मराठी उखाणे

नवरदेवासाठी उखाणे सोपे, छोटे आणि सुंदर

नवरदेवासाठी उखाणे

भारतातील लग्न समारंभामध्ये उखाणे घेण्याचा फार आनंदी सोहळा असतो. या सोहळ्यांमध्ये खास करून नवरदेव आणि नवरीला उखाणे घेण्याचा फार आग्रह केला जातो. आणि अगदी वेळेला कुठला उखाणा घ्यावा हे लक्षात येत नाही. म्हणून आम्ही नवरदेवासाठी घेऊन आलो आहे अगदी सोपे, छोटे आणि सुंदर उखाणे.

देवतांवरून नवरदेवासाठी उखाणे

  • शुभ प्रसंगाची सुरुवात होते श्री गणेशापासून, ….. चे नाव घ्यायला सुरुवात केली आजपासून.
  • कोल्हापूरला आहे महालक्ष्मीचा वास, …. ला भरवतो मी जलेबीचा घास.
  • सत्यनारायणाच्या पूजेला असतो कलश, … आहे माझी खूप सालास.
  • देवाच्या देव्हाऱ्यात गणपतीच्या पूजेला प्रथम स्थान, …. नी दिला मला पती राजांचा मान.
  • देवाच्या दर्शनासाठी मंदिरामध्ये लागतात लांबच लांब रांगा , …  चे नाव घ्यायला मला कधीही सांगा.
  • यमुनेच्या तीरी कान्हा वाजवितो बासरी, … माझी आहे फारच हासरी.
  • निर्मल मंदिर, पवित्र मूर्ती, माझे प्रेम फक्त …. वरती.
  • सीतेसारखे चरित्र, लक्ष्मीसारखं रूप, …. मला मिळाली आहे अनुरूप.
  • कृष्णाला बघून राधा हसली, … माझ्या हृदयात बसली.
  • पंढरीचा पांडुरंग आहे विटेवर उभा, … ने वाढवली आमच्या घराची शोभा.
  • राधे शिवाय श्रीकृष्णाला करमेना, आणि …. शिवाय माझे पान हालेना.
  • छोटीशी तुळस घराच्या दारी, तुमची …. आता माझी जबाबदारी.
  • मुंबापुरीची मुंबादेवी आज मला पावली, श्रीखंडाचा घास देताना, …. मला चावली.
  • इंद्राची इंद्राणी, दुष्यंताची शकुंतला, …. नाव ठेवले माझ्या प्रिय पत्नीला.
  • श्रीकृष्णाचे नाव घेतलं की आठवते त्याची बासरी, … आहे अगदी हासरी.
  • कोरा कागद, काळी शाही, … ला रोजच होते देवळात जाण्याची घाई.

लग्नातील विविध प्रसंगात नावरदेवासाठी उखाणे

  • नवीन आयुष्याला आजपासून करतो मी सुरुवात, ….  ला कायम सुखी ठेवेल वचन देतो लग्न मंडपात.
  • मंगळसूत्रात शोभतात काळे आणि सोनेरी मणी, ….  झाली आज माझी राणी.
  • सप्तपदीची सात वचन देतील दिशा नवी, …. सारखी पत्नी मला जन्मोजन्मी हवी.
  • हातात हात घेऊन अग्नीला सात फेरे घालतो, ….  सोबत मी आज सप्तपदी चालतो.
  • गृहप्रवेशाच्या वेळी रस्ता अडवायला जमल्या सगळ्या बहिणी, येऊ द्या आता घरात आणली तुमची वहिनी.
  • सगे सोयरे, आप्तेष्ट मंगल प्रसंगी जमले, ….  चे नाव माझ्या मनावर कोरले.
  • आई-वडिलांच्या आशीर्वादाने आयुष्य माझे फुलले, ….  च्या हाती भविष्य आता सोपवले.
  • हो नाही करता करता लग्नाला संमती दिली, आणि देवा ब्राह्मणाच्या साक्षीने …  माझी झाली.
  • सुंदर प्रेमाचे सुंदर गाव, … च्या मेहंदीत माझे नाव.
  • मोहमाया स्नेहाची जाळी पसरली घनदाट, …. चे बरोबर बांधले जीवन गट.
  • सनई आणि चौघडे वाजत होते सप्तसुरात, …. ला घेऊन आलो ….. यांच्या घरात.
  • जाई – जुईचा वेल पसरला दाट, ….  बरोबर बांधली सात जन्माची गाठ.

शिवरायांवरती आधारित नवरदेवाचे उखाणे

  • जिजाऊं सारखी असावी माता, शिवबा सारखा असावा पुत्र, …  च्या गळ्यात आज मी बांधतो मंगळसूत्र.
  • स्वराज्यासाठी सांडलं होतं मावळ्यांनी त्यांचे रक्त, ….  चे नाव घेतो शिवरायांचा भक्त.
  • सईबाईंचा पुत्र होता स्वराज्याचा छावा,  …  चे नाव घेतो कायम तुमचा आशीर्वाद हवा.

