लाइफस्टाइलफॅशन

आसाम सिल्क साडी किंवा मुगा सिल्क साडीचे प्रकार, इतिहास आणि वैशिष्ट्ये

Pure assam silk saree
Pure assam silk saree

आसाम सिल्क साडी (Assam silk saree) ही तिच्या सुंदरतेमुळे भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात अतिशय लोकप्रिय आहे. आसाम राज्य हे उच्च दर्जाच्या रेशीम उत्पादनासाठी प्राचीन काळा पासून प्रसिद्ध आहे. आसाम साडीला स्थानिक भाषेत मेखला चादर (Mekhela Chadar) असेही म्हणतात. आसाम मधील सुलकुची या  ठिकाणी आसाम सिल्क साडीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या ठिकाणचे कारागीर या विणकामांमध्ये अतिशय कुशल आहेत.

भारतातील सर्वात जास्त प्रमाणात रेशमाचे उत्पादन या भागामध्ये घेतले जाते. त्यामुळे या भागाला भारताचे रेशीम स्वर्ग असे ही म्हणतात. आसाम राज्यामध्ये तीन प्रमुख प्रकारचे जंगली रेशीम उत्पादन घेतले जाते. त्यामध्ये गोल्डन मुगा, व्हाईट पॅट आणि इरी सिल्क या तीन प्रकारांचा समावेश आहे. मुगा सिल्क आणि इरी सिल्कचे सर्वात जास्त उत्पादन या भागामध्ये घेतले जाते. हे रेशीम वाण्या सिल्क म्हणूनही लोकप्रिय आहे. आसाम राज्याला 2007 मध्ये मुगा सिल्क उत्पादनासाठी भौगोलिक संकेत (GI) टॅग मिळालेला आहे.

Assam Silk Saree: Intricate Weaving and Cultural Splendor
Assam Silk Saree: Intricate Weaving and Cultural Splendor

आसाम सिल्क साडी चा इतिहास | History of Assam Silk Sarees

सुलकुची हे शहर ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावरती वसलेले आहे. हे शहर गुवाहाटी पासून पश्चिमेला ३० किलोमीटर अंतरावर ती आहे. या गावातील लोकांचा प्रमुख व्यवसाय हा विणकाम आहे. म्हणूनच येथे प्रत्येकाच्या घरामध्ये हातमाग आहे. आसाम रेशमाचा उल्लेख पौराणिक कथांमध्ये देखील केलेला आहे. सिल्क उत्पादन घेणे हा येथील लोकांचा ग्रामीण व्यवसाय आहे.

Assam silk saree
Assam silk saree

बाणभट्ट यांच्या ऐतिहासिक नोंदीनुसार रेशीम मार्गाचे वर्णन हे चीन, तिबेट आणि ब्रह्मदेशातून आसाममध्ये पोहोचते. रेशीम शेतीचे ज्ञान हे चीनमधून आसाममध्ये पोहोचले आहे. वेगवेगळ्या राजांच्या कारकिर्दीमध्ये रेशीम उद्योगाला राजाश्रय मिळालेला आहे.

सम्राट चंद्रगुप्त मौर्यांच्या काळात कौटिल्याने लिहीलेल्या अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये आसाम सिल्कचा उल्लेख केलेला आहे. त्यामध्ये असे नमूद केलेले आहे की “लोण्यासारखा रंग”, “सूर्यासारखा लाल” आणि “सर्वोच्च दर्जाचा”, असे आसाम सिल्क बद्दल लिहिलेले आहे.

आसामच्या अहोम राजवटीत (1228-1826) मुगा सिल्क उत्पादनाला मोठा राजाश्रय मिळाला. पूर्वी राजांच्या शासन काळामध्ये विणकामात सोन्याच्या जरीचा वापर केला जात असे. त्यानंतर विणकामांमध्ये व्यावसायिकरण होऊ लागले आणि रेशमामध्ये सुती धाग्यांचा वापर होऊ लागला.

