लाइफस्टाइलफॅशन

भारतीय सिल्क साडी बद्दल संपूर्ण माहिती आणि प्रकार | Complete information about Indian silk sarees and type

Indian silk sarees
Indian silk sarees

भारतीय सिल्क साडी (Indian silk sarees) ही अत्यंत मौल्यवान आहेत. मानवाने बनवलेल्या सर्वात प्राचीन कापडांपैकी एक सिल्क आहे. सिल्कला कापडाची राणी म्हणतात. अस्सल सिल्क पासून बनलेली, अगदी मऊ, मनाला एक वेगळीच भुरळ घालणारी, दिसायला रुबाबदार जिच्याशिवाय कुठलाही कार्यक्रम, सण-समारंभ अपूर्ण वाटतो अशी ही साडी सगळ्यांचीच नजर आपल्याकडे खेचते.

ही साडी स्वतःच भव्यतेच एक मोठे उदाहरण आहे. तिची भव्यता तिच्या रुबाबदार दिसण्यातूनच मन मोहून टाकते, जिला परिधान केल्यावर एक सामान्य स्त्री सुद्धा स्वतःला अगदी असामान्य व्यक्तीमत्त्व समजेल अशी ही साडी स्त्रियांचे सौंदर्य वाढवते. या साड्यांवरती केलेले प्रत्येक नक्षीकाम कारागीर स्वतःच्या हाताने विणतात अशा या हस्तकला (hand woven) साड्या श्रीमंती दर्शवतात.

काळानुसार कितीही फॅशन बदलली, आपले राहणीमानही बदलले तरीही कुठलाही कार्यक्रम असो त्यामध्ये या साड्यांचे स्थान कुठलेही वस्त्र घेऊ शकत नाही. या साड्यांशिवाय भारतीय स्त्रियांचे सौंदर्य हे अपूर्णच असते असे म्हणायला हरकत नाही. रेशीमच्या साडीशिवाय स्त्रियांचे कपाट अपूर्ण आहे. संपूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रेशीमच्या साड्या बनवल्या जातात. चला तर मग येथे आपण जाणून घेऊया रेशीम साडी बद्दल थोडीशी माहिती.

सिल्क साडी प्रकार
सिल्क साडी प्रकार

अनुक्रमणिका

सिल्क साडी चे प्रकार व राज्य | Types of silk sarees and their states

सिल्क साडी बद्दल भारतातील वेगवेगळ्या राज्यांची स्वतःची एक वेगळी खासियत आहे. येथे आपण बघूया भारतातील सिल्क साड्यांचे प्रकार आणि ती कुठल्या राज्यात तयार होते.

  1. पैठणी सिल्क साडी | Paithani silk saree
  2. कांजीवरम सिल्क साडी | Kanchipuram silk saree | Kanjivaram
  3. बनारसी | Banarasi silk saree
  4. आसाम सिल्क साडी | Assam silk saree
  5. चंदेरी सिल्क साडी | Chanderi silk saree
  6. धर्मावरम सिल्क साडी | Dharmavaram silk saree
  7. ऑर्गेन्झा सिल्क साडी | Organza silk saree
  8. भागलपुरी सिल्क साडी | Bhagalpuri silk saree
  9. म्हैसूर सिल्क साडी | Mysore silk saree
  10. पटोला सिल्क साडी | Patola silk saree
  11. पोचमपल्ली सिल्क साडी | Pochampalli ikkat pattu sarees
  12. संबळपूरी सिल्क साडी | Sambalpuri silk saree
  13. महेश्वरी सिल्क साडी | Maheshwari silk saree
  14. कोरियल सिल्क साडी | Korial silk saree
  15. कोटा सिल्क साडी | Kota silk saree
  16. बलूचरी सिल्क साडी | Baluchari silk saree
  17. बांधणी सिल्क साडी | Bandhani Silk Saree
  18. उप्पाडा जामदानी साडी | Uppada Jamdani Saree
  19. गडवाल सिल्क साडी | Gadwal Silk Saree
  20. बोमकाई सिल्क साडी | Bomkai silk saree
  21. कोनराड सिल्क साडी | Konrad Silk Saree
  22. काश्मिरी सिल्क साडी | Kashmiri Silk Sarees

1. पैठणी सिल्क साडी | Paithani Silk Saree

या साड्या महाराष्ट्रात मध्ये तयार केल्या जातात. पैठणीचे उत्पादन मूळ पैठण या शहरांमध्ये होते, परंतु हळूहळू नाशिक जिल्ह्यातील येवला या शहरामध्ये त्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होऊ लागले. Read More

Traditional Paithani Saree with Intricate Zari Border and Pallu
Classic Indian Paithani Silk Saree with Peacock Motifs