शेतकरी नवरदेवासाठी सोपे उखाणे

  • नाशिक जिल्ह्यात असतात द्राक्षाच्या बागा, ….  चा आता माझ्या हृदयावर ताबा.
  • कोकणाच्या सागरकिनारी पोफळीच्या बागा, …  चा आता माझ्यावर ताबा.
  • भाजीत भाजी पालक, ….. माझी मालकीण आणि मी तिचा मालक.
  • कांदा, बटाटा, आणि टोमॅटो झाले स्वस्त, …आहे माझी सगळ्यात मस्त.
  • ट्रॅक्टर घेऊन नांगरत होतो वावर, … च्या हातात आता सगळी पावर.

निसर्गावर आधारित नवरदेवासाठी उखाणे

  • चंद्रावर आहे डाग, सूर्यावरती आहे आग, …च्या चेहऱ्यावरील राग, आहे माझ्या प्रेमाचा भाग. 
  • वसंत ऋतू मध्ये दरवळतो फुलांचा सुवास …  सोबत सुरू करतो संसाराचा जीवन प्रवास.
  • उन्हाळ्यानंतर येतो पावसाळा, पावसाळ्यानंतर येतो हिवाळा, … आणि माझ्यातला वाढत जाओ  जिव्हाळा.
  • हिरव्या हिरव्या डोंगरावर पांढरे पांढरे बगळे, … आणि माझा सुरू झाला संसार आता बाजूला व्हा सगळे.
  • डोंगर माथ्यावरून वाहतो आहे सुंदर झरा, …  आणि मला येऊ द्या घरात आता सर्वांना बाजूला करा.
  • एका वर्षात असतात महिने बारा, ….  चे नाव घेण्यात आनंद आहे सारा.
  • निळ्या निळ्या आकाशात चमकतात तारे, …  चे नाव घेतो लक्ष द्या सारे.
  • फुलांमध्ये फुल गुलाबाचे फुल, …  ने घातली मला प्रेमाची भूल.
  • गर गर गोल फिरतो भवरा, …. माझी बायको आणि मी तिचा नवरा.
  • भरजरी साडी तिचे सोनेरी काठ, …. चे नाव घेतो आता पुढचे नाही पाठ.
  • कावळा करतो काव काव चिमणी करते चिऊ चिऊ, … चे नाव घेतो बंद करा तुमची टिव टिव. 
  • सूर्योदयाची सुंदर आहे दृश्य, …. अली  जीवनात सुंदर झाले आयुष्य,
  • तिरंगा ध्वज आहे भारताची शान, … चे नाव घेतो ठेवून सर्वांचा मान.
  • अबोलीच्या फुलांचा गंध काही कळेना, …  चे नाव घ्यायला शब्द काही जुळेना.
  • सुंदर समुद्राची सुंदर लाट, …. शी बांधली लग्नाची गाठ.
  • निळ्या निळ्या आकाशातून पडती पावसाच्या सरी, …. चे नाव घेतो ….. च्या घरी.
  • सर्व ऋतूत ऋतू आहे वसंत, …. केली मी पत्नी म्हणून पसंत.
  • निसर्गाला नाही आधी नाही अंत, … आहे माझी मनपसंत.
  • ताऱ्यांच लुकलुकणं चंद्राला आवडलं, … ला मी जीवनसाथी म्हणून निवडलं.

नवरदेवासाठी छोटे उखाणे

  • वड्यात वडा बटाटा वडा, … ला मारला खडा म्हणून जमला आमचा जोडा.
  • दही, चक्का, तूप,  …. आवडते मला खूप.
  • पुरणपोळीत तूप असावे साजूक, …. आहेत आमच्या फार नाजूक.
  • घर आहे सुंदर, घराला होती घंटी, ….. माझी बबली आणि मी तिचा बंटी.
  • आई – वडील, भाऊ – बहीण यांनी, …ला आणले निरखुन, जणू माझ्यासाठी आणलाय त्यांनी कोहिनुर हिरा पारखून.
  • कोकिळेचा आवाज आहे खूप मधुर, … बरोबर संसार करण्यासाठी मी झालो आतुर. 
  • एक दिवा दोन वाती, … माझी जीवनसाथी.
  • सुंदर प्रेमाचे सुंदर गाव, … च्या मेहंदीत माझे नाव.
  • लाख लाख दिव्यांनी उजळत राहते एकनिष्ठ प्रेम, …. ची माझ्या हृदयात कोरली गेली  फ्रेम. 
  • पिवळं सोनं पांढरी शुभ्र चांदी, …  ने काढली माझ्या नावाची मेहंदी.
  • असे म्हणतात पुणे तेथे काय उणे, ….जर  गेली गावाला तर घर होते सुने सुने.
  • खिशामध्ये माझ्या आहे प्रेमाची लेखणी, …  माझी सगळ्यांमध्ये देखणी.
  • नाव घे, नाव घे करू नका ठणाणा, … चे नाव घ्यायला सुचत नाही उखाणा.

हे देखील वाचा ;-

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles