लाइफस्टाइलफॅशन

अप्रतीम पोचमपल्ली साडी चा परिचय | Introducing the stunning Pochampally saree

पोचमपल्ली साडी
green and white pochampalli saree

Pochampally saree ही भारतामधील तेलंगणा राज्यातील नलगोंडा जिल्ह्यातील भूदान येथील पोचमपल्ली गावामध्ये तयार केली जाते. म्हणून या साडीला पोचमपल्ली साडी असे म्हणतात. या साडीला पोचमपल्ली इकत देखील म्हणतात. ही साडी हातमागावर ( handloom ) तयार केली जाते. या साडीला युनेस्को विश्व धरोहर यादीमध्ये भारताची प्रतिष्ठीत साडी विणकाम म्हणून जागा भेटलेली आहे. 2005 मध्ये या साडीला GI टॅग म्हणजेच भौगोलिक संकेत देखील मिळालेले आहे. या साड्यांवरती मोठ्या प्रमाणात भौमितिक डिझाईन तयार केलेले असतात. दक्षिण भारतामध्ये ही साडी मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे. पोचमपल्ली साडी ही सर्वात जुन्या रंगीत प्रिंटिंग पद्धतीने तयार केली जाते.

एअर इंडिया ही भारत सरकारची अधिकृत विमान कंपनी आहे. या कंपनीने विशेष डिझाईन केलेल्या पोचमपल्ली सिल्क साड्या तिच्या केबिन क्रूमध्ये समाविष्ट केल्या आहेत.

black pochampalli saree
काळी पोचमपल्ली साडी

पोचमपल्ली साडी चा इतिहास | History of Pochampally saree

1970 पासून या साडीच्या निर्मिती चा इतिहास सापडतो. पोचमपल्ली या ठिकाणी राहणारे विनकर या कलेची निर्मिती करतात, पोचमपल्ली या गावातील लोकांनी त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी पारंपारिक कापूस विणकामात रेशीम विणकाम समवेश करण्याचा निर्णय घेतला. हे विणकाम अधिक सुधारित आणि योग्य होण्यासाठी या लोकांनी काही माणसे बंगलोर या ठिकाणी रेशीम विणकाम शिकण्यासाठी पाठवले. आणि यानंतर साडीच्या विणकामाला एक वेगळीच गती प्राप्त झाली. पूर्वी बर्मा, मध्य पूर्व आणि पूर्व आफ्रिकेत मोठ्या प्रमाणावर हे कापड विकले गेले, तेव्हा ते आशिया रुमाल म्हणून ओळखले जात होते. परंतु बदलत्या फॅशन मुळे या साड्यांची मागणी कमी होऊ लागली आणि या व्यवसायावर मंदीचे संकट आले. साडी तयार करण्यासाठी लागणारी मेहनत आणि खर्च या तुलनेत मिळणारा पैसा हा कमी होता. त्यामुळे बऱ्याचशा विनकरांनी हा व्यवसाय बंद केला आहे.

blue and green pochampalli saree
निळी आणि हिरवी पोचमपल्ली

साडी विणकामाची पद्धत | Method of Saree Weaving

  • पोचमपल्ली इकत जगभरात दुहेरी इकत कापड म्हणून प्रसिद्ध आहे. साडी विणण्याआधी धागे बांधले जातात आणि त्यानंतर रंगवले जातात. अशा पद्धतीने साडीवर नक्षीकाम तयार केले जाते. या पद्धतीला इकत असे म्हणतात.
  • साडीवर नक्षीकाम तयार करण्यासाठी धागे समान लांबवर एकसारखे बांधले जातात, त्यानंतर त्यावरती आपल्याला ज्याप्रमाणे नक्षीकाम हवे असते त्याप्रमाणे ठिकठिकाणी धागे ( सायकलच्या आतील नळ्यांच्या रबर पट्ट्या ) बांधले जातात.
  • त्यानंतर हे सर्व बांधलेले धागे डाई बाथमध्ये बुडवले जातात. आणि ज्या भागामध्ये धागे घट्ट बांधलेले असतात त्या जागी रंग शोषला जात नाही. त्यामुळे एक अतिशय सुंदर डिझाईन आपल्याला तयार होऊन भेटते. त्यानंतर हे तयार झालेले धागे हातमागावरती सेट केले जातात आणि सुंदर असे नक्षीकाम तयार होते.
  • सुरुवातीला या साड्या लाल, कळ्या आणि पांढऱ्या रंगांनमध्येच तयार केल्या जात असे. परंतु कालांतराने नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वेगवेगळ्या रंगांमध्ये देखील या साड्या तयार केल्या जाऊ लागल्या. 
  • पारंपारिक साड्यांच्या विणकामांमध्ये भौमितिक आकार, फुलांचे नक्षीकाम आणि उत्कृष्ट डिझाईन्सचा समावेश असतो. परंतु कालांतराने वाढत्या मागणीमुळे अनेक प्रकारच्या डिझाईन्स तयार होऊ लागल्या.
black and red pochampalli saree
काळी आणि लाल पोचमपल्ली

पोचमपल्ली साडीचे प्रकार | Types of Pochampally Sarees

  • इकत पट्टू साडी
  • पोचमपल्ली इकत साडी
  • पोचमपल्ली सिल्क साडी
  • इकत कांची साडी
  • इकत कॉटन साडी

पोचमपल्ली कशी ओळखावी? | How to identify Pochampally

“पागडू बंधू” (इकत) रंगाच्या शैलीमध्ये या साड्या तयार केल्या जातात. या साड्यांमध्ये पारंपारिक भूमितीय नमुने आहेत. त्यामध्ये फुले, भौमितिक नक्षीकाम, पक्षी इत्यादीचा समावेश आहे. आणि या साड्या तयार करण्याची विशिष्ट पद्धतच या साड्यांची खरी ओळख आहे.