2. कांजीवरम सिल्क साडी | Kanchipuram Silk Saree | Kanjivaram

कांजीवरम सिल्क साडी ही भारतातील तामिळनाडूमधील कांचीपुरम येथे तयार केली जाते. या साड्या तामिळनाडू, केरळ, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमधील बहुतेक महिला वधू विशेष प्रसंगी परिधान करतात. Read More

Kanjivaram Saree: Fine Silk Weaving and Traditional Elegance  | कांजीवरम साडी वरती दागिने
kanjivaram saree

3. बनारसी सिल्क साडी | Banarasi Silk Saree

बनारसी सिल्क साड्या उत्तर प्रदेश राज्यातील बनारसमध्ये बनवल्या जातात. बनारसी सिल्क साडी ही वाराणसी या प्राचीन शहरामध्ये बनवलेली साडी आहे त्या शहराला बनारस देखील म्हणतात. या साड्या भारतातील सर्वोत्कृष्ट साड्यांपैकी एक आहे. आणि त्यांच्या सोने आणि चांदीच्या ब्रोकेड किंवा जरी, उत्तम रेशीम आणि भव्य भरतकामासाठी ओळखल्या जातात. साड्या बारीक विणलेल्या रेशमापासून बनवलेल्या असतात आणि या कोरीव कामांमुळे त्या तुलनेने वजनदार असतात. Read More

Banarasi saree : Fine Silk Weaving and Traditional Saree
Banarasi saree : Fine Silk Weaving and Traditional Saree

4. आसाम सिल्क साडी | Assam Silk Saree

आसाम राज्याची राजधानी गुवाहाटी जवळील सुआलकुची येथे आसाम सिल्क साड्या तयार केल्या जातात. गुवाहाटी येथील आसाम सिल्क हाऊस हे सिल्क साडी विक्रेत्यांमधील अग्रगण्य व्यवसायांपैकी एक आहे. साडी विक्रेते, सिल्क साडी विक्रेते आणि बरेच काही यासाठी देखील आसाम ओळखले जाते. Read More

Assam Silk Saree: Intricate Weaving and Cultural Splendor
Assam Silk Saree: Intricate Weaving and Cultural Splendor

5. चंदेरी सिल्क साडी | Chanderi Silk Saree

चंदेरी रेशीम हलक्या वजनाचे तसेच चकचकीत पारदर्शकता आणि निखळ पोताचे आहे. रेशीमचे नाव मध्य प्रदेशातील ‘चंदेरी’ या छोट्या ठिकाणावरून आले आहे. चंदेरी रेशीमपासून विनलेल्या साड्या गरम हवामानात घालणे चांगले असते. ही साडी मध्य प्रदेश राज्यातील चंदेरी येथे बनवली जाते. म्हणून तिला चंदेरी साडी म्हणतात. Read More

Chanderi Silk Saree: Ethereal Gracefulness and Delicate Craftsmanship
Chanderi Silk Saree

6. धर्मावरम सिल्क साडी | Dharmavaram Silk Saree

धर्मावरम हातमाग पट्टू साड्या आणि पावडा या तुती रेशम आणि जरीचा वापर करून हाताने विणलेले कापड आहेत. या साडी हैदराबादच्या दक्षिणेस आंध्र प्रदेश राज्यातील अनंतपूर जिल्ह्यातील धर्मावरम येथे बनवल्या जातात. Read More

धर्मावरम सिल्क साडी
धर्मावरम सिल्क साडी

7. ऑर्गेन्झा सिल्क साडी | Organza Silk Saree

ऑर्गन्झा हा रेशीम धाग्यांपासून बनवलेल्या साडीचा एक प्रकार आहे. कधीकधी या साड्या नायलॉन आणि पॉलिस्टरचे मिश्रण करून देखील बनवल्या जातात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्रकारची साडी खूपच मऊ असते.  तामिळनाडू राज्यातील कोइम्बतूर हे शहर या साड्यांसाठी प्रसिद्ध आहे. Read More

organza silk saree with border
organza silk saree with border

8. भागलपुरी सिल्क साडी | Bhagalpuri Silk Saree

भागलपूर हे बिहार राज्यातील एक शहर आहे जिथे ही साडी तयार केली जाते. भागलपूरमध्ये एक शतकाहून अधिक काळ भागलपुरी रेशीम व्यवसाय सुरू आहे. अत्यंत कुशल कारागिरी ने या साडी वरती नक्षी काम केले जाते. भागलपुरी रेशमी साड्या बनवण्याचा इतिहास २०० वर्षांपूर्वीचा आहे. Read More

