महाराष्ट्राचे सौंदर्य वाढवणारी येवला पैठणी साडी चे प्रकार, कलर आणि इतिहासाबद्दल महिलांना संपूर्ण माहित असणे खूप महत्वाचे आहे. साडी खरेदी करण्यापूर्वी महिलांना नक्कीच फायदा होईल. या लेखामध्ये तुम्हाला पैठणी बद्दल आजपर्यंत जे माहित नसलेल्या गोष्टी, त्या सर्व तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करत आहोत.
येवला पैठणी सिल्क साडी ही विविध रंगाची आणि विविध कलाकृती पासून हातमागावर बनवलेली भरजरी साडी आहे. हातमागावरती बनवलेल्या या साडी वरती कारागीर आपल्या हाताने एक-एक धागा विनवून सुंदर असे नक्षीकाम तयार करतात, म्हणूनच तर ही साडी इतकी सुंदर तयार होते की प्रत्येक महिलेच्या मनाला ती भुरळ घालते आणि हवी हवीशी वाटते.
महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी सण, समारंभ, लग्नसोहळा पैठणी साडी शिवाय अपूर्ण आहे, म्हणूनच तर पैठणीला महाराष्ट्राचे महावस्त्र असे म्हटले जाते. पैठणीवरील कारागिरीमुळे व सुंदर अशा रेशीम, सोनेरी आणि चंदेरी जरी मुळे पैठणी हे महावस्त्र अगदी रुबाबदार दिसते. या महावस्त्रला येवला पैठणी साडी असेही म्हणतात. ही साडी इतकी महाग आहे की 2000 वर्षांपूर्वी ही साडी चलन म्हणून वापरली जात होती. चला तर मग आपण या ठिकाणी जाणून घेऊया पैठणीबद्दल मराठी मध्ये थोडीशी माहिती.
पैठणी साडीचा इतिहास | History of Paithani Saree
पैठणी सिल्क साडी ही महाराष्ट्र राज्यातील संभाजीनगर ( पूर्वीचे औरंगाबाद ) जिल्ह्यातील पैठण या गावांमध्ये बनवली जाते. पैठणी चा उगम पैठण येथे झालेला आहे, पैठण हे गोदावरी नदीच्या काठी वसलेले छोटेसे गाव आहे आणि पैठणी हे नाव पैठण या नावावरूनच दिलेले आहे.
2000 वर्षांपासून चालत आलेल्या प्रथेसाठी पैठणी प्रसिद्ध आहे. सातवाहन राजाच्या काळात पैठणीच्या निर्मितीला सुरुवात झाली. पैठणी म्हणजेच विविध रंगांच्या रेशीम सोनेरी आणि चंदेरी धागे विनवून सुंदर अशी साडी तयार केली जाते.
पैठणी मध्ये पुरातन कलाकृती टेपेस्ट्री ( tapestry ) चा वापर केला आहे. तसेच फुले, मोर आणि विशेष म्हणजे कमळाच्या फुलांनी विणलेल्या पैठणीचा पदर विशेष आकर्षणाचा भाग ठरतो. पैठणी साडी वरती गाणे देखील तयार केले गेले. “पदरावरती जर-तारीचा मोर नाचरा हवा“.. हे गाणे पैठणीच्या सुंदरतेची ओळख करून देते.
पैठणीची निर्यात ही रोमन साम्राज्यात ही केली जात असे. सातवाहन राजाच्या काळामध्ये रोमन लोकांसोबत कॉटन आणि सिल्कचा व्यापार केला जात असे आणि त्या मोबदल्यात सोन्या-चांदीचा व्यापार करत असे. पैठणीची मागणी एवढी होती की रोमन लोक पैठणी चे विणकाम पूर्ण होईपर्यंत सातवाहन राजाच्या कल्याण येथील राजवाडा मध्ये थांबत असे. यावरून पैठणी हे किती मौल्यवान वस्त्र आहे हे लक्षात येते.
रोमन व्यक्तींसोबतच महाराष्ट्रातील महिला देखील पैठणी बनण्याची वाट बघत असे. वेगवेगळ्या राजांच्या कारकीर्दीत पैठणीने आपले अस्तित्व टिकवून ठेवले.
