उप्पाडा जामदानी साडी उप्पाडा या गावामध्ये तयार केली जाते. उप्पाडा गाव पूर्व गोदावरी जिल्ह्यातील आंध्र प्रदेश राज्यामध्ये वसलेले हे गाव आहे. ही रेशीम साडी जामदानी तंत्राने हातमागावरती विणली जाते. उप्पाडा हातमागावरील साड्या त्यांच्या अनोख्या आणि सुंदर डिझाईन्ससाठी अतिशय प्रसिद्ध आहेत. या साडीचे अगदी हलके आणि गुळगुळीत पोत असते व ही साडी वजनाने देखील हलकी असते. उप्पाडा जामदनी साडी कुठल्याही कार्यक्रमांमध्ये नेसण्यासाठी अतिशय उत्तम असतात. या साडीला भौगोलिक स्थानदर्शक (GI tag) म्हणून मान्यता मिळालेली आहे.
उप्पाडा जामदानी साडीचा इतिहास | History of Uppada Jamdani Saree
उप्पाडा साडीचा इतिहास 300 वर्ष जुना आहे. जामदानी हा पारसी शब्द आहे. जाम म्हणजे फुल आणि दाणी म्हणजे फुलदाणी असा होतो. जामदानी विणकाम हे बांगलादेशी विणकाम तंत्र आहे. अठराव्या शतकात गोदावरी जिल्ह्यातील उप्पाडा येथे स्थानिक कारागिरांद्वारे जामदानी तंत्राने साडी विणण्यास सुरुवात झाली. अनेक राजघराण्यांनी या साडी विणकामाला आश्रय दिला. उप्पाडा जामदानी साडी विणकामाच्या पद्धतीला पिठापुरम आणि बोबिली या ठिकाण च्या राजांनी देखील संरक्षण दिले होते. 1972 मध्ये उप्पाडा साडी विणकामाला सरकारी मान्यता प्राप्त झाली.
उप्पाडा जामदानी साडीचे प्रकार | Types of Uppada Jamdani Sarees
- उप्पाडा जमदानी साडी ( Uppada Jamdani Saree ) – जामदानी साडी ही पारंपारिक विणलेली उप्पाडा जमदानी साडी आहे यामध्ये जामदानीचे पारंपारिक नक्षीकाम साडीवरती तयार केले जाते.
- बांधणी उप्पाडा साडी (Bandhani Uppada Saree)– बांधणी उप्पाडा साडी या प्रकारामध्ये पारंपरिक उप्पाडा फॅब्रिक वरती बांधणीचे डिझाइन्स तयार केले जातात. या साडीवरील डिझाईन बांधणी तंत्राने तयार केले जाते.
- इकत उप्पाडा बॉर्डर साडी ( Ikkat Uppada Border Saree ) – इकत उप्पाडा बॉर्डर साडी ही उप्पाडा फॅब्रिक पासून तयार केली जाते आणि या साडीच्या बॉर्डरवर इकत तंत्राचे विणकाम तयार केले जाते.
- बनारसी उप्पाडा सिल्क साडी ( Banarasi Uppada Silk Saree) – बनारसी उप्पाडा सिल्क साडी ही उप्पाडा साडीचा एक सुंदर प्रकार आहे. उप्पाडा फॅब्रिकवर बनारसी विणकाम करून अतिशय सुंदर डिझाइन तयार केली जाते.
- प्लेन उप्पाडा पोचमपल्ली पट्टू साडी ( Plain Uppada Pochampally Pattu Sarees) – प्लेन उप्पाडा पोचमपल्ली पट्टू साडीवर कुठल्याही प्रकारचे विणकाम केलेले नसते. ही साडी संपूर्ण प्लेन असते आणि बॉर्डरवर पोचमपल्ली पट्टू साडीवरील डिझाइन तयार केलेली असते. उप्पाडा जामदानी साडीचा अतिशय सुंदर प्रकार आहे.
उप्पाडा जामदानी साडीचे वैशिष्ट्ये | Features of Uppada Jamdani Saree
- पूर्वी उप्पाडा साडी तयार करण्यासाठी सुती धागे वापरले जात होते. बदलत्या काळानुसार हळू हळू रेशीम धाग्यांचा वापर केला जाऊ लागला. सोन्याच्या आणि चांदीच्या जरीचा देखील वापर केला जाऊ लागला.