Bhagalpuri Tussar Silk Saree
bhagalpuri tassar silk saree

9. म्हैसूर सिल्क साडी | Mysore Silk Saree

म्हैसूर सिल्क साडी कर्नाटक राज्यात तयार केली जाते. मैसूर, चंदनाची भूमी, त्याच्या इतिहासाइतकीच समृद्ध अशा रेशीम ची निर्मितीही करते. म्हैसूरच्या झगमगत्या सिल्क क्रेप साड्या हे या भूमीवर राज्य करणाऱ्या महाराजा आणि सुलतानांच्या मुकुटातील एक रत्न आहे. Read More

Yellow green pure mysore silk saree

Yellow green pure mysore silk saree

10. पटोला सिल्क साडी | Patola Silk Saree

पटोला साड्या गुजरात मध्ये पाटण या शहरामध्ये बनवल्या जातात. ही साडी हातमाग साडीचा एक प्रकार आहे तसेच ही रेशीम पासुन बनलेली असते. या साड्या खूप महाग आहेत. एकेकाळी हे कपडे फक्त राजघराण्यातील किंवा श्रीमंत लोकांनाच परवडणारे होते. Read More

Pure handmade patola silk saree | पाटण पटोला साडी
Pure handmade patola silk saree

11 . पोचमपल्ली सिल्क साडी | Pochampalli ikkat pattu sarees

पोचमपल्ली साड्या तेलंगणा राज्यात बनवल्या जातात. या साड्या आंध्र प्रदेश (तेलंगणा) मधील रेशीम आणि सुती साड्यांचा एक प्रकार आहे. या साडीला तेलंगणामधील पोचमपल्लीचे नाव देण्यात आले आहे, जिथे बहुतेक लोक या साड्या विणण्यात गुंतलेले आहेत. Read More

पोचमपल्ली साडी | Green and white pochampalli saree
green and white pochampalli saree

12. संबळपूरी सिल्क साडी | Sambalpuri Silk Saree

संबळपूरी साडी ही एक पारंपारिक हाताने विणलेली बांधा (इकत) साडी आहे. स्थानिक भाषेत याला “संबळपूरी बांधा” साडी असे म्हणतात. या साड्या भारतातील ओडिशा राज्यात संबळपूर, बालंगीर, बारगढ, बौध आणि सोनेपूर येथे तयार केल्या जातात. संबळपूरी साड्या त्यांच्या शंख, चक्र (चाक), फुल सारख्या पारंपारिक नक्षीकामासाठी ओळखल्या जातात. Read More

Handwoven Sambalpuri Silk Saree from Odisha
Red and Black Sambalpuri silk saree

13. महेश्वरी सिल्क साडी | Maheshwari Silk Saree

मध्य प्रदेश राज्यातील खरगोन जिल्ह्यातील महेश्वर हे शहर साडीसाठी प्रसिद्ध आहे. या साडीचे विशेष महत्त्व म्हणजे ही साडी दोनही बाजूंनी परिधान करता येऊ शकते. या साड्यांना केवळ भारतातच नाही, तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही मागणी आहे. Read More

Maheshwari Silk Saree with Traditional Weaving and Rich Zari Embellishments
Maheshwari Silk Saree with Traditional Weaving and Rich Zari Embellishments

14. कोरियल सिल्क साडी | Korial Silk Saree

पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात कोरीयल साड्या बनवल्या जातात. कोरियल हा बंगाली शब्द “कोरा” पासून आला आहे. याचा अर्थ साधा, निर्मळ असा होतो. यामध्ये गरड-कोरियल आणि कोरियल बनारसी साडी हे दोन प्रकार आहेत. कोरियल बनारसी साडीवर वापरले जाणारे सर्वांगीण जरी तंत्र हे खरेतर बनारसी सिल्क साड्यांची एक खासियत आहे आणि हेच तंत्र कोरीयल साडीच्या विणकाम शैलीमध्ये वापरले आहे. Read More

Korial Silk Saree: Timeless Elegance in Every Weave
Korial Silk Saree: Timeless Elegance in Every Weave

15. कोटा सिल्क साडी | Kota Silk Saree

कोटा हे राजस्थानच्या दक्षिणेकडील भागात असलेले एक शहर आहे, जिथे ही साडी तयार केली जाते. कोटा डोरिया साड्या शुद्ध कापूस आणि रेशमापासून बनवलेल्या असतात आणि त्यावर चौकोनी नमुने असतात ज्यांना खट्स म्हणतात. या साड्या पारंपारिक पद्धतीने पीट लूमवरती तयार केल्या जातात.  Read More

