- कॉलेज करता करता झालं प्रेम, प्रेम करता करता झालं लग्न, लग्न करता करता झाले सगळ्यांचे वांदे, उद्यापासून …. ला घेऊन जातो भरायला कांदे.
- चार एकर शेतात लावली तूर …. च्या पायगुणाने येऊदे सुखाचा पूर.
- मागणं काळ्या आईकडे दे आमच्या कष्टाचं दाम, … करते खांद्याला खांदा लावून शेतात काम.
- लग्न झाला सोहळा झाला करू संसार गोडीने, उद्यापासून … आणि मी करिन शेती काम जोडीने.
- साखरेचे पोते सुईने उसवले, … ने मला पावडर लावून फसवले
- पाऊस आला, पेरणी झाली, सगळे गेले निंदायला, … आहे पक्की माझ्याबरोबर भांडायला.
- शेती आहे, ट्रॅक्टर आहे, दारात उभी मोठी गाडी …. साठी बांधीन सगळ्यात मोठी माडी.
- चार एकर शेतात लावला ऊस आणि कांदे,… बरोबर लग्न करण्यासाठी झाले माझे वांदे.
- शेतकरी असलो म्हणून काय झालं कष्ट करेल जोमाने, आणि … सोबत जग फिरेन विमानाने.
- शेतकरी मुलगा नको म्हणून मुली फिरतात जोमात, …. एकदा येऊन बघ शेतात, आपली शेती पाहून जाशील डायरेक्ट कोमत.
- शेती करणे सोपे नाही, करावी लागते हिम्मतीने , इथून पुढे … आणि मी शेतात जाऊ संगतीने.
- बायको आणली सुगरण, स्वयंपाक करते गोड, … च्या सोबत लागली संसाराची ओढ.
शेतकऱ्यांसाठी लग्नातील फनी उखाणे
- नांगरणी झाली, पेरणी झाली, जोरात पाऊस आला, … समोर झुकेगा नई साला.
- शेती करायची म्हटल्यावर मशागत आणि बियाण्यांसाठी लागते रक्कम, म्हणून तर … सारखी बायको आणली एकदम भक्कम.
- शेतीमध्ये कष्ट करावेच लागतात मनापासून, नाहीतर … मला भाकर देईल का घरात बसून.
- धोतर आणि नऊवारी आहे शेतकऱ्याची शान, … तुला आयुष्यभर देईन मन सन्मान.
- नोकरीवाल्यापेक्षा शेतकऱ्याकडे आहे श्रीमंती, … बायको आणली अगदी गुणवंती.
- आहे ट्रॅक्टर, आहे गाडी, आहे आपल्याकडे बुलेट, … लै चराचर देऊ नको मला उत्तर उलट.
शेतकरी महिलांसाठी सुंदर उखाणे
- दिवस-रात्र कष्ट करून पिकवलं मातीत सोनं,… रावांनी दिल मला सौभाग्याचं लेनं.
- दूध पिल्याने वाढते शरीरातली पॉवर, …. रावांकडे आहे 100 एकर वावर.
- निसर्गाच्या रंगाने रंगला श्रीकृष्ण सावळा, … रावांचे नाव घेते, आज आहे आमच्या लग्नाचा सोहळा
- शेतकऱ्याचे आहे एकच मागणे, आमच्या मालाला द्या योग्य दाम, कारण शेतीमध्ये रक्ताचे पाणी करून गाळावा लागतो घाम, … रावांसोबत खांद्याला खांदा लावून करिन मी शेतात काम.
- वैताग आला कामाचा, शेतात आले रागानं, तर इथेही त्रास दिला या उन्हान, खोरं घेतलं, बारं लावलं, खोऱ्याला लागली माती, …. राव माझे पती आणि मी त्यांची सौभाग्यवती.
- काढली हातावर मेहंदी रंग आलाय भडक, लग्नाच्या पोशाखात … राव दिसतात एकदम कडक
- कितीही केले हरी हरी, तरीही काही येईना पावसाच्या सरी, अरे वरून देवा तू तरी कर काहीतरी, कारण सर्व शेतकऱ्यांना पाऊस हवा, पाऊस न येता सुटले फक्त वारे, … रावांचे नाव घेते ऐकताय ना सारे
हे देखील वाचा –
Leave a comment