ब्रोकेड पैठणी ही पैठणी साडीचा एक फेमस प्रकार आहे, या साडी च्या प्रत्येक धाग्यामध्ये इतिहासामधील काही गोष्टी पाहायला मिळतील आणि पुढेही इतिहास घडवला जाईल हे नक्की. ही साडी महाराष्ट्र राज्यांतील पैठण आणि येवला येथे तयार केली जाती. या साड्या हातमागावरती हाताने विणल्या जातात.
ब्रोकेड पैठणी डिझाईन्स
ब्रोकेड पैठणी साडी वरती संपूर्ण विणकाम हे सोन्याच्या किंवा चांदीच्या जरीने केले जाते. तसेच ही साडी वेगवेगळ्या डिझाइन्समध्ये देखील तयार केली जाते. यामध्ये संपूर्ण साडी वरती फुले, पाने, प्राणी, पक्षी वेली यांचे नक्षीकाम हे हाताने तयार केले जातात आणि काही डिझाईन आधुनिक चालू घडामोडीवरती पण तयार केल्या जातात. तसेच आपल्याला काही विशिष्ट डिझाईन मध्ये देखील ही साडी बघायला भेटते किंवा आपल्याला हवी तशी डिझाइन देखील आपण बनवून घेऊ शकतो.
अस्सल ब्रोकेड पैठणी कशी ओळखावी ?
अस्सल ब्रोकेड पैठणी साड्या शुद्ध रेशमापासून बनविल्या जातात. या साड्यांवरती जे विणकाम केले जाते ते मागच्या आणि पुढच्या बाजूला सारखेच असते. म्हणजेच या साड्यांची उलट आणि सुलट बाजू एकसारखीच असते. या साडीचे वैशिष्ट्य म्हणजे पूर्ण साडी वरती हाताने विणकाम करून वेगवेगळ्या कलाकृती च्या नक्षीकाम केले जाते.
या साड्या त्यांच्या जरी वर्कसाठी ओळखल्या जातात. प्युअर ब्रॉकेड पैठणीमध्ये संपूर्ण साडी वरती जरी वर्क असते त्यामुळे ही साडी वजनाला जड असते.
ब्रोकेड पैठणीची किंमत किती असते?
विणकामाचे पध्दत आणि कठीण जरीवर्क मुळे ब्रोकेड पैठणी साड्या खूप महाग असतात. या साड्यांची किंमत 2-3 लाखांपर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त असू शकते. या साडी वरती जितके अधिक नक्षीकाम असते तितकीच तिची किंमत अधिक असते. विणकामाला अधिक कालावधी लागतो त्यामुळे सुद्धा या साडीची किंमत असते.
सेमी ब्रोकेड पैठणीची किंमत किती असते?
सर्वसाधारण महिलांना इतकी महाग पैठणी खरेदी करणे परवडत नाही, त्यामुळे बाजारामध्ये कमी किंमतीमध्ये देखील ब्रॉकेट पैठणी उपलब्ध आहेत. या पैठणी मशीन वरती बनवल्या विणली जातात. सेमी ब्रोकेड पैठणीची किंमत ही 2600 पासून सुरू होते.
ब्रोकेड पैठणी साडी ची काळजी कशी घ्यायची?
- या साड्यांना शक्यतो ड्राय क्लीन करावे. या साड्यांना घरी धुण्याचा प्रयत्न करू नये.
- साडीवरती डायरेक्टर परफ्युमचा वापर टाळावा. त्यामुळे साडीची जरी खराब होऊ शकते.
- कपाटामध्ये या साड्यांचे घडी अधून मधून बदलावी त्यामुळे धागे खराब होत नाही.
- या साड्यांना डायरेक्ट सूर्यप्रकाशामध्ये ठेवू नये.
- या साड्यांना शक्यतो टोकदार वस्तूंपासून जपून ठेवावे, ज्यामुळे साडीचे विणकाम खराब होणार नाही.
- या साड्यांची व्यवस्थित काळजी घेतली तर त्या अनेक वर्ष टिकतात.
पैठणी शेला | पैठणी दुपट्टा
अलीकडच्या काळात, पैठणी दुपट्ट्याने भारताच्या इतर भागांमध्ये आणि जगभरात एक सुंदर फॅशन ऍक्सेसरी म्हणून लोकप्रियता मिळवली आहे.
पैठणी दुपट्टा हा पैठणी साडीप्रमाणेच छोटासा कपडा, ज्यावरती हाताने विनेनेल्या नयनरम्य अशा डिझाइन्स कारागीर तयार करतात. हा कपडा साडीइतकाच सुदंर असतो. पैठण आणि नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यामध्ये या दुपट्याची निर्मिती केली जाते. पैठणी दुपट्टा ज्याला आपण ओढणी देखील म्हणतो. प्युअर रेशीम पासून बनवलेल्या या दुपट्ट्यावरती सोन्याच्या किंवा चांदीच्या जरीने सुंदर विणकाम तयार केले जाते.
लग्न समारंभामध्ये हा दुपट्टा साडीवरती घेतला जातो आणि पंजाबी ड्रेस वरती सुद्धा परिधान केला जातो. दुपट्ट्यावरील डिझाईन्समध्ये अनेकदा मोर, फुले, पोपट आणि पैठणी साडीवरील इतर नक्षीकाम असते.
पैठणी दुपट्टे हे विविध रंगांच्या छटासाठी ओळखले जातात. या पैठणी दुपट्ट्यांची लांबी 2.5 मीटर एवढी असते. रॉयल ब्लू, डार्क रेड, ग्रीन्स, जांभळा आणि पिवळया रंगामध्ये तयार केले जातात. आपल्या आवडीनुसार पाहिजे त्या रंगामध्ये आपण दुपट्टे बनवून घेऊ शकतो.
पैठणी दुपट्ट्याची किंमत किती असते?
पैठणी दुपट्टा हा प्युअर रेशीम तसेच सोने आणि चांदीच्या जरीच्या मिश्रणापासून तयार केला जातो त्यामुळे या दुपट्ट्याची किंमतही महाग असते. अस्सल पैठणी दुपट्ट्याची किंमत ही ३००० पासून सुरू होते. तसेच जशी त्या दुपट्ट्यावरील जरी काम आणि विणकाम वाढते त्यानुसार त्या दुपट्ट्याची किंमत देखील वाढते.
आपण पैठणी दुपट्टा ऑनलाइन कुठे खरेदी करू शकतो?
अनेक ऑनलाइन मार्केटप्लेस आहेत जिथे तुम्ही पैठणी दुपट्टे खरेदी करू शकता. येथे काही लोकप्रिय पर्याय आहेत:
महाराष्ट्रातील येवला शहरामध्ये आपणाला कारागिराकडे हा मिळू शकतो, तसेच काही ठराविक दुकानदार सुद्धा याची निर्मिती करतात.
ऑनलाईन पर्याय: ऍमेझॉन, फ्लिपकार्ट, मिंत्रा, क्राफ्ट्सविला, उत्सव फॅशन
हे सुद्धा वाचा :-
Leave a comment