुपरस्टार टॉम हॉलंड (Spider-Man), गिगी हदीद आणि एम्मा चेंबरलेन यांसारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या मॉडेल्सही उपस्थित होत्या. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि स्मृती इराणी हे राजकारणी देखील सहभागी झाले होते. सद्गुरु जग्गी वासुदेव, स्वामी नारायण आदेशाचे राधानाथ स्वामी, रमेश भाई ओझा आणि स्वामी गौर गोपाल दास यांसारखे आध्यात्मिक अधिकारी देखील कार्यक्रमाला उपस्थित होते.
देशातील प्रत्येकाला निमंत्रण देण्यात आले होते. येथे भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची झलक पाहण्यासाठी दर्शक nmacc.com किंवा BookMyShow वर तिकीट आरक्षित करू शकतात. खास वैशिष्ट्य म्हणजे नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये मुले, विद्यार्थी, ज्येष्ठ आणि दिव्यांगांसाठी प्रवेश विनामूल्य आहे.
” नीता अंबानी यांनी NMACC संदर्भात सांगितले, ज्याचे वर्णन त्यांनी “भारतीय कलांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी आमची वचनबद्धता” असे केले. मला आशा आहे की आमच्या जागृत प्रतिभेची जोपासना केली जाईल आणि भारत आणि जगभरातील लोकांना प्रेरणा मिळेल.”
नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचा पत्ता | Address of Nita Mukesh Ambani Cultural Centre
Jio World Centre, G Block, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai, Maharashtra 400098
हे सुद्धा वाचा :-
Leave a comment