मोगल काळात औरंगजेबाने या वस्त्रोद्योगाला राजाश्रय दिला, सुप्रसिद्ध पुष्प आणि अमरवेल हि मोगल काळातील देणगी आहे, अजिंठा लेणी मधील चित्रकला देखील पैठणी मध्ये वापरलेली आहे.
नंतर पेशव्यांनी या वस्त्र उद्योगाला प्रोत्साहन दिले आणि पैठणी कारागिरांना नाशिक जिल्ह्यातील येवला या ठिकाणी स्थानिक होण्यासाठी जागा दिली. पेशव्यांच्या काळामध्ये पदर सोने आणि तांबे एकत्र करून बनविला जाऊ लागला.
पैठणी ही लग्न समारंभामध्ये नववधूसाठी साडी ( Wedding Saree ) म्हणून भारतातच नव्हे तर रोमन साम्राज्यात देखील प्रसिद्ध झाली. पैठणीच्या कमी बाजार भावामुळे आणि विक्रीमुळे सन 1970 साली 4-5 हातमागंच पैठणमध्ये उरले होते. म्हणून महाराष्ट्र राज्य सरकारने 1978 मध्ये पैठण येथे पैठणीचे प्रशिक्षण केंद्र सुरू केले ( महाराष्ट्र लघुउद्योग विकास मंडळ ).
या केंद्रामध्ये पैठणीचा वर्षानुवर्षे चालत आलेला ठेवा जपलेला आहे, आत्तापर्यंत 2000 व्यक्तींनी या केंद्रामध्ये प्रशिक्षण घेतले आहे, आणि स्वतःचा पैठणीचा वस्त्र उद्योग सुरू केला आहे.
अस्सल पैठणी साडीची किंमत किती असते ?
- अस्सल पैठणी तयार करण्यासाठी उत्कृष्ट प्रतीची सोन्याची किंवा चांदीची जर वापरली जाते आणि उच्च प्रतीचे रेशीम वापरले जाते, त्यामुळे या साडीची किंमत देखील तितकी च जास्त असते.
- तसेच साडी वरील नक्षीकाम किती कमी किंवा जास्त आहे. त्यावरून देखील साडी ची किंमत ठरते.
- खऱ्या पैठणीची किंमत ही 7 हजारापासून सुरू होते तर ती 6 लाख किंवा त्यापेक्षाही जास्त किमती ची असू शकते.
- 11lakh Paithani : होम मिनिस्टर या मराठी कार्यक्रमासाठी ११ लाखाची पैठणी बनून घेतली गेली आणि महा विजेतीला ती देण्यात आली.
पैठणी मधील प्रसिद्ध कलर किती आहेत ?
पैठणी साडी चे कलर हे दोन श्रेणीमध्ये मध्ये मोडतात, त्यामध्ये पहिला “पारंपारीक कलर” आणि दुसऱ्यामध्ये “इतर कलर” आहेत. त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
1. पैठणी चे पारंपारीक कलर | Paithani che colors
आज काल पैठणी मध्ये भरपूर कलर्स बघायला मिळतात, परंतु परंपरेनुसार पैठणी मध्ये फक्त तीन रंगांची नोंद आहे. त्या तीन रंगांना पारंपारीक कलर असे म्हणतात. दुसऱ्या श्रेणीमध्ये इतर कलर आहेत. त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
- काळीचंद्रकला | Black paithani saree – ही साडी संपूर्ण काळया रंगांमध्ये असते आणि तिचे काठ हे लाल रंगाचे असतात.
- राघू पैठणी | Green paithani saree – ही संपूर्ण साडी पोपटी हिरव्या रंगां मध्ये बनवली जाते, म्हणून ह्या साडीला राघू असेही म्हणतात.
- शिरोडक | white paithani saree – या साडीचा रंग हा संपूर्ण पांढराशुभ्र असतो. संपूर्ण साडी ही पांढऱ्या रंगां मध्ये तयार केली जाते.पांढऱ्या रंगाला शिरोडक असेही म्हणतात.
