लाइफस्टाइलफॅशन

Pure Bhagalpuri Silk Saree | भागलपुरी सिल्क साडी

yellow bhagalpuri tassar silk saree with jari border
yellow bhagalpuri tassar silk saree with jari border

Bhagalpuri silk saree ही भारतामधील बिहार राज्यातील भागलपूर येथे तयार केली जाते. या साडीला तसर सिल्क साडी असेही म्हणतात. तसर सिल्क चे बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. या साड्या नाजूक पोत, टिकाऊ आणि नैसर्गिक चमकसाठी प्रसिद्ध आहेत.

भागलपुरी रेशीमला “शांतता रेशीम” असेही म्हटले जाते, जे इतर सर्व प्रकारच्या रेशीम पासून पूर्णपणे वेगळे आहे. तसर किंवा भागलपुरी रेशमाच्या निर्मितीमध्ये केवळ मर्यादित प्रमाणात worms वापरतात आणि ही प्रक्रिया पूर्णपणे पर्यावरणपूरक आहे.

भागलपुरी सिल्क साडी चा इतिहास | History of Bhagalpuri Silk Saree

भागलपुरी साड्या विणण्याची कला पिढ्यानपिढ्या चालत आली आहे, विणकर पारंपारिक तंत्रांचा वापर करून उत्कृष्ट डिझाईन्स आणि नमुने तयार करतात. या प्रक्रियेमध्ये रेशीम धागा फिरवणे, नैसर्गिक रंगात रंगवणे आणि नंतर हात मागावर विणकाम करणे यांचा समावेश होतो.

मुघल काळात या साड्यांना मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली, श्रीमंत घराण्यातील स्रिया या साडीला त्यांची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी परिधान करीत असे. साडीवरील उत्कृष्ट कलाकृतीमुळे ही साडी अतिशय मौल्यवान होती. या साडीच्या भव्यतेमुळे याची निर्यात चीन आणि पर्शियासह इतर राष्ट्रांमध्ये केली जात असे.

कालांतराने, या साडी उत्पादनामध्ये असंख्य अडचणी येऊ लागल्या, त्यामुळे भागलपुरी साडीची लोकप्रियता आणि मागणी कमी होऊ लागली. परंतु, कारागिरांची मेहनत आणि साडीच्या अजोड सुंदरतेमुळे आता या साडी निर्मितीला पुन्हा गती प्राप्त होऊ लागली आहे.

Bhagalpuri silk saree
Bhagalpuri silk saree

भारत सरकारने ही हरवलेली कला पुनर्जीवीत करण्यासाठी अनेक संस्थांमार्फत पुढाकार घेतला आहे. आज, विविध वयोगटातील लोक या साडीविणकामासाठी पुढाकार घेत आहेत.

भागलपुरी साड्या भारताच्या सांस्कृतिक वारशाचा प्रमुख भाग आहेत. आजही देशातील सर्वाधिक मागणी असलेल्या साड्यांपैकी एक आहेत. लग्न, सण -समारंभ आणि धार्मिक कार्यक्रम यासारख्या प्रमुख प्रसंगी परिधान केल्या जातात.

भागलपूर सिल्क साडीचे प्रकार | Types of Bhagalpur Silk Sarees

भागलपूर सिल्क साडीचे प्रकार हे साडीवरील नक्षीकामावरून ठरवले जाते. भागलपूर सिल्क साडीचे २ प्रकार आहेत.

  • कंठा वर्क साडी । Kantha work saree – कंठा हा भरतकामाचा एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय प्रकार आहे. भारतातील पूर्वेकडील भागामध्ये या भरतकामाचा उगम झालेला आहे. भागलपूरी साड्यांवरती हे कंठा भारतकम केल्यामुळे त्या अतिशय सुंदर दिसतात.
  • शिबोरी साडी | Shibori sarees – कापडावरती सुंदर डिझाइन तयार करण्यासाठी या शिबोरी तंत्राचा वापर केला जातो. शिबोरी हा कापडावरती रंग करण्याचा अतिशय लोकप्रिय प्रकार आहे. भागलपूरी साडीवरती या पद्धतीने रंग केल्यामुळे साडीची सुंदरता अधिकच वाढते.

हातमाग भागलपुरी सिल्क साडी | Handloom Bhagalpuri silk saree

भागलपुरी रेशमी साड्या बनवण्यासाठी वापरण्यात येणारे उच्च-गुणवत्तेचे रेशीम हे बिहारच्या जंगलात आढळणाऱ्या टसर रेशीम किड्यांपासून बनवले जाते. या साड्या काळजीपूर्वक हाताने विणल्या जातात, ज्यासाठी खूप वेळ आणि उत्कृष्ट कौशल्य लागते. भागलपुरी रेशमी साड्या तयार करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या विणकाम प्रक्रियेला “टसर कटन” म्हणतात.

gery bhagalpuri silk saree with red pallu
gery bhagalpuri silk saree with red pallu

