पैठणी साडी (Paithani saree) पासून आपण अनेक प्रकारच्या वस्तू (accessories) तयार करू शकतो ज्या आपल्याला बऱ्याच ठिकाणी अतिशय उपयोगात देखील येतात. गृह सजावटीसाठी (home decoration) तसेच आपल्या सौंदर्या ला जोड देण्यासाठी या वस्तूचा मोठया प्रमाणात उपयोग होतो. चला तर बघूया खालील काही महत्वपूर्ण टिप्स (idea).
पैठणी साडी वन पीस | Paithani saree one piece
पैठणी साड्यांपासून महिलांसाठी किंवा मुलींसाठी अतिशय सुंदर आणि आपल्याला हवा तास डिझायनर वन पीस ड्रेस बनवता येऊ शकतो. आणि हा ड्रेस कुठल्याही महत्त्वपूर्ण कार्यक्रमांमध्ये घालण्यास अतिशय योग्य पर्याय आहे. हा ड्रेस पारंपरिक पैठणीपासून तयार केलेला असल्यामुळे आपल्याला आधुनिकतेबरोबरच पारंपरिक लुक देखील मिळतो.
पैठणी ड्रेस | Paithani dress
पैठणी साडी पासून वेगवेगळे ड्रेस देखील तयार केले जाऊ शकतात, जे आपल्या परंपरेबरोबर च आधुनिकतेची जोड देतात व सौंदर्यामध्ये भर पाडू शकतात. पैठणी साडीपासून तयार केलेला घागरा ओढणी ड्रेस. हा ड्रेस कुठल्याही कार्यक्रमासाठी अतिशय उत्तम आहे. छोट्या मुलींबरोबरच मोठ्या महिला देखील पैठणी घागरा ओढणी ड्रेस मध्ये अगदी सुंदर दिसतात.
शेला | Shela
पैठणी शेला हा एक पैठणी साडीचाच भाग आहे आणि हाच महत्त्वपूर्ण भाग पैठणी साडीचे आकर्षण वाढवतो. पैठणी साड्यांचं प्रमोशन करण्यामध्ये हा शेला महत्वाची भूमिका बजावतो. लग्नामध्ये नऊवारी साडीवरती शेला किंवा पैठणी साडीवरती शेला घेतल्यास अतिशय सुंदर लुक येते. लग्नामध्ये हा शेला नावारीबरोबरच नवरदेव देखील परिधान करू शकतो.
सोहळे | Sohale
लग्न समारंभामध्ये, संगीत सोहळ्यात, नृत्य, पुजा आणि आपल्या पैठणी साड्यांचं मॉडेलिंग किंवा फैशन शो मध्ये हे सोहळे परिधान केले जातात. सोहळ्याशिवाय कुठलीही भारतीय पूजा – विधी अपूर्णच आहे. काही ठिकाणी लग्नामधील पूजेसाठी नवरदेवाला सोहळे आणि शेला हे तर प्रमुख वस्त्र आहे. तसेच आपली घरातील नित्य पूजा देखील पुरुषांनी सोहळे नेसूनच करावी असे म्हणतात.
मास्क | Mask
कोरोना काळामध्ये मास्क वापरणे बंधनकारक होते. त्या काळात मोठ्या प्रमाणामध्ये लग्न, सनसमारंभा मध्ये तसेच शुभ कार्यामध्ये मास्क चा वापर होऊ लागला. आता नॉर्मल मास्क तर होतीच पण काही फॅशन प्रेमींनी ड्रेस वरती मॅचिंग मास्क वापरण्यास सुरुवात केली. आणि त्यातच उगम झाला पैठणी मास्क चा. पैठणी साडी, ड्रेस, वन पीस या सर्वांवरती हा मास्क सुंदर दिसायचा. आणि अजूनही बरेचशे लोक गर्दी मध्ये काळजी म्हणून मास्क वापरतातच.
पैठणी दुपट्टा (ओढणी) | Paithani dupatta
पैठणी पासून छान-छान दुपट्टे देखील तयार केले जातात. या दुपट्ट्यांना दोन्ही बाजूंना जरी वर्क किंवा रेशीमचे नक्षीकाम केले जाते. या दुपट्ट्यावरील विणकामामुळे हा दुपट्टा अतिशय सुंदर दिसतो.
पर्स | Paithani purse | Paithani handbags
प्युअर पैठणी पासून सुंदर पर्स किंवा हॅन्ड बॅग देखील बनवल्या जातात. आणि या पर्स लग्न समारंभांमध्ये वापरण्यास अतिशय छान ठरतात आणि महिलांच्या सौंदर्यात भर घालतात. या पैठणी हॅन्ड बॅग्सवरती मोर, कमळ, फुले, पक्षी, यांचे जरीमध्ये किंवा रेशीम धाग्यांमध्ये सुंदर विणकाम केलेले असते. पैठणी साडीवर या पर्स अगदी सुंदर दिसतात.
जॅकेट | Jacket
मागील काही वर्षांपासून जरी वर्क असलेल्या पैठणी पासून तयार केलेल्या जॅकेटची फॅशन फारच चर्चेमध्ये आहे. यामध्ये आपल्याला हवी तशी डिझाईन निवडून आणि योग्य कलरचा कुडता निवडून आपण समारंभामध्ये परंपरेबरोबरच आधुनिकतेची देखील छान जोड देऊ शकतो. हे पैठणी जॅकेट लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वानाच सुंदर दिसतात.
चप्पल | Sandal
आज-काल पैठणी कापडापासून बऱ्याचश्या वस्तू तयार केल्या जातात. आणि त्यातीलच एक म्हणजे पैठणी चप्पल. हे एक अतिशय सुंदर पैठणी प्रॉडक्ट आहे.
कुशन्स | Cushions
आपण घरातील उषांना ( pillow ) देखील पैठणी पासून तयार केलेल्या कुशन्स वापरू शकतो. आणि त्यामुळे घराच्या सुंदरतेमध्ये भर घालू शकतो.
शोभेच्या वस्तू | Decoration products
पैठणीच्या कापडापासून आपण गृह सजावटीसाठी शोभेच्या वस्तू देखील बनवू शकतो. यामुळे घरामध्ये सुंदर देखावा तयार होतो.
पोटली | Batwa
पैठणी साड्यांपासून पोटली देखील बनवली जाते. आणि या पोटली ( बटवा ) महिलांना कार्यक्रमांमध्ये आकर्षक दिसण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.
वॉल हैंगर | Wall hanger
घरातील भिंतीवर पैठणीच्या कापडापासून बनवलेले सुंदर वॉल हँगर देखील आपण लावू शकतो. त्यामुळे घर प्रसन्न आणि सुसज्ज वाटेल.
फोटो | Photo
पैठणी पासून सुंदर फोटो फ्रेम देखील बनवल्या जाऊ शकतात. या फ्रेम अतिशय मनमोहक आणि आकर्षक बनतात. अश्या अनोख्या वस्तूंपासून आपल्या घरातील हॉल ची किंवा बेडरूम ची सुंदरता वाढवू शकतो.
उपरणे | Uparne
पैठणी उपरणे हे मार्केटमध्ये जास्त प्रमाणात उपलब्ध नाहीत पण आपण ते कारागिरांना ऑर्डर देऊन तयार करून घेऊ शकतो याचा वापर लग्न समारंभामध्ये भेटवस्तू देण्यासाठी होतो.
Leave a comment