आसाम सिल्क साडी
आसाम सिल्क साडी

आसाम सिल्क साडी चे वैशिष्ट्ये | Characteristics of Assam Silk Sarees

आसाम सिल्क साडी ही हातमागावर विणली जाते. कारागीर स्वतःच्या हाताने या साडी वरती नक्षीकाम आणि नमुने तयार करतात. आसामच्या हातमागावरील साड्यांवरती अत्यंत उत्कृष्ट प्रकारचे भरतकाम केले जाते. ही साडी उच्च प्रतीच्या रेशमाच्या धाग्यांपासून तयार केली जाते. तसेच ही साडी जस-जशी जुनी होते तस-तशी तिची शाईन वाढते.

आसाम सिल्कचे वैशिष्ट्य म्हणजे जितका जुना कपडा तितकीच जास्त शाईन जसजशी आपण हा कपडा धुतो तस तशी हा कपडा अगदी टिकाऊ बनतो आणि त्याची शाईनही अजून वाढते. टसर सिल्क चे कपडे जसजसे जुने होतात तसतसे ते अधिक उबदार होतात.

मुगा याचा अर्थ स्थानिक भाषेत पिवळसर असा होतो. मुगा सिल्कला सोनेरी रेशीम म्हणूनही ओळखले जाते. असे म्हणायला हरकत नाही की मुगा रेशीम हे निसर्गाने आसाम राज्याला दिलेली एक देणगीच आहे.

आसाम मधील कुठलाही लग्न समारंभ या साडी शिवाय अपूर्णच असतो. विविध कार्यक्रमांमध्ये या साड्यांना फार महत्त्व दिले जाते. पूर्वीच्या काळी विणकामाचे कौशल्य असणे हे कुमारीका मुलींसाठी लग्नासाठी आवश्यक होते. 

आसाम मुगा सिल्क ला 2014 मध्ये ट्रेडमार्क हेतूसाठी (GI) लोगो मंजूर केला आहे. या लोगोची ASTEC (आसाम विज्ञान तंत्रज्ञान आणि पर्यावरण परिषद) यात नोंदणी करण्यात आली आहे.