पॉवरलूम भागलपुरी सिल्क साडी | Powerloom bhagalpuri silk saree

पॉवरलूम भागलपुरी साड्या हँडलूम भागलपुरी साड्यांपेक्षा स्वस्त असतात. आणि या साड्या मशीनमध्ये तयार केल्या जातात त्यामुळे त्याचे उत्पादन देखील मोठ्या प्रमाणात होते. पॉवरलूम वरील साड्या बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. या साड्या विविध रंग आणि डिझाइनमध्ये देखील उपलब्ध आहेत.
परंतु, पॉवरलूमवरील साड्यांचा दर्जा हातमागाच्या साड्यांसारखा नाही. कारण जी विणकामाची सुंदरता हातमागावरील साड्यांना असते ती पॉवरलूम साडीला नसते. फॅब्रिकचा पोत आणि फील देखील हातमागाच्या साड्यांपेक्षा वेगळा असतो.

भागलपुरी सिल्क साडी चे वैशिष्ट्ये | Features of Bhagalpuri Silk Saree

Bhagalpuri silk saree with gold jari
Bhagalpuri silk saree with gold jari
  • भागलपुरी सिल्क साड्या तसर सिल्कपासून बनवल्या जातात, हे सिल्क उत्कृष्ट फॅब्रिक आणि नैसर्गिक सोनेरी रंगासाठी ओळखली जाते.
  • पारंपारिक हातमाग तंत्राचा वापर करून या साड्या विणल्या जातात, त्यामुळे साडीला एक अद्वितीय आणि सुंदर पोत मिळतो.
  • भागलपुरी सिल्क साड्या पारंपारिक डिझाईन आणि मॉडर्न प्रकारच्या डिझाइनमध्ये देखील तयार केल्या जातात.
  • या साड्या वजनाने अतिशय हलक्या आहेत. आणि परिधान करण्यासाठी अगदी सोप्या आहेत.
  • इतर सिल्क साड्यांच्या तुलनेत भागलपूरी साड्यांची किंमत कमी आहे. भागलपुरी रेशमी साड्या तुलनेने परवडणाऱ्या आहेत, ज्यामुळे या साड्या मोठ्या प्रमाणात खरेदी केल्या जातात.
  • या साड्या त्यांच्या टिकाऊपणासाठी ओळखल्या जातात. या साड्यांचे फॅब्रिक अतिशय उत्कृष्ट आणि टिकाऊ आहे. त्यामुळे योग्य काळजी घेतल्यास अनेक वर्षे टिकतात.

भागलपुरी साडी कशी ओळखावी? | How to identify Bhagalpuri saree?

  • भागलपुरी साड्यांना एक अनोखा फील आणि चमक असते. कारण या साड्या रेशीम आणि सुती धाग्यांनी तयार केल्या जातात. या साड्या तसर सिल्क म्हणून ओळखल्या जाणार्‍या रेशीम पासून बनवल्या जातात, ज्याला नैसर्गिकरित्या सोनेरी चमक असते.
  • भागलपुरी साड्यांची बॉर्डर आणि पल्लू साधे असतात आणि मेन बॉडीचा रंग कॉन्ट्रास्ट असतो. बॉर्डरवर जरी किंवा सोन्याच्या धाग्याचे विणकाम केलेले असते.
  • भागलपुरी साडीला भौगोलिक संकेत (GI) टॅगमिळालेला आहे. याचा अर्थ फक्त भागलपूर, बिहारमध्ये उत्पादित केलेल्या साड्या “भागलपुरी साडी” नावाने विकल्या जाऊ शकतात. अस्सल भागलपुरी साडी असल्याची खात्री करण्यासाठी साडीवर GI टॅग बघा.
  • भागलपुरी साड्यांचा एक वेगळा पोत असतो जो स्पर्श केल्यानंतर किंचित खडबडीत लागतो. विणकामात तसर रेशीम आणि सुती धाग्यांचा वापर केल्यामुळे हा खडबडीतपण येतो.
pure bhagalpuri silk saree

भागलपुरी सिल्क साड्यांची काळजी कशी घ्यायची | How to care for Bhagalpur silk sarees

  • भागलपुरी सिल्क साडीचा पोत आणि रंग जपण्यासाठी शक्यतो साडी ड्राय क्लीनच करावी.
  • जर साडी घरी धुवायची असेल तर थंड पाण्यात आणि हलके डिटर्जंट वापरा. हळुवारपणे साडी पाण्यात काही मिनिटे भिजवा आणि नंतर ती पूर्णपणे स्वच्छ धुवा. साडीला मुरगळू नका.
  • सूर्यप्रकाशात वळवू नका कारण त्यामुळे साडीचे नाजूक फॅब्रिक खराब होऊ शकते.
  • धुतल्यानंतर सूर्यप्रकाशात वळवू नका आणि ड्रायर वापरू नका कारण त्यामुळे साडीचे नाजूक फॅब्रिक खराब होऊ शकते.
  • साडी किंचित ओलसर असताना कमी उष्णतेवर इस्त्री करा. फॅब्रिकचे कोणतेही नुकसान टाळण्यासाठी नेहमी इस्त्री आणि साडी यांच्यामध्ये एखादे कापड वापरा.
  • साडी ठेवताना ती व्यवस्थित घडी करून सुती किंवा मलमलच्या कपड्यात ठेवा. प्लॅस्टिक पिशव्या वापरणे टाळा कारण त्यामुळे फॅब्रिक ठिसूळ होऊ शकते आणि कालांतराने त्याचा रंग खराब होऊ शकतो.

