स्त्री आणि पुरुषांसाठी रोमँटिक मराठी उखाणे जे तुम्ही कुठल्याही लग्नामध्ये किंवा कार्यक्रमामध्ये अगदी आरामात घेऊ शकता.
रोमँटिक मराठी उखाणे पुरुषांसाठी | Romantic Marathi Ukhane for Male
- बघितले जेव्हा … ला काळीज झाले स्थिर, आता जन्मभर सोडणार नाही साथ, राहील तिच्यासाठी नेहमीच खंबीर.
- जाईच्या वेणीला चांदीची तार, माझी… म्हणजे लाखात सुंदर नार.
- हत्तीच्या अंबारीला मखमली झूल, माझी …. इतकी नाजूक जसे गुलाबाचे फुल.
- संसार रुपी सागरात पती – पत्नीची नौका, …. चे नाव घेतो सर्वजण ऐका.
- उभा होतो मळ्यात, नजर गेली खळ्यात, नवरत्नांचा हार … च्या गळ्यात.
- नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री …. आज पासून माझी गृहमंत्री.
- नभांगनी दिसे शरदाचे चांदणे, …. चे रूप आहे अत्यंत देखणे.
- गंगेची वाळू चाळणीने चाळू, चल चल …. आपण सारीपाठ खेळू.
- लाखात दिसते देखणी, चेहरा सुद्धा हसरा, …. च्या रूपा पुढे अप्सरेचा काय तोरा.
- आंबे वनात कोकिळा गाते गोड, … आहे माझ्या तळहाताचा फोड.
- सप्तपदी केली, मंगल वाद्य वाजली,…. आज पासून माझ्या जीवनात आली.
- मोगरा, जाई – जुई दारातच फुलली ,…. च्या जोडीने संसार वेल बहरली.
- माप लवंडले, तांदूळ झाले साक्षी, … च्या रूपानं घरी अली लक्ष्मी.
- सरला अंतरपाट, माळ पडली गळ्यात, …. अलगद आली सासरच्या गोताळ्यात.
- विठ्ठलाने राखला सावता माळ्याचा मळा, मनी मंगळसूत्र बांधले मी …. च्या गळा.
- हिरवा चुडा, मंगळसूत्र गळ्यात, नेसली हिरवा शालू, …. उभी आहे मैत्रिणींच्या मेळाव्यात कसा मी तिच्याशी बोलू.
- भरल्या पंगतीत उदबत्तीचा वास, …. ला देतो जिलेबीचा घास.
- चाकणच्या किल्ल्यावर ठेवल्या होत्या फौजा, … च्या जीवावर … मारतो मौजा.
- वाटल्या डाळीचे केले पिठले, त्यात खोबरे घातले किसून, … गेली तेव्हा मीच खाल्ले चाटून पुसून.
- कोवळी काकडी करकर वाजते , काळी चंद्रकला पैठणीमध्ये …. शोभून दिसते.
- कपाटाच्या खणात ठेवला पैका, … चे नाव घेतो सर्वजण ऐका.
- आंबे वनात पिकाला अंबा, माझी … जशी स्वर्गाची रंभा.
- श्रावण महिन्यात प्रत्येक वारी सण, …. ला सुखात ठेवीन असा माझा पण.
- पाण्याच्या हंड्यावर रुप्याचे झाकण, … च्या हातात हिऱ्याचे कंकण.
- वर मथळा, खाली बातमी वर्तमानपत्राची रीती, …. चे नाव घेतो, अशीच वाढो आमची प्रीती.
- काव्यासाठी प्रतिभा, देवासाठी भक्ती, मलाही मिळाली …. सारखी मदनाची रती.
- सोन्यात सोने बावन कशी, माझी … दुसरी मस्तानीच जशी.
- पुनवेच्या चंद्राच्या शोभल्या 16 कला, …. ने माझ्या आवडीची नेसली चंद्रकला.
- राधिकेला कृष्ण म्हणे हास राधे हास, मी …. ला भरवतो लाडवाचा घास.
- श्रावण महिन्यात दिसते इंद्रधनुची रंगत न्यारी, …. साठी केली लग्नाची तयारी.
- मुखी असावे प्रेम, मनामध्ये दया, …. सोबत जडली माझी माया.
- वाटीत वाटी सोन्याची,…. माझी प्रीतीची.
- कश्मीरच्या नंदन वनात फुलतो नशीगंध, …. सोबत जीवनात मला आहे आनंद.
- भरली फुलांनी निशिगंधाची पाती, … चे नाव घेतो लग्नाच्या राती.
रोमँटिक मराठी उखाणे महिलांसाठी | Romantic Marathi Ukhane for Female
- काय जादू केली जिंकलं मला एक क्षणात, प्रथमदर्शनीच भरले … माझ्या मनात.
- नवग्रह मंडळात शनीचा आहे वर्चस्व, …. आहे माझे सर्वस्व.
- लग्नाची झाली सुरुवात सगळीकडे चालू आहे गडबड, आणि …. समोर येताच काळीज करताय धडधड.
- आंबा गोड, ऊस गोड, त्याहीपेक्षा अमृत गोड, …. चे नाव आहे अमृता पेक्षाही गोड.
- आधी होती लेक,मग झाली सून, नवीन नातं जडलं, …. चे संसारात सोन्याचं पाऊल पडलं.
- गळ्यात माळ पडली, बांधले मंगळसूत्र, …. आणि माझा संसार होऊ दे पवित्र.
- फुलांत फुल मदनबाण, … माझा जीव की प्राण.
- हत्तीला बघण्यासाठी सगळे झाले गोळा, आणि …. ने मला हळूच मारला डोळा.
हे सुद्धा वाचा :-
- पैठणी साडी चे प्रकार, कलर आणि इतिहासाबद्दल संपूर्ण माहिती नक्की वाचा
- राम नवमी कधी आहे आणि या राम नवमी ला जाणून घेऊया का प्रभू श्री रामांना मर्यादापुरुषोत्तम असे म्हणतात?
- श्रीकृष्णजन्माष्टमीची कथा, माहिती, इतिहास
- श्री हनुमान जयंती / अंजनेय यांच्याबद्दल संपूर्ण माहिती
- गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमेबद्दल संपूर्ण माहिती व कथा
- हरतालिका तीज का साजरी करतात? कथा, महत्व आणि संपूर्ण माहिती
- पैठणी आणि नऊवारी साडीवरील उखाणे
- परंपरेचा ठेवा नऊवारी साडीचे प्रकार, इतिहास आणि संपूर्ण माहिती नक्की वाचा
- ब्रोकेड पैठणी बद्दल पूर्ण माहिती
- पैठणी साडी कशी तयार केली जाते? त्याबद्दल संपूर्ण माहिती
- पुरुषांसाठी आणि नवरदेवासाठी कॉमेडी मराठी उखाणे
Leave a comment