- उप्पाडा साडी कापूस आणि रेशीम या दोन्हींच्या मिश्रणातून तयार केली जाते.
- दैनंदिन वापरासाठी किंवा विशिष्ट कार्यक्रमासाठी या सड्या अतिशय उत्तम असतात.
- स्थानिक भाषेत जामदानी विणकाम पद्धतीला “अनी बुट्टा” असे म्हणतात. “अनी” म्हणजे “शेड”.
- जामदानी विणकामासाठी जाला तंत्र देखील वापरले जाते. अलीकडील काळामध्ये जॅकवर्ड तंत्राने साडी उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
- उप्पाडा सीडीवरील डिझाइन्स मध्ये अंधारपदेशमधील स्थानिक प्रचलितनक्षीकामाचा समावेश करण्यात आला. ज्यमुळे साडीच्या डिझाइन मधील वेगवेगळ्या श्रेणी तयार होऊ लागल्या.
- या साडीवरील डिझाइन्स मध्ये भौमितिक आकार, पाने, फुले, इत्यादी तयार केले जातात.
- जामदानी साडी विणकामात कौशल्य आणि अचूकता आवश्यक आहे, विणकर अत्यंत काळजीपूर्वक आणि तपशीलाकडे लक्ष देऊन प्रत्येक साडी बारकाईने तयार करतात.
- उप्पाडा आणि त्याच्या आसपासच्या भागांमध्ये सुमारे ३००० यंत्रमाग जामदानी साडीचे उत्पादन करतात.
- उप्पाडा सिल्क साड्या विविध रांगांमध्ये आणि डिझाइन्स मध्ये देखील उपलब्ध आहेत.
- उप्पाडा साडी विणण्यासाठी १० दिवस ते २ महिने इतका कालावधी लागतो. साडीवरील विणकामावर देखील साडी विणण्याचा कालावधी ठरतो.
- उपडा साडी विणकामासाठी 2 – 3 विणकरांना दिवसातील 10 तास साडी विणण्यासाठी घालवावे लागतात.
- उप्पाडा साडी विणण्यासाठी बंगळुरू भागामध्ये तयार केलेले रेशीम वापरतात.
शुद्ध उप्पाडा जामदानी साडी कशी ओळखायची? | How to identify a pure uppada jamdani saree?
- कारागिरांच्या अद्वितीय कलाकुसरीमुळे उप्पाडा जामदानी साडी दोन्ही बाजूनी अगदी एकसारखीच दिसते.
- उप्पाडा साडीची अगदी बारीक घडी होते आणि ती इतकी छोटी असते कि ती काडीपेटी मध्ये देखील सहज बसू शकते.
- विणकामाच्या अनोख्या पद्धतीमुळे या साड्या अर्धपारदर्शक असतात.
उप्पाडा साडीची काळजी कशी घ्यावी | How to take care of uppad jamdani saree
- साडी नेहमी कोरड्या जागी ठेवावी.
- उप्पाडा जामदानी साडी सध्या पाण्यामध्ये अगदी हलक्या हाताने न रगडता धुवावी.
- गरम पाणी आणि स्ट्रॉंग डिटर्जेंट टाळावे.
- या साड्या डायरेक्ट सूर्यप्रकाशात सुकवायला टाकू नये, साडी नेहमी सावलीतच सुकवावी.
- साडीवरती चुकून डाग पडल्यास डाग काढून टाकण्यासाठी व्हाईट टूथपेस्टचा वापरू शकता.
उप्पाडा साडीची किंमत | Uppada Saree Price
उप्पाडा जामदानी साडीची किंमत ही 5,000 पासून ते 80,000 पर्यंत असू शकते. बऱ्याच महिला लग्नासाठी खास ऑर्डर देऊन साडी तयार करून घेतात. आणि विशेष सोन्याच्या किंवा चांदीच्या साडीची किंमत हि २-३ लाखांपर्यंत असू शकते.
Leave a comment