Muga silk saree
Muga silk saree

आसाम सिल्कचे प्रकार | Types of Assam Silk

  • मुगा सिल्क
  • व्हाईट पॅट सिल्क
  • एरी सिल्क

आसाम सिल्क साडी चे प्रकार | Types of Assam silk Sarees

  • मेखला चादर   मेखेला चादर हा आसामी महिलांचा पारंपारिक पोशाख आहे. आसाम सिल्क साडी ला  मेखला चादर किंवा रोहा मेखला असेही म्हणतात. खालच्या भागाला मेखला म्हणतात आणि  स्कर्ट म्हणून परिधान केला जातो. आणि वरच्या पेहरावाला चादर असे म्हणतात. याच्या खालच्या भागातील लाल रंगामधील विणकाम अतिशय आकर्षक असते. मेखला च्या बॉर्डर मध्ये सुंदर नक्षीकाम केलेले असते. या साडीला मेखला हाफ साडी असेही संबोधतात.
  • पॅट सिल्क साडी – पॅट सिल्क, ज्याला आसाम सिल्क किंवा मुगा सिल्क असेही म्हणतात. हे सहसा पांढरे किंवा ऑफ व्हाईट रंगाचे रेशीम असते. या रेशमाला सावलीत सुकवले जाते. हे रेशीम बॉम्बे टेस्टर रेशीमद्वारे तयार केले जातात. हे किडे तुतीचे पाने खातात. या सिल्क पासून तयार केलेली साडी अतिशय हलकी, मऊ, उबदार आणि टिकाऊ असते.
  • मुगा सिल्क साडी – मूग सिल्क ही आसाम ला एक नैसर्गिक देणगी आहे. हे रेशीम हाताने धुतले जाऊ शकते आणि प्रत्येक धुण्यानंतर मुगा रेशमाची चमक वाढते. हे रेशीम धागे इतके टिकाऊ असतात की ते मनुष्यापेक्षा जास्त काळ टिकतात.  हे रेशीम नैसर्गिक सोनेरी रंग आणि चमक यासाठी खास ओळखले जाते. त्यामुळे मुगा  सिल्क साडीवरती नैसर्गिकच सुंदर चमक असते. म्हणूनच ही साडी अत्यंत बहुमोल आहे. 
  • एरी सिल्क साडी हे सिल्क सामिया सिंथिया रिसिनीने बनवले जाते. हे किडे एरंडेल तेलाच्या वनस्पतीची पाने खातात. याला एरंडी रेशीम असेही म्हणतात. या रेशमाला अहिंसक रेशीम देखील म्हटले जाते. मुगा सिल्क साडीच्या तुलनेत एरी सिल्क साडीला कमी चमक असते. एरी रेशीम मऊ आणि उबदार असते आणि यापासून शॉल देखील तयार केल्या जातात.
  • आसाम कॉटन साडी – आसाम सुती साड्यांसाठी देखील ओळखले जाते, रोजच्या वापरामध्ये या सुती साड्या अतिशय उत्तम असतात. आणि या साड्यांवरती अतिशय सुंदर पारंपारिक नक्षीकाम देखील तयार केलेले असते.
  • गामोसा साडी गामोसा साडी ही पारंपारिक साडी नसली तरी, गामोसा हा आसामी संस्कृतीचा एक भाग आहे. हा स्कार्फ म्हणून वापरला जातो. या वरती पारंपरिक विणकाम केलेले असते.

आसाम सिल्क साडी विणण्याची पद्धत | Assam Silk Saree Weaving Method

आसाम सिल्क साडी तयार करण्याआधी त्यावरती कुठल्या प्रकारचे नक्षीकाम तयार करायच्या आहे, ते नक्षीकाम ग्राफ पेपर वरती तयार केले जाते, त्यानंतर कार्डबोर्डला होल पाडून कार्डबोर्डवर नक्षीकाम तयार केले जाते. त्यानंतर हे कार्डबोर्ड मशीन वरती सेट केले जातात. आणि आपल्याला हवे तसे नक्षीकाम तयार करून भेटतात.

आसाम सिल्क साडी वरती अनेक प्रकारचे नक्षीकाम केले जाते . या साड्यांवरील नक्षीकाम हे शक्यतो निसर्ग प्रेरित असतात. आसाम सिल्क साडी वरती फुलांबरोबरच आपल्याला यामध्ये मोर, मासा, हरिण, गेंडा इत्यादी प्राण्यांचे नक्षीकाम देखील बघायला भेटतात. तसेच काही वेळेला धार्मिक नक्षीकाम देखील बघायला भेटतात.

शक्यतो या साड्यांमध्ये सफेद, लाल आणि काळा रंग असतो, पण कधी कधी हिरवा, निळा, नारंगी हे उठावदार कलर देखील बघायला भेटतात. 

आसाम मधील प्रत्येक घरामध्ये आपल्याला हातमाग बघायला भेटतील. येथील प्रत्येक महिला घरातील काम आवरल्यानंतर जेव्हा त्यांना वेळ भेटतो त्यावेळेस  त्या पारंपारिक कपड्यांचे विणकाम करतात.

रेशमा बरोबरच कापूस देखील या रेशीम साड्या बनवण्यासाठी वापरला जातो. आसाम मधील कारागिरांचे विणकाम अतिशय कौशल्यपूर्ण आणि अद्भुत आहे. हे विणकाम रेशीम कपड्यावर असो किंवा सुती कपड्यावर ते अतिशय सुंदर दिसते.

Assam muga silk saree
Assam muga silk saree

मुगा सिल्क साडी किंमत | Muga Silk Saree price

आसाम मुगा सिल्क (Assam muga silk) मध्ये सुरुवातीची किंमत ही 11000 पासून सुरू होते त्यानंतर या साड्यांमध्ये जसजशी विणकाम आणि नक्षीकाम वाढते तसतसे या साड्यांची किंमत कमी किंवा जास्त होते.