पोचमपल्ली इकत
पोचमपल्ली इकत

साडीची काळजी कशी घ्यावी | How to take care of saree

  • या साड्या शक्यतो कोरड्या जागी ज्या ठिकाणी ऊन जाणार नाही अशा ठिकाणी सुती कापडामध्ये गुंडाळून ठेवाव्यात. 
  • अधून मधून या साड्यांना थोडा वेळ हवेत ठेवावे. 
  • या साड्या थेट सूर्यप्रकाशात ठेवू नये.
  • साड्यांना केमिकल किंवा पाण्याचा ओलावा लागणार नाही याची काळजी घ्यावी.
  • या साड्यांवरती परफ्यूमचा वापर शक्यतो टाळावा. 
  • साड्या परिधान केल्यानंतर शक्यतो अति टोकदार दागिन्यांचा वापर करू नये, ज्यामुळे साड्यांमधील धागे ओढले जाणार नाही.

अशा सोप्या पद्धतीने आपण पोचमपल्ली साड्यांची काळजी घेऊ शकतो.

साडी कशी स्वच्छ करावी | How to clean a saree

  • शक्यतो पहिल्यांदा या साडीला ड्राय क्लीनच करावे, त्यानंतर आपल्याला जर नेहमीच ड्राय क्लीनिंग शक्य नसेल, तर आपण घरी देखील या साडीला धुऊ शकतो.
  • त्यासाठी आपण हलक्या डिटर्जंटचा वापर करू शकतो. किंवा शाम्पू मध्ये देखील हळुवारपणे ही साडी धुवू शकतो.
  • या साडीला गोळा करू नये किंवा पिळू नये.
  • वॉशिंग मशीन मध्ये धुवू नये.
  • साडी सुकवण्यासाठी ड्रायरचा वापर करू नये.
  • धुऊन झाल्यानंतर ही साडी नेहमी सावलीमध्ये हवेतच सुकवावी.
black and white pochampalli saree
काळी आणि पांढरी पोचमपल्ली

पोचमपल्ली ची किंमत | Price of Pochampally

  • वेगवेगळे रंग, पारंपारिक हातमागाचा वापर करून साडी बनवणे, डिझाईन तयार करणे, त्याचबरोबर लागणारे मनुष्यबळ आणि कठीण परिश्रम, वाढत्या रेशमाच्या किंमती या सर्व कारणांमुळे या साड्या महाग असतात.
  • हात मागावर बनवलेल्या पारंपारिक पोचमपल्ली साडीची किंमत ही 5000 पासून सुरू होते.
  • साडी वरील डिझाईन आणि साडी वरील केलेले कठीण परिश्रम यानुसार साडीची किंमत अधिक वाढू शकते.

लग्नासाठी पोचमपल्ली | Pochampally Saree for Wedding

pochampalli saree for wedding
लग्नासाठी पोचमपल्ली
  • पोचमपल्ली ही लग्नासाठी एक योग्य पर्याय आहे.
  • विवाह सोहळ्यासाठी  पोचमपल्ली आजकाल सर्वांच्याच मनाला भुरळ घालत आहे.
  • नववधू या साडीला लग्नातील विविध कार्यक्रमांमध्ये परिधान करतात.

पोचमपल्ली साडी आणि पटोला साडी सेम आहे का ? | Is pochampally saree and patola saree same ?

पोचमपल्ली साडी ही तेलंगणा राज्यातील पोचमपल्ली येथे तयार केली जाते, तर पाटण पटोला ही साडी गुजरात मधील पाटण या ठिकाणी तयार केली जाते. तसेच दोन्ही साड्यांचे नक्षीकाम देखील वेगवेगळे आहे.

पोचमपल्ली आणि इकत म्हणजे काय ? | What is Pochampalli and Ikat?

पोचमपल्ली हे एका गावाचे नाव आहे जे तेलंगणा राज्यामध्ये आहे, तसेच या ठिकाणी ज्या साड्या बनवल्या जातात त्या इकत या पद्धतीने बनवल्या जातात. परंतु या साड्यांना त्या गावाच्या नावावरून ओळखले जाते म्हणून या साड्यांना पोचमपल्ली इकत साडी असे म्हणतात.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

silk Fabric
लाइफस्टाइलफॅशन

सिल्क ( रेशीम )आणि सिल्क साड्यांबद्दल माहिती

आपण सर्व भारतीय महिला विशेष प्रसंगी सिल्कच्या साड्या परिधान करतो, परंतु या...

pure handmade kashmiri silk saree
लाइफस्टाइलफॅशन

काश्मिरी सिल्क साडी

काश्मिरी सिल्क साडी त्यांच्या सुंदर आणि आलिशान रेशीमच्या गुणवत्तेसाठी खास ओळखल्या जातात....

wedding outfit ideas for womens
फॅशनलाइफस्टाइल

लग्नामध्ये कुठला पोशाख घालावा याचा विचार करताय का? इथे आहेत महिलांसाठी काही भन्नाट कल्पना

लग्नामध्ये कुठला पोशाख घालावा? हा प्रश्न तर सर्वांनाच पडलेला असतो. आपल्या भारतीय...

konrad silk saree
लाइफस्टाइलफॅशन

दक्षिण भारतातील टेम्पल साडी – कोनराड सिल्क साडी | Konrad Silk Saree

कोनराड सिल्क साडी, ही साडी भारतातील सर्वात सुंदर साड्यांपैकी एक साडी आहे....