2. पैठणी मधील इतर कलर
- पिवळा कलर पैठणी साडी | Yellow color paithani saree
- जांभळा कलर पैठणी साडी | Purple color paithani saree
- शेवाळी कलर पैठणी साडी | Bottle color green paithani saree
- वाइन कलर पैठणी साडी | Wine color paithani saree
- चिंतामणी कलर पैठणी साडी | Chintamani color paithani saree
- वांगी कलर पैठणी साडी | Brinjal colour paithani saree
- नारंगी कलर पैठणी साडी | Orange colour paithani saree
पैठणी चे प्रकार किती आहे ? | What are the types of Paithani?
बांगडी-मोर पैठणी | Bangadi-Mor Paithani
भारतामध्ये बांगडी ला फार महत्व आहे. बांगड्यां ना सौभाग्याचा अलंकारही म्हणतात. आणि मोर सुंदरते चे, श्रीमंती चे प्रतिक आहे आणि प्रेम दर्शवतो. या साडी च्या प्रकारामध्ये बांगडी मध्ये मोरा चे नक्षीकाम केले आहे. म्हणून साडी च्या या प्रकाराला बांगडी-मोर पैठणी असे म्हणतात.
ब्रॉकेड पैठणी | Brocade Paithani Saree
या पूर्ण साडीवरती फुले, वेली, मोर, पोपट अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कलाकृतींनी भरलेले नक्षीकाम केले जाते. त्यामुळे या साडीला ब्रोकेड पैठणी असे म्हणतात Read More
मुनिया ब्रॉकेड पैठणी | Munia Brocade Paithani
मुनिया म्हणजे पोपट या साडीमध्ये काठांवरती आणि पदरावरती पोपटाचे नक्षीकाम केले जाते, याचा कलर पोपटी असतो. या साडीला तोता-मैना साडी असेही म्हणतात.
काळी चंद्रकला | Kali Chandrakala
काळी चंद्रकला ही साडी संपूर्ण काळया रंगांमध्ये विणलेली असते आणि तिचे काठ लाल रंगांमध्ये विणलेले असतात. म्हणून या साडीला काळी चंद्रकला साडी असे म्हणतात.
संगीत पैठणी | Sangeet Paithani
या साडी चे वैशिष्ट्य म्हणजे तिच्या पदरावरती विविध प्रकारच्या वाद्यां चे नक्षीकाम केलेले असते. उदा. सनई, तबला, तंबोरा, पिपाणी, ढुमके इत्यादी.. म्हणून या साडी ला संगीत पैठणी असे म्हणतात.
एक धोती पैठणी | Ek Dhoti Paithani
ही साडी बनवण्यासाठी सिंगल शटल लावले जाते. या साडीला नारळी बॉर्डर असते आणि नाण्यासारखी साधी बुट्टी असते.
पेशवाई पैठणी | Peshwai Paithani
पेशवाई पैठणी (Peshwai paithani) ही ब्राम्हण पेशव्यांच्या राजवटीत उदयास आली होती. पेशव्यांनी जुन्या ज्या काही रूढी, परंपरा, वस्त्र उद्योग आणि जे काही पारंपारिक व्यावसाय होते, त्यांना चालना दिली आणि त्यांचे पालन पोषण केले. पेशवाई पैठणी ही पेशवे कालीन देणगी आहे.
पैठणीच्या पल्लू चे प्रकार | Types of Paithani Pallu
पैठणी च्या कुंडा वरतून पल्लू ठरवला जातो की पैठणी सिंगल पल्लू आहे कि डबल पल्लू, महत्वाचे हे की दोन मोरांपासून एक कुंडा तयार केला जातो.
- सिंगल पल्लू | Single Pallu – या मध्ये पदरा वरती 6 मोर असतात.
- डबल पल्लू | Double Pallu – या मध्ये पदरावरती 14 मोर असतात.
पैठणी च्या काठाचे प्रकार किती आहे ? | Types of Paithani Border
- नारळी बॉर्डर पैठणी : ही बॉर्डर पारंपरिक चटईसारखी दिसणारी आहे, त्यामुळे तिला नारळी बॉर्डर पैठणी असे म्हणतात.