kota silk saree
kota silk saree

16. बालुचारी सिल्क साडी | Baluchari Silk Saree

ही साडी पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये बनवली जाते. ही साडी तिच्या पल्लू वरील पौराणिक दृश्यांच्या चित्रांसाठी प्रसिद्ध आहे. सध्या पश्चिम बंगालमधील बिष्णुपूर आणि त्याच्या आसपासच्या भागात अस्सल बालुचारी साड्यांचे उत्पादन केले जाते. Read More

baluchari silk saree
baluchari silk saree

17. बांधणी सिल्क साडी | Bandhani Silk Saree

बांधणी साडी म्हणजेच बंधेज साडी, या साड्या पारंपरिक टाय-डाय पद्धतीने तयार केल्या जातात. “बांधा” या संस्कृत शब्दापासून बांधणी हा शब्द तयार झाला आहे. या साडया गुजरात आणि राजस्थान या राज्यांमध्ये तयार केल्या जातात. Read More

handmade bandhani saree
handmade bandhani saree

18. उप्पाडा जामदानी साडी | Uppada Jamdani Saree

आंध्र प्रदेश राज्यामधील पूर्व गोदावरी जिल्ह्यातील उप्पाडा हे छोटेसे गाव आहे. उप्पाडा या गावामध्ये जामदानी विणकाम पद्धतीने ही साडी तयार केली जाते म्हणून या साडीला उप्पाडा जामदानी साडी असे म्हणतात. ही साडी शुद्ध रेशीम तसेच कॉटन आणि रेशीम या दोन्हींच्या मिश्रणातून बनवली जाते. Read More

uppada jamdani silk saree

19. गडवाल सिल्क साडी | Gadwal Silk Saree

गडवाल सिल्क साडी, या साड्या भारतातील तेलंगणा राज्यामधील जोगुलांबा गडवाल जिल्ह्यातील गडवाल या गावामध्ये हातमागावरती तयार केल्या जातात. या साड्या शुद्ध रेशीम तसेच रेशीम आणि कॉटन या दोन्हींच्या मिश्रणातून बनवल्या जातात. Read More

pure gadwal saree
pure gadwal saree

20. बोमकाई सिल्क साडी | Bomkai Silk Saree

ही साडी ओडिशा राज्यातील गंजम जिल्ह्यात बनवली जाते. या साडीच्या साधेपणामुळे तिचे सौंदर्य खुलून येते. या साडीमध्ये आदिवासी छटा आहे. काही डिझाईन्समध्ये विशेषत: कमळ, मंदिर, चौरस प्रकारचे नमुने, कासव इ. दिसून येतात. Read More

pure bomkai silk saree
pure bomkai silk saree

21. कोनराड सिल्क साडी | Konrad Silk Saree

कोनराड सिल्क साडी, भारतातील तामिळनाडू राज्यातील आर्णी या गावामध्ये या रेशीम साडी विणकामास सुरुवात झाली. कोनराड सिल्क साडी ही भारतातील सर्वात सुंदर रेशीम साड्यांपैकी एक साडी आहे. या साडीला “टेम्पल साडी” असे देखील म्हणतात. या साडीचे विणकाम देवतांना परिधान करण्यासाठी करण्यात आले होते. Read More

22. काश्मिरी सिल्क साडी | Kashmiri Silk Saree

काश्मिरी सिल्क साडी ही काश्मीर मध्ये हातमागावरती तयार केल्या जातात आणि या साडीवरील वर्क देखील अतिशय सुंदर पद्धतीने हाताने साडीवरती विणले जाते. या विणकामात पारंपरिक काश्मिरी डिझाइन्सचा समावेश आहे. Read More

हे सुद्धा वाचा :-

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

फॅशनलाइफस्टाइल

Yoga Clothes Information : महिलांना वर्क आऊट साठी योग्य कपडे का महत्त्वाचे आहेत? जाणून घ्या पूर्ण माहिती

जिम मध्ये जाणे, योगाभ्यास करणे, धावणे किंवा उच्च स्थरावरील जिम ट्रेनिंग मध्ये...

garba dress
फॅशनलाइफस्टाइल

नवरात्रीचा पोशाख : ९ रंगाचे महत्व

नवरात्री, भारतातील सर्वात आनंदी सणांपैकी एक आहे. वाईटावर चांगल्याच्या विजयाचा उत्सव आहे...

silk Fabric
लाइफस्टाइलफॅशन

सिल्क ( रेशीम )आणि सिल्क साड्यांबद्दल माहिती

आपण सर्व भारतीय महिला विशेष प्रसंगी सिल्कच्या साड्या परिधान करतो, परंतु या...

pure handmade kashmiri silk saree
लाइफस्टाइलफॅशन

काश्मिरी सिल्क साडी

काश्मिरी सिल्क साडी त्यांच्या सुंदर आणि आलिशान रेशीमच्या गुणवत्तेसाठी खास ओळखल्या जातात....