प्युअर आसाम सिल्क साडी कशी ओळखायची? | How to Identify pure Assam Silk Saree?

आपल्याला मार्केटमध्ये कृत्रिम म्हणजेच मशीन मेड आसाम सिल्क साडी सुद्धा बघायला भेटते, आणि त्यामुळे आपली फसवणूक होऊ शकते. म्हणूनच प्युअर आसाम साडी खरेदी करताना काही बाबी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे.

  • साडी खरेदी करण्याआधी साडीचा (GI) मार्क चेक करावा. प्युअर आसाम सिल्क साडी ओळखण्याची एकच महत्त्वाची टीप आहे आणि ती म्हणजे या साड्यांवरती गव्हर्मेंट लेबल असतो. आणि हे लेबल फक्त अस्सल आसाम सिल्क साडीलाच असते.कृत्रिम साड्यांना अशा प्रकारचे गव्हर्मेंट लेबल नसतात.
  • अस्सल असम सिल्क साडीला नेहमी लॅबोरेटरी टेस्ट रिपोर्ट जोडलेले असतात. आपली फसवणूक होऊ नये यासाठी या साड्या शक्यतो ओळखीतील कारागिरांकडेच खरेदी कराव्यात.

आसाम सिल्क साडी ची काळजी कशी घ्यायची? | How To Care For Assam Silk Saree?

  • आसाम सिल्क साड्या या नैसर्गिक रंगाने रंगवलेल्या असतात. त्यामुळे शक्यतो यांना ड्रायक्लिनच करावे.
  • वेळोवेळी या साड्यांची घडी बदलावी.
  • एरी सिल्क हे शाम्पूच्या पाण्यात हलके धुतले तरी चालते.

आसाम सिल्क साडी वरती दागिने | Jewelery on Assam silk Saree

  • आसाम सिल्क साडी वरती आपण वेगवेगळ्या प्रकारचे दागिने परिधान करू शकतो.
  • यामध्ये आपण सुंदर असे हार साडी वरती परिधान करू शकतो – सातसोरी, गोलपाता, गेजेरा, ढोल बिरी, जून बिरी, पोलमोनी, सिलिखा मोन, डूग डूगी, बिरी मोनी, मुकुटा मोनी यांचा समावेश आहे. 
  • तसेच आपण सुंदर कानातले देखील यावरती घालू शकतो त्यामध्ये- लोकापरो, केरू, सोना किंवा माकोरी, लांब केरू, थुरिया, जंगफई यांचा समावेश आहे.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

फॅशनलाइफस्टाइल

Yoga Clothes Information : महिलांना वर्क आऊट साठी योग्य कपडे का महत्त्वाचे आहेत? जाणून घ्या पूर्ण माहिती

जिम मध्ये जाणे, योगाभ्यास करणे, धावणे किंवा उच्च स्थरावरील जिम ट्रेनिंग मध्ये...

garba dress
फॅशनलाइफस्टाइल

नवरात्रीचा पोशाख : ९ रंगाचे महत्व

नवरात्री, भारतातील सर्वात आनंदी सणांपैकी एक आहे. वाईटावर चांगल्याच्या विजयाचा उत्सव आहे...

silk Fabric
लाइफस्टाइलफॅशन

सिल्क ( रेशीम )आणि सिल्क साड्यांबद्दल माहिती

आपण सर्व भारतीय महिला विशेष प्रसंगी सिल्कच्या साड्या परिधान करतो, परंतु या...

pure handmade kashmiri silk saree
लाइफस्टाइलफॅशन

काश्मिरी सिल्क साडी

काश्मिरी सिल्क साडी त्यांच्या सुंदर आणि आलिशान रेशीमच्या गुणवत्तेसाठी खास ओळखल्या जातात....