भागलपुरी सिल्क साडीची किंमत | Bhagalpuri silk saree price

भागलपुरी सिल्क साडीची किंमत रेशमाची गुणवत्ता, साडीवरील डिझाइन, त्यावर केलेले काम आणि ब्रँड यासारख्या विविध घटकांवर अवलंबून असते. एक साधी भागलपुरी सिल्क साडीची किंमत 1600 ते 5000 दरम्यान असू शकते.

तसेच, अधिक किचकट डिझाईन्स, रेशीम आणि कारागिरीची गुणवत्ता यावर देखील साडीची किंमत वाढवू शकते. डिझायनर किंवा हाताने विणलेल्या भागलपुरी सिल्क साड्यांची किंमत 8000 ते 50000 किंवा त्याहूनही जास्त असू शकते. भागलपुरी सिल्क साडी खरेदी करताना गुणवत्ता आणि कारागिरीचा विचार करणे आवश्यक आहे, कारण त्याचा किंमतीवर परिणाम होऊ शकतो.

भागलपुरी सिल्क साडीवर दागिने | Jewellery on Bhagalpuri silk saree

jwellery on bhagalpuri saree
jwellery on bhagalpuri saree
  • भागलपुरी सिल्क साडी वरती दागिन्यांची निवड करताना, साडीचा रंग आणि डिझाइन लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
  • स्टेटमेंट नेकलेस तुमच्या भागलपुरी सिल्क साडीची सुंदरता वाढवते. साध्या डिझाईनमधील चंकी नेकलेस साडीच्या पॅटर्नला छान दिसेल.
  • कानातले ही एक उत्तम ऍक्सेसरी आहे जी कोणत्याही साडीवरती अप्रतिम दिसतात. भागलपुरी सिल्क साडीसाठी तुम्ही मोती किंवा कुंदन वर्क असलेले झुमके निवडू शकता.
  • बांगड्या ही एक पारंपारिक ऍक्सेसरी आहे जी तुमच्या लुकमध्ये छान भर घालू शकते. तुम्ही तुमच्या भागलपुरी सिल्क साडीसोबत मेटल किंवा काचेच्या बांगड्या निवडू शकता.
  • मांग टिक्का हे पारंपारिक हेडपीस आहे जे साड्यांसह परिधान केले जाऊ शकते. भागलपुरी सिल्क साडीसाठी तुम्ही कुंदन किंवा मोत्याचे काम असलेला मांग टिक्का निवडू शकता.
  • नोज रिंग तुमच्या लूकमध्ये पारंपारिक स्पर्श जोडू शकते. भागलपुरी साडीसाठी तुम्ही साधी नोज रिंग किंवा लहान मोत्यांसह नथ निवडू शकता.

भागलपुरी रेशीम का प्रसिद्ध आहे? | Why is Bhagalpuri silk famous?

भागलपूर हे पूर्व बिहार राज्यातील गंगा नदीच्या काठावर वसलेले ऐतिहासिक महत्त्व असलेले शहर आहे. भारताचे मुख्य व्यापार केंद्र म्हणून ओळखले जाणारे हे शहर ‘तुसाहोर टसर’ नावाच्या विशिष्ट रेशीम कापडांसाठी प्रसिद्ध आहे. रेशीम विणणे ही शहरातील प्राचीन प्रथा आहे.

हे सुद्धा वाचा :-

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

silk Fabric
लाइफस्टाइलफॅशन

सिल्क ( रेशीम )आणि सिल्क साड्यांबद्दल माहिती

आपण सर्व भारतीय महिला विशेष प्रसंगी सिल्कच्या साड्या परिधान करतो, परंतु या...

pure handmade kashmiri silk saree
लाइफस्टाइलफॅशन

काश्मिरी सिल्क साडी

काश्मिरी सिल्क साडी त्यांच्या सुंदर आणि आलिशान रेशीमच्या गुणवत्तेसाठी खास ओळखल्या जातात....

wedding outfit ideas for womens
फॅशनलाइफस्टाइल

लग्नामध्ये कुठला पोशाख घालावा याचा विचार करताय का? इथे आहेत महिलांसाठी काही भन्नाट कल्पना

लग्नामध्ये कुठला पोशाख घालावा? हा प्रश्न तर सर्वांनाच पडलेला असतो. आपल्या भारतीय...

konrad silk saree
लाइफस्टाइलफॅशन

दक्षिण भारतातील टेम्पल साडी – कोनराड सिल्क साडी | Konrad Silk Saree

कोनराड सिल्क साडी, ही साडी भारतातील सर्वात सुंदर साड्यांपैकी एक साडी आहे....