- साखळी : या प्रकारामध्ये पोपट आणि मोराचे विणकाम साखळी मध्ये केलेले असते. त्यामुळे याला साखळी बॉर्डर असे म्हणतात.
- मुनीया बॉर्डर : मुनिया म्हणजे पोपट आणि यामध्ये पोपटाचे विणकाम बॉर्डर वरती केले जाते. पोपटी कलर मध्ये काठा वरती पोपट विणतात.
- अस्वली : मदिरा आणि फुल असलेल्या नक्षीकामाला अस्वली म्हणतात.
- कुयरी : याला आंब्यासारखा आकार असतो. आंब्याच्या आकाराची बुट्टी साडीवरती विणली जाते त्याला कुयरी असे म्हणतात.
- परिंदा : या प्रकारामध्ये साडीच्या काठा वरती परिंदाचे नक्षीकाम केले जाते.
- मोर : या प्रकारच्या विणकामांमध्ये साडीच्या संपूर्ण काठांवरती मोराचे विणकाम केले जाते.
- कमळ : कमळ हे अजिंठा लेण्यांवर केलेले कोरीव काम आहे. अजिंठा लेण्यांवरील कमळाचे नक्षीकाम हे या पैठणीमध्ये वापरलेले आहे.
पैठणीची काळजी कशी घ्यायची? | How to Take Care of Paithani?
- पैठणी ही मलमलच्या कपड्यामध्ये घडी करून ठेवावी. प्लास्टिक किंवा तशीच कपाटांमध्ये ठेवायची नाही.
- पैठणी वरती डायरेक्ट परफ्यूम चा वापर करायचा नाही.
- पैठणी ला पॉलिश करावे लागत नाही.
- पैठणी नेहमी ड्रायक्लीनचं करायची असते.
- मिथेनॉल च्या गोळ्या पैठणी जवळ ठेवायच्या नाही.
- पैठणी ची जर व्यवस्थित काळजी घेतली तर ती वर्षानुवर्ष टिकते आणि ती खराब होत नाही.
पैठणी लुक | Paithani look
पैठणी साडी ही कुठल्याही पद्धतीने घातली तरी ती अतिशय सुंदरच दिसते, मग ती साडी नेसण्याची पारंपारिक पद्धत असो किंवा नवीन फॅन्सी पद्धत. तुमची साडी जर अधिक हेवी असेल तर ब्लाउज साधा निवडा आणि जर तुमची साडी अगदी साधी असेल, तर त्यावर मात्र तुम्ही हेवी ब्लाउज परिधान करावे. आपल्या आवडीनुसार लांब बाह्यांचे किंवा छोट्या बाह्यांचे ब्लाऊज निवडावे.
तसेच साडी वरती सुंदरशी हेअर स्टाईल करून गजरा देखील माळू शकतो तर या साडीवरील लुक अतिशय सुंदर दिसेल. आवडत असल्यास सुंदरशी छान टिकली लावावी. त्याचबरोबर या साडी वरती योग्य अशी सुंदर पर्स निवडा किंवा काही ठराविक पैठणीच्या ॲक्सेसरीजचा देखील वापर करू शकता.
पैठणी वरती कोणते दागिने घालावे ? | Which Jewellery is best for Paithani?
पैठणी साडीवरती योग्य प्रकारचे दागिने जर परिधान केले तर पैठणी साडी मधील लुक हा खूपच सुंदर दिसतो आणि अगदी उठवदार दिसतो. साडी वरती दागिने निवडताना साडीच्या काठांच्या रंगासारखे दागिने घालावेत.
साडीच्या बॉडीचा जो कलर आहे अगदी त्याच कलर चे दागिने घालने शक्यतो टाळावे. साडीचे काठ जर गोल्डन असतील तर गोल्ड चे दागिने त्यावर ती अगदी सुंदर दिसतील, तसेच साडीचे काठ हे सिल्वर कलर मध्ये असतील तर त्या सारखेच त्या रंगाचे दागिने परिधान करावेत. कंबर पट्टा, छल्ला देखील आपण साडी वरती वापरू शकतो.
अगदी पारंपारिक पद्धतीने मेकअप करायचा असेल तर शक्यतो मोत्याच्या दागिन्यांचा वापर करावा नथ, चिंचपेटी, बांगड्या, तन्मणी, कानातले इत्यादी…
पैठणीची खासियत काय आहे? | What is the Speciality of Paithani?
पैठणी ही अस्सल रेशमा पासून हातमागावरती बनवली जाते. तसेच या साडी मध्ये पक्षी, फुले, वेली, मंदिरांवरील नक्षीकाम देखील हाताने विणले जाते. अत्यंत बारीक तुतीच्या रेश्मापासून बनवलेली ही साडी भारतातील सर्वात श्रीमंत साड्यांपैकी एक साडी आहे.
पैठणी साड्या महाग का असतात? | Why are Paithani costly?
ही साडी शुद्ध चांदीच्या व सोन्याच्या जरी मध्ये विणली जाते, तसेच अस्सल रेशमाचा वापर ही साडी तयार करण्यासाठी केला जातो. एकेकाळी रोमन साम्राज्यामध्ये चलन म्हणून वापरली जात होती. या साडीचे विणकाम पर्शियन गालिचा यासारख्या तंत्रज्ञानाने केली जाते. ही एक वंश परंपरागत साडी आहे.
येवला पैठणी ऑनलाइन खरेदी करता येईल का? | Can you buy yeola paithani online?
होय, तुम्ही येवला पैठणी साड्या ऑनलाइन खरेदी करू शकता. येवला नावाचे महाराष्ट्रातील एक छोटेसे गाव हाताने विणलेल्या पैठणी साड्यांसाठी प्रसिद्ध आहे. येवला पैठणी साड्या अनेक इंटरनेट शॉप्समध्ये विकल्या जातात आणि तुम्ही त्या जगाच्या कानाकोपऱ्यातून खरेदी करू शकता.
येवला पैठणी साड्या विकणाऱ्या ऑनलाइन किरकोळ विक्रेत्यांसाठी तुम्ही पटकन इंटरनेटवर शोधू शकता. तसेच, तुम्ही Flipkart, Amazon आणि Myntra सारख्या सुप्रसिद्ध भारतीय ई-कॉमर्स साइट्स पहाव्यात, ज्यात येवला पैठणी सारख्या पारंपारिक भारतीय साड्यांची प्रचंड प्रकार आहे. याव्यतिरिक्त, जर तुम्ही येवला पैठणी साड्यांची अधिक विस्तृत निवड शोधत असाल, तर तुम्ही हातमागाच्या साड्या विकण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या अनेक वेबसाइट्सपैकी एकाला भेट देऊ शकता.
हे सुद्धा वाचा :-
- राम नवमी कधी आहे आणि या राम नवमी ला जाणून घेऊया का प्रभू श्री रामांना मर्यादापुरुषोत्तम असे म्हणतात?
- श्रीकृष्णजन्माष्टमीची कथा, माहिती, इतिहास
- श्री हनुमान जयंती / अंजनेय यांच्याबद्दल संपूर्ण माहिती
- गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमेबद्दल संपूर्ण माहिती व कथा
- पैठणी आणि नऊवारी साडीवरील उखाणे
- 22 सर्वोत्कृष्ट भारतीय सिल्क साड्यांबद्दल संपूर्ण माहिती आणि त्यांचे प्रकार नक्की वाचा
- परंपरेचा ठेवा नऊवारी साडीचे प्रकार, इतिहास आणि संपूर्ण माहिती नक्की वाचा
- ब्रोकेड पैठणी बद्दल पूर्ण माहिती
- पैठणी साडी कशी तयार केली जाते? त्याबद्दल संपूर्ण माहिती
- पुरुषांसाठी आणि नवरदेवासाठी कॉमेडी मराठी उखाणे
- हरतालिका तीज का साजरी करतात? कथा, महत्व आणि संपूर्ण माहिती
Leave a comment